Home » Jobs & Education » Essay Writing » कोरोना पिडीताची आत्मकथा (कोरोना ग्रस्तांचे मनोगत) मराठी निबंध | Autobiography Of Corona Victim Essay in Marathi

कोरोना पिडीताची आत्मकथा (कोरोना ग्रस्तांचे मनोगत) मराठी निबंध | Autobiography Of Corona Victim Essay in Marathi

Autobiography Of Corona Patient Essay in Marathi म्हणजे कोरोना पिडीताची आत्मकथा किंवा कोरोना ग्रस्तांचे मनोगत या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

कोरोना पिडीताची आत्मकथा मराठी निबंध | Autobiography Of Corona Patient Essay in Marathi

आपण येथे कोरोना पिडीताची आत्मकथा या विषयावर मराठी निबंध तीन प्रकारे बघणार आहोत, १००, २०० आणि ३०० शब्दांत.

कोरोना ग्रस्तांचे मनोगत | कोरोना पिडिताची आत्मकथा मराठी निबंध [१०० शब्दांत]

मी तर इतकी काळजी घेत होतो, इतकं घाबरून घरच्या बाहेर न निघूनही मला कोरोना झाला….आणि मी आज तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे.

मला जेव्हा कळले की मी पॉझीटिव्ह आलो…..अर्थातच मला कोरोना झाले. माझे नाव अरुण आहे मी एक इंजिनिअर आहे. जेव्हापासून covid-19 आला आहे तेव्हापासून माझे काम घरी बसून चालू आहे. मी खूप काळजीही घेत होतो पण काय झाले कुणास ठाऊक मला पण हा आजार झाला.

जेव्हा मला दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा मला बाहेरची परिस्थिती कळली की, लोकं किती मोठ्या संकटातून जात आहेत. रोज कितीतरी लोक मरतात आणि कितीतरी लोकं या कोरोनाचं शिकार होता. फक्त आणि फक्त स्वतःच्याच निष्काळजीपणाने………

कोरोना काय आहे, कसा होतो अन् कसा कमी होतो याचा संपूर्ण ज्ञान होता मला…..मी न घाबरता या आजाराचा सामना केला आणि या आजारावर मात करून घरी परतलो……

तुम्ही पण लक्षात ठेवा…….घाबरु नका, भिऊ नका…..सामना करा……आणि जागरूक राहा.

कोरोना ग्रस्तांचे मनोगत | कोरोना पिडिताची आत्मकथा मराठी निबंध [२०० शब्दांत]

पोटासाठी मी आज बाहेर पडले, मार्केट मधून भाजी आणि थोड राशन घेऊन यावे म्हणून……घरी येताच २ दिवसात आजारी पडले……मला फक्त एका गोष्टीची भीती वाटत होती की, माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला पण संकटे भोगावी लागणार……

माझे नाव सरिता आहे. मी पुण्याची राहणारी एक सर्वसाधारण गृहिणी आहे. तुम्हाला ते माहीतच आहे, आजच्या काळात कोरोना मुळे किती लोक संकटात आलेले आहेत. पोटासाठी माणूस हताश झाले आहे. तशीच मी पण झाले होते अन् काय……..झाले मलाही कोरोना……

मी एका चांगल्या नागरिकाचे कर्तव्य लक्षात घेत दवाखान्यात गेले आणि तिथे दाखल झाले आणि या आजारावर उपचार घेऊ लागले. रोज जितके लोक या आजाराने मारायचे तितकेच या आजारामुळे इथे येत असत………….

काही लोक या आजाराला घाबरून दवाखान्यात येतच नसे आणि जेव्हा खूप जास्त व्हायचे तेव्हा दाखल होण्यास यायचे आणि जीव गमवायचे. पण मी त्यातली नव्हते मला माझ्या मुलांसाठी अन् कुटुंबासाठी जगायचे होते.

मला उपचार घेत घेत जवळ जवळ 4 दिवस होत आले होते आणि माझ्या बाजूच्या पलंगावर एक २४-२५ वयाचा मुलगा………त्याचे दुःखद निधन झाले. आम्ही जितके त्या वार्डमध्ये तितक्या सगळ्यांनी हंबरडा फोडला कारण तो मुलगा आमच्यापैकी वयाने सगळ्यात लहान होता …..

अखेर मी त्या आजारावर मात केली…शेवटी मी जिंकले अन् परत घरी आले.

अशी होती माझी आत्मकथा…….

कोरोना ग्रस्तांचे मनोगत | कोरोना पिडीताची आत्मकथा मराठी निबंध [३०० शब्दांत]

सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता आणि मला भीती वाटू लागली, आता झाला मला कोरोना झाला आणि आता मी मरणार…….

नमस्कार मित्रांनो, मी उज्वल……उज्वल पाटील….मी एक किरणाचालक आहे. माझी स्वतःची किराणा मालाची दुकान आहे. असल्या लॉकडाऊन मधे पण मी लोकांच्या गरजेसाठी, लोकसेवेसाठी काम करत होतो.

मला कोरोना होण्याची भीती होती पण, मी काळजी घेत घेत दुकान चालवत होतो. अन् काय ज्याची भीती होती तेच झालं……मी covid-19 चा रुग्ण झालो…..अर्थात मला ज्याची भीती होती तेच झाले….

मला कोरोना झाले अन् मला महानगरपालिकेच्या अंबुलन्स मधे बसवून दवाखान्यात आणले आणि मी कोरोना पीडित झालो……..माझ्या सोबत बरेच लोक होते ज्यांना माझ्या सारखा रोग झाला होता……

काहींना खूप जास्त झाले होते, काही साधारण कोरोना झालेला होता आणि काही तर त्याच दवाखान्यातले कर्मचारी होते जे माझ्या सारख्या पीडितांची सेवा करत करत त्यांनाच हे रोग झाले…

माझ्या वार्ड मधे खूप सिरीयस पेशंट्स होते. मला खूप भीतीही वाटू लागली. मला त्यांना बघून, त्यांची अवस्था बघून खूप रडू येत होते. एकतर घरून कोणी सोबत नव्हते, एकट्याने सगळे सहन करायचे आणि इतकेच नाही तर आजूबाजूचे जे मित्र बनू लागले होते ते मरू लागले.

पण मला एक गोष्ट कळतं नव्हती, माझ्या वार्ड मध्ये एक आजी होत्या त्याची तब्येत खूप हलाखीची होती. त्यांना कोरोनाचा खूप त्रास होत होता. तरी त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत नव्हती. ज्यांना बघेल त्यांना त्या हसून बोलायच्या, सगळ्यांना भिऊ नकोस म्हणून सांगायच्या.

त्या माझ्यासोबतच तिथे आल्या होत्या, आणि त्यांची तब्येत सुधरत होती आणि माझी खूप मोठ्या वेगाने बिघडत होती. एके दिवशी त्या आजी माझ्या जवळ आल्या, अन् माझ्या डोक्यावरून हाथ फिरवत म्हणाल्या बाळ……..तू का भित आहेस…..तू जितका जास्त भिऊन राहशील तितका तू आजरी होशील…….

जगण्याची उमेद सोडू नकोस……..बरा होशील….मी मरेन आता….असा विचार तर अजिबात करू नकोस…..मला बघ…मी खूप आजारी होते, पण मला अजून खूप जगायचे आहे अस मनात ठरवले अन् बघ…..मला माझे आजार कमी होत आहे……

मला त्या आजीने विचार करण्यास भाग पाडले की, खरंच माणसे भीतीपोटी तर मरत नाहीत ना……हा आजारच असा आहे की जास्त घाबरून जायचे नाही, भिऊन माणसांना जास्त तर होत नाही…….

आणि दुसऱ्या दिवशी त्या आजी बऱ्या होऊन घरी गेल्या. मी मनाशी ठरवले की त्या आजी करू शकतात तर मी का नाही …….मी बरा होऊनच घरी जाईन…..

आणि काय झाले पाहा……आज मी तुमच्या समोर माझी आत्मकथा सांगत आहे…..अर्थातच मी कोरोना पॉझिटिव्ह वरून कोरोना निगेटिव्ह झालो…….


तर मित्रांनो Autobiography Of Corona Patient Essay in Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *