Home » Jobs & Education » Essay Writing » भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi | Essay On Corruption In Marathi

भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi | Essay On Corruption In Marathi

आजच्या या लेखात आपण Corruption म्हणजे भ्रष्टाचार (Bhrashtachar) या विषयावर एक निबंध बघू. 

भ्रष्टाचार (Bhrashtachar) या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

Essay On Corruption In Marathi या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Nibandh In Marathi | Essay On Corruption In Marathi

भ्रष्टाचार म्हणजेच वाईट तसेच बिघडलेले आचरण असते.भ्रष्टाचार करणारी व्यक्ती ही एक अशी व्यक्ती असते जी अनैतिक तसेच अनुचित कार्य करत असते.

भ्रष्टाचार करणारा व्यक्ती हा आपल्या समाजातील रूढ केलेले नैतिकतेचे नियम तसेच कायदयाचे पालन न करता आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी वाईट तसेच अनैतिक कामे करीत असतो.इतरांची फसवणुक करत असतो त्यांच्याकडुन पैसे लुबाडत असतो.

आज आपला देश हा सुदधा भ्रष्टाचारी लोकांने ग्रासलेला तसेच पिडित आहे.रोज आपल्याला वर्तमानपत्र तसेच बातम्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना प्रसंग वाचायला मिळत असतात.कधी कोणी मोठा अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची वार्ता वाचायला तसेच ऐकायला मिळते तर कधी कोणी संस्था डोनेशनच्या नावाखाली लोकांकडुन पैसे उकळताना आज आपणास दिसुन येते.

आज मोठमोठया महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी तसेच संस्था,कार्यालयात नोकरी मिळविण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला वशिलेबाजी लावावी लागते तसेच नोकरी मिळविण्यासाठी पैसे देखील भरावे लागत असतात.

आज आपण सर्व जण काम करतो ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी,पैसा कमविण्यासाठी पण आज ह्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाला नोकरी शिक्षण प्राप्त करण्यासाठी देखील पैसे भरावे लागत असतात.अशी नामुष्की आज ह्या बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणसावर ओढावलेली आपणास दिसुन येते आहे.

आज संपुर्ण जगात भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा 94 वा क्रमांक लागतो.आणि हा भ्रष्टाचार आपल्याला खुप वेगवेगळया मार्गानी पदधतीने होताना आज आपणास दिसुन येत आहे.

कधी लाच घेणे,कधी वस्तुंचा,पैशांचा काळा बाजार करणे,कमी किंमतीच्या वस्तु अवाढव्य किंमतीत विकणे.पैसे घेऊन इतरांची कामे करून देणे,स्वस्त किंमतीत एखादी वस्तु खरेदी करून महाग किंमतीमध्ये इतरांना विकणे,अवैध्य पदधतीने दारूची विक्री करणे असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार समाजात आज घडुन येताना आपणास दिसुन येत आहे.

आणि यात खासकरून एखादे काम करण्यासाठी लाच घेणे,आपले एखादे काम करून घेण्यासाठी एखाद्याला पैसे देणे,पैसे वाटुन निवडणुकीत निवडुन येणे,पैसे घेऊन एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत निवडुन देणे.हे प्रकार सर्रास घडताना आज आपणास दिसुन येतात.

आणि हे भ्रष्टाचाराचे प्रकार घडण्यामागे अनेक गोष्टी कारणीभुत असतात.जसे की आपल्या मनात असणारी असमाधानी वृत्ती,आपला स्वार्थी स्वभाव,आपल्याला मिळणारी असमान वागणुक.

जेव्हा आपल्या मनात आपल्याला जे प्राप्त झाले आहे त्याबाबद समाधान नसते आपण असमाधानी असतो तेव्हा आपल्या ईच्छा तसेच अपेक्षा कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करण्यासाठी असे अनैतिक मार्ग आपण निवडत असतो.

म्हणजेच आपण अशी चुकीची कामे करत नसतो तर आपल्या कधी न संपत असलेल्या ईच्छा तसेच अवाढव्य अपेक्षा आपल्याला असे अनैतिक मार्गाची निवड करण्यास विवश करत असतात.

भ्रष्टाचार करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे आर्थिक आणि सामाजिक सम्मान प्राप्ती.आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपल्याला समाजात मान तसेच प्रतिष्ठा मिळावी.

पण आज समाजात आपल्याला मान तसेच प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर आपल्या खिशात लक्ष्मीचा वास म्हणजेच पैसा असणे खुप गरजेचे आहे.पण आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आपल्याकडे पाहिजे तेवढा पुरेसा पैसा उपलब्ध नसतो.

ज्यामुळे समाजातील लोक आपल्याला जास्त महत्व देखील देत नसतात.आणि हेच महत्व तसेच मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपण भरपुर पैसा कमविण्याची ईच्छा बाळगतो जेणेकरून समाजात आपल्याला पाहिजे ती इज्जत तसेच मान मिळेल.याचसाठी आपण चुकीचे मार्ग देखील अवलंबायला माघार घेत नसतो.

आता प्रश्न आपल्याला असा पडतो की यावर बंधन लादण्यासाठी आपण काय करू शकतो.समाजात घडत असलेल्या भ्रष्टाचारा सारख्या अनैतिक घटना तसेच प्रसंगांना आळा घालण्यासाठी आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेने भ्रष्टाचारा विरुदध कठोर कायदे तयार केले पाहिजे. 

जेणेकरून कोणतीही व्यक्ती भ्रष्टाचार करताना चारदा विचार करेल की भविष्यात त्याला याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागु शकतात.पण पाहायला गेले तर आज भ्रष्टाचार करण्यासाठी ज्या गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई केली जाते.तो गुन्हेगार त्या गुन्हयापासुन निदोर्ष सुटका करून घेण्यासाठीच भ्रष्टाचार करताना आपणास दिसुन येतो.

म्हणुणच भारतीय न्याय व्यवस्थेने असा अपराध करत असलेल्या व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावली पाहिजे मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा 

एखादा मोठा अधिकारी तसेच कोणी एखादा मोठा सेलिब्रिटी असो.कायद्याचा धाक तसेच एक भीती गुन्हेगारांच्या मनात निर्माण केली पाहिजे म्हणजे ते पुन्हा अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब अजिबात करणार नही.

तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण समाजामध्ये चांगल्या आचरणाचे आणि प्रामाणिकपणाचे फायदे पोहचवायला हवेत.जेणेकरून आपली येणारी नवीन पिढी सुदधा चांगले आचरण आणि नैतिकतेचे पालन करेल.याचसाठी आपण 9 डिसेंबर रोजी आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोध दिन देखील साजरा करत असतो.

जेणेकरून आपल्याला जगभर भ्रष्टाचारा विरूदध जागृती निर्माण करता येईल.आणि भ्रष्टाचाराला थांबवता येईल.कारण भ्रष्टाचार ही फक्त आपल्या भारत देशाची समस्या नसुन समस्त जगाची प्रमुख समस्या आहे जिचे निवारण करणे खुप गरजेचे आहे.

म्हणुन आपण सगळयांनी भ्रष्टाचाराला विरोध करायला हवा.आणि कुठे भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसुन येत असेल तर याची ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात  पोलिसांकडे तक्रार करायला हवी.निमुटपणे गप्प राहुन भ्रष्टाचार होताना पाहत बसु नये.कारण गुन्हा करत असलेल्या व्यक्तीपेक्षा गुन्हा होताना दिसुनही गप्प राहणारा व्यक्ती सगळयात मोठा गुन्हेगार असतो.

अंतिम निष्कर्ष:

अशा पदधतीने आज आपण Corruption म्हणजे भ्रष्टाचार (Bhrashtachar) या विषयावर मराठी निबंधबघितला. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला भ्रष्टाचार निबंध मराठी या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *