Home » News » Earth Day Information In Marathi । जागतिक वसुंधरा दिवस विषयी माहिती

Earth Day Information In Marathi । जागतिक वसुंधरा दिवस विषयी माहिती

Earth Day Information In Marathi : तुम्हाला माहित आहे का संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा एकमेव ज्ञात असलेला ग्रह आहे जिथे सजीव राहतात, मानव राहतात त्यामुळेच आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया जागतिक वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस विषयी माहिती.

पृथ्वीवर अब्जावधी झाडे, मनुष्य तसेच प्राणी राहतात आहेत व सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले वातावरण पृथ्वीवरच उपलब्ध आहे. परंतु, पृथ्वीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामध्ये प्रदूषण, जागतिक तापमान वाढ इत्यादी समस्यांचा समावेश होतो.

त्यामुळे पृथ्वीवरील सर्व मानवांना पृथ्वीच्या समस्यांची जाणीव व्हावी यासाठी जागतिक वसुंधरा दिवसाची गरज निर्माण झाली होती. जागतिक वसुंधरा दिवस दरवर्षी साजरा केला जातो त्यामुळे जागतिक वसुंधरा दिवसाची माहिती पुढीलप्रमाणे.

जागतिक वसुंधरा दिवसाची माहिती | Earth Day Information In Marathi

दरवर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. जगातील पहिला जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल 1970 रोजी साजरा केला गेला. जागतिक वसुंधरा दिवसात एक बिलियन पेक्षा जास्त लोक सहभागी होतात व या वर्षीचे जागतिक वसुंधरा दिनाची थीम आहे – Invest In Our Planet.

Gaylord Nelson यांनी 1970 पासून जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला जनतेचा खूप पाठिंबा लाभला त्यामुळे पर्यावरण संरक्षण एजन्सी चे पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी गठण करण्यात आले.

जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व पर्यावरण रक्षणाचा संकल्प साधला जातो. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने मानवी मूल्यांचे जतन होण्यास मदत होते.

जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास (Earth Day History In Marathi)

Gaylord Nelson यांनी the salient spring या पुस्तकाने मानवा द्वारे पृथ्वीवर होणाऱ्या अपायांची माहिती दिल्यानंतर, अमेरिकन संसदेमध्ये पर्यावरण नुकसानीबाबत आवाज उठवला. व या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पर्यावरण संरक्षण एजन्सी चे निर्माण करण्यात आले.

सन 1990 मध्ये जागतिक वसुंधरा दिन जगभरात साजरा करण्यात आला आधी अमेरिकेत व नंतर च्या काळात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाची ओढ निर्माण होण्यास मदत झाली.

जगातील पहिल्या वसुंधरा दिनाचे आयोजन 22 एप्रिल 1970 मध्ये रोजी अमेरिकेत करण्यात आले. व या वर्षी 52 व्या वसुंधरा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.दरवर्षी वसुंधरा दिनाचे आयोजन earthday.org या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन द्वारे करण्यात येते.

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व (Earth Day Importance In Marathi)

जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे व त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे व हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे म्हणूनच जगभरात जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येऊन पर्यावरण वाचविण्याचा निर्धार करतात व पृथ्वीला भविष्यात मानवाला राहण्यायोग्य स्थान राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. जागतिक वसुंधरा दिनाने जगात पहिल्यांदाच पर्यावरणाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.

जागतिक वसुंधरा दिनामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा उपयोग करण्यास प्रो्साहित केले जाते. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा चर्चासत्रे तसेच प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा (Earth Day Wishes Quotes In Marathi)

पृथ्वी आपली आहे निराळी
तिचे आपण संरक्षण करू या !
यावर्षीच्या वसुंधरा दिनाला
नाविन्यपूर्ण पृथ्वी घडवूया !!

जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , चला एकत्र येऊन पृथ्वीला अधिक सुंदर बनवुया …

चला पृथ्वीच्या प्रती आपण आपल्या संवेदना प्रकट करूया ,
भविष्याच्या प्रति जागृक बनून दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणासाठी योगदान देऊया !
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌍

पृथ्वी आपले घर आहे व घराचे रक्षण करणे आपले काम आहे, म्हणून या जागतिक वसुंधरा दिनाला पर्यावरण रक्षणाचा निर्धार करूया…

अर्थ साठी काहीतरी करा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

चला या जागतिक वसुंधरा दिनला निर्धार करुया की आपण प्रत्येक मानवाशी व पर्यावरणाशी सद्भावनेने राहु जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा !!

आपली पृथ्वी आहे प्यारी,
तिला प्रदूषनाने दूषित करू नका,
पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करूया,
नुसता संकल्प घेऊन गप बसू नका…

माझ्या सर्व प्रिय जनांना 🌍 वसुंधरा दिनाच्या 🌍 खूप खूप  शुभेच्छा

FAQ On Earth day In Marathi

वसुंधरा दिन कधी असतो?

वसुंधरा दिन 22 एप्रिल ला असतो.

जगातील पहिला जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला गेला?

जगातील पहिला जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल 1970 रोजी साजरा केला गेला.

सारांश 

मला आशा आहे माझ्या या लेखाद्वारे तुम्हाला जागतिक वसुंधरा दिवसाची माहिती मिळाली असेल तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेअर करा व या लेखात काही कमी किंवा त्रुटी आढळली असेल तर कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. 

मला खात्री आहे तुमच्या Earth Day Information In Marathi बद्दल सर्व शंका मिटल्या असतील. जर तुम्हाला इतर कोणत्याही एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट द्वारे नक्की कळवा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *