Home » Business & Finance » Finance » Banking » Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi | शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज योजना माहिती

Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi | शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज योजना माहिती

Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi: शेती करण्यासाठी भांडवल व पैशाची गरज भासते. शेतकरी एवढे पैसे अचानक उभे करू शकत नाही. त्याला शेतीसाठी कर्ज घ्यावे लागते. महाराष्ट्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कोणत्या कर्ज योजना व कोण कोणत्या कर्ज सुविधा उपलब्ध आहेत हे या लेखातून जाणून घेऊयात.

Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi | कृषी कर्ज

शेती हा भारतातील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. म्हणूनच भारताला ‘कृषीप्रधान’ देश म्हटले जाते. शेतकरी शेती व्यवसायात गुंतवणुकीसाठी आणि शेती पूरक व्यवसाय मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिकरित्या कमकुवत आहे. त्यामुळे त्यास कर्ज घेण्याची आवश्यकता भासते. शेतीशी निगडित उद्देशांसाठी कृषी कर्ज घेऊ शकतात. 

वेळोवेळी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध बॅंका व वित्तीय संस्था मदत करतात. त्यामुळे शेतकरी शेती ही अधिक जोमाने व कार्यक्षमतेने करू शकतील.‌ ‌‍‍‌‌‍कृषी कर्ज हे बिज – बियाणे, कीटकनाशके, खते, शेती अवजारे, सिंचनासाठी पाणी खरेदी करण्यासाठी उपयोगी पडते.

कृषी कर्जाचे प्रकार

बँका व वित्तीय संस्था द्वारे दिल्या जाणाऱ्या शेती कर्जाचे सामान्य प्रकार आहेत : 

 1. पीक कर्ज/किसान क्रेडिट कार्ड
 2. शेती यांत्रिकीकरण कर्ज
 3. कृषी सुवर्ण कर्ज
 4. कृषी कार्यरत भांडवल कर्ज
 5. कृषी मुदत कर्ज
 6. फलोत्पादन कर्ज (फळबाग लागवड)
 7. वनीकरण कर्ज
 8. कृषी जोड-धंद्यासाठी कर्ज

कर्ज मुदती व परतफेड कालावधी नुसार कृषी कर्जाचे प्रकार पडतात.

 1. अल्प मुदत (एक हंगाम) : बियाणे, खते, पीक कर्ज
 2. मध्यम मुदत (१ ते ३ वर्षे) : शेती अवजारे खरेदी
 3. जास्त मुदत (३ ते ५ वर्षे) : शेतजमीन खरेदी

कृषी कर्जाचे उद्देश :

 • कृषी कर्जाचा मुख्य उद्देश कृषी व कृषी संलग्न बिगरशेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून शेती विकासातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

कृषी कर्जाचे लाभ :

 • कृषी कर्जातून तुम्ही पीक कर्ज घेऊ शकता. ज्याचा लाभ हंगामी खरिप किंवा रब्बी शेती मशागतीसाठी होईल.
 • फलोत्पादन / फळबाग लागवड करण्यासाठी येणारा खर्च कमी करण्यात शेती कर्ज लाभदायक आहे.
 • शेतीसाठी लागणारी साधने आणि अवजारे खरेदी करू शकता.
 • नवीन शेतजमीन खरेदीसाठी कृषी कर्ज उपयोगी आहे.
 • Hi-Tech शेती म्हणजेच पॉलीहाऊस उभारणी करीता कर्ज मिळते.
 • शेतामध्ये ठिंबक किंवा तुषार सिंचन सुविधा बसवण्याकरिता आणि सोलर पंप बसविण्यासाठी ही हे कर्ज घेऊ शकता.
 • शेततळे, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन व्यवसाय, मधुमक्षिका पालन व्यवसाय स्थापन करण्यासाठीही कृषी कर्ज मिळू शकते. 
 • शेतीची कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक ट्रॅक्टर किंवा इतर वाहन खरेदीसाठी हे कर्ज उपयोगी आहे.
 • मत्स्यशेती साठी ही कृषी कर्ज मिळते.

शेती कर्जासाठी पात्रता :

शेतीच्या कर्जासाठी पात्रता निकष हे बँक व वित्तिय संस्थेनुसार तसेच तुम्हाला पाहिजे असणाऱ्या कृषी कर्ज प्रकारानुसार बदलतात.

१ ) कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याचे वय १८ ते ७० वर्षापर्यंत असावे.

२ ) शेतकऱ्याकडे आवश्यक मालमत्तेची मालकी असणे आवश्यक आहे.

कृषी कर्जासाठी महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज :

 • संपूर्ण भरलेला अर्ज
 • लाभार्थ्याचे ओळख पुरावे ( Identity Proof ) – आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र
 • मालमत्ता दस्तऐवज (जसे की ७/१२ कागदपत्रे), जे की शेती कर्जासाठी सुरक्षा म्हणून आवश्यक असतील.b
 • सुरक्षा म्हणून पिडीसी (पोस्ट डेटेड चेक)

शेतकऱ्यांनी कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा :

कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा? हे जाणून घेण्याआधी खालील गोष्टींचा विचार करावा.

 • तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी त्यासंबंधित सर्व अटी आणि नियम वाचल्याची खात्री करा.
 • बँकेने सांगितलेल्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करा.
 • कर्जातून मिळणाऱ्या रक्कमेचा घेतलेल्या कारणांसाठीच वापर करावा.

कृषी कर्जाकरिता अर्ज करण्यासाठी संबंधित बॅंकेच्या शाखेत जाऊन चौकशी करावी. बँक आवश्यक‌ त्या कागदपत्रांची मागणी करेल.कर्ज पुरविणारी बँक तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, बँक तुमचे कर्ज मंजूर करेल.

काही बँका आणि वित्तीय संस्था ऑनलाइन सेवा देखील पुरवतात. त्यामार्फत तुम्ही कृषी कर्जासाठी अर्ज करू शकता.

सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना : 

1. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

 • राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ‘डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना’ ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना महाराष्ट्र राज्यात अंमलात आणण्यात आली आहे.
 • १९९१ मध्ये कमी दरात पीक कर्ज देणारे धोरण आणि १९९९ मध्ये नामकरण
 • सध्या शेतकऱ्यांना रु. एकुण ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३ टक्के व्याज सवलतीत लाभ देण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल.

2. कृषी सोने तारण कर्ज

 • पेरणी, पीक लागवड, पीक कापणी, सिंचन, दुग्धव्यवसाय, मत्स्यशेती कारणांसाठी हे कर्ज मिळते.
 • तारण – १८ ते २४ कॅरेट सोने. २४ कॅरेट सोन्याचे नाणी (coin) बॅंकेकडून स्विकारली जातात पण सोन्याचे बिस्किटे व बार बॅंकेकडून स्विकारले जात नाही.
 • कर्ज रक्कम – २० ते २५ लाख
 • कालावधी – १ वर्ष
 • व्याजदर – ७.५० ते ९.०० टक्के

3. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना

शेतकऱ्यांना ३ लाख पर्यंतचे पीक कर्ज 

4. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२२

३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज माफ केले जात आहे.

अशा विविध कृषी कर्ज योजना महाराष्ट्र व केंद्र सरकारतर्फे राबविल्या जातात. महाराष्ट्र सरकार कृषी कर्ज वितरणा बरोबरच शेती संबंधित अनुदान सुध्दा पुरवते‌.

FAQ On Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi

शेतकऱ्यांना कृषी कर्ज किती रक्कम मिळते?

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज रक्कम कर्जाच्या कारणानुसार मिळते.

कृषी कर्ज मिळविण्यासाठी तारण आवश्यक आहे का? असेल तर किती?

भारत सरकारतर्फे कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी बँकांनी सुरक्षा आणि तारणासाठीचे नियम शिथिल केले आहेत. १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची गरज नाही आणि १ लाखांपेक्षेच्या जास्त कर्जासाठी, सुरक्षा निकष वैयक्तिक त्या बँकांद्वारे ठरविले जातात.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

शेतकऱ्यांना कृषी कर्ज योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

महिला शेतकरी कृषी कर्ज घेऊ शकतात का?

होय, महिला शेतकरी कृषी कर्ज घेऊ शकतात. काही बँका महिला कर्जदारांसाठी विशेष सुविधाही पुरवतात.

कृषी कर्जासाठी व्याजदर किती आहे?

कृषी कर्जासाठी व्याजदर प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेसाठी वेगवेगळे असते. त्या संबंधित माहिती बँकेतून मिळवावी.

आशा आहे की आम्ही दिलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज विषयी योजना माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Farmer Loan Schemes In Maharashtra In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *