Home » Business & Finance » Finance » Cryptocurrency » [अगदी सोप्या भाषेत] ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय? (Blockchain Meaning In Marathi)

[अगदी सोप्या भाषेत] ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय? (Blockchain Meaning In Marathi)

आजच्या लेखात मी तुम्हाला ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय (Blockchain Technology Meaning In Marathi) , ब्लॉकचेन तंत्रज्ञान चा इतिहास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे, ब्लॉकचेन चे प्रकार, ब्लॉकचेन चे उपयोग, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भविष्य या सर्व विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय आहे?

आपल्याकडे जसे घरघुती व्यवहार टिपण्यासाठी एक वही असते त्याच प्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे एक डिजिटल वहीसारखे आहे ज्यात देवाणघेवाण व्यवहार लिहिलेले असतात. आपण करत असलेले देवाणघेवाण व्यवहार हे प्रत्येक ब्लॉक स्वरूपात या डिजिटल लेजर मध्ये साठविलेले असतात आणि त्यांना एकमेकांसोबत जोडलेले देखील असते, त्यामुळे या तंत्रज्ञानाला ब्लॉक-चैन असे म्हणतात. 

सध्या आपण जे बँक आणि त्यातून पैसे पाठविणे यासारख्या गोष्टी करतो, त्यासाठी आपल्याला बँकेशी संबंध येतो. मात्र ब्लॉकचैन तंत्रज्ञान वापरल्यानंतर हे थर्ड पार्टी घटक आपल्याला लागणार नाहीत. आपल्याला आपली माहिती कोणाला द्यायची आहे किंवा कशी द्यायची आहे हे आपण स्वतः ब्लॉकचैन मध्ये ठरवू शकतो. त्यामुळे आपला डेटा हा एखाद्या थर्ड पार्टी कंपनीला मिळण्याची शक्यता फार कमी होते आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान चा इतिहास

आपल्याला बिटकोईन माहिती असेलच? याच बिटकोईनची सुरुवात म्हणजेच ब्लॉकचैनची सुरुवात समजली जाते. याआधी देखील ब्लॉकचैन वापरली गेली मात्र ती तितक्या प्रभावीपणे समोर आली नाही. 2008 मध्ये सतोशी नाकामोटो (नाव अद्याप देखील खरे वाटत नाही) यांनी बिटकोईनची सुरुवात केली. जस मी वर देखील सांगितलं की ब्लॉकचैन च्या माध्यमातून लपवणे खूप सोपे आहे त्यामुळे खरंच बिटकोईनची सुरुवात सतोषी नाकामोटो यांनी केली यामध्ये संभ्रम आहेत. 

ब्लॉकचेन तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे?

आपण सध्या ज्या इंटरनेट विश्वात जगतो आहे त्यामध्ये आपली सुरक्षितता कितपत आहे यावर सतत शंका आहे. परंतु आपल्याला त्यातल्या त्यात थोडेफार सुरक्षित राहायचे असेल तर मग ब्लॉकचैन सुरक्षित आहे. ब्लॉकचैन तंत्रज्ञानात nodes चा समावेश असतो आणि हेच nodes आपले व्यवहार घडवत असतात. आपल्याला जर एखादा व्यवहार करायचा असेल तर त्या व्यवहारासाठी लागणाऱ्या सर्व nodes कडून परवानगी घ्यावी लागेल.  

समजा आपल्याला एखाद्या बँकेचे व्यवहार हॅक करायचे आहेत तर मग आपल्याला त्या बँकेचे एकटे सर्व्हर हॅक केले तरी काम होऊ शकेल. मात्र जर आपल्याला ब्लॉकचैन वरील एखादा व्यवहार हॅक करायचा असेल तर त्यासाठी त्या व्यवहारात वापरात आलेले सर्व nodes हॅक करावे लागतील आणि हे जवळपास अशक्य आहे. ब्लॉकचैन मध्ये अनेक संगणक नेटवर्क च्या साहाय्याने आणि क्लाऊडच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यामुळे तुमचे सर्व व्यवहार आणि कॉम्प्युटिंग अगदी वेगाने ब्लॉकचैन तंत्रज्ञान वापरून होते. 

ब्लॉकचेन चे प्रकार

तसे बघायला गेलं तर ब्लॉकचैन अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले आहे मात्र यात देखील खाजगी (Private) आणि सार्वजनिक(Public) ब्लॉकचेन हे दोन मुख्य प्रकार आहेत.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर खाजगी बँका आणि सार्वजनिक बँका ही संकल्पना डोळ्यासमोर आणा. सार्वजनिक बँकेत कोणताही व्यक्ती एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे टाकू शकतो आणि त्यामध्ये कोणाचेही खाते असू शकते. त्याच प्रमाणे सार्वजनिक म्हणजेच पब्लिक ब्लॉकचैन मध्ये सर्वांना व्यवहार करण्याचे अधिकार असतात. 

याउलट आपण जर एखादी खाजगी बँक घेतली जी फक्त एका संस्थेसाठी काम करते. अशा बँकेतील व्यवहार हे फक्त त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांकडूनचे केले जातात. त्याचप्रमाणे प्रायव्हेट ब्लॉकचैन मध्ये व्यवहार कोण करेल यावर मर्यादा असतात. 

ब्लॉकचेन चे उपयोग

क्रिप्टोकरन्सी – क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकोईन, इथेरियम, शिबा आणि डॉज सारख्या इतरही अनेक डिजिटल करन्सी होय. क्रिप्टोकरन्सी या पूर्णपणे ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आपले सर्व व्यवहार अगदी गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे ब्लॉकचैन तंत्रज्ञान महत्वाचे आहे.

NFT – नॉन फुंजीबल टोकन हे एक क्रिप्टो करन्सी सारखेच नवे रूप आहे. यामध्ये आपण आपल्या कला आपल्या नावाने रजिस्टर करून विक्री करू शकतो. पुढे जाऊन या कलाकृती कितीही लोकांकडून एकमेकांना हस्तांतरित झाल्या तरी देखील त्याच्या खऱ्या मालकाला त्याचा काही प्रमाणात विक्री किंमतीचा मोबदला मिळत असतो. हे सर्व बॅकट्रॅक करण्याचे काम ब्लॉकचैनच्या मदतीनेच शक्य आहे.

Web 3.0 वेब 3.0 हे भविष्यात येणारे तंत्रज्ञान देखील पूर्णपणे ब्लॉकचैन वर आधारित असेल. यामध्ये तुमचा डेटा ब्लॉकसच्या स्वरूपात साठविला जाईल. तुम्हाला इथे पैसे देण्यासाठी आणि घेण्यासाठी डिजिटल करन्सी वापराव्या लागतील. म्हणजे वेब 3.0 हे भविष्यात येणारे ब्लॉकचैन वर आधारित सर्वात चांगले उदाहरण आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भविष्य

आपण वरील मुद्द्यात बघितल्याप्रमाणे भविष्य हे ब्लॉकचैन तंत्रज्ञानाचे आहे. कदाचित ब्लॉकचैन शिवाय दुसऱ्या काही सुविधाजनक तंत्रज्ञानाला सुरुवात होईल मात्र ब्लॉकचैन कायम वापरात असेल. ब्लॉकचैन तंत्रज्ञानाचा वापर हा आपला डेटा सुरक्षितपणे आणि सुलभपणे साठविण्यासाठी आणि पुन्हा वापर करण्यासाठी करता येतो आहे. भविष्यात आपल्या डेटा ची सुरक्षितता ही सर्वात मोठी समस्या असणार आहे. यावर मात करण्यासाठी ब्लॉकचैन हे तंत्रज्ञान कितपत किफायतशीर असेल हे वेळच सांगू शकते.

आशा आहे की आम्ही दिलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञान विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Blockchain Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *