Home » People & Society » Full Form » CEO Full Form in Marathi | सीईओ (CEO) चा फुल फॉर्म काय आहे?

CEO Full Form in Marathi | सीईओ (CEO) चा फुल फॉर्म काय आहे?

तुम्ही खूपवेळा CEO हा शब्द वापरला असेल किंवा ऐकला असेल. परंतु, नक्की CEO म्हणजे काय? CEO चा फुल फॉर्म काय आहे? त्याचा अर्थ, CEO चे कार्य काय असते? तसेच जगातील नामांकित कंपन्यांचे CEO कोण आहेत? हे तुम्हाला माहीत नसेल. तरी आता आपण या लेखात CEO बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सीईओ चा फुल फॉर्म काय आहे? (CEO full form in Marathi)

C Chief (मुख्य)
E Executive (कार्यकारी)
O Officer (अधिकारी)
CEO full form in Marathi
CEO Full Form marathi

CEO चा फुल फॉर्म ‘Chief Executive Officer आहे. मराठी मध्ये CEO ला ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे म्हणतात.

कोणत्याही कंपनी / संस्थेमध्ये संपूर्ण कामाचे व्यवस्थापन करणे. तसेच कंपनी / संस्थेची वाढ (Growth) चांगल्या प्रकारे होण्यासाठी एका मुख्य व्यक्तीला जबाबदारी दिली जाते. त्या व्यक्तीलाच सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हणतात.

थोडक्यात, CEO हा कंपनीचा मुख्य अधिकारी असतो, जो कंपनी किंवा संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये महत्वाची भुमिका बजावतो.

सीईओ म्हणजे काय? (CEO information in Marathi)

मित्रांनो, तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये कोणता ग्रुप प्रोजेक्ट केला असेल, तर त्यासाठी ग्रुप लीडर (Group Leader) असतो. त्याचप्रमाणे, कंपनी / संस्थेचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी CEO असतो. CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी होय.

CEO आपल्या कंपनीच्या कामाची माहिती बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा चेअरमन यांना देत असतो. तसेच त्याला कंपनीच्या प्रगतीसाठी हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी असते.

सीईओ ची कार्ये (CEO Work in Marathi)

  • कंपनीच्या हिताचे व महत्वाचे निर्णय घेणे.
  • नियमांमध्ये आणि काही गरज पडल्यास कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये बदल करणे.
  • कर्मचारी व अधिकारी यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे.
  • कंपनीच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • कंपनीच्या उत्पादनावर आणि वस्तूंच्या गुणवत्तेवर भर देणे.
  • संस्थेच्या संचालक मंडळ किंवा मालक आणि कर्मचाऱ्यांच्या मधील एक दुवा म्हणून काम करतो.
  • संचालक मंडळाला शिफारस आणि सल्ला देणे.
  • तसेच संचालक मंडळाला सदस्यांच्या निवडी मधे व मूल्यमापनासाठी मदत करणे.
  • कंपनीला विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • CEO कडे कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापनाची ही जबाबदारी असते.

नामवंत कंपन्यांचे सीईओ ( CEO of Popular Companies )

कंपनीचे नावसीईओ
ॲपलटीम कूक
गुगलसुंदर पीचाई
मायक्रोसॉफ्टसत्या नाडेला
टेस्ला, स्पेस एक्स, न्युरा लिंक आणि द बोअरिंगइलोन मस्क
ॲमेझॉनअँडी जस्सी
मेटा (फेसबुक)मार्क झुकरबर्ग
अलिबाबाडॅनिएल झांग
इन्फोसिससलील पारीख
ट्विटरजॅक दोर्से
रिलायन्समुकेश अंबानी

हे सर्व नामवंत कंपन्यांचे सीईओ असून ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कार्य करीत आहेत.

इतर काही फुल फॉर्म आणि त्यांचे मराठी मध्ये अर्थ (Other Full Form with meaning in Marathi)

महत्वाची पदेफुल फॉर्म /मराठी अर्थ
Deputy CEO meaning in MarathiDeputy Chief Executive Officer
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
Managing director meaning in Marathiव्यवस्थापकीय संचालक
Founder meaning in Marathiसंस्थापक
Chairman meaning in Marathiअध्यक्ष / चेअरमन
Chief meaning in Marathiप्रमुख / मुख्य
President meaning in Marathiराष्ट्राध्यक्ष / राष्ट्रपती

Frequently Asked Questions (FAQ) On CEO In Marathi

CEO ला पगार किती असतो?

सीईओ या पदासाठी पगार प्रत्येक कंपनी नुसार वेगवेगळा असतो. काही कंपन्या एक लाख तर काही कंपन्या एक कोटी पर्यंत पगार देतात.

CEO बनण्यासाठी किती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

अकाउंटिंग, बिझनेस, इकॉनॉमिक्स, फायनान्स किंवा मॅनेजमेंट मधील बॅचलर डिग्री ही CEO बनण्यासाठी पात्रता आहेत. तसेच MBA उत्तीर्ण असावे. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राध्यान दिले जाते.

CEO मध्ये कोणकोणते गुण आवश्यक असतात?

CEO मध्ये विनम्रता, समजूतदारपणा, प्रेरणादायी, नेतृत्वगुण तसेच संवाद कौशल्य सारखे गुण आवश्यक असतात.

MD चा फुल फॉर्म काय आहे?

Doctor of Medicine तसेच Managing Director हे MD चे फुल फॉर्म आहेत.

हिंदीमधे CEO चा फुल फॉर्म काय आहे?

CEO चा फुल फॉर्म “Chief Executive Officer” होतो. हिंदी भाषेमधे मुख्य निष्पादन अधिकारी असे म्हणतात.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण CEO Full Form in Marathi जाणुन घेण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या CEO Full Form in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *