Facebook Twitter Instagram
    Facebook Twitter Instagram
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    • Jobs & Education
      • Marathi Alphabet
      • Advertisement Writing
      • Essay Writing
      • Letter Writing
      • Stories
        • Moral Stories
    • Business & Finance
      • Business
      • Finance
    • People & Society
      • Health
      • Information
      • Biography
      • Festival Information
      • Devotional
        • Hanuman Chalisa
      • Quotes
      • Meaning
      • Names
      • Wishes
    • Schemes
      • Central Government Schemes
        • Pradhan Mantri Yojana
      • Maharashtra Government Schemes
    • Sports & Entertainment
      • Sports
      • Entertainment
      • Web Stories
    • Download
    • News
    • About
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Terms Of Use
      • DMCA Copyright
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    Home » People & Society » Information » Google Classroom Information in Marathi | गुगल क्लासरुम माहिती
    Information

    Google Classroom Information in Marathi | गुगल क्लासरुम माहिती

    Sammiksha PawarBy Sammiksha PawarNovember 9, 2021Updated:November 9, 2021No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Google Classroom Information in Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘Google Classroom’ बद्दल तुम्ही ऐकून असालच! नसेल तर या लेखात आपण गुगल क्लासरूम कसे वापरावे, गुगल क्लासरूमचे फायदे आणि बरेच काही जाणून घेणार आहोत.

    Contents hide
    1. Google Classroom Information in Marathi
    1.1. गुगल क्लासरूम म्हणजे काय0? | Google Classroom Meaning In Marathi
    1.2. गुगल क्लासरूमचा इतिहास :
    1.3. गुगल क्लासरूम कसे वापरावे?
    1.4. गुगल क्लासरूम अकाऊंट कसे उघडावे?
    1.5. शिक्षकांनी गुगल क्लासरूम कसे वापरावे? | How To Create Class In Google Classroom in Marathi
    2. विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूम कसे वापरावे? | Class Join कसा करावा :
    2.1. गुगल क्लासरूमची वैशिष्ट्ये :
    2.2. गुगल क्लासरूमचे फायदे :
    2.3. Frequently Asked Questions On Classroom in Marathi (FAQ) :

    Google Classroom Information in Marathi

    अनुप्रयोगाचे नाव (Application Name)गुगल क्लासरूम (Google Classroom)
    डेव्हलपर (Developer)Google
    प्रकार (Type)शैक्षणिक सॉफ्टवेअर (Educational software)
    अधिकृत संकेतस्थळ (Official Website)https://classroom.google.com

    गुगल क्लासरूम म्हणजे काय0? | Google Classroom Meaning In Marathi

    गुगल क्लासरूम हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शिक्षकांशी जोडले जातात. हे ॲप्लिकेशन ऑनलाइन शिक्षणाकरिता एक सर्वोत्तम पर्याय आहे, जे की ॲन्ड्राॅइड मोबाईल, टॅब्लेट, संगणक या मध्ये वापरू शकता. हे ॲप्लिकेशन पूर्णपणे मोफत असून गुगलकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

    गुगल हे विश्‍वसनीय माध्यम आहे. गुगल क्लासरूमचा उद्देश गृहपाठ, निबंध वितरण व ग्रेडिंग सोपे बनवणे आहे तसेच मुख्य उद्देश हा आहे की विद्यार्थी व शिक्षकांनी मध्ये फाईलींचे किंवा शैक्षणिक साहित्याचे ऑनलाइन हस्तांतरण सहजरीत्या व्हावे.

    गुगल क्लासरूम वापरण्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे गुगल अकाउंट असणे आवश्यक आहे. शिक्षक ऑनलाईन क्लास च्या माध्यमातून शिकवत असतील तर ते गुगल क्लासरूमद्वारे क्लासेस घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणजेच गृहपाठ, प्रश्न उत्तरे, शैक्षणिक साहित्य पुरवू शकतात. शिक्षकांना विद्यार्थ्यांस अभ्यासाबाबतच्या फाईली पाठवण्यात अडचणी येतात, तर गुगल क्लासरूम मुळे हे काम सोपे झाले आहे.

    या ॲपमधून शिक्षक pdf फाईल्स, word फाईल्स, इमेजेस, लिंक्स व Google Drive वरील फाईली सहजरित्या पाठवू शकतात. हे ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. गूगल क्लासरूम द्वारे शिक्षक टेस्ट किंवा परीक्षा घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा वेळ वाचतो तसेच विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्यही सुधारते.

    कोरोना लॉकडाउनच्या काळात शिक्षकांना झूम आणि स्काईप सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्सद्वारे विद्यार्थ्यांना शिकवावे लागे. परंतु त्यांना गृहपाठ, चाचण्या आणि परीक्षा घेणे अवघड जायचे. हे एकत्रित एकाच ठिकाणी गुगल क्लासरूम मध्ये उपलब्ध आहे.

    गुगल क्लासरूमचा इतिहास :

    • गुगलने G Suite Education Program अंतर्गत ६ मे २०१४ रोजी Google Classroom ची घोषणा केली. नंतर याचे प्रात्यक्षिक ॲप्लिकेशन सेवेचे १२ ऑगस्ट २०१४ रोजी सार्वजनिकरित्या अनावरण केले गेले.
    • त्यानंतर २०१५ साली यामध्ये API, Share Button सारखे नवीन फिचर्स समाविष्ट केले गेले.
    • २०१५ साली हे गुगल कॅलेंडर सोबत जोडले गेले.
    • २०१७ सालापासून वापरकर्त्यांसाठी आपल्या पर्सनल गुगल अकाउंट च्या सहाय्याने गूगल क्लासरूम वापरण्या योग्य केले.
    • २०१८ साली गूगल क्लासरूम नवीन डिझाईनच्या अपडेट सोबत आले आणि २०१९ ला यामध्ये विविध थीम्स चा समावेश केला गेला.
    • २०२० या वर्षी Google Classroom मध्ये महत्वाचा अपडेट आणला. त्याला Google Meet या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवे बरोबर जोडले गेले.
    • कोरोना महामारी मध्ये पूर्ण जगामधून या सेवेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या काळातच नवीन वापरकर्ते याचा वापर करू लागले. कारण विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आपले शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने करावे लागत होते.
    • सध्या Google Classroom ॲप्लीकेशन ऑनलाइन शिक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

    गुगल क्लासरूम कसे वापरावे?

    गुगल क्लासरूम बद्दल आपण माहिती घेतली. आता आपण याचा वापर कसा करावा हे पाहुया.

    हे ॲप्लिकेशन शिक्षक व विद्यार्थी यांना वापरण्यास सोपे आहे. हे तुम्ही वेबसाईट च्या स्वरुपात वापरण्याबरोबरच ॲप्लिकेशन मध्ये ही वापरु शकता. गुगल क्लासरूमचे ॲप्लिकेशन Android आणि iOS वरती उपलब्ध आहे.

    गुगल क्लासरूम अकाऊंट कसे उघडावे?

    • वेबसाइट वरुन खाते उघडण्यासाठी classroom.google.com हे संकेतस्थळ उघडा. किंवा Google Classroom App इन्स्टाॅल करा. 
    • तुम्हाला ज्या Gmail Account द्वारे खाते उघडायचे असेल त्याचा ॲपमध्ये ई-मेल आयडी व पासवर्ड टाकून login करा.

    शिक्षकांनी गुगल क्लासरूम कसे वापरावे? | How To Create Class In Google Classroom in Marathi

    • Gmail ID ने Login केल्यानंतर समोरच्या ‘+’ या चिन्हावर क्लिक करा.
    • तुम्हाला दोन पर्याय दिसतील. त्यातील ‘Create Class’ पर्याय निवडा.
    • तुमच्या समोर Terms and Conditions पेज उघडेल. त्या खालील चेकबॉक्स मार्क करा. T&C Agree केल्यानंतर Continue वर क्लिक करा.
    • नंतर Class Creation विंडो उघडेल.
    • त्या मध्ये विचारलेली माहिती भरा. जसे की Class, Section, Subject & Room No. भरा. Class म्हणजे वर्ग किंवा इयत्ता, Section मध्ये सत्र, Subject मध्ये विषयांचे नाव आणि Room No. मध्ये विद्यार्थ्यांची संख्या अशा प्रकारे माहिती भरा.
    • ‘Create’ वर क्लिक करा.
    • त्यानंतर तुम्ही तयार केलेला क्लास दिसेल.
    • त्या शेजारील Class Code विद्यार्थ्यांना पाठवा किंवा Invite link पाठवा जेणेकरून ते तुमचा class Join करू शकतील.
    • Classwork वर क्लिक करून Assignment, Question, Material, Reuse post आणि Topic देऊ शकता.

    विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूम कसे वापरावे? | Class Join कसा करावा  :

    • Gmail ID ने Login केल्यानंतर समोरच्या ‘+’ या चिन्हावर क्लिक करा.
    • तुम्हाला दोन पर्याय दिसतील. त्यातील ‘Join Class’ पर्याय निवडा.
    • त्यामध्ये शिक्षकांनी पुरवलेला Class Code भरा.
    • आणि Join वर क्लिक करा.
    • तूम्ही आता तुमच्या शिक्षकांनी तयार केलेल्या क्लास मध्ये असाल.

    गुगल क्लासरूमची वैशिष्ट्ये :

    • मोबाईल ॲप्लिकेशन : गुगल क्लासरूम हे वेब सेवेबरोबरच ॲप्लिकेशन स्वरूपात Android व iOS वरती उपलब्ध आहे. ते Google Play Store वरुन डाऊनलोड करू शकता.
    • असाइनमेंट : गुगल क्लासरूम मध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊ शकतात. त्यासोबतच फाईल जोडू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याचे असाइनमेंटस् स्वतंत्रपणे शिक्षक पाहू शकतात.
    • कम्युनिकेशन : शिक्षक विद्यार्थ्यांशी ई-मेल स्वरुपात संपर्क साधू शकतात. Class Stream मधे शिक्षक पोस्ट करु शकतात आणि विद्यार्थी यांना शिक्षकांच्या परवानगीने त्यात पोस्ट करता येते.
    • आर्काइव्ह क्लास : वर्षाच्या शेवटी शिक्षक क्लास या ठिकाणी साठवून ठेवतात. तेज् कोणी ही संपादित करु शकत नाही. शिक्षकांना त्यांच्या पुनर्वापरासाठी ते Restore करावे लागतील.
    • क्लास मटेरियल : हे ॲप Google च्या इतर प्रॉडक्ट सोबत जोडले आहे. त्यामध्ये शिक्षक फाईल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये पाठवू शकतात. 
    • टेस्ट व परीक्षा : या ॲपवर शिक्षक प्रश्नोत्तरे, चाचण्या आणि परीक्षा तयार करून विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देऊ शकता आणि विद्यार्थी ते सोडवून Submit करु शकता. प्रत्येक विद्यार्थ्याची जमा केलेची वेळ नोंद होते.
    • Google पालकांना त्यांच्या मुलांची गुणवत्ता ईमेल द्वारे कळवते.
    • G Suit Program अंतर्गत क्लास मधील प्रत्येक मुलाची माहिती Drive ला साठवली जाते.

    गुगल क्लासरूमचे फायदे :

    1. गुगल क्लासरूम हे मोफत ॲप्लिकेशन आहे.
    2. हे विद्यार्थी व शिक्षकांना वापरण्यास अगदी सोपे आहे.
    3. खाते उघडणे व क्लास तयार करणे सोपे आहे.
    4. अनेक शाळा, कॉलेज व संस्थाना वापरण्यायोग्य आहे.
    5. Google Meet, Google Calendar व Google Drive अशा गुगलच्या साधनाशी जोडले गेले आहे.
    6. पालकांना त्यांच्या मुलांची प्रगती पाहता येते.
    7. Google च्या सुरक्षेसह उपलब्ध
    8. यामुळे वेळ वाचतो व शिक्षण सोपे झाले आहे.
    9. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक माहिती साठवून ठेवली जाते.
    10. कागदविरहीत शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे.

    Frequently Asked Questions On Classroom in Marathi (FAQ) :

    गुगल क्लासरूम काय आहे?

    गुगल क्लासरूम हे गुगल ची मोफत वेब सेवा असून यामध्ये हे विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणामध्ये मदत करते.

    गुगल क्लासरूम मोफत आहे का?

    होय, गुगल क्लासरूम हे पूर्ण विनामूल्य असून Google वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क आकारत नाही.

    गुगल क्लासरूम केव्हा लॉंच केले गेले?

    १२ ऑगस्ट २०१४ रोजी गुगल क्लासरूम लॉंच केले गेले.

    गुगल क्लासरूम वरती विद्यार्थी शिक्षकांसोबत संवाद साधू शकतात का? 

    होय, विद्यार्थी व शिक्षकांना या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून ऑनलाइन संभाषण करता येते.

    अंतिम निष्कर्ष :

    अशा पदधतीने आज आपण Google Classroom Information in Marathi म्हणजे गुगल क्लासरुम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

    आपल्याला या Google Classroom Information in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

    अधिक वाचा :

    • Mutual Fund Information In Marathi
    • UPSC Information In Marathi
    • NGO Information In Marathi

    गूगल क्लासरूम
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sammiksha Pawar
    • Website
    • Facebook
    • LinkedIn

    नमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.

    Related Posts

    26 January Republic Day Information In Marathi | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विषयी माहिती

    December 16, 2022
    Read More

    Earth Day Information In Marathi । जागतिक वसुंधरा दिवस विषयी माहिती

    April 22, 2022
    Read More

    Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी

    April 13, 2022
    Read More

    Leave A Reply Cancel Reply

    Recent Posts
    • Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये
    • Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    • [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    • मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi
    • 26 January Republic Day Speech In Marathi 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
    Categories
    • Advertisement Writing
    • App
    • Banking
    • Bigg Boss Marathi
    • Biography
    • Business
    • Central Government Schemes
    • Cricket News & Updates Marathi
    • Cryptocurrency
    • Devotional
    • Digest
    • Download
    • Entertainment
    • Essay Writing
    • Farmer Scheme
    • Festival Information
    • Finance
    • Full Form
    • Ganpati Names
    • Hanuman Chalisa
    • Health
    • House Names
    • How To
    • Information
    • Jobs
    • Jobs & Education
    • Lagna Patrika
    • Letter Writing
    • Love Letter
    • Maharashtra Government Schemes
    • Mangalashtak Marathi
    • Marathi Alphabet
    • Marathi Grammar
    • Marathi Numbers
    • Marriage Biodata Format
    • Meaning
    • Moral Stories
    • Mutual Fund
    • Names
    • News
    • Pradhan Mantri Yojana
    • Quotes
    • Recipes
    • Share Market
    • Speech
    • Stories
    • Technology
    • Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
    • Twins Baby Boy Names
    • UPI
    • Whats App Group
    • Wishes
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms Of Use
    • DMCA Copyright
    © 2023 Read In Marathi. Designed by Read In Marathi.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.