Home » Business & Finance » Business » [40+ कृषी आधारित व्यवसाय] शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी व माहीती | Agriculture Business Ideas In Marathi

[40+ कृषी आधारित व्यवसाय] शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी व माहीती | Agriculture Business Ideas In Marathi

शेती पुरक व्यवसाय, शेती पूरक व्यवसाय यादी, ग्रामीण भागातील व्यवसाय, शेती व्यवसाय, कृषी व्यवसाय, बिझनेस, व्यवसाय (Agri, Farming, Sheti, Agriculture Business Ideas In Marathi)

आपल्याला नेहमी पाहायला मिळते की कर्जबाजारी झाल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस पडुन पिकांचे नुकसान झाल्यामुळे खुप शेतकरी चिंताग्रस्त असतात. काही शेतकरी तर ह्या चिंतेत आपले जीवन देखील संपवायला निघतात.पण आज असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्याची आवश्यकता शेतकरी वर्गाला नाहीये कारण आज वेगवेगळे व्यवसाय आणि त्याचसोबत जोडव्यवसाय देखील आले आहेत. जो करून शेतकरी वर्ग सुखात आपले आयुष्य व्यतित करू शकतो. आणि आज पाहावयास गेले तर मोठे शेतकरीच नाही तर छोटे शेतकरी देखील आपल्या शेतीमधुन जास्तीत जास्त उत्पन्नाची प्राप्ती करू शकता.

आणि जर आपण सुदधा अशाच लहान शेतकरी वर्गाच्या गटात मोडत आहात. आणि आपण देखील शेतीमधुन आपल्या उज्वल भविष्याची निर्मिती व्हावी असे स्वप्र पाहत असाल तर आपण आज एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात. कारण आमच्या ह्या आजच्या लेखात आम्ही आपणास असे शेती पुरक व्यवसायांची माहीती देणार आहोत जे करून आपण चांगले उत्पन्न प्राप्त करू शकता.

शेती पुरक व्यवसाय यादी

शेती पुरक व्यवसाय चे पर्याय जाणून घेण्यापूर्वी, त्याच्या श्रेण्यांबद्दल बोलूया, ज्यांना 3 मोठ्या श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. आणि ते आहेत –

1. निर्मितीची तसेच उत्पादनाची संसाधने (Manufacturing as well as Production Resources) : ह्या प्रकारच्या संसाधनांमध्ये उर्जा,यंत्रे,जनावरांसाठी चारा,बियाणे इत्यादींचा समावेश होत असतो.

2. शेतीमध्ये लागणारी सामग्री (Materials required in agriculture): ह्या प्रकारच्या संसाधनांमध्ये कच्चा माल,खाद इत्यादींचा समावेश  होत असतो.

3. सेवा तसेच सोय-सुविधा (Services and Amenities) : ह्या प्रकारच्या संसाधनामध्ये विमा,मार्केटिंग,प्रोसेसिंग,पँकेजिंग तसेच स्टोरेज आणि क्रेडिट इत्यादींचा समावेश होत असतो.

ग्रामीण भागातील छोटया शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय विषयी माहीती

इथे आपण काही अशा उद्योग व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत ज्यांचा शेती ह्या व्यवसायाशी फार घनिष्ठ असा संबंध आहे. आणि जे व्यवसाय करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकतात.

उत्पादन संसाधनांमध्ये मोडत असलेल्या शेतीशी संबंधित काही व्यवसायांची उदाहरणे पुढीलप्रमाणे :

1. शेतीची अवजारे भाडयाने देणे : जर छोटया शेतकरी वर्गाकडे शेतीची सर्व महत्वपुर्ण अवजारे उपलब्ध असतील किंवा त्या अवजारांची बाजारात जाऊन खरेदी करण्याइतपत त्याची आर्थिक कुवत असेल तर ते शेतीची अवजारे विकत घेऊन तीच अवजारे इतर शेतकरींना भाडेतत्वावर वापरण्यासाठी देण्याचा देखील व्यवसाय करू शकता.

2. झाडांची मुळे बियाणे इतरांना पुरविणे : हा सुदधा छोटया शेतकरी वर्गासाठी एक चांगला व्यवसाय आहे ज्यात ते विविध प्रकारच्या वृक्षांची बियाणे कापुन इतर लोकांना विकण्याचे काम करू शकतात. 

3. फळ आणि भाज्यांच्या निर्यातीचा व्यवसाय : आपल्या शेतात पिकवलेल्या फळ भाज्या तसेच इतर पिकांच्या निर्यातीचा व्यवसाय देखील छोटा शेतकरी वर्ग करू शकतो.

4. अँग्रीकल्चर फार्म : बहुतेक शेतकरी ही स्वताचे एक अंँग्रीकल्चर फार्म देखील सुरू करू शकतात.ह्यामध्ये फक्त आपल्याला लोकांच्या मागणीनुसार वस्तुंचे उत्पादन करावे लागेल आणि त्या तयार केलेल्या वस्तुंची विक्री करावी लागेल.

5. खत विक्रीचा व्यवसाय : खत विक्रिचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे जो आपण अत्यंत कमी भांडवलामध्ये देखील सुरू करू शकतो.

6. ग्रीन हाऊसमधील सेंद्रीय शेती : आजकाल सेंद्यिय पदधतीने तयार केल्या गेलेल्या शेतीविषयक उतपादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आणि याला कारण आहे रासायनिक पदधतीचा वापर करून आज जी शेतीविषयक पिके काढली जातात त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.त्यामुळे हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे जो शेतकरी करू शकतात.

सुविधा सेवेशी संबंधित केले जाणारे शेती पुरक उद्योग-व्यवसाय :

1. खाद्य पदार्थाची विक्री करणे : ह्या मध्ये आपण खाद्य पदार्थाची कापणी करून त्यांची बाजारात विक्री करू शकतो.किंवा एखाद्या कंपनीला देखील विकत देऊ शकतो.

2. Hydroponic Retail Store : ही एक अशी नवीन पदधत आहे जिच्यामध्ये वृक्षारोपन केले जात असते.आणि ह्यामध्ये आपल्याला घरगुती वापरासाठी तसेच व्यवसायिक विनियोगासाठी वृक्षारोपन करायचे असते जिथे आपल्याला मातीची आवश्यकता भासत असते.

3. जेवण तसेच इतर खाद्यपदार्थ पोहचवण्याचे काम करणे : जर छोटा शेतकरी वर्ग आपल्या शेतीसाठी खाद्यपदार्थ उगवत असेल किंवा ते तयार करत असेल तर ज्या स्थानिक लोकांना त्या खाद्यपदार्थांची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यत ते खाद्यपदार्थ पोहचवण्याचे काम ते करू शकतात.

4. फुलांची विक्री करणे : फुलांचा व्यवसाय करण्यासाठी शेतकरी वर्गाला फुलांच्या उत्पादनाची आणि फुलांचा व्यवसाय करण्यासाठी जागेची देखील आवश्यकता असते.

5. पीठाच्या गिरणीचा व्यवसाय करणे : बहुतेक शेतकरी हे पीठाच्या गिरणीचा देखील व्यवसाय करू शकतात.आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये आपण आपल्या स्वताच्या नावाने उत्पादनाचा व्यवसाय केला तर याचा खुप जास्त फायदा आपल्याला होत असतो.

6. औषधी वनस्पतींचा व्यवसाय करणे : शेतीसाठी तुळशीसारख्या औषधी वनस्पतींची निर्मिती करण्याचा औषधी वनस्पती निर्मितीचा व्यवसाय देखील यात शेतकरी करू शकतात.आणि ह्या औषधी वनस्पती निर्मितीचे काम आपण आपल्या घरात किंवा शेतीमध्ये देखील करू शकतो.

7. शेतीची पिक उत्पादने : शेतीमध्ये शेती करुन अन्य प्रकारचे पीक उत्पादन करत असताना आपल्याला सोयाबीन लवंग ह्यासारख्या पिकांच्या उत्पादनांची आवश्यकता असते.आणि ज्यासाठी आपल्याला काही योग्य प्रमाणात जागेची देखील नड भासत असते.आणि जर आपल्याकडे आपली स्वताची जागा असेल तर आपण वेगवेगळया प्रकारच्या खाद्य उत्पादनांना विकण्यासाठी इतर विशिष्ट प्रकारच्या पीक उत्पादनांची कापणी करू शकतो.

8. फुलपाखरू शेती : आपल्या नेहमी निर्दशनास येत असते की बागवान तसेच बागेची निगा राखण्याचे काम करणारे माळी हे आपल्या बागेतील वृक्षांचे तसेच रोपटयांचे सौंदर्य वाढविण्यासाठी करत असतात.आणि अशा परिस्थितीत जर आपण आपली स्वताची फुलपाखरांची एक वसाहत तयार केली तर आपण ह्यातुन अशा लोकांना टारगेट करू शकतो ज्यांना ह्याची आवश्यकता आहे.याच्याने आपला एक व्यवसाय देखील सुरू होऊ शकतो.

9. पीकांची लागवड करणे : हा व्यवसाय असे लोक करू शकतात ज्यांना पिकांची लागवड तर करता येते पण त्यांची स्वताची शेतीच नाहीये.ह्यात असे शेतकरी ज्यांची स्वताची शेती नाहीये पण त्यांना पिकांची लागवड करता येते ते इतरांना पीक लागवडीची सेवा देण्याचे काम करू शकतात.

10. फुलांचा व्यवसाय : आज कृषी क्षेत्रामध्ये जर कोणत्या व्यवसायामध्ये जोरात झपाटयाने वाढ होते आहे तर तो म्हणजे फुलांचा व्यवसाय.आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या फुलांची गरज पडत असते.

पशुपालन संबंधित केले जाणारे काही इतर छोटे उद्योग-व्यवसाय :

1. कुक्कुटपालन : कुकककुटपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण खाद्य तसेच उत्पादन कंपनीच्या मागणीनुसार कोंबडी तसेच इतर पोल्ट्री फार्ममधील जनावरांची काळजी घेत असतो.

2. मधमाशी पालन : मधुमक्षिका पालन व्यवसाय हा मधमाशींचे पालन करण्याचा व्यवसाय आहे.ज्याचा मुळ हेतु मधमाशीपासुन मध मिळविणे आणि ते मध विकणे हा असतो.

3. मासे पालन : मासेपालन हा एक असा व्यवसाय आहे जो समुद्री भागात राहणारे लोक जास्त प्रमाणात करत असतात.ह्या व्यवसायात आपण मासेपालन करत असतो आणि मग त्याच माशांची विक्री करत असतो.

4. ससे पालन : हा सुदधा एक चांगला शेतीशी निगडीत जोड व्यवसाय आहे जो शेतकरी करू शकतात.

5. गांडूळ पालन : अन्न उत्पादकांसाठी कंपोस्ट हे अत्यंत उपयुक्त साधन ठरू शकते. त्यामुळे तुम्ही कंपोस्ट बनवू शकता आणि ते शेतकरी आणि बागायतदारांना विकू शकता आणि अशा प्रकारे तुमची स्वतःची गांडूळ फार्म सुरू करू शकता.

उत्पादनासंबंधित केले जाणारे उद्योग-व्यवसाय :

1. गांडूळ खत (सेंद्रिय खत) निर्मिती : सेंद्रिय खतांचे उत्पादन आणि विक्री हा एक असा उद्योग व्यवसाय आहे जो आपण अत्यंत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील करू शकतो.ह्यासाठी फक्त आपणास एक गोष्ट लक्षात असणे गरजेचे असते आणि ती गोष्ट म्हणजे आपली उत्पादन करण्याची प्रक्रिया कशी आहे?हे खुप यात महत्वाचे असते.

2. मशरूम शेती चा व्यवसाय : अळंबी (मशरूम) हे गोल छत्रीसारखे दिसत असलेली आणि ज्याची वाढ जलदगतीने होत असते अशी वनस्पती आहे. हा एक असा व्यवसाय आहे जो करून आपण काही दिवसांतच एक चांगली कमाई करू शकतो. शिवाय ह्या व्यवसायात गुंतवणुक ही आपण फार कमी प्रमाणात करू शकतो.

3. सुर्यफुलाची शेती : आपण जेव्हा सुर्यफुलाची शेती करत असतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम कशाची आवश्यकता भासत असते तर ती म्हणजे जमीनीची.आणि थोडयाफार भांडवलाची.

4. कीटकनाशकांचे उत्पादन : जेव्हा आपण सेंद्रिय शेती करत असतो तेव्हा वनस्पतींना जी कीड लागत असते ती लागु नये यासाठी वनस्पती कीटकनाशकांचा वापर केला जात असतो.आणि याची मागणी देखील फार विपुल प्रमाणात असते.

5. झाडु तयार करणे : झाडु तयार करणे हा एक खुप चांगला व्यवसाय आहे जो चिरंतन काळ चालत राहणार आहे.कारण जेव्हा आपण सकाळी घराची स्वच्छता तसेच झाडझुड करत असतो तेव्हा आपल्याला झाडुचीच आवश्यकता पडत असते.आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी करावी लागणारी पैशांची गुंतवणुक देखील एवढी जास्त नसते.

6. टोपली तयार करणे : टोपली तयार करणे ही एक रचनात्मक प्रक्रिया आहे ज्यात आपल्या रचनात्मक बुदधीची जास्तीत जास्त आवश्यकता पडत असते. ह्याकरिता हा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली रचनात्मक बुदधी देखील फार तल्लख असावी लागते.

7. ख्रिसमस ट्रीची शेती : ख्रिसमस ट्रीची शेती करणे हा देखील एक चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे.ज्यात आपण आपल्या शेतजमिनीवर देवदाराच्या वृक्षाची सुदधा लागवड करू शकतो.आणि यांची विक्री करून देखील आपण चांगली कमाई प्राप्त करू शकतो.

8. जळाऊ लाकडांचे उत्पादन करणे : जर आपण आपल्या शेतजमिनीवर वेगवेगळया प्रकारची झाडे लावलेली असतील तर आपण त्याच झाडांच्या लाकडाचा जळाऊ लाकुड म्हणुन देखील वापर करू शकतो.आणि तीच लाकडे आपण अशा लोकांना विकु शकतो ज्याची त्यांना आवश्यकता असते.

9. लोकरीची उत्पादने : लोकरीचे उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे भरपुर मेंढया असाव्या लागतात. कारण लोकर हे आपल्याला मेंढयांपासुनच प्राप्त होत असते.

10. पाळीव प्राण्यांसाठीची खाद्य उत्पादने : आपण पाळीव प्राण्यांसाठी खाद्य उत्पादनाचा व्यवसाय देखील करू शकतो.आणि तीच तयार केलेली खाद्य उत्पादने आपण त्यांचा वापर करत असलेल्या वापरकर्त्यांना विकु देखील शकतो.

खाद्य पदार्थांच्या उत्पादनासंबंधी केले जाणारे उद्योग-व्यवसाय :

1. फ्रोजेन चिकन चे उत्पादन करणे : हा एक असा व्यवसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि हा व्यवसाय आपण कोणत्याही मेट्रोसिटीमध्ये देखील करू शकत असतो.

2. फळभाज्यांची शेती करणे : ह्या व्यवसायामध्ये आपण आपल्या शेतीत वेगवेगळया प्रकारच्या फळ भाज्यांची लागवड करू शकतो. आणि त्याच लागवड केलेल्या फळ भाज्यांची आपण विक्री देखील करू शकतो.आणि हा व्यवसाय करून चांगली कमाई देखील करू शकतो.

3. दुधाचे उत्पादन करणे : दुध उत्पादन हा सुदधा एक उत्तम व्यवसायाचा पर्याय आहे ज्यात आपण दुधाचे उत्पादन करून त्यापासुन वेगवेगळे पदार्थ तयार करून त्याच दुधाची आणि त्यापासुन बनवलेल्या उत्पादनांची विक्री करू शकतो.ह्यासाठी आपल्याला एक गायी,म्हशींसाठी,बकरी ह्या इत्यादी जनावरांसाठी एक गोठा तयार करावा लागेल.

4. मसाल्याचे उत्पादन करणे : जर आपल्याला मसाला उत्पादनाची प्रक्रिया माहीत असेल तर आपण आपला स्वताचा मसाला उत्पादनाचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो.ज्यात आपण मसाल्यांची निर्मिती करून तेच तयार केलेल्या मसाल्याच्या उत्पादनाची विक्री करू शकतो.

5. भुईमुगाचे उत्पादन करणे : भुईमुगाचे उत्पादन करण्याचा व्यवसाय एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.कारण आज बाजारपेठेत भुईमुगाची अत्याधिक मागणी होत आहे.आणि अशा परिस्थितीत आपण भुईमुगाचे उत्पादन करण्याचा व्यवसाय केला तर आपला व्यवसाय अजून जोरात चालु शकतो.

6. तेल उत्पादन : आज पाहावयास गेले तर अशी खुप वृक्ष आहेत ज्यांच्यापासुन तेलाची निर्मिती केली जात असते.आणि ह्याच तेलाचा वापर आपण अन्न तयार करण्यासाठी तसेच डोक्याला लावण्यासाठी इत्यादी कारणांसाठी करत असतो.हा सुदधा एक चांगला व्यवसाय आहे ज्यात आपण विविध वृक्षांपासुन तेलाची निर्मिती करून त्याची विक्री करू शकतो.

पर्यटन आणि आकर्षणे संबंधित केले जाणारे उद्योग-व्यवसाय :

1. मक्याचे मेजतयार करणे : जर आपल्याकडे जी शेतजमीन आहे तिच्यात मक्याची रोपटे उपलब्ध असतील तर आपण त्याच मक्याच्या रोपटयांचा वापर करून एक भुलभुलैय्या तयार करू शकतो. जिथे लोक पर्यटनासाठी येत जातील आणि त्याबदल्यात आपण त्यांच्याकडुन काही चार्ज घेऊ शकतो.आणि अशा पदधतीने आपला स्वताचा एक व्यवसाय सुरू होऊ शकतो.

2. पाळीव प्राणी प्राणीसंग्रहालय : ह्या व्यवसायासाठी आपल्याला काही पाळीव जनावरांची आवश्यकता असते. आणि येथे आपण एक आकर्षक ज्युच्या स्वरुपामध्ये आपण जे कोणी लोक आपल्या शेतजमिनीत येत असतील त्यांचे स्वागत देखील करू शकतो.आणि ह्याचे आपण त्यांच्याकडुन पैसे घेऊन आपला एक व्यवसाय सुरू करू शकतो.

3. शैक्षणिक शेतीविषयक व्यवसाय : जर आपल्याला शेतीविषयी चांगले ज्ञान असेल आणि आपल्याला शेती कशी करावी कोणत्या पदधतीने करावी इत्यादी सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्याला अवगत असेल तर आपण इतर शेतीविषयी ज्ञान प्राप्त करू इच्छित लोकांना शेतीविषयी ज्ञान देऊ शकतो.

4. ट्रॅक्टर राईडिंग सेवा : जर समजा आपल्याकडे स्वताचे एखादे ट्रॅक्टर असेल तर आपण आपले टँक्टर आपल्या शेतीच्या वेगवेगळया भागात चालवू शकतो.तसेच इतरांना मदत म्हणुन आपल्याकडून टँक्टर राईडिंग सेवा देखील प्रदान करू शकतो.ज्याचे परिणाम स्वरुप आपण एक चांगले उत्पन्न प्राप्त करू शकतो.

5. कृषि पर्यटन : जर आपल्यात असे एखादे कौशल्य असेल ज्याच्यादवारे आपण आपल्या शेतीला एका पर्यटन स्थळाचे रुप देऊन पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनवु शकतो.तर आपण अँग्रो टुरिझमचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो.

6. पैसे घेऊन शिकार करू देणे : जर आपल्याकडे अशी एखादी शेतजमिन आहे जिथे विपुल प्रमाणात जनावरे आहेत तर आपण अशा लोकांना आपल्या शेतजमिनीत शिकार करू देऊ शकतो.ज्यांना शिकाराची आवश्यकता असते.आणि ह्या सेवेसाठी आपण त्यांच्याकडुन काही शुल्क देखील आकारू शकतो.

अशा प्रकारे, तुम्ही लहान आणि मोठ्या स्तरावर शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता आणि पैसे कमवू शकता. हे सर्व व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही यापैकी कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

आशा आहे की आम्ही दिलेल्या शेती पुरक व्यवसाय विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला Agriculture Business Ideas In Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *