Home » Jobs & Education » Essay Writing » एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा वर मराठी निबंध | फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त । Fatkya Pustakachi Atmakatha In Marathi

एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा वर मराठी निबंध | फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त । Fatkya Pustakachi Atmakatha In Marathi

Fatkya Pustakachi Atmakatha In Marathi म्हणजे एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा किंवा फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे. Essay on Autobiography of a Torn Book in Marathi Language हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये आत्मकथन निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

एका फाटक्या पुस्तकाचे आत्मकथन (आत्मवृत्त) | Fatkya Pustakachi Atmakatha (Autobiography Of A Torn Book) In Marathi

आज रविवार असल्यामुळे उठायला जरा उशीरच झाला सर्व काम आरामात चालू होतं तेवढ्यात आई ओरडली दिवाळी जवळ आली आहे आणि अडगळीची रूम तर अगदी पाहण्यालायक आहे मधुरा आज तुला अडगळीची रूम साफ करायची आहे. मी तोंड वेंगाडतच होय असे म्हटले थोड्या वेळाने मी अडगळीच्या रूम मध्ये गेले आणि पाहते तर काय सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. एका ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढीग तर एका ठिकाणी पेपरची रद्दी एका कोपऱ्यात तर जुन्या पुस्तकांचा ढीग पडलेला होता. थोडक्यात काय तिथे पाय ठेवायला देखील जागा नव्हती. मी आवरायला कुठून सुरुवात करू तेच मला समजत नव्हत

आणि तेवढ्यात एक आवाज आला मधुरा….

मी थोडी चरकलेच आजूबाजूला तर कोणीच दिसत नव्हते मग कुठून आवाज येतोय? तेवढ्यात परत आवाज आला मधुरा

मी बोलतोय तुझे संस्कृतचे पुस्तक….

आणि बघितले तर काय खरेच माझे संस्कृतचे पुस्तक होते ते दहावीत असताना माझा संस्कृत विषय तसा खूप आवडीचा होता मला संस्कृत मध्ये 100 पैकी 97 मार्क मिळाले होते आणि ज्या पुस्तकामुळे मिळाले होते त्या पुस्तकाची आज आज अतिशय दयनीय अवस्था झालेली पाहून मला वाईट वाटले. आणि पुस्तक बोलु लागले..

आज माझी जी काही अवस्था झाली आहे त्याला पूर्णपणे तूच जबाबदार आहेस.मला नवल वाटते दहावीत असताना तू मला अगदी जपून वापरायचीस. मला वाचताना माझी पाने उलगडताना अगदी नाजूकपणे कोमल स्पर्शाने हाताळायचीस. तुझ्या मैत्रिणींनी सुद्धा कधी मला मागितले तर त्यांना मला द्यायची नाहीस आणि कधी चुकून दिलेसच   तरी त्यांना खूप इन्स्ट्रक्शन(instructions) द्यायची मला कोणी फोल्ड केलेले देखील तुला चालायचे नाही आणि आज माझे एक एक पान फाटले आहे मला याचा किती त्रास झाला याचा कधी विचार केला आहेस का तू ?

माझ्यामुळे तुला ज्ञान मिळाले संस्कृत विषयात तुला एवढे चांगले मार्क मिळाले आणि आता माझं काम संपलं म्हणून तू मला अडगळीच्या रूममध्ये टाकून दिलेस. म्हणजे तू मला कामापुरता मामा बनवलेस जोपर्यंत माझी गरज होती तोपर्यंत मला छान वापरलेस आणि आता माझी काही गरज नाही म्हटल्यावर मला टाकून दिलेस तुम्ही माणसे अशीच स्वार्थी असता जोपर्यंत तुम्हाला एखाद्या कडून फायदा मिळत असतो तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी गोड बोलता त्याच्याशी छान वागता आणि मग तुमचा फायदा संपल्यावर त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही ते पुस्तक अजून पुढे बोलू लागले, 

मनुष्याची जात तुमची आहे खूपच स्वार्थी
परंतु लक्षात ठेवा तुम्ही असता आजन्म विद्यार्थी
आणि आम्ही पुस्तके तुमची सेवा करतो निस्वार्थी

फाटक्या पुस्तकाचे मनोगत

हे ऐकून माझे डोळे पाणावले मला भरून आले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी मी ते पुस्तक जवळ घेतले आणि त्याची माफी मागितली आणि मी पुस्तकाला वचन दिले की मी पुन्हा असे वागणार नाही मी सर्वच पुस्तके सर्वच वस्तू अगदी व्यवस्थित ठेवेन माझे काम झाल्यावर देखील मी पुस्तकांची व्यवस्थित काळजी घेईल तुला तक्रार करायला काही जागा देणार नाही आणि त्यानंतर पुस्तकाने देखील मला मोठ्या मनाने माफ केले आणि मी पण स्वतःशीच निश्चय केला की परत असे वागायचे नाही सर्वच वस्तूंची व्यवस्थित काळजी घ्यायची . त्यानंतर मी अडगळीची रूम व्यवस्थित साफ केली सर्व पुस्तके अगदी व्यवस्थित ठेवली ,जी पुस्तके फाटली होती त्याला सेलोटेप लावली आणि कव्हर बाइंडिंग केले.

यावरून तुम्हाला अशी शिकवण मिळते की आपण पुस्तके जपून वापरावेत ती फाटता काम नयेत, किंवा त्यांना अडचणीत टाकू नये पुस्तकांमुळे आपल्याला चांगले ज्ञान मिळते त्यांचा वापर व्यवस्थितच करावा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त या विषयावर मराठी निबंध बघितला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या निबंधाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली मराठी निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला Fatkya Pustakachi Atmakatha In Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *