ई एम आय चा फुल फॉर्म, ई एम आय चा अर्थ, ई एम आय म्हणजे काय, ई एम आय कसा मोजावा, ई एम आय चे फायदे, ई एम आय चे तोटे, EMI चे इतर काही फुल फॉर्म (EMI Full Form in Marathi, EMI Meaning in Marathi, EMI Information in Marathi, How to calculate EMI In Marathi, Advantages of EMI In Marathi, Disadvantages of EMI In Marathi, Other Full Forms of EMI in Marathi)
आपण खूपवेळा EMI हा शब्द वाचला असेल किंवा ऐकला असेल. काही लोक म्हणतात, की मी EMI वरती गाडी किंवा मोबाईल घेतला आहे. लोक EMI वरती विविध वस्तूंची खरेदी करताना दिसतात. त्याकारणाने ई एम आय हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. परंतु, नक्की EMI म्हणजे काय असते? EMI चा फुल फॉर्म काय आहे? EMI चा अर्थ काय होतो? EMI म्हणजे काय? हे तुम्हाला माहीत नसेल. तर आता आपण या लेखात EMI बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आजकाल जीवनातील लक्ष्य पूर्ण करण्याकरिता किंवा गरजा भागविण्यासाठी कर्ज घेण्याची गरज भासते. लोक आयुष्यातील विविध टप्प्यांवर कर्जाचा आधार घेतात. कर्ज हा सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे.
कार खरेदी करावयाची असेल तर कार लोन, घर खरेदी किंवा घरबांधणी करायची असेल तर होम लोन किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असेल तर शैक्षणिक लोन अशा एकानेक कर्जांची आवश्यकता असते.
कर्जाबाबत बोलत असताना त्याची परतफेड करणे आलेच. त्यासंबंधितच असलेल्या EMI बद्दल बरेचश्या व्यक्तींना माहिती नसते. तसेच बहुतांश लोकांना EMI Full form in Marathi सुध्दा माहित नाही.
ई एम आय चा फुल फॉर्म काय आहे? | EMI Full Form in Marathi
EMI चा फुल फॉर्म ‘Equated Monthly Installment’ आहे. मराठी मध्ये EMI ला ‘समतुल्य मासिक हप्ता’ असे म्हणतात. तर, हिंदी मध्ये ‘समान मासिक किश्त’ असे म्हणतात.
” एखाद्या व्यक्तीने कोणत्याही घेतलेल्या कर्जाची ठराविक कालवधीनंतर परतफेड करावी लागते. त्याची परतफेड समान मासिक हफ्त्यांद्वारे केली जाते. त्यालाच ई एम आय किंवा एक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट असे म्हणतात. “
थोडक्यात, EMI म्हणजेच हा दर महिन्याला खरेदी केलेल्या वस्तूचा किंवा घेतलेल्या कर्जाचा हप्ता असतो.
ई एम आय चा अर्थ काय आहे | EMI Meaning in Marathi
EMI चा अर्थ (Equated Monthly Installment) समतुल्य मासिक हप्ता असा होतो. याचाच अर्थ जेव्हा आपल्याला कर्जाची गरज असते, तेव्हा ते तुम्हाला मंजूर होईल. त्यानंतर घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी समान मासिक रक्कम हफ्त्यांच्या स्वरूपात कर्जदात्याला परत करावी लागते. यालाच ई एम आय म्हणतात.
ई एम आय म्हणजे काय? | EMI Information in Marathi
आपण आता EMI शब्दाचा अर्थ पाहिला. परंतु, आता आपण EMI म्हणजे काय हे पाहुयात.
जेव्हा आपण कोणतीही वस्तू बँकेच्या कर्जाव्दारे खरेदी करतो, तेव्हा आपल्याला बँकेचे कर्ज काही ठराविक दिवसांमध्ये परतफेड करावयाचे असते. हे कर्ज आपल्याला काही टप्प्यांमध्ये परतफेड करायचे असते. तुम्ही ते ६, १२ किंवा १८ महिने तुमच्या परिस्थितीनुसार कालावधी निवडू शकता. म्हणजेच दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याजासह ठरवली जाते आणि ती आपणास बँकेमध्ये जमा करावी लागते. या ठरावीक हफ्त्यालाच EMI (ई एम आय) असे म्हणतात. सोप्या भाषेत यास कर्जाचा हप्ता म्हणतात.
उदा. : तुम्ही समजा एक दहा हजार रुपयाचा मोबाईल किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या विचाराधीन आहात. तुमच्याजवळ एकदम दहा हजार रुपये नसतील तर तुम्ही तो मोबाईल किंवा वस्तू EMI वरती खरेदी करू शकता. ते पैसे तुमच्यापाशी एकाचवेळी उपलब्ध नसल्याने तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन हजार या प्रमाणे पाच महिन्यांत किंवा ठराविक रक्कम देऊन काही कालावधीत तो मोबाईल किंवा वस्तू खरेदी करू शकता. या प्रक्रियेलाच ‘EMI वरती वस्तू खरेदी करणे’ म्हणतात.
- EMI हा त्या विशिष्ठ वस्तूच्या किंमतीवरून ठरविला जातो.
- वस्तू EMI वरती घेण्यापूर्वी तिच्या किमतीच्या थोडी रक्कम सुरवातीला जमा करावी लागते. याला ‘डाऊन पेमेंट’ असे म्हणतात.
- ज्या त्या वस्तूंच्या मालकी कंपनी कोणत्या वस्तू EMI वरती द्यावयाच्या हे ठरविते. प्रत्येक वस्तूवर EMI लागू होत नाही.
- कार किंवा घर खरेदी करण्यासाठी EMI ही सुविधा मिळते. या कारणांसाठी मोठी रक्कम आवश्यक असते. एकाचवेळी जास्त रक्कम उपलब्ध नसल्याने लोक ई एम आय चा लाभ घेतात.
- ई एम आयवर कोणतीही वस्तू घेता तेव्हा ते तुमच्या बँकेचे पासबुक मागतात म्हणजे नंतर हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेतून त्या तारखेला आपोआप कापले जातात.
- EMI चा हफ्ता चुकला तर दंड भरावा लागतो अथवा EMI वरील वस्तू जप्त केली जाऊ शकते. म्हणून EMI वेळोवेळी भरला जाईल याची खात्री करावी.
ई एम आय कसा मोजावा | How to calculate EMI In Marathi
एखादा कर्जदार जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्यास कर्जावरती किती व्याज लागेल हे सांगितले जाते. त्या कर्जाच्या रक्कमेस मुद्दल म्हणतात. बँका कर्ज परतफेडीवेळी मुद्दल + व्याज घेतात. ते हफ्त्याच्या स्वरूपात एकत्र घेतले जाते. तसेच, कर्जासोबतच कर्जाचा कालावधी सुद्धा निश्चित केलेला असतो, त्याप्रमाणे कर्ज बँकेला तेवढ्या कालावधीतच परत होईल असे EMI ठरविले जाते.
यातून समजते की EMI ची रक्कम मोजण्यासाठी तीन घटकांचा विचार केला जातो.
- कर्जाची मुद्दल ( Loan Amount )
- बँक किंवा वित्तीय संस्थेद्वारे आकारला जाणारा व्याजदर (Interest Rate)
- कर्ज परतफेड करण्यासाठी लागणारा कालावधी (Tenure of the Loan)
ई एम आय चे फायदे | Advantages of EMI In Marathi
- EMI च्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेची आणि आवडीची कोणतीही वस्तू जरी किमती एवढी रक्कम उपलब्ध नसेल तरी खरेदी करू शकता.
- EMI चे हफ्ते वेळच्या वेळी भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो.
- व्याजाशिवाय उपलब्ध असलेल्या EMI च्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला व्याज भरावे लागत नाही.
- जर तुम्ही विश्वासू कंपनी सोबत EMI द्वारे व्यवहार करत असाल. तर, तुमची फसवणूक होण्याचा धोका उद्भवत नाही.
EMI चे असे अनेक फायदे आहेत.
ई एम आय चे तोटे | Disadvantages of EMI In Marathi
- EMI द्वारे आपणास आवश्यक त्या वस्तूच खरेदी कराव्यात. अतिमहाग व अनावश्यक वस्तू खरेदी केल्यास त्यांच्या हफ्त्याचा बोजा पडतो.
- EMI सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी अटी व शर्ती नक्की वाचाव्यात, किंबहुना नंतर तुम्हाला समस्या उद्भवू नयेत.
- EMI चे हफ्ते जर वेळेवरती भरले नाहीत तर आपणास सेवा कर आकारला जातो.
EMI चे इतर काही फुल फॉर्म | Other Full Forms of EMI in Marathi
EMI – Electromagnetic Interference. | विद्युत चुंबकीय व्यत्यय |
EMI – Electronic and Musical Instrument. | विद्युत संगीत वाद्य |
EMI – Equal Monthly Installment. | समान मासिक हफ्ता |
EMI – Electronic Money Institution. | इलेक्ट्रॉनिक मनी इन्स्टिट्युशन |
FAQ On EMI In Marathi
EMI चा फुल फॉर्म ‘Equated Monthly Installment’ आहे. तर मराठी मध्ये EMI चा फुल फॉर्म ‘समान मासिक हप्ता’ असा आहे.
EMI चा अर्थ समतुल्य मासिक हप्ता असा होतो. याचाच अर्थ आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी समान मासिक रक्कम हफ्त्यांच्या स्वरूपात कर्जदात्याला परतफेड करावी लागते. म्हणजेच ई एम आय म्हणतात.
EMI चा हिंदीमधे फुल फॉर्म ‘समान मासिक किश्त’ असा होतो.
EMI हा मूळ परतफेड रक्कम, व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी या घटकांवर अवलंबून आहे.
डाउन पेमेंट म्हणजे कोणतीही वस्तू EMI द्वारे खरेदी करण्यासाठी सुरवातीला द्यावी लागणारी राशी/रक्कम होय.
आशा आहे की आम्ही दिलेल्या EMI Full Form in Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या EMI Meaning in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा: