Home » People & Society » Meaning » Credit Meaning in Marathi | क्रेडिट म्हणजे काय – मराठी अर्थ आणि स्पष्टीकरण

Credit Meaning in Marathi | क्रेडिट म्हणजे काय – मराठी अर्थ आणि स्पष्टीकरण

क्रेडिट म्हणजे काय, क्रेडिट कार्ड म्हणजे काय (Credited meaning in marathi, Cash Credit meaning in marathi, Credited meaning in bank in marathi, Money Credited meaning in marathi)

आपल्याला बँकेचा – “Your A/c No xxxx Credited by Rs.1000.00 on 15-August-2022” असा संदेश पाहायला मिळतो. परंतु, यातील ‘Credited’ शब्दाचा अर्थ काय? हे आपणास लवकर समजत नाही. ह्या संदेशातील क्रेडिट म्हणजे काय? क्रेडिट चा अर्थ आणि स्पष्टीकरण काय आहे? तर, आता आपण या लेखात Credit बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत – 

Credit चा मराठीत अर्थ (Credit Meaning in Marathi)

“श्रेय / जमा झालेले पैसे   = Credit”

Credit – Grammar 

  • Credit : नाम
  • Credit : सकर्मक क्रियापद
  • Credited : भूतकाळ क्रियापद

Credit चा मराठीत शब्दश: अर्थ (Credit Meaning in Marathi) :

जमा लिहिणे, जमामध्ये नोंद करणे, घेणे म्हणून नोंद, जमा खर्चातील जमा बाजू भरणे, खात्यामधे जमा करणे, प्राप्त रक्कम, खात्यामधील जमा रक्कम, बँकेमार्फत खातेधारकास उधार म्हणुन देण्यात येणारी रक्कम, इज्जत, आदर, मानमान्यता, उधारी, पतपैसा, श्रेय, श्रद्धा, नावलौकिक, प्रतिष्ठा, प्राप्त होणारा सन्मान, विश्वास.

Credit Meaning in Bank in Marathi :

बँकेचे व्यवहार करताना बऱ्याचदा आपणास Credit Mhanje kay हे जाणून घ्यायचे असते. तर, जेव्हा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले किंवा झाले असतील तेव्हा त्या प्रकियेला Credit होणे असे म्हणतात.

Synonyms (समानार्थी शब्द ) :

जमा रक्कमेची नोंद, कर्ज, उधार, ठेव, आदर

Antonyms (विरुद्धार्थी शब्द) :

जमा खर्चातील खर्चाची बाजू, ठेव, काढलेली रक्कम, देय रक्कम

Credit चा संज्ञा (Definition) / स्पष्टीकरण (Explanation) :

  • बँकिंग मधील क्रेडिटची व्याख्या (Cash Credit meaning in marathi) :

आपल्या बँकेच्या खात्यामध्ये कोणा व्यक्तीकडून ठराविक रक्कम जमा केलेली असते, यालाच Credit असे संबोधतात.

साधारण भाषेत क्रेडिटची व्याख्या : 

व्यापाराच्या किंवा इतर नोंदवहीत उजव्या बाजूला / स्तंभामध्ये केली जाणारी जमा केलेल्या रक्कमांची नोंद.

Credit meaning in Hindi :

जब हमारे खाते में पैसा या राशी किसी व्यक्ती द्वारा जमा की जाती है, तो उसे क्रेडिट करना कहते है |

Credit ची उदाहरणे :

The bank has credited my account with the Rupees 2000 they mistakenly charged from me. – बँकेने माझ्या खात्यात माझ्याकडून चुकून घेतलेले 2000 रुपये जमा  केले आहेत.

  • She got no credit for completing work – काम केल्याचे श्रेय तिला मिळालेच नाही.

बँकेतील क्रेडिट आणि डेबिटचा अर्थ (Credit and Debit in Marathi) :

बँकिंग संबंधित व्यवहारात क्रेडिट आणि डेबिट हे दोन्ही  शब्द वापरले जातात.

  • क्रेडिटचा अर्थ (Credit Meaning in Marathi) : 

जेव्हा आपल्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा इतर कोणाकडूनही जमा केले जातात. यालाच क्रेडिट असे म्हणतात.

  • डेबिटचा अर्थ (Debit meaning in Marathi) :

आपण आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे काढतो किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात आपले पैसे पाठवतो, यालाच डेबिट असे म्हणतात. 

डेबिट बद्दल अतिरिक्त जाणून घेण्यासाठी लेख वाचा.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय असते (Credit Card Meaning in Marathi) :

बँकेद्वारे खातेदारांना “आमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड हवे आहे का” अशी विचारणा करणारे कॉल व संदेश येतात.

परंतु, आपणास क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड कसे वापरावे? हे प्रश्न पडतात.

बँकिंग व्यवहार सुलभ होण्यासाठी बँकांमार्फत क्रेडिट कार्ड दिले जाते.

हे कार्ड नियमित बँक व्यवहार करणाऱ्या आणि उत्तम क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना दिले जाते.

या मार्फत बँक ग्राहकाला ठराविक रक्कम व्याजासह उधार म्हणून वापरण्यास देते.

क्रेडिट कार्ड वापरून आपण खरेदी करू शकता. महिना झाल्यावर व्याजासह रक्कम बँकेद्वारे घेतली जाते.

FAQ On Credit Meaning in Marathi

क्रेडिटचा मराठीत अर्थ काय आहे?

क्रेडिट म्हणजे श्रेय किंवा आदर देणे. तर, बँकिंग क्षेत्रात क्रेडिट म्हणजे खात्यात पैसे जमा किंवा प्राप्त रक्कमेची नोंद होय.

बँकेच्या Credited चा अर्थ काय आहे?

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. यालाच Credited असे म्हणतात.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट स्कोअर म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज परतावा निश्चित वेळेत करता का हे मोजून सांगणारा एक सूचक साधन आहे.

क्रेडिट कार्डचा फायदा काय?

क्रेडिट कार्ड मुळे पैशांचे व्यवहार सुलभ व सुरक्षित होतात, जवळ पैसे बाळगावे लागत नाहीत, खरेदीवेळी सूट व कॅशबॅक मिळतात असे अनेक फायदे आहेत.

आशा आहे की आम्ही दिलेल्या क्रेडिट म्हणजे काय माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Credit Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *