Home » News » E Shram Card Information In Marathi: Benefits, Registration Online Maharashtra |  ई श्रम कार्ड योजना माहिती

E Shram Card Information In Marathi: Benefits, Registration Online Maharashtra |  ई श्रम कार्ड योजना माहिती

ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र, ई श्रम कार्ड योजना माहिती, ई श्रम कार्ड योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे, ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्रता (E Shram Card Yojana Information In Marathi, E Shram Card Benefits In Marathi, E Shram Card Registration Online Maharashtra, E Shramik Registration Maharashtra)

भारत सरकारने देशातील कामगार व मजूर यांच्याकरिता ई श्रम योजना तयार केेली आहे. ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता, महत्वाची कागदपत्रे व नोंदणी करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

ई श्रम कार्ड योजना माहिती | E Shram Card Yojana Information In Marathi

तुम्ही जर कामगार किंवा मजूर असाल. तर आपण विविध सरकारी योजनांचा सरळ लाभ मिळविण्याकरिता या ई श्रमिक कार्ड चा वापर करावा. केंद्र सरकार मार्फत कामगार व मजूर यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी या ई श्रम योजनेचा उपयोग होणार आहे.

योजनेचे नावई श्रम योजना (E-Shram Scheme )
योजनेचा प्रकारकेंद्र पुरस्कृत योजना
मंत्रालयश्रम व रोजगार मंत्रालय
उद्देशअसंघटित कामगार व मजूर यांचा डाटाबेस तयार करणे
अधिकृत संकेतस्थळhttps://eshram.gov.in/

E Shram Card Information in Marathi | ई श्रम योजना म्हणजे काय ?

ई श्रम पोर्टल चे २६ ऑगस्ट २०२१ रोजी श्रम व रोजगार मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते शुभारंभ झाला. 

ई श्रम पोर्टल हे स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, मजूर सारख्या असंघटित कामगारांचा हा पहिला राष्ट्रीय डेटाबेस पोर्टल आहे.

या पोर्टल मार्फत असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात आहे. या कामगारांना सामाजिक क्षेत्रातील योजनांचा लाभ पोहोचवण्याची सुविधा देते.

ई-श्रम पोर्टल आधारसह पोर्टल सोबत जोडलेले आहे आणि नोंदणीकृत कामगारांचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य प्रकार आणि कुटुंब तपशील इत्यादी तपशील घेतले जाते.

नोंदणी केलेल्या श्रमिकांना ई श्रम कार्ड दिले जाते ज्यावरती आधार क्रमांक सारखाच बारा अंकी युनिक क्रमांक असेल जो की नंबर भारतभर कोणत्याही कामगार संबंधीत योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयोगी असेल.

ई श्रम योजनेचा उद्देश

 • ई श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांचा यांचा डेटाबेस तयार करणे.
 • या सर्व कामगारांना शासकीय योजनांचा  सरळ लाभ त्यांच्या पर्यंत पोहचवणे.
 • कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
 • तसेच, या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना विमा सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा पुरविणे.

ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्रता : 

या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती कडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

१ ) लाभार्थी व्यक्तीचे वय १६ वर्षापेक्षा कमी तसेच ५९ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.

२ ) व्यक्ती असंघटित कामगार म्हणून काम करत असावा.

असंघटित कामगार म्हणजे काय?

असा कामगार जो गृह आधारीत कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील मजुरीचा कामगार आहे. ज्यामध्ये तो संघटित क्षेत्रातील कामगार जसे की ESIC किंवा EPFO ​​चा सदस्य नाही यांना असंघटित कामगार असे म्हणतात

३) Employee Provident Fund Organisation (EPFO) / Employees State Insurance Corporation (ESIC) तसेच NPS चा सदस्य नसावा.

ई श्रम योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज :

 • लाभार्थ्याचे ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड
 • रेशन कार्ड प्रत
 • बँक पासबुक प्रत आणि बँक शाखेचा IFSC कोड
 • वीज बिल प्रत
 • मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाशी जोडलेला/लिंक असावा.

टीप : जर आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसेल. तर तुमच्या जवळच्या आधार केंद्र मधून लिंक करावा.

ई श्रम कार्डाचे लाभार्थी :

 • स्थलांतरित कामगार
 • लहान आणि अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर
 • रिक्षाचालक, CSC केंद्र चालक
 • आशा कार्यकर्ता व अंगणवाडी कामगार
 • मनरेगा (MGNREGA) कामगार
 • भाजी आणि फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता
 • सुतार, कुंभार, न्हावी, कोळी, लिदर कामगार
 • गृह कामगार
 • इमारत आणि बांधकाम कामगार
 • लेबलिंग आणि पॅकेजिंग कामगार
 • विडी कामगार
 • हातगाडी ओढणारे व वीटभट्टी कामगार

ई श्रम पोर्टल अंतर्गत लाभ दिला जाणाऱ्या योजना :

देशातील ज्या कामगारांनी नोंदणी करून ई श्रम कार्ड घेतले असेल त्यांना खालील योजनांचा लाभ घेता येईल.

 • राष्ट्रीय पेन्शन योजना
 • मनरेगा रोजगार योजना
 • कामगार पुनर्वसन स्वयंरोजगार योजना
 • आयुष्मान भारत
 • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
 • प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
 • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
 • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
 • प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
 • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
 • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
 • सामाजिक सुरक्षा कल्यान योजना
 • दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना
 • राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम
 • राष्ट्रीय सफाई कामगार
 • विणकरांसाठी आरोग्य विमा योजना

E Shram Card Benefits in Marathi | ई श्रम योजनेचे लाभ

 • ई श्रम योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
 • ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना भारत सरकार मार्फत पीएम सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.
 • ई श्रम पोर्टल वर कामगारांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. मोफत नोंदणी केली जाते.
 • ई श्रम पोर्टल वरती नोंदणीकृत कामगाराचा अपघातात मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
 • ई श्रम पोर्टल वरती नोंदणीकृत कामगाराला अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल, तर त्याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान केले जाईल.
 • जर ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगाराचा आंशिक अपंगत्व आल्यास रुपये १ लाख रुपये देण्याची तरतूद निश्चित करण्यात आलेली आहे.
 • कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एक वर्षासाठी प्रीमियम वेव्ह दिले जाईल.

E Shram Card Registration Online Maharashtra | ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र

आपण ई श्रम पोर्टल द्वारे किंवा ॲप द्वारे स्वताची नोंदणी करू शकतो. तसेच या कामगारांना ‘आपले सरकार सेवा केंद्राची’ मदत देखील मिळू शकते.

E Shram card Registration Online Maharashtra
 1. पहिल्यांदा आपण ई श्रम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ उघडावे.
 2. आपणासमोर मुख्यपृष्ठ उघडेल.
 3. मुख्य पृष्ठावरती आपणास सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय दिसेल. त्या बटणावरती क्लिक करावे.
 4. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल जो की तुमच्या आधार कार्डाशी जोडलेला आहे.
 5. समोर दिलेला कॅप्चा कोड (Captcha Code) समाविष्ट करावा.
 6. त्यानंतर, तुम्हाला EPFO आणि ESIC साठी सदस्य स्थिती Yes / No चा पर्याय निवडून समाविष्ट करावा.
 7. त्यानंतर तुम्हाला ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करावे.
 8. तुम्हाला तुमच्या समाविष्ट केलेल्या मोबाईल नंबर वरती OTP मिळेल. तो OTP प्रविष्ट करावा.
 9. त्यांनतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
 10. आता तुमचा आधार कार्ड चा डेटाबेस मधील तुमचा फोटो आणि आधार कार्ड वरील माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
 11. यानंतर तुम्हाला तुमचे तपशील प्रविष्ट करा या पर्यायावर क्लिक करावे.
 12. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय आणि कौशल्य, बँक तपशील याबरोबरच आवश्यक ती वेळोवेळी विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 13. ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर Preview Self Declaration या पर्यायावर क्लिक करावे.
 14. आता तुमच्या समोर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुमच्या पुढे स्क्रीनवरती दिसेल ती पडताळून पहावी.
 15. यानंतर खालील तुम्हाला नियम व अटी टिक करावी आणि Submit या बटणावर क्लिक करावे.
 16. डाव्या साईडला तुम्हाला UAN Card असा एक पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावे. यानंतर तुमच्या पुढे तुमचे ई श्रम कार्ड उघडेल. तुमचे ई श्रम कार्ड Download किंवा Print करायचे आहे.

अशाप्रकारे तुम्हाला तुमचे ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या करता येईल.

संपर्क :

अधिक माहितीसाठी किंवा काही समस्या असल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून किंवा मेल लिहून माहिती किंवा समस्या निवारण करून घेऊ शकता.

संकेतस्थळ : https://eshram.gov.in/

पत्ता : कामगार आणि रोजगार मंत्रालय, सरकार. ऑफ इंडिया, जैसलमेर हाऊस, मानसिंग रोड, नवी दिल्ली – ११००११

हेल्पलाइन : १४४३४ (TollFree)

फोन : ०११-२३३८९९२८

मेल : eshram-care@gov.in

किंवा

तुमच्या जवळच्या CSC केंद्र येथे संपर्क साधावा.

जवळचे CSC केंद्र शोधण्यासाठी लिंक वर क्लिक करा : https://findmycsc.nic.in/csc/

FAQ On E Shram Card Information in Marathi

ई श्रम कार्ड योजनेसाठी वयाची अट किती आहे?

या ई श्रम योजनेसाठी लाभार्थी वय १६ ते ५९ दरम्यान असावे.

ई श्रमिक कार्डची वैधता कालावधी आहे का? किती?

ई श्रमिक कार्डची वैधता कालावधी कायम आहे आणि ते आयुष्यभर वैध राहील.

ई श्रम कार्ड योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

ई श्रम कार्ड योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

ई श्रम योजने अंतर्गत किती लाभार्थ्यांना ई श्रमिक कार्ड मिळाली आहेत?

eshram.gov.in यांच्या माहितीनुसार २७ करोड ७५ लाख पेक्षा जास्त कामगारांना ई श्रमिक कार्ड चे वितरण केले गेले आहे. या मध्ये कृषी व बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

E Shram मध्ये नोंदणीसाठी कामगाराला काही शुल्क भरावे लागते का?

E Shram पोर्टलवर नोंदणी विनामूल्य आहे. कामगारांना कोणत्याही नोंदणी करणाऱ्या संस्थेला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

असंघटित कामगार म्हणजे काय?

असा कामगार जो गृह आधारीत कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील मजुरीचा कामगार आहे. ज्यामध्ये तो संघटित क्षेत्रातील कामगार जसे की ESIC किंवा EPFO ​​चा सदस्य नाही यांना असंघटित कामगार असे म्हणतात.

आशा आहे की आम्ही दिलेल्या ई श्रम कार्ड योजना माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या E Shram Card Information in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *