Home » People & Society » Festival Information » गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत | Ganesh Chaturthi Information In Marathi

गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत | Ganesh Chaturthi Information In Marathi

गणेश चतुर्थी माहिती मराठी, गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत, गणपती उत्सव माहिती मराठी, गणपती उत्सव निबंध मराठी, गणेश चतुर्थी निबंध मराठी, गणेश उत्सव निबंध मराठी, गणेश चतुर्थी विषयी माहिती (Information About Ganesh Chaturthi In Marathi, Ganesh Chaturthi In Marathi, Ganesh Chaturthi Information In Marathi, Ganesh Utsav In Marathi, Ganesh Chaturthi Marathi Mahiti)

आपण दर वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठया उत्सुकतेने वाट पाहत असतो आणि गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) च्या दिवशी मोठया जल्लोषात आणि आनंदात गणपती बाप्पांचे स्वागत करत असतो. आणि थोडयाच दिवसात दर वर्षी प्रमाणे पुन्हा आपल्या सर्वाच्या लाडक्या बाप्पांचे आगमन होते आहे. म्हणुन आज ह्याच निमित्त आपण गणेश चतुर्थी किंवा विषयी गणपती उत्सव संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

Contents hide
1. गणेश चतुर्थी (गणपती उत्सव) माहिती मराठी | Ganesh Chaturthi Information In Marathi

गणेश चतुर्थी (गणपती उत्सव) माहिती मराठी | Ganesh Chaturthi Information In Marathi

उत्सवाचे नाव (Festival Name)श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi), गणेश उत्सव (Ganesh Utsav), गणपती उत्सव (Ganapati Utsav)
श्री गणेश चतुर्थी 2023 तारीख (Ganesh Chaturthi Date 2023) 19 सप्टेंबर 2023 (19 September 2023)
गणेश चतुर्थी गणपती स्थापना मुहूर्त 20231. सकाळी 6.12 ते सकाळी 9.19
2. सकाळी 10.53 ते दुपारी 12.21
गणेश पूजेचा मुहूर्तसकाळी 10:58 ते दुपारी 01:29 पर्यंत

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) काय आहे?

गणेश चतुर्थी हा हिंदु धर्मातील लोकांचा एक प्रमुख सण आहे.हा सण आपल्या भारतातच नव्हे तर परदेशातही लोक मोठया आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.पण महाराष्ट हा एक असा भाग आहे जिथे हा सण तसेच उत्सव खुपच मोठया जल्लोषात साजरा केला जातो.आणि आपल्या हिंदु धर्माच्या पुराणांमध्ये देखील हे सांगितले आहे की ह्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता.याच कारणामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पुजा अर्चना केली जाते तसेच गणेशाच्या मोठमोठया मुर्त्या देखील स्थापित केल्या जातात.सलग नऊ दिवस भक्तीभावाने गणपतीची आरती केली जाते.विसर्जनाच्या एक दिवस आधी मुर्तीची साजसजावट म्हणजेच डेकोरेशन केले जाते.जे बघण्यासाठी लोक दुरून दूरून येत असतात.आणि मग सलग नऊ दिवसांनंतर गणपतीच्या मुर्तीचे नदीमध्ये तसेच समुद्रामध्ये विसर्जन केले जात असते.

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

 हिंदु धर्मातील पंचागात सांगितल्या प्रमाणे दर वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी हा सण तसेच उत्सव साजरा केला जातो.

2023 मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे?

2023 मध्ये गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी मंगळवार ला असणार आहे. 

गणेश चतुर्थी हा सण सर्वत्र एवढया जल्लोषात आणि आनंदात का साजरा केला जातो?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला दर वर्षी गणेश चतुर्थी आपण साजरी करत असतो.ही गणेश चतुर्थी आपण ह्यासाठी साजरी करत असतो की ह्याचदिवशी देवी पार्वती आणि शंकरजी यांचे पुत्र श्री गणेशाचा जन्म झाला होता.आणि आपल्या हिंदु धर्मामध्ये ब्रम्हा,विष्णु आणि महेश यांचे खुप अग्रगण्य आणि पुजनीय स्थान आहे.म्हणुन हा सण सर्व हिंदु भक्तजण मोठया भक्तिभावाने तसेच आनंद,उत्साहाने जल्लोषात साजरा करत असतात.आणि आपल्या सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पा ह्यांना बुदधीचे दैवत म्हणुन देखील ओळखले जाते.

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ह्या सणाचे महत्व काय आहे?

गणेश चतुर्थी ह्या सणाचे महत्व सांगावयाचे म्हटले तर ह्याच महिन्यात श्रावण महिन्याच्या सुरूवातीची वाटचाल चालू असते.आणि श्रावण महिना शंभु महादेव आणि देवी पार्वती यांचा अत्यंत आवडता महिना म्हणुन ओळखला जातो.आणि श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिव यांचे व्रत ठेवले जाते.आणि ह्याच महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी गौरी म्हणजेच पार्वतीचे देखील पुजन केले जाते.

गणेश चतुर्थी हा सण कशा पदधतीने साजरा केला जातो?

गणेश चतुर्थी हा तब्बल १० दिवस चालणारा सण तसेच उत्सव आहे.ह्या दिवशी घरोघरी गणपतीच्या मुर्तीची स्थापणा केली जात असते.दहा दिवस रोज सकाळी संध्याकाळी गणेशाच्या मुर्तीची विधिवत पुजन तसेच आरती केली जाते.आरती करुन झाल्यावर प्रत्येकाला प्रसाद वाटप केला जातो.

प्रसादात गणपतीचे आवडते मोदक ठेवले जातात.आणि मग अकराव्या दिवशी गणेशाच्या मुर्तीचे वाजत गाजत बँण्ड बाजासोबत पाण्यात विसर्जन केले जात असते. गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या तसेच अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला अशी सर्वत्र गर्जना केली जात असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत तसेच उपवास का केला जात असतो? यामागचे कारण काय आहे?

गणेश चतुर्थीला व्रत तसेच उपवास का केला जात असतो हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रताची कथा आधी जाणुन घ्यावी लागेल एकदा महादेव आणि माता पार्वती हे दोघे नर्मदा नदीच्या काठी बसलेले असतात.आणि वेळ व्यतित करण्यासाठी माता पार्वती महादेव यांना चौपट खेळायला सांगतात.

पण दोघांमध्ये कोण जिंकले हे ठरवण्यासाठी त्यांना कोणीतरी मध्यस्थी हवे होते मग महादेव यांनी एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळयाची प्राण प्रतिष्ठापणा केली. आणि मग त्याला सांगितले की बाळ आम्ही चौपट खेळतो आहे आमच्यामध्ये कोण जिंकते आणि कोण हरते हे आम्हाला सांग.

खेळ संपतो आणि प्रत्येक डावामध्ये देवी पार्वतीच जिंकते तरी खेळाच्या शेवटी तो मुलगा महादेव यांना विजयी घोषित करतो.यामुळे संतापात देवी पार्वती त्या मुलाला शाप देते की आयुष्यभर तु लंगडा राहशील आणि चिखलात पडुन राहशील.

मग बालक गयावया करू लागतो आणि पार्वतीला आपला शाप मागे घेण्यास सांगतो तेव्हा त्याच्यावर दया करत पार्वती सांगते की येथे गणेश पुजनासाठी काही मुली येतील.त्या तुला जसे सांगतील तशा पदधतीने व्रत कर म्हणजे मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वरदान देईल.

मग थोडयाच दिवसात त्याचठिकाणी काही नागकन्या येतात मग तो मुलगा त्यांच्याकडुन त्या व्रताची माहीती मिळवतो आणि २१ दिवस ते व्रत करतो.त्याची श्रदधा आणि भक्ती बघून श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न होतात.आणि त्याला वरदान मागण्यास सांगतात.

यग तो मुलगा श्रीगणेशाकडे वरदान मागतो की त्याच्या पायात आणि अंगात इतके बळ द्यावे की तो त्याच्या आई वडिलांना घेऊन स्वताच्या पायाने चालत महादेव आणि पार्वती यांच्यासमोर कैलास पर्वतावर जाऊ शकेल.आणि ते त्याला आनंदीत होतील.

मग ह्याच व्रताविषयी महादेव पार्वतीला देखील सांगतात.मग देवी पार्वतीला देखील आपल्या मुलाला कार्तिकेयनला भेटण्याची ईच्छा निर्माण होते आणि मग त्याही २१ दिवस हे व्रत करतात.आणि मग कार्तिकेयनशी त्यांची भेट होते.त्या दिवसापासुन गणेश चतुर्थी हे आपल्या मनातील ईच्छा पुर्ण करणारे व्रत म्हणुन ओळखले जाऊ लागले.

गणेश चतुर्थीच्या व्रताचे नियम कोणकोणते आहेत?

 • जर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत करत असलो तर आपण पिवळे किंवा हिरवे वस्त्र परिधान करूनच त्यांची पुजा करायला हवी.
 • श्री गणेशाला दुर्वा अधिक प्रिय आहे त्यामुळे त्यांना दुर्वा वाहणे विसरू नये.
 • गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पुजन तसेच आरती करताना त्यांच्यासमोर सुपारी ठेवावी.
 • श्री गणेशाच्या पुजेत तुळशीचा प्रयोग हा वज्र केला गेला आहे त्यामुळे आपण श्रीगणेशाची पुजा करताना तुळस वापरू नये.
 • गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण श्रीगणेशापुढे मोदक तीळ यांचा प्रसाद ठेवायला हवा.
 • ह्या दिवशी आपण चुकुनही चंद्रदर्शन करू नये कारण असे म्हटले जाते की ह्या दिवशी चंद्र दर्शन केल्याने आपल्यावर खोटा कलंक लागत असतो.
 • ह्या दिवशी अजिबात कोणाशी कलह तसेच वाद घालु नयेत आणि एखाद्या हत्तीला गाईला चारा खाऊ घालायला हवा त्यांची सेवा करायला हवी.
 • गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्राम्हमणांना जेऊ घालून त्यांना दक्षिणा द्यावी.
 • श्री गणेशाचे पुजन करत असताना आपले मुख नेहमी पुर्वेला किंवा उत्तर दिशेकडे असायला हवे.
 • श्री गणेशाचे पुजन करताना ऊँ गण गणपतये नम जा जप करावा श्री गणेशाला २१ दुर्वा वाहाव्यात.
 • श्रीगणेशाला बुंधीच्या २१ लाडुंचा प्रसाद ठेवावा.याच्यातील पाच लाडु ब्राम्हणांना दान स्वरुप द्यावे आणि पाच श्रीगणेशाच्या समोर ठेवावेत.आणि बाकीचे सर्व प्रसाद म्हणुन सगळयांना वाटुन द्यावे.

गणेश चतुर्थीचा व्रताचा मुहुर्त काय आहे?

गणेश पुजनासाठी मध्यांतराच्या कालावधीतील मुहुर्त सकाळी 10:58 ते दुपारी 01:29 पर्यंत, कालावधी – 02 तास 31 मिनिटे.

चंद्र दर्शन न करण्याचा कालावधी : सकाळी 09:14 ते रात्री 09:10 पर्यंत

गणेश चतुर्थीला पुजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहेत?

 • गणपतीची मुर्ती 
 • कापुर 
 • नारळ 
 • फुलांची माळ
 • फुले 
 • हार 
 • दुर्वा 
 • अगरबत्ती 
 • लवंग 
 • दोरा 
 • मिठाई 
 • मोदक 
 • सुपारी 
 • शेंदुर 
 • हळद 
 • कुंकु 
 • फळे
 • इत्यादी 

गणेश चतुर्थी पुजा विधी काय आहे?

 • सकाळी लवकर उठुन आधी आपण स्नान करावे मग त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यायला हवा.
 • सगळयात पहिले एक टेबल किंवा पाट ठेवावा आणि त्याच्यावर पिवळया रंगाचे फडके ठेवून तांदळाचे स्वस्तीक काढावे.त्यावर कुंकु वहावे.
 • मग पाटावर गणपतीची मुर्ती बसवावी मुर्तीचे दोन्ही बाजुला तांदुळ ठेवावे आणि त्यावर सुपारी ठेवावी.
 • गंगाजलनचा शिडकाव करून सर्व जागा पवित्र करून घ्यावी.
 • गणपतीच्या मुर्तीच्या उजव्या बाजुला कलश बसवायचा
 • गणपतीला दुर्वा वाहाव्यात.मोदकाचा प्रसाद ठेवावा.
 • मग सर्व परिवार मिळुन गणेशाची कथा ऐकायला बसावे.

बाजारातुन गणपतीची मुर्ती खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

 • प्लँस्टर आँफ पँरिस तसेच इतर रासायनिक पदार्थांचा उपयोग करून तयार केलेली मुर्ती खरेदी करू नये कारण आपल्या शास्त्रानुसार मातीपासुन बनवलेल्या गणेशाच्या मुर्तीचे पुजन करणे अधिक शुभ मानले जात असते.आपल्याला वाटले तर आपण सोने चांदी तसेच तांबे इत्यादींपासुन बनवलेली मुर्ती देखील खरेदी करू शकता.
 • जर आपण आपल्या कार्यालयात स्थापित करण्यासाठी गणेशाची मुर्ती खरेदी करता आहे तर मग अशीच मुर्ती विकत घ्या जिच्यात श्री गणेश उभे असतील कारण असे म्हटले जाते की अशा उभ्या मुर्तीचे पुजन केल्याने आपल्या नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
 • तसे पाहायला गेले तर आपण आपल्याला हव्या त्या रंगाची गणपतीची मुर्ती घरात तसेच आपल्या आ़फिसमध्ये बसवु शकतो पण शास्त्रानुसार आपण सफेद तसेच लाल रंगाची बाप्पाची मुर्ती स्थापित करणे अधिक चांगले असते.

FAQ On Ganesh Chaturthi In Marathi

गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते?

गणेश चतुर्थी भाद्रपद मराठी महिन्यात येते.

पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कधी साजरा केला?

भाऊसाहेब रंगारी यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव 1892 मध्ये साजरा केला.

2023 मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे?

2023 मध्ये गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी बुधवारी असणार आहे. 


आशा आहे की आम्ही दिलेल्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ची माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Ganesh Chaturthi In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *