Home » Jobs & Education » Essay Writing » कोव्हिडने दिलेले धडे निबंध | कोरोनाने आपल्याला काय शिकवले मराठी निबंध

कोव्हिडने दिलेले धडे निबंध | कोरोनाने आपल्याला काय शिकवले मराठी निबंध

प्रकृतीची एक वेगळीच पदधत असते. आपल्याला एखादी शिकवण देण्याचा तसेच आपल्याला एखादा धडा शिकविण्याचा. सर्वसाधारणपणे आपण आपल्या आयुष्यात आधी काहीतरी शिकत असतो. मग ते आपल्याला किती लक्षात आले आहे हे जाणुन घेण्यासाठी परिक्षा देत असतो. पण निसर्ग ह्याउलटच आपल्या कडुन करवून घेत असतो. तो आपली परिक्षा घेत असतो अणि त्या परिक्षेतुनच आपल्याला खुप काही धडे शिकवून देखील जात असतो.

अशाच पदधतीने आज प्रकृती आपल्याला कोरोना महामारीच्या काळात काहीतरी शिकवण देण्याचे काम करते आहे. जी शिकवण आपण आधीच घेणे गरजेचे होते.

आज जगभरात कोरोना नावाच्या महामारीने थैमान घातलेले आहे. कोरोनामुळे आज कित्येक व्यक्तींनी आज आपले अमुल्य प्राण गमावले आहेत. आणि अजुनही ह्या कोरोना नावाच्या महामारीने आपला पुर्णपणे पिच्छा सोडलेला नाहीये. अजुनही पुर्णपणे आपण कोरोनापासुन मुक्त झालेलो नाहीये.

पण ह्याच कोरोनाच्या महामारीने जसे अनेक लोकांचे प्राण घेतले आहेत. त्याचप्रमाणे काही महत्वाची शिकवण देखील हा कोरोना व्हायरस आपल्याला देऊन गेलेला आहे.जी आपण ठरवुन सुदधा कधीच विसरू शकत नाही.

30 जानेवारी 2020 मध्ये जेव्हा भारतामध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळुन आला होता तेव्हा आपल्याला कोणालाच याची भनक देखील नव्हती की हा कोरोना व्हायरस एवढे मोठे थैमान आपल्या देशात घालणार आहे.अणि खरे पाहायला गेले तर हा व्हायरस भारतामध्ये चीनमधुन आला होता.पण चीनने वेळ असताच ह्या व्हायरसवर उपाय शोधुन स्वताचे संरक्षण केले होते.

आणि हा व्हायरस चीनने भारताबरोबरच इतर देशांमध्ये सोडुन खुप मोठी जीवहाणी केली आहे हे आपल्या सगळयांनाच चांगले माहीत आहे.त्यामुळे आज खुप देश चीनच्या विरोधात आज उभे असलेले आपणास दिसुन येतात.पण चीन अजुनही आपल्या चुकीच्या वागण्याला आळा घालताना दिसुन येत नाहीये.

पण ह्याच कोरोना महामारीच्या काळात आपल्याला खुप काही चांगल्या गोष्टी शिकायला देखील मिळाल्या आहेत.खुप काही चांगल्या शिकवण मिळाल्या अणि धडे देखील मिळाले आहेत.

कोव्हिडने आपल्याला दिलेले धडे :

1)पर्यारणाकडे दुर्लक्ष करण्याची आपली चुक आपल्याला आपल्या लक्षात आणुन दिली:

कोरोना महामारीने आपल्याला सुंदर आणि स्वच्छ पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले.आपण कळत नकळत का होईना पर्यावरणाची किती नासाडी केली आहे हे आपल्या लक्षात आणुन दिले.कारण आपणच कित्येक समुद्रांना त्याच कचरा टाकुन दुषित केले आहे.

ज्यामुळे पर्यावरण प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत गेली.ज्याला जनजीवण आज अडचणीत देखील आलेले आहे.पण कोरोनाच्या पाश्वभुमीत जागोजागी लाँकडाऊन लागलेला असल्यामुळे पर्यावरणाला थोडीफार का होईना विश्रांती देखील मिळाली आहे.हे आपण नाकारू शकत नाही.ज्यामुळे जनजीवण तसेच पर्यावरण सुरळीत होण्यास चांगला हातभार देखील लागलेला आपणास दिसुन येतो.अणि कोरोनाच्या काळात आपल्याला हाच धडा मिळाला की आत्तापर्यत आपण प्रदुषण करून पर्यावरणाचे खुप नुकसान केले आहे.जे आपण आता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी थांबविणे फार गरजेचे आहे.

2) भारताला आपल्या विकासात्मक योजनांमध्ये व्यापक दर्जाचे पुनर्गठण करणे फार गरजेचे आहे:

 भारताला आपले आरोग्य अणि शिक्षणासाठी आपल्या जेडीपी पैकी तीन टक्के भागाची वाटणी करणे फार गरजेचे आहे.आरोग्य हा पुर्ण देशाचा प्रश्न आहे त्यामुळे

राज्य तसेच केंद्र ह्या दोघांनीही मिळुन यावर काम करणे आवश्यक आहे.ह्यासाठी भारताला आपल्या योजनात्मक धोरणांमध्ये काही व्यापक दर्जाचे बदल करणे देखील गरजेचे आहे.

3) जागतिकीकरणाचे महत्व कळले :

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक देशाला कोरोना वँक्सीनचा तुटवडा पडल्याने एकमेकांकडुन त्याची आयात करावी लागली.कारण प्रत्येकाकडे ह्या महामारीच्या काळात मर्यादित औषधसाठा उपलब्ध नव्हता.त्यामुळे प्रत्येक देशाला एकमेकाची साहाय्यता घ्यावी लागली होती.ह्यावरून आपल्याला दिसुन येते की जागतिकीकरणाची किती गरज आहे.

4) समाजातील काही कमकुवत वर्गासाठी काही ठोस योजना तयार करणे गरजेचे आहे

ऐन कोरोना महामारीच्या काळात काही आर्थिकदृष्टया कमकुवत वर्गाला खुप अडचणींना सामोरे जावे लागले होते.कोरोनाच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ देखील आलेली आपणास दिसुन येते.यातच कोरोना वँक्सीन खरेदी करण्याइतके पण पैसे सुदधा त्यांच्याकडे ह्या महामारीच्या काळात उपलब्ध नव्हते.आणि हीच एक गोष्ट आपल्याला दिसुन आली की सरकारने समाजातील काही र्आर्थिक दृष्टया कमकुवत वर्गासाठी ठोस उपाययोजना करणे किती गरजेचे आहे.

4) कोरोना व्हायरसने आपल्याला कौटुंबिक नात्यांमध्ये वाढ करण्याची,बिघडलेले नातेसंबंध पुन्हा बनवण्याची संधी दिली 

कोरोना महामारीच्या काळात सगळीकडे लाँकडाऊन असल्यामुळे ह्या काळात सगळयांना आपल्या घरातच कुटुंबियांसोबत नातलगांसोबत वेळ घालवावा लागला आहे.त्याचे परिणामस्वरूप कामाच्या धांदलीत ज्या नोकरदार वर्गाला आपल्या कुटुंबासाठी वेळ मिळायचा त्यांना ह्या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत भरपुर वेळ व्यतित करण्याची संधी मिळाली.ज्यामुळे दुरावलेल्या कौटुंबिक नात्यांमध्ये अजुन घटटपणे वाढ होण्यास मदत देखील झाली.

5) कोरोना व्हायरसने आपल्याला मौन अणि एकांताचे महत्व पटवून दिले 

कोरोना व्हारसने आपल्याला मौन पाळणे,एकांतात राहणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.संकटाच्या क्षणात मौन तसेच संयम पाळणे किती महत्वपुर्ण आहे याची जाणीव कोरोना व्हायरसने आपल्या सर्वाना करून दिली.तसेच कधी कधी एकांत देखील लाभदायक ठरतो याची जाणीव आपल्याला ह्या कोरोना महामारीने आपल्याला करून दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *