डेबिट म्हणजे काय, डेबिट कार्ड म्हणजे काय ( Debit Meaning In Marathi, Debited Meaning In Marathi, Debit Card Meaning In Marathi, Money Debited Meaning In Marathi, Cash Debit Meaning In Marathi, Debited Meaning In Bank In Marathi, Debit and Credit in Marathi, Debit Card and Credit Card Meaning in Marathi )
अनेकदा आपण मोबाईल मध्ये – “Your A/c No xxxx debited by Rs.1000.00 on 15-August-2022” असा संदेश/मेसेज पाहिला असेल. परंतु, यातील ‘debited’ शब्दाचा अर्थ काय? हे आपणास समजत नाही. ह्या बँकेशी संबंधित मेसेज मधील Debit म्हणजे काय? डेबिट चा अर्थ आणि स्पष्टीकरण काय आहे?
तर, आता आपण या लेखात Debit बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Debit Meaning In Marathi | Debit चा मराठीत अर्थ
“खर्चाची नोंद / पैसे काढणे = Debit”
Debit – Grammar
व्याकरणदृष्ट्या Debit हे Noun (नाम) म्हणून वापरले जाते.
Debit हे Verb (क्रियापद) म्हणून सुध्दा वापरले जाते. परंतू, दोन्ही स्वरूपात अर्थ वेगवेगळा आहे.
Debits : अनेकवचनी नाम
Debits : वर्तमानकाळ क्रियापद
Debited : भूतकाळ क्रियापद
Debit चा मराठीत शब्दश: अर्थ (Debit Meaning in Marathi)
खर्च नावे लिहिणे, खर्चामध्ये नोंद करणे, देणे म्हणून नोंद, जमा खर्चातील खर्चाची बाजू भरणे, खात्यामधून वजा करणे, थकीत किंवा शिल्लक रक्कम, देय रक्कम.
Debited Meaning in Bank in Marathi
केलेला खर्च, खात्यातून काढलेली रक्कम
Debit Synonyms (समानार्थी शब्द ) :
नावे नोंद, कर्ज, उधार, वजा, उत्तरदायित्व, खर्च, शिल्लक रक्कम, थकीत देय रक्कम, लेखा प्रविष्टीत देय रक्कमेची नोंद.
Debit Antonyms (विरुद्धार्थी शब्द) :
जमा खर्चातील जमा बाजू, ठेव, जमा रक्कम (Credit)
बँकिंग मधील डेबिटची व्याख्या (Cash Debit Meaning in Marathi) :
बँकेच्या खातेदाराने त्याच्या खात्यातून किंवा बँक किंवा इतर वित्तीय संस्थेने कर्जदाराच्या खात्यातून ठराविक रक्कम काढून घेतली असेल, तर त्यालाच Debit असे संबोधतात.
साधारण भाषेत डेबिटची व्याख्या :
व्यापाराच्या किंवा इतर नोंदवहीत डाव्या बाजूला / स्तंभामध्ये केली जाणारी देत अथवा खर्च केलेल्या रक्कमांची नोंद.
Debit Meaning In Hindi :
जब हम खाते से पैसा निकालते या खाते में उधार लिखते है, तो उसे डेबिट करना कहते है |
Debit ची उदाहरणे :
- Your A/c No xxxx debited by Rs.100.00 – तुमच्या खाते क्रमांक xxxx मधून १०० रुपये रक्कम काढण्यात आली आहे.
- These debit cards are also used as ATM cards along with purchases. – ही डेबिट कार्डे खरेदीसोबत एटीएम कार्ड म्हणूनही वापरली जातात.
बँकेतील डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ (Debit and Credit in Marathi) :
बँकिंग संबंधित व्यवहारात डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही शब्द वारंवार वापरले जातात.
डेबिटचा अर्थ (Money Debited Meaning in Marathi) :
आपण आपल्या बँकेच्या खात्यामधून पैसे काढतो किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात आपले पैसे पाठवत, यालाच डेबिट असे म्हणतात.
क्रेडिटचा अर्थ (Credit Meaning in Marathi) :
जेव्हा आपल्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा इतर कोणाकडूनही जमा केले जातात. यालाच क्रेडिट असे म्हणतात.
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय (Debit Card and Credit Card Meaning in Marathi) :
बँकिंग व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी बँकांमार्फत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड दिली जातात.
डेबिट कार्ड (Debit Card) :
हे कार्ड वापरून आपण आपल्या खात्यातून सुलभतेने विना बँकेत जाता सुध्दा पैसे काढू शकतो. ह्या प्लास्टिक कार्डद्वारे ATM मशीनमधून पैसे त्वरित काढू शकतो. एक असे Payment Card आहे ज्याचा वापर करून ग्राहकाच्या बँक खात्यातून थेट पैसे काढले जातात.
क्रेडिट कार्ड (Credit Card) :
हे कार्ड नियमित बँक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना दिले जाते. या मार्फत बँक ग्राहकाला ठराविक रक्कम व्याजासह उधार म्हणून वापरण्यास देते. क्रेडिट कार्ड वापरून आपण खरेदी करू शकता. महिना झाल्यावर व्याजासह रक्कम बँकेद्वारे घेतली जाते.
FAQ On Debit Meaning In Marathi
डेबिट म्हणजे खात्यातून पैसे काढणे किंवा देय रक्कमेची नोंद करणे होय.
तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. यालाच Debited असे म्हणतात.
डेबिट म्हणजे खात्यातून जाणाऱ्या व क्रेडिट म्हणजे खात्यात येणाऱ्या रकमेची नोंद होय.
एटीएम कार्ड हे पिनच्या साहाय्याने पैसे काढण्यासाठी वापरतात. तर, डेबिट कार्ड एटीएम मधून पैसे काढण्याबरोबरच खरेदीसाठी किंवा ऑनलाईन व्यवहारासाठी वापरतात.
आशा आहे की आम्ही दिलेल्या डेबिट म्हणजे काय माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Debit Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :