Home » Jobs & Education » Essay Writing » मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध लेखन । आरशाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Autobiography Of Mirror In Marathi

मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध लेखन । आरशाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Autobiography Of Mirror In Marathi

आजच्या या लेखात आपण मी आरसा बोलतोय आत्मकथन, आरशाचे आत्मवृत्त, Autobiography Of Mirror In Marathi या विषयावर एक निबंध बघू. 

मी आरसा बोलतोय आत्मकथन या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

आरशाचे आत्मवृत्त या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध लेखन | आरशाचे आत्मवृत्त (Autobiography Of Mirror In Marathi)

आपल्या रोजच्या जीवणात आपल्याला अत्यंत छोटीशी पण उपयुक्त अशी वस्तु म्हणजे आरसा.जिच्यात आपण आपले प्रतिबिंब पाहत असतो.आपण आपली वेशभुषा,केशभुषा कशी दिसते आहे?तसेच आपले सौंदर्य किती खुलून दिसते आहे?हे पाहण्यासाठी रोज आरशाचा वापर आपण करत असतो.

रोजप्रमाणे बाहेर जाण्यासाठी निघालो असताना तोंड हात पाय धुवून मस्तपैकी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो.आणि बाथरूममधुन डोक्यावर तोंडावर थंड पाण्याचा शिडकाव करून,रुमालाला हात पाय पुसुन रोजप्रमाणे आरशासमोर उभा राहिलो.आणि मी कसा दिसतो आहे माझी कटिंग,दाढी वगैरे जास्त वाढली तर नाहीये ना हे आरशात बघत होतो.

तेवढयात मला अचानक कोणाचा तरी खळखळुन हसण्याचा आवाज ऐकु आला.मग मी माझ्यावर एवढ कोण जोरजोरात हसते आहे? हे जाणुन घेण्यासाठी इकडे तिकडे पाहु लागलो.पण आजुबाजुला मला कोणीच दिसुन आले नाही.

मग पुन्हा आरशाकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या समोरचा आरसाच माझ्याकडे बघून जोरजोरात हसत होता.

मग मी त्याला हसण्याचे कारण विचारण्या अगोदरच माझ्याशी तो बोलु लागला आणि तो मला म्हटला हे बघ प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतावर आपल्या सौंदर्यावर प्रेम असते.आणि ते असालयाच हवे प्रत्येकाला वाटते की आपण इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसावे यात माझी कोणतीच हरकत नाही.

पण रोज तु असा स्वताची दाढी किती वाढली आहे?कटिंग किती वाढली आहे?चेहरा कसा दिसतो आहे?कपडे कसे दिसता आहे? हे रोज तु माझ्यासमोर उभा राहुन चेक करत असतो.पण तु कधी याचा विचार केलास का तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे दिवसभरात मला रोज किती त्रास होतो?

रोज तु जेव्हा सकाळी उठुन दात घसण्यासाठी माझ्यासमोर उभा राहतो तेव्हा माझ्यावर तु दात घसत असताना तुझ्या टुथपेस्टचे शिंपडे पडत असतात.आणि तु ते तसेच राहु देतो.मला कधी फडक्याने पुसत सुदधा नाही.आणि स्वताची निगा तर तु इतकी उत्तम ठेवतो दाढी किती वाढली यापासुन तर कटिंग पर्यत सर्वच टापटीप ठेवत असतो.

पण तेवढीच टापटीप तु माझी का बर ठेवत नाहीस माझ्यामुळेच तर तुला रोज तुझी कटिंग किती वाढली आहे?दाढी किती वाढली आहे?चेहरा कसा दिसतो आहे?कपडे कसे दिसता आहे?तुझे पुर्ण व्यक्तीमत्व कसे आणि किती खुलून दिसते आहे तुला हे रोज माझ्यामुळेच कळत असते.

तरी सुदधा तु कधी मला एखाद्या साध्या फडक्याने सुदधा कधी पुसत नसतो.रोजच तर सोड कधी महिन्यातुन एकदा तरी कधी तु मला स्वच्छ करतोस का?

त्यातच तुझी आई येते आणि माझ्यावर तिच्या टिकल्या लावून माझे सौंदर्य नष्ट करत असते.

तुझ्या सौंदर्यात व्यक्तीमत्वात काही कमतरता तसेच उणीव जाणवली तर ती भरूण काढण्यासाठी लगेच हेअरस्टाईल मध्ये कटिंग,दाढी,फेशल करत असतो.नवीन कपडे विकत घेऊन स्वताचे व्यक्तीमत्व टापटीप ठेवत असतो.

पण तुला तुझी हेअरस्टाईल कशी दिसते आहे?दाढी किती वाढली आहे?चेहरा कुरूप दिसतो आहे का सुंदर? परिधान केलेले कपडे तुला शोभुन दिसता आहे का नाही? हे सर्व तुला माझ्यामुळेच बघता येत असते ना!

मग तु स्वताप्रमाणे माझी देखील काळजी का घेत नसतो?का रोज दिवसातुन एकदा तरी मलाही एखादे स्वच्छ फडके घेऊन साफ करत नाही?

तु आणि तुझ्या घरातील सर्व लोक दिवसभरात माझ्यासमोर उभे राहुन किती नट्टापटा करतात कोणी केस विंचरते,कोणी माझ्यासमोर उभे राहुन आपले दाते कोरत बसते किंवा त्यातुन अडकलेली घाण काढत बसते.तर कोणी माझ्यासमोर तासनतास आपले व्यक्तीमत्व शरीरयष्टी कशी दिसते आहे?हे बघत बसतात.

पण एकदा सुदधा कधी तुम्ही मला कपडयाने स्वच्छ पुसत नाही.ही गोष्ट मला तुला बोलायची नव्हती पण आज जेव्हा तु स्वताचा टापटिपपणा चेक करत होता हे बघुन माझ्यातुन हे राहावलेच नाही.म्हणुन मला आज तुला हे सर्व बोलुन दाखवावा लागले.

मान्य करतो मी एक निर्जिव आरसा आहे ज्याच्यात कोणताही जीव नाही.किंवा प्राण नाही.पण भावना तर आम्हाला देखील आहेतच ना फरक फक्त एवढाच आहे तुम्ही मनुष्य तुमच्या भावना,दुख,वेदना बोलून दाखवू शकतात.तुमच्या कृतीतुन,शब्दांतुन त्या एखाद्याकडे व्यक्त करू शकतात पण आम्हाला तसे अजिबात करता येत नाही.निसर्गाने आम्हाला तसे निर्माणच केले नही.म्हणुन आम्हाला तुमचा हा सर्व अन्याय निमुटपणे सहन करावा लागत असतो.

तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवणात नेहमी तुम्हाला आम्ही उपयोगी पडत असतो कधी तुमचे प्रतिबिंब बघण्यासाठी तर कधी तुमचे शारीरीक व्यक्तीमत्व(दात,केस,दाढी,चेहरा,मुखाचे सौदर्य इत्यादी) चेक करण्यासाठी.

पण तुम्ही मनुष्य फक्त तुमच्या गरजेपुरता आमचा उपयोग करता आणि मग आमच्याकडे कधी ढुंकुनही बघत नसतात.दिवसभरात आमच्यावर इतकी धूळ साचत असते तरी एकदा सुदधा तुम्हाला आम्हाला पुसायची सवड नसते.

याचाच अर्थ तुम्ही मनुष्य तुमच्या गरजा तर भागवुन घेतात पण आमच्या स्वच्छतेचा कधी विचार सुदधा करत नसतात.

जेव्हा तुम्ही रस्त्यावरून प्रवास करतात तेव्हा आमच्यामुळेच तुम्हाला मागुन कोणत्या दिशेने कोणते वाहन येते आहे?हे कळत असते.म्हणजेच तुमचा रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी देखील आम्हीच उपयोगी पडत असतो.पण तरी सुदधा तुम्ही मनुष्य एकदाही आमच्या टापटीपतेचा,स्वच्छतेचा विचार करत नसतात.

मला फक्त तुला एवढेच सांगायच आहे स्वताच्या व्यक्तीमत्वाची जशी काळजी घेत असतो त्याचप्रमाणे तु थोडीफार माझी देखील काळजी घेत जा.रोज नाही तर आठवडयात एकदा तरी मला पुसत जा.माझ्यावर काही डाग लागला तर तो पाण्याने स्वच्छ फडक्याचा वापर करून पुसुन टाकत जा.वैयक्तिक तसेच घरातील भांडणामुळे काही राग आल्यावर माझ्यावर काहीही फेकुन मारून माझे सौंदर्य बिघडवत जावू नकोस.

एवढी देखील तु माझी निगा राखली तरी माझ्यासाठी खुप आहे.

शेवटी एकच आशा बाळगतो की माझ्या भावना,दुख खंत,तुमच्यापर्यत पोहचल्या असतील आणि इथून पुढुन तुम्ही सर्व मनुष्य माझी देखील काळजी घ्याल.स्वताप्रमाणे माझ्या पण टापटीप पणाचा विचार कराल.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण मी आरसा बोलतोय आत्मकथन किंवा आरशाचे आत्मवृत्त या मराठी निबंध विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केलं आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या मी आरसा बोलतोय आत्मकथन किंवा आरशाचे आत्मवृत्त या मराठी निबंध विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Autobiography Of Mirror In Marathi निबंध विषयी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

4 thoughts on “मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध लेखन । आरशाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Autobiography Of Mirror In Marathi”

  1. मराठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम बातमी लेखन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *