Home » Jobs & Education » Essay Writing » [कॉम्पुटर] संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Computer Shap Ki Vardan Essay In Marathi

[कॉम्पुटर] संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Computer Shap Ki Vardan Essay In Marathi

आजच्या या लेखात आपण संगणक शाप की वरदान, Computer Shap Ki Vardan, कॉम्पुटर शाप की वरदान या विषयावर एक निबंध बघू. 

संगणक शाप की वरदान या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

Computer Shap Ki Vardan या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Computer Shap Ki Vardan Essay In Marathi

आज पाहावयास गेले तर सर्व जग आपल्याला संगणकावर आलेले दिसुन येते आहे.नोकरीपासुन ते व्यवसाय तसेच शिक्षणापर्यत सर्वच काही आता डिजीटल झालेले आपणास दिसुन येते.त्यामुळे आज जाँब देखील आँनलाईन झाले आहेत.व्यवसायाची देखील पदधत बदलते आहे.पहिल्याप्रमाणे आता कोणताही उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याला दुकानात जाऊन बसण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये.संगणकामुळे आज जग इतके वेगवान झाले आहे की आपण कोणतेही काम तसेच व्यवसाय आता संगणकाद्वारे घरबसल्या करू शकतो.

पण ज्याप्रमाणे जग संगणकाच्यामुळे सुविधायुक्त अणि जलद झाले आहे.त्याचप्रमाणे संगणकाचे जगावर काही दुष्परिणाम देखील झालेले आपणास पाहावयास मिळतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या विषयावर संगणक शाप की वरदान ह्याच्यावर चर्चा करणार आहोत.आणि ह्या चर्चेत आपण संगणकामुळे आपल्याला झालेले फायदे,आपल्याला झालेले नुकसान तसेच त्यावर आपण काय उपाययोजना करायला हवी? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

संगणकामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत?

 • संगणकामुळे आज आपल्याला खुप फायदे झाले आहेत जसे की आज संगणकाच्या मदतीने आपण कोणतेही काम झटक्यात काही क्षणांत करू शकतो.जे काम करण्यासाठी आपल्याला दहा लोकांची आवश्यकता असते ते काम एकटा संगणक करण्याची क्षमता ठेवतो.
 • एवढेच नाही तर आज कोणताही आर्थिक व्यवहार तसेच हिशोब क्षणार्धात संगणकाचा वापर करून आपण करू शकतो.
 • संगणकाचा वापर करून कोणतेही अवकाशयान नियंत्रित करू शकतो.संगणकाचा वापर करून आपण जगातील कुठलीही माहीती प्राप्त करू शकतो.
 • बँकेतील शाळा,महाविद्यालयातील,शासकीय कार्यालयांतील,मोठमोठया कंपन्यांमधील व्यवहार देखील संगणकावरच चालत असलेले आपणास दिसुन येतात.विदयाथ्यांची सर्व शैक्षणिक माहीती,त्यांचे नाव,रोल नंबर हे शाळा,महाविद्यालयात संगणकातच साठवून ठेवले जात असतात.
 • तसेच कोणताही मोठयातील मोठा हिशोब संगणकाद्वारे आज आपण एकदम क्षणार्धात करु शकतो.
 • आज कोणाला नोकरी हवी असेल तर तो आधी संगणकाचा वापर करून आँनलाईन पदधतीने जाँब कुठे प्राप्त होईल याची चौकशी करत असतो.हे सर्व आज संगणकामुळेच शक्य झालेले आपणास दिसुन येते.
 • एवढेच नाहीतर आज कोणाला एखादा व्यवसाय टाकायचा असेल तसेच आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर तो पहिले संगणकाचा वापर करून आँनलाईन आपला व्यवसाय लोकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.
 • आज जा़ँब,शाँपिंग,व्यवसाय,व्यवसायाची मार्केटिंग,आर्थिक व्यवहार,शिक्षण देखील आज प्रत्येकजण आँनलाईन संगणकाद्वारे करताना आपणास दिसून येत आहे.एवढे आज आपले जग संगणकाने व्यापलेले आहे.

असे देखील म्हणायला काहीच हरकत नाही की आज सर्व जग संगणकावर चाललेले आहे.संगणक नसणे ही कल्पणा देखील लोकांच्या आयुष्यात मोठी चिंतेचा विषय ठरू शकतो.कारण आज सर्व जनजीवन संगणक तसेच इंटरनेटवर अवलंबुन आहे.कारण खुप लोकांची रोजीरोटीच संगणक तसेच इंटरनेट असलेली आपणास दिसुन येते.

संगणकामुळे आपल्याला कोणकोणते नुकसान झाले आहे?

आज संगणकामुळे मानवाला खुप अनन्यसाधारण लाभ झालेले आपणास दिसुन येतात.पण याचसोबत संगणकामुळे खुप जणांच्या आयुष्यावर चुकीचा तसेच दुष्प्रभाव देखील पडलेला आपण नाकारू शकत नाही.

खुप जणांना संगणकामुळे नुकसानाला देखील सामोरे जावे लागले आहे आणि ते नुकसान पुढीलप्रमाणे आहेत:

 • खुप जणांना संगणकामुळे ईमेल फ्राँड,आँनलाईन जाँब फ्राँड,इंटरनेट क्राईम,हँकिंग यासारख्या अनैतिक बाबींचा सामना करावा लागला आहे.ज्यामुळे कित्येक जणांचे बँक खाते देखील रिकामे झाले असल्याचे आपणास दिसुन येते.
 • कोणाला ईमेल द्वारे पैशांची लालुच दाखवून आँनलाईन फ्राँड करण्यात आले आहेत तर कोणाला आँनलाईन डेटा एंट्री वगैरेच्या जाँबच्या नावाखाली फसवणुक केली जाते आहे तरूण मुलामुलींना,घरगृहिणींना घरबसल्या डेटा इंट्री तसेच कँपच्या इंट्रीचे काम देण्याच्या नावाखाली त्यांना काही फसव्या टोळक्या कंपनीकडुन लुबाडले जाते आहे.त्यांच्या नकळत त्यांच्याकडुन खोटे करार करून घेऊन कोर्टात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडुन पैशांची मागणी केली जाते.असे अनैतिक प्रकार देखील आँनलाईनच्या जगतात संगणकाचा इंटरनेटचा चुकीचा वापर करून घडताना आपल्याला दिसुन येता आहे.
 • हँकिंगचे ज्ञान प्राप्त करून त्याचा दुरुपयोग करून मोठमोठया नेते सेलिब्रिटी,संस्था यांच्या आँफिशिअल वेबसाईट अनैतिक कामे करण्यासाठी हँक केली जाता आहेत.अनेक लोकांची बँक डिटेल काढुन त्यांच्या बँक खात्यातुन पैसे लंपास केले जाता आहे.

अशा पदधतीने संगणकाचा वापर करून अशी अनेक अनैतिक कामे केली जात आहेत.ज्यामुळे संगणक हे मानवासाठी जितके वरदान ठरते आहे तितकेच शाप देखील ठरताना आपणास दिसुन येत आहे.

मानव जातीसाठी वरदान ठरलेले संगणक आपल्यासाठी शाप ठरू नये म्हणुन आपण काय उपाययोजना करायला हवी?

आज संगणकामुळे मानवाला अनेक फायदे झाले आहेत.मानवाला कोणतेही कार्य करण्यासाठी आपली जास्त उर्जा,अधिक वेळ खर्च करावा लागत नाहीये.कारण संगणक तसेच इंटरनेटद्वारे कोणतीही गोष्ट आज आपण जागेवर बसुन प्राप्त करू शकतो.

पण आज ज्या संगणकामुळे आपल्याला अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत.आपल्या उर्जेची तसेच वेळेची बचत होते आहे आज त्याच संगणकाचा वापर करून गुन्हेगारी प्रवृतीचे कार्य देखील केली जात आहेत.

आणि ह्या अशा कार्याना आळा घालणे देखील खुप गरजेचे बनलेले आहे.आणि हा आळा बसविण्यासाठी आपण करावयाची उपाययोजना पुढीलप्रमाणे :

 • कोणतीही शहानिशा न करता कोणत्याही तसेच कोणाच्याही ईमेलवर प्रतिक्रिया देत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार आपण करू नये.
 • आपली बँक डिटेल कोणत्याही अविश्वसनीय वेबसाईटवर शेअर करू नये.कारण अशा देखील काही वेबसाईट असतात ज्या आपली बँक डिटेलच्या आधारे आपल्या बँक खात्यातील पैसे लंपास करत असतात.
 • आज कोरोनाच्या महामारीत घराबाहेर पडता येत नाही म्हणुन खुप जण आँनलाईन जाँब करणे अधिक पसंद करता आहे.पण आँनलाईन जाँबच्या शोधात काही असतानाच तरुण,तरुणी,गृहिणी काही फसव्या लोकांच्या जाळयात अडकत असतात.जे आँनलाईन डेटा एण्ट्री,कँप्च्या एण्ट्री अशा जाँबच्या नावाखाली अनेकांना लुबाडता आहेत.म्हणुन आपण कोणतीही शहानिशा न करता,तसेच आपण जिथे नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे ती साईट विश्वसनीय आहे फ्राँड नाहीये याची खात्री झाल्याशिवाय तिथे नोकरीसाठी अर्ज करूच नये.
 • आणि आँनलाईन नोकरी तसेच फ्रिलान्सर म्हणुन काम करण्यासाठी नौकरी डाँट काँम,माझी नौकरी,अपवर्क,फिवर,फ्रिलान्सर  इत्यादी अशा विश्वसनीय वेबसाईटचा वापर करावा कारण ह्या वेबसाईट सेफ आणि सिक्युअर आहेत.
 • खुप जण हँकिंगचे ज्ञान प्राप्त करता आणि आपल्या कौशल्याचा चुकीच्या कामासाठी वापर करत असतात.ज्याचा त्रास समाजातील इतर लोकांना सहन करावा लागत असतो.आणि कोणतेही ज्ञान तेव्हाच फायदेशीर ठरत असते जोपर्यत त्याचा वापर आपण समाजाच्या हितासाठी,भल्यासाठी करत असतो.आणि जेव्हा आपण आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा वापर लोकांच्या अहितासाठी करत असतो तेव्हा ते ज्ञान सर्व समाजासाठी शाप ठरत असते.म्हणुन आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर प्रत्येकाने लोकांच्या हितासाठी करायला हवा.आपण असे कोणतेही अनैतिक कार्य करू नये ज्याने समाजाला हानी पोहचेल.

कोणत्याही वस्तुच्या दोन तसेच नाण्याच्या दोन बाज असतात.पहिली बाजु जी आपली फायद्याची असते दुसरी ज्यात आपल्याला नुकसान देखील होत असते.संगणक हे एक यंत्र आहे ज्याचा शोध हा मानवाच्या हितासाठी लावण्यात आलेला आहे.म्हणुन आपण मानव करत असलेल्या चुकीच्या कार्यांचे खापर संगणकासारख्या निर्जीव यंत्रावर फोडु नये.

संगणकाचा शोध हा मानवाच्या सुख सुविधांसाठी लावण्यात आला होता. पण काही लोक याचा इतरांना हानी पोहचवण्यासाठी करता आहे. पण याला दोषी संगणक नाहीये तर मानवाने चांगल्या कार्यासाठी सोयी सुविधांसाठी तयार केलेला संगणकालाच काही मानवांनी आपल्या स्वार्थासाठी गुन्हेगारी प्रवृतीचे क्षेत्र बनवुन टाकले हे कारणीभुत आहे.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण संगणक शाप की वरदान हे दोन्ही अंगांनी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या संगणक शाप की वरदान मराठी निबंध माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *