Home » Jobs & Education » Essay Writing » शिक्षण संख्यात्मक हवे की गुणात्मक मराठी निबंध

शिक्षण संख्यात्मक हवे की गुणात्मक मराठी निबंध

शिक्षण हे संख्यात्मक असावे की गुणात्मक?

आज शिक्षणामुळे आपल्या सर्वाच्या प्रगतीचा पाया रचला गेला आहे.आज शिक्षणामुळे आपण चांगल्या मोठया कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करू शकतो.किंवा आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर आपल्या अंगी असलेल्या कला-कौशल्यांचा वापर करून आपण स्वताचा एखादा उद्योग-व्यवसाय देखील सुरू करू शकतो.आणि हे सर्व शक्य होते ते शिक्षणामुळे.

पण आपण जे शिक्षण घेऊन एवढया मोठमोठया कंपनीत आज नोकरी करतो आहे.स्वताचे स्टार्ट अप व्यवसाय सुरू करतो आहे ह्यासाठी आपल्याला कोणते शिक्षण गरजेचे आहे गुणात्मक की संख्यात्मक हा देखील आपल्याला पडणारा एक मोठा प्रश्न आहे.

सर्वात आधी आपण गुणात्मक आणि संख्यात्मक शिक्षण म्हणजे काय हे जाणुन घेऊ मग आपण त्यावर सविस्तरपणे चर्चा करूया. संख्यात्मक शिक्षण म्हणजे भरपुर पदव्या प्राप्त करणे,आणि त्यात नेहमी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणे होय.म्हणजे यात गुणवत्तेपेक्षा शिक्षणाच्या संख्येला महत्व दिले जाते.

आणि गुणात्मक शिक्षण म्हणजे गुणवत्तापुर्ण पदधतीने घेतलेले शिक्षण ज्यात आपण किती मोठमोठया पदव्या प्राप्त केल्या याला महत्व न देता त्या मिळवलेल्या पदवींतुन आपण किती ज्ञान प्राप्त केले याला महत्व दिले जाते.आणि त्याच मिळवलेल्या आपल्या ज्ञानाचा आपल्याला भविष्यात आपल्या दैनंदिन जीवणात किती उपयोग होणार आहे त्या घेतलेल्या शिक्षणामुळे आपण स्वताच्या कर्तृत्वाच्या बळावर पैसे कमावू शकतो का?हे ह्या गुणात्मक शिक्षणात पाहिले जाते.यात शिक्षणाच्या संख्येपेक्षा त्याच्या दर्जाला विशेष महत्व दिले जात असते.म्हणजेच आपण किती पदव्या प्राप्त केल्या त्यापेक्षा त्या पदव्यांमधून आपण किती ज्ञान प्राप्त केले आणि त्याच प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवणात समाजात वावरताना किती योग्य पदधतीने करतो आहे?आपण आपल्या ज्ञानाचा कलेचा कौशल्याचा वापर करून पैसे कमावू शकतो का?ह्या पातळीवर आपल्या गुणात्मक शिक्षणाची पाहणी तसेच पडताळणी केली जात असते.

पण आजचे शिक्षण पाहायला गेले तर तरूणांकडे-तरूणींकडे पदव्या भरमसाठ आहेत.पण त्या पदवीच्या बळावर त्यांना कुठेही नोकरी लागत नाहीये.कारण आजचा तरूण आपल्या skill expertise वर काम न करता फक्त पदव्या प्राप्त करतो आहे ज्यांना आजच्या ह्या डिजीटल युगात काहीच महत्व नाहीये.

कारण आपल्याकडे पदव्या कितीही असो पण आपल्याकडे knowledge आणि skill expertise नसेल तर कोणतीही कंपनी आपल्याला आज फक्त पदवीच्या बळावर नोकरी देणार नाहीये.हे तर निश्चित आहे कारण कोणतीही कंपनी आपल्याला तेव्हाच नोकरी देणार आहे जेव्हा त्या कंपनीला वाटेल की आपल्यापासुन त्यांना काहीतरी profit होऊ शकतो तसेच आपण त्यांच्या कंपनीत काही value addition करू शकतो.

आणि हीच गोष्ट आपल्या तरुण वर्गाला माहीत नसते.म्हणुन तो फक्त मुलाखतीस जातो आणि त्याच्या प्राप्त केलेल्या मोठमोठया पदव्या दाखवतो पण ज्याक्षणी त्याला हे विचारले जाते की तुमच्या अंगी कोणते skill आहे किंवा तुम्ही आमच्या कंपनीत काय value add करू शकता.तेव्हा त्याच्याकडे काहीच उत्तर नसते.कारण त्याने संख्यात्मक शिक्षणावर विशेष भर दिलेला असतो गुणात्मक नाही.

आणि मग पुढे जाऊन तोच तरूण-तरूणी सरकारला दोष देत म्हणतो की आम्ही एवढे शिक्षण करून,एवढया मोठमोठया पदव्या प्राप्त करून सुदधा आज आमच्याकडे नोकरी नाहीये.आणि याला कारणीभुत सरकार आहे.पण यात सरकार तरी काय करणार आपण आपल्या संख्यात्मक शिक्षणाकडेच फक्त लक्ष दिले गुणात्मक शिक्षणाकडे कधी आपण लक्ष दिलेच नाही.

सांगण्याचा उददेश एवढाच की आजच्या तरूण-तरुणीने पदव्यांमागे वर्ष वाया घालत बसण्यापेक्षा आपल्या skill expertise वर जास्त काम करायला हवे.अशा skill चे शिक्षण घ्यायला हवे ज्याच्यामुळे आपण स्वताच्या बळावर पुढे जाऊन कमावू शकतो.आणि जरी नोकरी नही मिळाली तरी हताश-निराश न होता आपल्या  skill तसेच knowledge च्या बळावर स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो.आणि आपला उदरनिर्वाह करू शकतो.

आणि हेच खरे शिक्षण आज प्रत्येकाने प्राप्त करणे गरजेचे आहे.आणि असेच शिक्षण म्हणजे गुणात्मक शिक्षण आहे.कारण शिक्षणाचे मुळ उददिष्टच आपल्याला सक्षम बनविणे हे आहे आणि आपल्याला सक्षम बनविण्याचेच मुख्य काम हे गुणात्मक शिक्षण करते.

हा ही गोष्ट पण आपण नाकारू शकत नाही की संख्यात्मक शिक्षण पण महत्वाचे आहे कारण आज प्रत्येकाला आज त्याने प्राप्त केलेल्या मोठमोठया पदव्यांमुळे,तसेच भरमसाठ टक्केवारीमुळे चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त असते.पण ह्या सर्व गोष्टींसोबत अजुन काही गोष्टी नोकरी देताना पाहिल्या जात असतात आणि त्या जर आपल्यात नसल्या तर आपल्याला आपण घेतलेल्या नुसत्या कागदी शिक्षणाच्या आधारावर कोणीही नोकरी देणार नाही आणि त्या गोष्टी म्हणजे आपली गुणवत्ता,आपली skill expertise तसेच आपल्याला आपल्या शिक्षण घेतलेल्या field विषयी असलेले knowledge.ज्याचा उपयोग फायदा आपण जिथे नोकरी करणार असतो त्या कंपनीला होणार असतो.

म्हणुन आपण आपल्या संख्यात्मक शिक्षणासोबत गुणात्मक शिक्षणावर देखील अधिक भर देणे अधिक गरजेचे आहे.आणि सध्याच्या डिजीटल युगात अशाच शिक्षणाला अधिक महत्व दिले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *