Home » Jobs & Education » Essay Writing » मराठी निबंध लेखन (Marathi Nibandh Lekhan)। Essay Writing In Marathi

मराठी निबंध लेखन (Marathi Nibandh Lekhan)। Essay Writing In Marathi

निबंध meaning in marathi, निबंध इन मराठी, निबंध प्रकार मराठी, निबंध मराठी 10वी, निबंध मराठी 12वी, निबंध लेखन class 10 marathi, निबंध लेखन मराठी 10वी, निबंध लेखन मराठी 12वी, निबंध लेखन मराठी 6वी, निबंध लेखन मराठी 8वी, निबंध लेखन मराठी 9वी, निबंध लेखन मराठी pdf, निबंध लेखन मराठी विषय, निबंध लेखन विषय मराठी ( how to write essay in marathi, how to write nibandh in marathi, marathi nibandh 10th class)

आजच्या या लेखात आपण मराठी निबंध लेखन (Marathi Essay Writing) कसा करायचा हे बघू आणि निबंध ह्या विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Contents hide
1. मराठी निबंध लेखन । Essay Writing In Marathi
1.2. निबंधाचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत?

मराठी निबंध लेखन । Essay Writing In Marathi

निबंध हा एक असा महत्वाचा लेखनातील महत्वपुर्ण घटक आहे.जो आपल्याला शालेय अभ्यासक्रमातुनच अभ्यासावयास मिळत असतो.निबंध हे वेगवेगळया पातळीवरचे असतात.पहिली पातळी म्हणजे शालेय पातळी आणि दुसरी म्हणजे महाविद्यालयीन पातळी तसेच स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे निबंध.शालेय पातळीवरच्या निबंधात माझी आई,माझी शाळा अशा प्रकारच्या निबंधांचा समावेश होतो.तर महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परिक्षेतील निबंध हे सामाजिक तसेच वैचारिक पातळीवरचे निबंध असतात.

निबंध म्हणजे काय?

निबंध ह्या शब्दाचा अर्थ होतो नि+बंध म्हणजेच नियमाने बांधलेला.एखाद्या विषयावर जेव्हा आपण योग्य आणि सुसंगतपणे निवडक शब्दांचा आधार घेऊन विचारांची बांधणी तसेच मांडणी करत असतो.तेव्हा त्याला निबंध असे म्हटले जात असते.

निबंधाचे त्याच्या स्तरानुसार वेगवेगळे प्रकार पडत असतात.ज्यात शालेय पातळीवरचे निबंध ज्यात शालेय विदयार्थ्यांच्या बौदधिक पातळीनुसार निबंधाचे विषय त्यांना दिले जात असतात.आणि महाविदयालयीन पातळीवरील,स्पर्धा परिक्षा पातळीवरचे निबंध हे थोडे अवघड तसेच वैचारिक पातळीवरचे असतात.

निबंधाचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत?

 1. वैचारिक निबंध
 2. कल्पणात्मक निबंध
 3. वर्णनात्मक निबंध
 4. आत्मकथनात्मक निबंध
 5. कथनात्मक निबंध
 6. लघुनिबंध
 7. ललित निबंध
 8. शोधनिबंध

1. वैचारिक निबंध म्हणजे काय?

वैचारिक निबंध म्हणजे वैचारिक पातळीवरील लेखन केलेला निबंध. अशा प्रकारच्या निबंधांमध्ये एखाद्या महत्वाच्या विषयावर चहुबाजुंनी विचार केला जातो.

वैचारिक निबंधाचे स्वरुप :

यात एखादा महत्वाचा विषय मांडला जातो मग त्याचा दोन्ही पदधतीने म्हणजेच सकारात्मक तसेच नकारात्मक पदधतीने तसेच पहिल्या व्यक्तीच्या बाजुने,दुसरी व्यक्तीच्या बाजुने विचार केला जातो.मग शेवटी दोन्ही पक्षाचे मुददे उदाहणासहित मांडुन झाल्यावर कोणत्याही एका बाजुचे समर्थन करीत समोरच्या विरूदध म्हणजेच दितीय पक्षाचे मत खोडुन काढायचे असते.आणि मग एक शेवटचा निष्कर्ष अशा प्रकारच्या निबंधामध्ये काढला जात असतो.म्हणुन अशा प्रकारच्या निबंधाला चर्चात्मक निबंध असे देखील म्हटले जात असते.

अशा प्रकारचे निबंध हे स्पर्धा परिक्षा तसेच महाविद्यालयीन परिक्षेत विचारले जात असतात.

वर्णनात्मक निबंध चे उदाहरणे

2. कल्पणात्मक निबंध म्हणजे काय?

कल्पणात्मक निबंध म्हणजे असा निबंध ज्याची रचना ही कल्पणेच्या आधारावर केली गेलेली असते.त्याचा वास्तविकतेशी खूप मोठा घनिष्ठ असा निबंध नसतो.

कल्पणात्मक निबंधाचे स्वरूप :

अशा प्रकारच्या निबंधामध्ये जर तर असे शब्द प्रामुख्याने वापरले जात असतात.जर मी पक्षी झालो तर तसेच जर मी अदृश्य झालो तर अशा प्रकारचे काल्पणिक विषय ह्या काल्पणिक निबंधाच्या प्रकारात येत असतात.

आपण दैनंदिन जीवणात ज्या परिस्थितीत जगत असतो.त्या परिस्थितीतुन बाहेर पडणे आपल्याला अवघड तसेच अशक्य वाटत असते.अशा वेळी काहीतरी चमत्कार घडावा आणि असे व्हावे तसेच तसे व्हावे असे आपल्याला वाटत असते.आणि ह्या भावनेतुन आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कल्पणेच्या पातळीवर पुर्ण करत असतो.आणि आपल्या मनातील ही कल्पणा आपण शब्दांच्या रूपात मांडत जातो.आणि ह्यालाच काल्पणिक निबंध असे म्हटले जात असते.

3. वर्णनात्मक निबंध म्हणजे काय?

एखादी घटना,प्रसंग, वस्तु प्राणी, इत्यादींचे आपण पाहिलेले दृश्य हुबेहुब चित्रात्मक पदधतीने वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध लेखन होय.

वर्णनात्मक निबंधाचे स्वरूप :

वर्णनात्मक निबंधामध्ये आपण ज्या घटना तसेच प्रसंगाचे वर्णन करत असतो.त्याच्यामधील सुक्ष्मातीसुक्ष्म बारकावे टिपण्याची आणि त्याचे वर्णन करण्याची कला आपल्यामध्ये वर्णनात्मक निबंध लेखन करण्यासाठी असावी लागते.वर्णनात्मक निबंध हा अशा पदधतीने मांडायचा असतो की त्या निबंधामध्ये आपण वर्णन केलेल्या घटना प्रसंगाचे हुबेहुब चित्र निबंध वाचत असलेल्या व्यक्तीच्या डोळयासमोर उभे राहिले पाहिजे अशा पदधतीची मांडणी ह्या निबंधाची करावी लागत असते.

वर्णनात्मक निबंधामध्ये व्यक्तीचित्रणाचा देखील समावेश होत असतो.ज्यात एखाद्या व्यक्तीच्या गुणांचे,स्वभावाचे,व्यक्तीमत्वाचे हुबेहुब चित्रण करण्यासोबतच त्यांच्या अवगुणाचे,दोषांचे,वाईट प्रवृत्ती इत्यादींचे देखील वर्णन केले जात असते.

वर्णनात्मक निबंध चे उदाहरणे

4. आत्मकथनात्मक निबंध म्हणजे काय?

आत्मकथनात्मक निबंध हा एक असा निबंधाचा प्रकार आहे ज्यात एखाद्या सजीव तसेच निर्जिव वस्तुचे आत्मकथन आपण करत असतो.

आत्मकथनात्मक निबंधाचे स्वरूप :

ह्या निबंधाच्या प्रकारात आपल्याला त्या सजीव तसेच निर्जिव वस्तुच्या वेदनांचा आपल्याला स्वता अनुभव आला आहे अशा पदधतीने सहदयीपणे हा निबंध मांडायचा असतो.आत्मकथनात्मक निबंधात एखाद्या सजीव तसेच निर्जिव वस्तुची कैफियत,मनोगत सांगितलेले असते.ज्यात त्याने त्याच्या जीवणाच्या सुरूवातीपासुनच्या घडलेल्या प्रत्येक घटना तसेच प्रसंगाचे आत्मनिवेदन केलेले असते.

अशा प्रकारच्या निबंधात एखाद्या सजीव तसेच निर्जिव वस्तुच्या समस्यांचे सुख दुखाचे कथन करून त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या असलेल्या तक्रारी देखील येथे प्रभावीपणे मांडायच्या असतात.अशा प्रकारच्या निबंधात विषय अशा पदधतीने मांडायचा असतो की ती सजीव तसेच निर्जिव वस्तु स्वता लोकांशी संवाद साधते आहे आणि आपल्या व्यथा मांडते आहे.

आत्मकथन निबंध चे उदाहरणे

5. कथनात्मक निबंध निबंध म्हणजे काय?

कथनात्मक निबंध म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवणात घडलेल्या घटना प्रसंगाचे तसेच दैनंदिन जीवणात आलेल्या स्व अनुभवांचे कथन कथेच्या स्वरुपात करणे होय.

6. लघुनिबंध म्हणजे काय?

लघुनिबंध हा सुदधा निबंधाचाच अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणुन ओळखला जातो.लघुनिबंध म्हणजे आपल्या दैनंदिन जीवणात घडत असलेली एखादी घटना तसेच प्रसंग एकदम खेळकरवृत्तीने आपल्या शब्दांत मांडणे होय.

लघुनिबंधाचे स्वरूप :

ह्या निबंधाच्या प्रकारात आपण आपल्या जीवणातील एखादा विनोदी प्रसंग खेळकरवृत्तीने,गंमतीशीर पदधतीने सांगत असतो.मराठी लघुनिबंध लेखणात ना.सी फडके आणि वि.सं.खांडेकर यांनी खुप चांगली भुमिका बजावलेली आपणास दिसुन येते.आणि ह्यांचे सर्व लघुनिबंध हे अत्यंत खोडसर प्रवृत्तीचे तसेच विनोदी स्वरुपाचे असतात.ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यात एखादा घडलेला गंभीरातील गंभीर प्रसंग देखील एकदम विनोदी स्वरूपात आपल्यासमोर मांडलेला आपणास दिसुन येतो.

7. ललित निबंध म्हणजे काय? 

ललित निबंध हा एक ललित साहित्याचाच मुख्य प्रकार म्हणून ओळखला जातो.

ललित निबंधाचे स्वरुप :

ललित निबंधामध्ये निसर्गाचे सौदर्यचित्रण केलेले असते.ललित निबंधामध्ये निसर्गाच्या एखाद्या दृश्याचे लालित्यपुर्ण पदधतीने वर्णन केले जात असते.लालित्य ह्याचाच दुसरा अर्थ प्रेम असा देखील होतो.म्हणजेच आपण जेव्हा निसर्गाच्या एखाद्या सुंदर दृश्याचे लालित्यपुर्ण पदधतीने वर्णन करत असतो.तेव्हा अशा प्रकारच्या लेखनाला ललित लेखण असे म्हटले जात असते.

8. शोधनिबंध म्हणजे काय? 

शोधनिबंध म्हणजे एखाद्या विषयावर पुर्ण संशोधन करून,संदर्भासाठी विविध पुरावे गोळा करून केलेले निबंध लेखन म्हणजे शोधनिबंध होय.

शोधनिबंधाचे स्वरूप :

शोधनिबंध हा प्रकार महाविदयालयीन अभ्यासक्रमात एम ए,पी एचडी सारख्या पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट करण्यात आला आहे.ज्यात आपल्याला एखाद्या विषयावर संशोधन करून,संदर्भासाठी योग्य पुरावे माहीती,गोळा करावे लागत असतात.त्यासाठी अनेक जणांच्या मुलाखती घेणे,ज्या विषयावर आपण पी एचडी करतो आहे त्या विषयावरील माहीतीचे संकलन करण्यासाठी त्या विषयाशी संसंधित लोकांशी चर्चा करणे,त्यांचे जीवन,जगण्याची पदधत,संस्कृती जाणुन घेणे आणि मग त्यावर एक शोधनिबंध लिहायचा असतो.

शोध निबंधात कल्पणेच्या बळावर आपण कुठलीही गोष्ट मांडु शकत नसतो.त्यासाठी ती गोष्ट सिदध करायला आपल्याला योग्य ते पुरावे,संदर्भ सादर करावे लागत असतात.तेव्हाच आपला शोधनिबंध हा ग्राहय धरला जात असतो.अन्यथा नाही.

एम पी एससी साठी निबंध कसा लिहायचा? | How To Write Essay in Marathi For MPSC

 • निबंधाची सुरुवातच इतक्या आकर्षक पदधतीने करावी की पुढचा संपुर्ण निबंध वाचण्याची उत्कंठा परिक्षकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.
 • निबंधाची सुरूवात आकर्षक पदधतीने करून झाल्यावर विषयाची ओळख करून द्यावी आणि आपण ज्या विषयावर निबंध लिहितो आहे त्या विषयाचे गांभीर्य देखील व्यवस्थित थोडक्यात समजावून सांगावे.
 • यानंतर आपण लेखन करत असलेल्या मुद्याचे तपशीलवार,योग्य संदर्भ तसेच उदाहरणांचा वापर करून सर्मथन करावे सोबत समोरच्याची बाजु मांडुन ती देखील खोडुन काढावी.
 • प्रत्येक नवीन विचाराची मांडणी करत असताना एक नवीन परिच्छेदाचा वापर करावा.
 • आणि मग शेवटी सारांश मांडतांना दोन्ही बाजुचे मत मांडुन कोणत्याही एका बाजूचे मत मांडुन खोडुन देखील काढावे.तसेच एका बाजुला आपले समर्थन देखील दाखवण्याबरोबरच आपले एक वैयक्तिक मत देखील मांडावे.

अशा पदधतीने आज आपण मराठी निबंध लेखन (Marathi Essay Writing) हा विषय जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *