Home » People & Society » Information » महाराष्ट्रातील प्रसिद्ध 10 घाटांची नावे व माहिती | Top 10 Ghats In Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्रातील प्रसिद्ध 10 घाटांची नावे व माहिती | Top 10 Ghats In Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्रातील घाटांची नावे, महाराष्ट्र घाट, घाटांची नावे (Maharashtratil ghat in marathi, Pasarni ghat information in marathi, Maharashtratil ghat, Top 5 ghats in maharashtra, Ghat in maharashtra)

महाराष्ट्र राज्यास भौगोलिकदृष्ट्या पश्चिमेस सह्याद्रीच्या पर्वतरांगा लाभलेल्या आहेत. अशा पर्वतरांगा मधून ये जा करण्यासाठी घाटरस्त्यांची गरज पडते. त्यातील काही निवडक प्रसिद्ध घाटरस्त्यांबद्दल आपण या लेखात जाणून घेऊयात.

घाट रस्ते म्हणजे काय?

पर्वतरांगांमधून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांना ‘ ‘घाट रस्ते’ असे म्हणतात.

 महाराष्ट्राच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वत रांगा आहेत. कोकण विभाग हा सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमेस असल्याने मध्य महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांना घाटामधून जावे लागते. महाराष्ट्रात या प्रसिद्ध १० घाटांसोबतच इतर अनेक घाट आहेत. घाट रस्त्यांचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो. काही घाट रस्ते आणि बोगदा रस्ते विशेषतः रेल्वे वाहतूकीसाठी वापरले जातात. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट व त्यांना जोडणारी प्रमुख शहरे | Top 10 Ghats In Maharashtra in Marathi

क्र.घाटाचे नावजोडणारी शहरे
आंबा घाटकोल्हापुर – रत्नागिरी
आंबनेळी घाटमहाबळेश्वर – पोलादपूर
आंबोली घाटसावंतवाडी – बेळगाव
कात्रज घाटपुणे – सातारा
भोर घाटमुंबई – पुणे
दिवे घाटपुणे – बारामती
कुंभार्ली घाटसातारा – रत्नागिरी (चिपळूण – कराड)
काशेडी घाटपोलादपूर – खेड
माळशेज घाटमुंबई – नाशिक
१०ताम्हिणी घाटमुंबई – कोकण

महाराष्ट्रातील घाटांची माहिती | Name And Information About The Top Ten ghat In Marathi

1. आंबा घाट (Amba Ghat) :

Amba Ghat
आंबा घाट

हा घाट महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट आहे. हा कोल्हापूर व रत्नागिरी ह्या प्रमुख शहरांना जोडणारा घाटरस्ता आहे. हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधे येतो. आंबा घाटाची समुद्रसपाटीपासूनची उंची २००० फूट आहे. या घाटाच्या परिसरात विशाळगड आणि पावनखिंड आहे. ज्यांना शिवकालीन इतिहास लाभलेला आहे.

2. आंबनेळी घाट (Ambenali Ghat) :

Ambenali Ghat
आंबनेळी घाट

आंबनेळी घाट हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणांना जोडतो. या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २०५१ फूट आहे. हा SH-72 रस्ता असून आंबनेळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व जीवघेणा घाट रस्ता आहे. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण ४० किमी आहे. या घाटामध्ये या आधी अनेक अपघात झाले आहेत. या घाटाच्या परिसरात प्रतापगड आहे जिथे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.

3. आंबोली घाट (Amboli Ghat) :

Amboli ghat
आंबोली घाट

आंबोली घाट हा बेळगाव आणि सावंतवाडी या ठिकाणांना जोडतो. या घाटाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. अनेक पर्यटक इथे धबधबे, जंगल आणि नैसर्गिकदृष्टया लाभलेला परिसर पाहण्यास येतात. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण ३० किमी आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्याला जाण्यासाठी या आंबोली घाटाचा वापर करून जावे लागते. हा SH-121 रस्ता असून या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २२६३ फूट आहे.

4. कात्रज घाट (Katraj Ghat) :

Katraj Ghat
कात्रज घाट

पुणे शहराच्या दक्षिणेस असलेल्या डोंगररांगांमध्ये कात्रज घाट आहे. हा रस्ता म्हणजेच NH-04 महामार्ग कात्रज घाट मधून जातो. कात्रज घाट पार करण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग हा सातारा – पुणे महामार्ग आहे जो की दोन बोगदा मार्गांचा आहे. या मार्गाची लांबी एकूण १०.७ किमी आहे. तर दुसरा मार्ग हा घाटमार्ग आहे ज्याची लांबी ६ किमी आहे. या घाट परिसरात सिंहगड किल्ला आहे. घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी तेथे कात्रज घाट व्हिव्हपाॅंइंट आहे.

5. भोर घाट (Bhor Ghat) :

Bhor Ghat
भोर घाट

भोर घाट हा प्रसिद्ध घाट असून मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांना जोडतो. या घाटाला ‘खंडाळा घाट’ असेही म्हणतात. या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २०२७ फूट आहे. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण १८ किमी आहे. भोर घाट हा रेल्वे सेवेचा ही एक भाग आहे. घाट परिसरात लोणावळा व खंडाळा सारखे थंड हवेची ठिकाणे आहेत तसेच रायगड आणि राजमाची किल्ले आहेत.

6. दिवे घाट (Dive Ghat) :

Dive Ghat
दिवे घाट

दिवे घाट हा पुणे व सासवड बारामती शहरांना जोडतो. याच घाटातून दरवर्षी संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. विठ्ठल देवाची पंच धातूची ६० फूट उंच मूर्ती आहे. हा घाट पुण्यातील पुरंदर तालुक्यात असून जवळच पुरंदर किल्ला व मल्हारगड ही आहे. घाट परिसरात पेशवेकालीन ‘मस्तानी तलाव’ आहे.

7. कुंभार्ली घाट (Kumbharli Ghat) :

Kumbharli Ghat
कुंभार्ली घाट

कुंभार्ली घाट हा सातारा जिल्ह्यातील कराड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या शहरांना जोडतो. या घाटाची समुद्रसपाटीपासून उंची २०५१ फूट आहे. या संपूर्ण घाट रस्त्याची लांबी एकूण १४ किमी आहे. पावसाळ्यात या घाटात फेसळणाऱ्या दुधासारखे पाणी धबधबे, हिरवीगार झाडे, रिमझिम पाउस हे दृश्य मन लोभवणारे असते.

8. काशेडी घाट (Kashedi Ghat) :

Kashedi ghat
काशेडी घाट

काशेडी घाट हा पोलादपूर व खेड या ठिकाणांना जोडतो. या घाटाची एकूण लांबी २० किमी आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची १२६३ फूट आहे. हा घाट महाराष्ट्रातील एक अपघाती व जीवघेणा घाट आहे. यापूर्वी या घाटात अनेक अपघात झाले आहेत. हाच घाट रस्ता मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे NH-17 आहे. या घाटामध्ये वाहनांची गर्दी टाळण्यासाठी काशेडी बोगदा मार्गाचे काम चालू आहे. या घाट परिसरात चंद्रगड व मंगळगड सारखे गड आहेत.

9. माळशेज घाट (Malshej Ghat) : 

Malshej Ghat

पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला, थंड हवेची अनुभूती देणारा आणि खलखळत्या पाण्याच्या धबधब्यानी वेढलेला असा हा माळशेज घाट.

माळशेज घाट हा मुंबई व नाशिक या प्रमुख शहरांना जोडतो. या घाटात जैवविविधतेचे दर्शन घडते म्हणजेच प्राणी पक्षी व झाडे आढळतात. हा घाट रस्ता SH-222 राज्य महामार्ग असून 

10. ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) :

Tamhini Ghat
ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हा पुणे जिल्ह्यातील मुळशी व लोणावळा  मध्ये आहे आणि मुंबई व कोकणाला जोडतो . या घाटाची एकूण लांबी १५ किमी आहे. घाट परिसरात धबधबे, तळे व घनदाट झाडी आहे. घाटा शेजारील परिसरात मुळशी धरण आहे.

महाराष्ट्रातील इतर काही घाटांची नावे

 • संगमेश्वर व कोल्हापूर जोडणारा फोंडा घाट
 • सातारा व रत्नागिरी जोडणारा पार घाट आणि हातलोट घाट
 • खारेपाटण व कोल्हापूर जोडणारा बावडा / करूल घाट
 • चंद्रपूर व सिरोंचा मधील सारसा घाट
 • कोल्हापूर व देवरूख मधील कुंडी घाट
 • कोल्हापूर व सावंतवाडी जोडणारा राम घाट
 • सातारा व रत्नागिरी जोडणारा केळघरचा घाट
 • वाई व सातारा जोडणारा पसरणी घाट
 • वाई व पोलादपूर जोडणारा पाचगणी घाट
 • सातारा व पुणे मधील खंबाटकी घाट
 • सातारा व दाभोळ मधील उत्तर तिवरा घाट
 • पाटण व संगमेश्वर मधील दक्षिण तिवरा घाट (नायरी घाट)
 • महाड व पुणे जोडणारा भीमाशंकर, रुपत्या व वरंधा घाट
 • भोर व पोलादपूर मधील ढवळा घाट
 • मुंबई व नाशिक जोडणारा थळ घाट
 • अमरावती जिल्ह्यातील मधील चिखलदरा घाट
 • कल्याण व अकोला मधील तोरण घाट
 • कल्याण व जुन्नर मधील नाणे घाट
 • नाशिक व डहाणू जोडणारा अव्हाट व गोडा घाट
 • लोणावळा व पेण मधील उबरखिंड घाट

कुंडल घाट, तोलार खिंड, कसारा घाट, मेंढ्या घाट वाघजाई घाट, उपांडया व मधे घाट या घाटांप्रमाणेच अनेक छोटे मोठे घाट रस्ते महाराष्ट्रातील डोंगररांगाना आहेत.

Frequently Asked Questions (FAQ) On Ghats In Marathi

महाराष्ट्रातील अवघड घाट रस्ता कोणता?

काशेडी घाट हा महाराष्ट्रातील अवघड घाट रस्ता आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट रस्ता कोणता आहे?

आंबनेळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट आहे ज्याची लांबी एकूण ४० किमी आहे.

जगातील सर्वात जीवघेणा घाट रस्ता कोठे आहे?

North Yungas Road, Bolivia हा जगातील सर्वाधिक जीवघेणा घाट रस्ता आहे. या रस्त्याला ‘ मृत्यूचा रस्ता ‘ असेही म्हणतात.

भारतातील सर्वात धोकादायक व प्राणघातक घाट रस्ता कोणता?

हिमालय पर्वत रांगेतील झोजी ला पास ( Zoji la pass ) हा भारतातील सर्वात धोकादायक व प्राणघातक घाट रस्ता आहे.

महाराष्ट्रातील वेस्टर्न घाट काय आहे?

सह्याद्री पर्वतरांगांनाच वेस्टर्न घाट असे म्हणतात. नाशिक ते केरळ पर्यंत ही सह्याद्री पर्वतरांग पसरलेली आहे.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध 10 घाट रस्ते विषयी माहिती बघितलं आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहिती चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Top 10 Ghats Of Maharashtra Information in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

4 thoughts on “महाराष्ट्रातील प्रसिद्ध 10 घाटांची नावे व माहिती | Top 10 Ghats In Maharashtra Information in Marathi”

 1. एकूण किती घाट आहेत मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते गोवा या मार्गावर

  1. मुंबई ते कोल्हापूर
   एकूण ३ घाट आहेत.
   १. खोपोली २. कात्रज ३. खंडाळा

   मुंबई ते गोवा कोल्हापूर मार्गे – ५
   मुंबई ते गोवा चिपळूण मार्गे – ६ पेक्षा जास्त (छोटे – मोठे )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *