Home » Download » [Free Download] Google Input Tools Marathi Offline Full Version | Google इनपुट साधने Download मराठी

[Free Download] Google Input Tools Marathi Offline Full Version | Google इनपुट साधने Download मराठी

तुम्हाला Google Input Tools Marathi Download करायचे आहे. आणि तुम्ही Google Marathi Typing च्या शोधात असाल तर तुम्हाला Google Marathi Input Tools Offline चे Full Version Download करण्यासाठी Free link मिळणार आहे. तसेच हे Tool Install करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

Google इनपुट साधने (Google Input Tools Marathi) काय आहे?

आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरती टायपिंग करतो. तेव्हा आपणास मराठी टायपिंग करताना खूप अडचणी येतात. सरळ पद्धतीने QWERTY कीबोर्ड वर मराठी टायपिंग करण्यासाठी प्रोफेशनल मराठी टायपिंग कोर्स करावा लागतो. आपले मराठी टायपिंग चे काम करण्यासाठी आता असे कोर्स करण्याची आवश्यकता नाही. मराठी ब्लॉगर तसेच इतरांना मराठी टायपिंग जलद करायचे असते. त्यासाठी आपण गुगल च्या Google Marathi Input Tool या Free Tool चा वापर करून आपले मराठी टायपिंग सोपे व योग्य प्रकारे करू शकतो.

आपल्याला WhatsApp सारख्या मेसेजिंग ॲपमधे चॅटिंग किंवा टायपिंग करताना मराठी शब्द इंग्लिश मध्ये टाइप करण्याची सवय असते. { उ.दा. Maitri = मैत्री }. यालाच Unicode Typing असे म्हणतात. मोबाइल मधे आपण असे टायपिंग करू शकतो. पण, PC/Laptop वरती या प्रकारे टायपिंग करणे अवघड वाटते. म्हणून Google Marathi Input Tool वापरून आपण असे टायपिंग करू शकतो.

Google ने ऑफिशियली ही सेवा बंद केली आहे. तरी आम्ही तुमच्या सोयीकरिता त्याची लिंक पुरवित आहोत.

Google Input Tools चे वैशिष्ठे

हे टूल सध्या २२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. गुगल इनपुट टूल्स विविध इनपुट टूल्स चे पर्याय उपलब्ध करून देते.

  1. Transliteration : यामध्ये आपणास Unicode Typing होते. जसे की शब्दाच्या स्वर आणि उच्चारा नुसार शब्दांचे टायपिंग केले जाते.
  2. IME : IME म्हणजे Input Method Editor. विविध भाषेतील वाक्याचा बदल करते.
  3. Virtual Keyboard : यालाच On-Screen Keyboard असेही म्हणतात. यामध्ये तुमच्या स्क्रीनवर एक कीबोर्ड दिसतो. त्या माध्यामातून आपण टायपिंग करू शकतो.
  4. Handwriting : यामध्ये तुम्ही स्क्रीनवर काढलेल्या (चितारलेल्या) शब्दांचे रूपांतरण करून टायपिंग करते.

Google Input Tools Marathi Download Offline Link

गुगल इनपुट टूल्स म्हणजे काय? हे आपण पाहिले. तर आता आपण इंस्टॉल कसे करावे हे पाहुयात. हे टूल वापरण्यासही सोपे आहे. Google Input Tool Marathi Download इथून करावे.

Google Input Tools Marathi Windows मध्ये कसे Install करावे ?

Google Marathi Typing वापरण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेव्दारे Google Input Tools Marathi PC मध्ये Install करावे.

  1. Step I : पहिल्यांदा वरती दिलेली लिंक उघडा. त्यामधील zip फाईल ही Google Drive साहाय्याने डाऊनलोड करा.
  2. Step II : डाऊनलोड केलेली zip फाईल तुमच्या PC/Laptop मध्ये Extract किंवा Open करा.
  3. Step III : Extract केलेली फाईल इंस्टॉल करण्यासाठी डबल क्लिक करा. ती फाईल ‘Run’ करा.
  4. Step IV : टास्कबारच्या खालील उजव्या कोपऱ्यातील EN दिसेल. जर ते दिसत नसेल तर तुमचा PC/Laptop Restart करा.
  5. Step V : आपण EN वर क्लिक करून मराठी Language Selection करू शकतो.

[ तुम्हाला इंग्लिश ते मराठी किंवा मराठी ते इंग्लिश मध्ये बदल करण्यासाठी Ctrl+G ही शॉर्टकट की वापरावी. ]

आता तुम्ही मराठी मधून टायपिंग अगदी सहजरित्या करू शकता.

Google Input Tools Marathi Chrome Extension Online Download Link

तुम्ही Google Chrome Extension सुध्दा वापरून Google Marathi Input Tool चा वापर करू शकता. Google Input Tool Marathi Chrome Extension इथून Download करावे.

Frequently Asked Questions (FAQ) On Google Input Tools Marathi

गुगल इनपुट टूल काय आहे?

गुगल इनपुट टूल हा एक व्हर्चुअल कीबोर्ड असून हे विविध भाषांमध्ये अनुवाद करून टायपिंग करण्यास मदत करते.

गुगल इनपुट टूल्स मोफत आहे का?

होय, गुगल इनपुट टूल्स हे वापरण्यास मोफत आणि सुरक्षित आहे.

गुगल इनपुट टूल्स केव्हा लॉंच केले गेले?

जुलै २०१२ मध्ये Google Input Tools हे लॉंच केले गेले.

Google Input Tools हे PC वरती वापरता येईल का?

होय, Google Input Tools हे PC च्या Windows 7,8,10,11 व्हर्जन वरती वापरू शकतो.

गुगल इनपुट टूल्स ची भाषा कशी बदलावी?

तुम्ही कॉम्प्युटर मध्ये टास्कबारमधे उजव्या कोपऱ्यातील EN बटनावरून किंवा ALT+Shift ही शॉर्टकट की वापरून सुद्धा Google Input Tools ची भाषा बदलू शकता.

Google Input Tools हे मोबाइल मधे  वापरता येते का?

होय, Google Input Tools हे मोबाइल मधे वापरण्यासाठी Google Indic Keyboard हे PlayStore मधून इंस्टॉल करा.

Google ने Google Input Tools सेवा बंद का केली?

कॉम्प्युटर मधील MS Word मध्ये टायपिंग करताना खूप लोक कृतिदेव फॉन्टचा उपयोग करतात. त्यामुळे Google ने गुगल इनपुट टूल्स सेवा बंद केली.

आशा आहे की आम्ही दिलेल्या Google Marathi Typing माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Google Input Tools Marathi Download माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा

1 thought on “[Free Download] Google Input Tools Marathi Offline Full Version | Google इनपुट साधने Download मराठी”

  1. आधी google इनपुट PC वर Whatapps वर type केले तर मराठी typing येत होती आता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *