Home » Jobs & Education » Essay Writing » आत्मनिर्भर भारत काळाची गरज मराठी निबंध । Aatm Nirbhar Bharat Nibandh Marathi

आत्मनिर्भर भारत काळाची गरज मराठी निबंध । Aatm Nirbhar Bharat Nibandh Marathi

आजच्या या लेखात आपण आत्मनिर्भर भारत काळाची गरज, Aatm Nirbhar Bharat या विषयावर एक निबंध बघू. आत्मनिर्भर भारत काळाची गरज या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी इयत्ता १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, आणि ११, १२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

Aatm Nirbhar Bharat या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

आत्मनिर्भर भारत काळाची गरज मराठी निबंध । Aatm Nirbhar Bharat Nibandh Marathi

आत्मनिर्भर म्हणजे आपण म्हणजेच एखादी व्यक्ती, एखादा देश आपल्या गरजा,तसेच मागण्या पुर्ण करण्यासाठी कोणा इतर देशावर अवलंबुन न राहता त्यांच्याकडे कोणतीही मागणी न करता स्वताच स्वताच्या देशातील नागरीकांच्या मुलभुत गरजा पुर्ण करतो यालाच आत्मनिर्भर होणे असे म्हणतात.

आपला भारत देश हा प्राचीन काळापासुनच आत्मनिर्भर आहे.कारण इथे सर्व वस्तु स्वता तयार देखील केल्या जातात आणि आपल्या देशाच्या हेतुसाठी त्याचा योग्य तो उपयोग देखील केला जातो.कारण ह्या अभियानाचा मुख्य हेतुच तो आहे.

भारतातील संसाधनांच्या मदतीने तयार केल्या गेलेल्या वस्तुंचा आपल्या भारतामधेच वापर करणे,उपयोग करणे तसेच भारतातील युवा पिढीला ह्या कामामध्येच रोजगार उपलब्ध करून देणे, गरीबांना पर्याप्त अन्नसुविधा प्राप्त करून देणे हा देखील मुख्य हेतू हे अभियान राबवण्यामागचा आहे सरकारचा होता.

आणि कोरोना महामारीच्या काळात जेव्हा इतर देशातील वस्तुंची आयात बंद झाली होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल फाँर व्होकल चा नारा देणे सुरू केले होते.याचा अर्थ असा होता की आपल्या देशात बनलेल्या वस्तुंचाच वापर आणि प्रचार देखील भारतातील सर्व नागरीकांनी करावा असे जाहीर आवाहनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना केले होते.

आत्मनिर्भर भारत हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेले हे अभियान आहे.आत्मनिर्भर भारत ही एक आर्थिक साहाय्य योजना आहे.जिचा उपयोग भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबुत तसेच बळकट करण्यासाठी,प्रत्येक नागरीक स्वयंनिर्भर होण्यासाठी,योग्य योजना आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हा ह्यामागचा मुख्य हेतु होता.

भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबुत होण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी आत्मनिर्भर व्हायला हवे. असा हा आत्मनिर्भर भारत योजनेचा मुळ हेतु आहे.कारण ऐन कोरोना महामारीच्या काळात खुप जणांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. म्हणुन आत्मनिर्भर भारत काळाची मुख्य गरज आता निर्माण झाली आहे याची जाणीव आपल्या सर्वाना देखील झाली आहे.

ह्या संकल्पणेमागचा मुख्य अर्थ असा देखील आहे की आपला भारत देश संपन्न तसेच समृदध तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण आत्मनिर्भर बनुन त्यात आपले मोलाचे योगदान देऊ. कारण आज कोरोना महामारीच्या जाळयात इतर देशांसोबतच आपला भारत देश देखील आज अडकलेला आहे.अशा अटीतटीच्या परिस्थितीत कोणतीही पर्वा न करता आपल्या क्षमतांचा वापर करून आपल्या देशाला एका वेगळया उंचीवर नेण्याचे काम आपण सर्व भारताचे नागरीक करू शकतो.यात कोणतीच शंका नाही.

आपण आत्मनिर्भर होणे काळाची गरज का आहे?

आपण आत्मनिर्भर होणे का गरजेचे आहे हे समजून घेण्यासाठी आपण कोरोना महामारीचेच उदाहरण घेऊ जेव्हा आपल्या भारत देशात अचानकपणे कोरोना व्हायरसने प्रवेश करून थैमान घालणे सुरू केले तेव्हा 

ह्या कोरोना महामारीच्या काळात लाँकडाऊन लागल्यामुळे आपले सर्व उद्योग धंदे बंद पडले होते.देशाची सर्व अर्थव्यवस्था रूग्णांना बरे करण्यात लागली होती.आपल्याकडे त्यावर तोडगा म्हणुन पाहिजे तेवढी औषधे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला जुन्या औषधांचा वापर रूग्णांना बरे करण्यासाठी करावा लागला होता.

आणि ह्याच कोरोना महामारीच्या काळात कित्येक जणांना आर्थिक मंदीमुळे तसेच लाँकडाऊनमुळे घरीच बसावे लागले होते.पण याच लाँकडाऊनच्या काळात ज्यांना डिजीटली कामे करत येतात.त्यांना घरबसल्या 

लँपटाँप तसेच कंप्युटरवर आपली सर्व कामे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून देखील एकदम व्यवस्थित करता येत होते.पण ह्याच काळात काही जणांना तर आपली नोकरी देखील गमवावी लागली होती.अशावेळी खुप जण बेरोजगार होऊन बसले होते.याला कारण म्हणजे आपण उदरनिर्वाहाच्या एकाच संसाधनावर अवलंबुन राहिलो आणि ते एक संसाधन बंद झाल्यावर आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणता पर्यायच उरलेला नव्हता.म्हणजे नोकरी हाच एक शेवटचा आणि एकमेव पर्याय बहुतेक जणांकडे होता.त्यामुळे खुप जणांना ह्या काळात अडचणींना देखील सामोरे जावे लागले होते.

म्हणजेच सरकारला तसेच प्रशासनाला दोष देत न बसता ह्या डिजीटल युगात आपण डिजीटल पदधतीने पैसा कसा कमवायचा हे शिकणे किती आवश्यक झाले आहे हे आपल्याला ह्या काळात शिकायला देखील मिळाले होते.कारण जेव्हा कोरोना व्हायरसमुळे सर्व कामकाज दुकाने,व्यवसाय, धंदे बंद पडले होते.त्यावेळी फक्त डिजीटल माध्यमातुन चालणारे सर्व व्यवहार सुरळीत चालू होते.कोणी ब्लाँगिंग करून आपला उदरनिर्वाह करत होते.तर कोणी युटयुब चँनल वगैरे चालवून आपल्या सर्व गरजा पुर्ण करत होते.म्हणजेच खुप जणांनी डिजीटल पदधतीचा अवलंब करून आत्मनिर्भरतेकडे पाऊल देखील टाकले होते.

आणि ज्या व्यक्तींनी ह्या काळात नशीबाला तसेच सरकारला दोषारोपन करण्यापेक्षा ह्या अडचणीच्या काळाला सुवर्णसंधीचे रूप प्राप्त करून दिले.आणि डिजीटल पदधतीने काम करणे शिकुन घेतले त्यांना कोणतीही अडचण ह्या काळात आलेली आपणास दिसून येत नाही कारण त्यांनी संकटालाच संधीचे स्वरूप देऊन नवीन बदलाचा स्वीकार करून डिजीटल माध्यमाने कामे करणे शिकुन घेतले होते.आणि ह्यालाच म्हणतात खरे आत्मनिर्भर होणे.म्हणजेच कोणालाही दोषारोपन न करत बसता तसेच कोणावरही कुठल्या मदतीसाठी अवलंबुन न राहता आहे त्या परिस्थितीची जबाबदारी आपण स्वता स्वीकारायला हवी

आणि अशाच पदधतीने परिस्थितीला दोष न देता,कोणावर विसंबुन न राहता आपल्या भारताचा प्रत्येक नागरीक हा आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासात त्याने नवीन तंत्रज्ञानाचा देखील खिलाडीवृतीने स्वीकार केला पाहिजे.आणि डिजीटल युगात हळुहळु का होईना पाऊल टाकलेच पाहिजे आणि डिजीटल पदधतीने व्यवहार करणे,नोकरी तसेच व्यापार धंदे करणे शिकुन घ्यायला हवे जेणेकरून भविष्यात पुन्हा कधी लाँकडाऊनची वेळ उदभवली तर मागील काही महिन्यात तसेच एक दोन वर्षांमध्ये पैशांसाठी,नोकरी,व्यवसायासाठी आपली जी परवड झाली ती अजिबात पुढे होणार नाही.आणि हीच आपल्या आजच्या आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी काळाची मुख्य गरज देखील आज बनलेली आहे.

आत्मनिर्भर भारत होण्याचे फायदे :

  • भारत आत्मनिर्भर झाला तर आपल्या देशातील व्यवसाय तसेच उद्योगात अधिक वाढ होईल.
  • आपल्या देशाला इतर देशांची कुठलीही आर्थिक मदत घेण्याची गरज भासणार नाही.
  • आपल्या देशात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील ज्याचा लाभ तरुण पिढीला घेता येईल आणि त्यांची बेरोजगारी देखील दुर होण्यास मदत होईल.
  • आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती देखील अधिक मजबुत तसेच भक्कम होईल.

अशा पदधतीने आज आपण आत्मनिर्भर भारत काळाची गरज हा निबंध पूर्ण केला केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *