Home » People & Society » Devotional » गणेश चतुर्थी आरती | Ganesh Chaturthi Aarti Marathi Lyrics | गणपती आरती (Ganapati Aarti) मराठी

गणेश चतुर्थी आरती | Ganesh Chaturthi Aarti Marathi Lyrics | गणपती आरती (Ganapati Aarti) मराठी

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) पूजे नंतर म्हटल्या जाणाऱ्या सर्व आरत्या मी येथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

Ganesh Chaturthi Aarti Marathi Lyrics । गणेश चतुर्थी आरती

सर्वप्रथम श्री गणपती च्या मूर्ती ची पूजा करून घ्यायची आणि मग आरती ला सुवात करायचं. सर्वात आधी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या आरती पुसून सुरवात करा नंतर शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको हि आरती म्हणायची त्या नंतर जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा हि आरती म्हणा. आरती म्हणून झाल्या नंतर कर्पूर लावायचं आणि कर्पूरगौरं करुणावतारं हि आरती म्हणायची नंतर आरती खाली ठेऊन आरती भोवती पाणी फिरवायचा आणि हात जोडून घालीन लोटांगण वंदीन चरण हि पार्थना म्हणायचं आणि गोल फिरून प्रदक्षिणा मारायची. सर्व झाल्या नंतर गणपतिबाप्पा मोरया असा जय घोष करा.

Sukhkarta Dukhharta Aarti lyrics in Marathi | गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता Lyrics

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥२॥

॥ जय देव जय देव०॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥३॥

॥ जय देव जय देव०॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥४॥

॥ जय देव जय देव०॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥५॥

॥ जय देव जय देव०॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥६॥

॥ जय देव जय देव०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव जय देव०॥

शेंदुर लाल चढ़ायो आरती | Shendur Lal Chadhayo Aarti Lyrics Marathi

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥1॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता,
जय देव जय देव ॥ध्रु०॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥२॥

॥ जय देव जय देव०॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥

॥ जय देव जय देव०॥

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा आरती | Jay Ganesh Jay Ganesh Deva Aarti Lyrics

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ॥

एकदंत, दयावन्त, चार भुजाधारी,
माथे सिन्दूर सोहे, मूस की सवारी ।
पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा,
लड्डुअन का भोग लगे, सन्त करें सेवा ॥

जय गणेश, जय गणेश, जय गणेश, देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ॥

अंधन को आंख देत, कोढ़िन को काया,
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया।
‘सूर’ श्याम शरण आए, सफल कीजे सेवा ॥

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ॥

दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी।
कामना को पूर्ण करो जय बलिहारी।

कर्पूरगौरं करुणावतारं

कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि ॥1॥

मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय॥2॥

श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहारिणे।
सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम:॥3॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

जय-घोष

।। गणपतिबाप्पा मोरया ।।

।। मंगलमूर्ती मोरया ।।

आशा आहे की आम्ही दिलेल्या गणेश चतुर्थी आरती चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published.