Home » Jobs & Education » Essay Writing » गोधडीचे आत्मकथन वर मराठी निबंध Godaddy Chi Atmakatha Nibandh Marathi

गोधडीचे आत्मकथन वर मराठी निबंध Godaddy Chi Atmakatha Nibandh Marathi

Godhadi Chi Atmakatha Essay In Marathi म्हणजे गोधडीचे आत्मकथन या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

गोधडीचे आत्मकथन वर मराठी निबंध Godaddy Chi Atmakatha Nibandh Marathi

“मायेलाही मिळणारी ऊब
गोधडीत दटावून बसलेल्या चिंध्या
लुगड्याचे पटकुर
बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे
स्मरणांच्या सुईने शिवलेली”
गोधडी

दिवाळी च्या सुट्ट्या मध्ये आम्ही दार वर्षी गावी जात असतो तसेच या वर्षी सुध्दा गावी आलो आहोत. दिवाळी सहसा हिवाळ्यात असते म्हणून गावी खूप जास्ती थंडी असते शहरा पेक्षा. गावी गेल्यावर आम्हाला थंडी जास्तच जाणवायला लागली. सर्वांनी जेवण केलं आणि काही वेळ अंगणात सर्वजण गप्पा मारत बसलो. जस जस रात्र होत होती अजून जास्ती थंडी वाढू लागली होती. मी आई ला म्हंटल माझ्या साठी अंगावर घेण्यासाठी काही तरी अन. आई आत गेली आणि मला एक गोधडी आणून दिली. ‘हि घे गोधडी बघ आता कशी तुझी थंडी छूमंतर होऊन जाते’ असे म्हणत आई सर्वांसाठी झोपेची तयारी करू लागली.

गोधडी………….पहिलो न काय मला ती नकोशी वाटू लागली आणि शहरात जी चादर मी वापरत असल्यामुळे मला गोधडी घेऊन झोपायला नको वाटले म्हणून मी तशीच एक चादर घेऊन त्या गोधडीला बाजूला केलं.

तेवढयात कुठून तरी आवाज आला,

मी गोधडी बोलते…

“अरे बाळा! मी गोधडी बोलतेय. होय! मीच ही सुंदर रंगबिरंगी गोधडी.” तुझ्या आईने न आजीने मला खूप प्रेमाने शिवले आहे ते ही फक्त तुमच्यासाठीच. जेव्हा गावाकडे थंडी येते तेव्हा सगळे माझी आठवण काढतात, अन का कधी नये बर……….मी सगळ्यांना थंडी पासून वाचवते, ऊब देते.

रोज दुपारी थोडं थोडं वेळ काढून मला नक्षी वाले टाके घालयचे. तू कधी विचार पण नाही करू शकत तितक्या वेदना मी सहन केल्या,कारण मला तुम्हा सर्वांना थंडीच्या दिवसात ऊब द्यायची होती. तुझ्या आई आजीने माझा रंग पण बघ किती मस्त ठरवलाय अस पहिल्या बरोबर माणूस असा आकर्षित झाला पाहिजे. तुझ्या आईने न आजीने किती प्रेमाने गाणी गात गात मला असे रूप दिले आहे आणि तुला मी आवडत नाही………का?

काही ठिकाणी मला हातानेच शिवली जाते तर काही ठिकाणी शिलाई मशीनवरही शिवतात. मला गोधडी हे नाव तर आहेच परंतु काही ठिकाणी मला वाकळ, Quint आणि लेपटी असेहि म्हणतात.

हिवाळ्यात गावाकडची लोक माझा आवडीने वापर करतात. चादर माझ्या पेक्षा जास्ती उबदार नसते मी जास्ती उबदार आहे म्हणून लोक थंडीपासून बचाव साठी माझाच वापर करतात. आणि त्यांची थंडीत सुध्दा चांगली झोप होते. जेव्हा तू मला बाजूला केलं तेव्हा मला खूप वाईट वाटले. परंतु मला माहिती आहे माझा वजन थोडा जास्ती आहे इतर चंदारांपेक्षा म्हणून तुम्हा मुलांना मी आवडत नाही. पण या मुळेच तुमचा थंडी पासून बचाव होतो.

थंडी गेली कि गावातले लोक मला स्वच्छ धुतात आणि कडक उन्हात वाळवून पुन्हा कपाटात ठेऊन देतात. थंडी संपली कि मझा महत्व पण संपतो आणि मला असच अंधाऱ्या कापडात पुढचा हिवाळा येत परंत बसून राहावं लागतो. तुम्ही काय शहरातली मुले तुम्हाला एका गोधडी चा काय महतव काढणार तुम्हाला मी जाड वाटत असणार पण एका साधारण कपडा पासून ते गोधडी बनण्याचा माझा हा प्रवास खूप कठीण असते. मऊ मऊ लुगड्यापासून मला वजनदार गोधडी बने पर्यंत तुझ्या आजी न आईने जितकी कष्ट केलीत ते खूप बहुमोलाचे आहे. आणि मला असा एक सुंदर रूप दिला ते मला खूपच आवडले. पण काय झाले कुणास ठाऊक तुम्हा शहरी मुलांना आपल्या आजी न आईच्या कष्टाचा काहीच मोल नाही.

त्या किती तुमच्यासाठी आपले सर्वस्व न्योच्छावर करतात आणि कदाचित माझा पण यात खूप मोठा मोलाचं वाटा आहे. ते तुम्हाला मुलांना कळले पाहिजे. आणि तू मला एकदा पांघरूण तर बघ……….तुझी थंडी कशी पळून जाईल…….

आणि काय हे सगळं ऐकत ऐकत मला इतकी थंडी वाजू लागली की बस……

मला आता माझ्या आई आणि आजीने शिवून बनविलेले गोधडी चे खरे महत्व समजले आहे. गोधडी बनण्याच्या प्रवासात लागणारे तिचे कष्ट आणि माझ्या आई आणि आजीचे केलेली मेहनत माझ्या लक्षात आले आहे. मग मी बाजूला केलेली गोधडी अंगावर घेतली आणि झोपी गेली. मला झोपेत थंडीची जाणीव सुध्दा झाली नाही आणि मला सरळ सकाळीच जाग आला. कारण माझ्या प्रिय गोधडी ने रात्र भर मला उब दिले.

“गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब….”


आशा आहे की आम्ही दिलेल्या गोधडीचे आत्मकथन निबंध मराठी चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या गोधडीचे आत्मकथन निबंध मराठी माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी आत्मकथन निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

2 thoughts on “गोधडीचे आत्मकथन वर मराठी निबंध Godaddy Chi Atmakatha Nibandh Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *