दिवाळीला आपण दिपावली असे देखील संबोधित असतो.दिवाळी हा सण हिंदु धर्मीय व्यक्ती तसेच दक्षिण आणि आग्निय आशियातील व्यक्ती सुदधा हा सण साजरा करत असतात.दिवाळी सणाविषयी असे देखील म्हटले जाते की हा सण तसेच उत्सव तीन हजार वर्षापुर्वीपासुन साजरा केला जाणारा जुना सण आहे.
महाराष्टात आपण दिवाळी हा सण 5 ते 10 दिवस साजरा करतो.ज्यात वसुबारस,नरक चतुर्दशी,धनत्रयोदशी,लक्ष्मी पुजन ह्या काही प्रमुख दिवसांचा समावेश होतो.ह्या प्रत्येक दिवशी आपण विधीप्रमाणे पुजेचे आयोजन देखील करत असतो.
आजच्या लेखातुन आपण ह्याच दिवाळी सणाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये । Diwali Information in Marathi
उत्सवाचे नाव (Festival Name) | दिवाळी (Diwali) किंवा दिपावली |
दिवाळी किती तारखेला आहे | 4 नोव्हेंबर 2021 |
दिवाळी म्हणजे काय असते?
हिंदु धर्मातील व्यक्ती प्रत्येक वर्षी साजरा करतात तो सण तसेच उत्सव म्हणजे दिवाळी.दिवाळी हा हिंदु धर्मातील लोकांचा एक पवित्र सण आहे.दिवाळीला आपण दिव्यांचा सण असे देखील म्हणत असतो.आणि हे दिवे म्हणजेच अंधकारावर प्रकाशाने प्राप्त केलेला विजय मानले जातात.
दिवाळी हा सण केव्हा आणि कधी असतो?
दिवाळी हा हिंदु धर्मातील लोकांचा एक अत्यंत महत्वाचा सण आहे.जो हिंदु धर्मातील पंचांगानुसार कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जात असतो.
2021 मध्ये दिवाळी हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जाणार आहे?
ह्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येच्या दिवशी गुरूवारी 4 नोव्हेंबर 2021 रोजी साजरा केला जाणार आहे.
दिवाळी हा सण आपण का साजरा करतो?
दिवाळी हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत. ज्या कारणांमुळे हिंदु धर्मातील लोक तसेच इतर धर्मातील लोक देखील ह्या सणाला मोठया उत्साहात साजरा करतात. दिवाळी सण साजरा करण्यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
- दिवाळीच्या सणाच्या दिवशीच लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता.आणि भगवान श्री हरि विष्णु यांच्यासोबत त्या ह्याच दिवशी विवाहबदध देखील झाल्या होत्या.म्हणुन ह्या दोघांच्या विवाहाचा उत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात.आणि संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जाते.
- भगवान श्री हरि विष्णु यांनी आपला पाचवा अवतार धारण करून राजा बाली याच्या तावडीतुन लक्ष्मी माता यांची सुटका केली होती.आणि भगवान श्री हरि विष्णु यांनी त्यांची सुटका केली तेव्हा कार्तिक अमावस्येचाच दिवस होता.
- ह्याच दिवशी पांडवांनी आपला वनवास देखील पुर्ण केला होता.
- दिवाळी ह्या सणाच्या एक दिवस आधी नरकासुर नावाच्या राक्षसाचा कृष्णाने वध केला होता.त्यानंतर हा दिवस एक सण म्हणुन साजरा केला जाऊ लागला.
- ह्याच दिवशी रामाने सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत चौदा वर्षाचा वनवास भोगुन आयोध्येमध्ये वापसी केली होती.म्हणुन रामाच्या आयोध्येमधील पुन्हा वापसीच्या आनंदात ह्याच दिवशी सर्वत्र दिवे लावण्यात आले होते.आणि आनंदाने हा दिवस साजरा केला होता.
महाराष्टात दिवाळी हा सण दरवर्षी कशा पदधतीने साजरा केला जातो?
दिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणुन ओळखला जातो.कारण दिवाळीत प्रत्येक घरासमोर दिवे लावुन संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जात असते.ह्या दिवशी आपण घराची साजसजावट करत असतो.घरासमोर रांगोळी काढत असतो.नवीन कपडे परिधान करीत असतो.दिवाळीमध्ये शेव,चिवडा,लाडु,शंकरपाळे बर्फी,मिठाई इत्यादी असे व्यंजन फराळ म्हणुन घरोघरी तयार केले जात असते.दिवाळीला आपण पाहुण्यांना घरी बोलावुन फराळ खाऊ घालत असतो.आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो.रात्री घरासमोर फटाके देखील फोडत असतो.
दिवाळी ह्या सणाचे महत्व काय आहे?
- दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणुन सर्वत्र दरवर्षी साजरा केला जातो.कारण ह्याच दिवशी रामाचे आयोध्येमध्ये आपला वनवास पुर्ण करून पुनरागमन होणे,भगवान श्री हरी विष्णु आणि लक्ष्मी माता यांचा विवाह,अशा अनेक चांगल्या आणि शुभ गोष्टी घडुन आल्या होत्या.
- असे म्हणतात की ह्या दिवशी देवी लक्ष्मी मातेचे पुजन केल्याने आपल्याला धनलाभ होत असतो तसेच आपल्याला पैशांची कमतरता कधीच भासत नसते.
दिवाळी हा सण साजरा करण्याच्या पारंपारीक पदधती कोणकोणत्या?
दिवाळी हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक विभागातील लोकांच्या आपापल्या काही पारंपारीक पदधती आहेत.
- महाराष्ट : दिवाळी हा सण आपण दिव्यांचा सण म्हणुन ओळखतो.कारण दिवाळीत प्रत्येक घरासमोर दिवे लावुन संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जात असते.घरासमोर रांगोळी काढली जाते.दिवाळीत फराळ तयार केले जाते.नवीन कपडे घालुन फटाके देखील फोडले जातात.तसेच एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
- कोलकत्ता : दिवाळी सणात कोलकत्ता येथे महाकालीचे पुजन केले जाते.ह्याच दिवशी संपुर्ण कोलकत्ता शहरात असलेल्या महाकाली देवीच्या सर्व मंदीरांची साजसजावट केली जाते.
- चेन्नई : चेन्नई शहरात धनत्रयोदशीला भगवान कुबेर यांची पुजा केली जाते.नरकासुराच्या पुतळयाचे दहन देखील केले जाते.
- पंजाब : पंजाब मध्ये दिवाळी हा सण थाटामाटात साजरा केला जातो.आणि ह्याच दिवशी गुरू गोविंदसिंह यांची मोगलांच्या ताब्यातुन सुटका देखील झाली होती.म्हणुन हा दिवस पंजाबमध्ये मोठया आनंद उत्सवात साजरा केला जातो.
- जम्मु काश्मीर : दिवाळी ह्या सणाला दाल सरोवरामध्ये दरवर्षी प्रथेप्रमाणे पाण्यात दिवे सोडले जातात.
दिवाळीत साजरे केले जाणारे महत्वाचे दिवस कोणकोणते आहेत?
दिवाळी हा सण महाराष्टात 5 ते 10 दिवस साजरा करतो. ज्यात वसुबारस, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, लक्ष्मी पुजन ह्या काही प्रमुख दिवसांचा देखील समावेश होतो.
1. वसुबारस
वसुबारसलाच आपण गोवत्स दादशी असे देखील म्हणत असतो.आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश असल्यामुळे ह्या दिवसाला अत्याधिक महत्व दिले जाते.
ह्या दिवशी गावोगावी प्रत्येक घरोघरी गाईची आणि तिच्या वासराची पुजा केली जाते.ह्या दिवशी स्त्रिया गायीचे पायावर पाणी टाकुन पाय धुवतात आणि मग त्यावर हळद कुंकु,फुले,अक्षदा वाहतात आणि गाईच्या गळयात माळ घालुन तिला श्रदधेने वंदन करतात.
आणि मग केळीच्या पानावर गायीला भात,पुरणपोळी पापड इत्यादी पदार्थ खाऊ घालत असतात.
2. धनत्रयोदशी
धनत्रयोदशीला आपण आपल्या घरातील सर्व धन बाहेर काढुन त्यांची साफसफाई करून पुजा करत असतो.
जैन धर्मात ह्या दिवसाला ध्यान तेरस असे म्हटले जाते.कारण ह्याच दिवशी तिसरे ध्यान करण्यासाठी भगवान महावीर यांनी योग निद्रा धारण केली होती.आणि सलग तीन दिवस योग निद्रा करून झाल्यावर त्यांना निर्वाण प्राप्त झाले होते.
3. नरक चतुर्दशी
नरकासुर हा एक राक्षस होता ज्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याला कोणीही मारू शकणार नाही असे वरदान त्यांच्याकडुन मागितले आणि त्याच वरदानाचा अनैतिक वापर करत तो इतरांवर अन्याय अत्याचार करू लागला.स्त्रियांचे अपहरण करून त्यांना कारावासात ठेवू लागला.विविध राज्यांतील संपत्ती तो लुटु लागला.
त्याच्या वरदानाचा फायदा उठवत तो साधारण मनुष्यांनाच नाही तर स्वर्ग लोकातील देवांना देखील त्रास देऊ लागला.तेव्हा सर्व पृथ्वी तसेच स्वर्गाच्या रक्षणासाठी श्री हरि विष्णुने नरकासुराचा वध केला होता.
म्हणुन नरकासुराच्या त्रासापासुन मुक्ती मिळण्याच्या आनंदात तसेच श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून केलेल्या पराक्रमाच्या आठवणीत नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाऊ लागला.
नरक चतुर्दशी आपल्या मध्ये लपलेल्या पाप तसेच वासनांचा,अहंकाराचा नाश करणारा दिवस म्हणुन ओळखला जातो.
4. लक्ष्मी पुजन
दिवाळीच्या सणात घराघरात लक्ष्मीपुजन केले जाते. कारण असे म्हणतात की लक्ष्मी ही चंचल असते तिला टिकवुन ठेवले नाही तर ती आपल्या हातातुन निघुन जात असते.म्हणुन आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहावा म्हणुन लक्ष्मी पुजन केले जात असते.
अंतिम निष्कर्ष :
अशा पदधतीने आज आपण दिवाळी सणा विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या दिवाळी सणा विषयी माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :