Facebook Twitter Instagram
    Facebook Twitter Instagram
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    • Jobs & Education
      • Marathi Alphabet
      • Advertisement Writing
      • Essay Writing
      • Letter Writing
      • Stories
        • Moral Stories
    • Business & Finance
      • Business
      • Finance
    • People & Society
      • Health
      • Information
      • Biography
      • Festival Information
      • Devotional
        • Hanuman Chalisa
      • Quotes
      • Meaning
      • Names
      • Wishes
    • Schemes
      • Central Government Schemes
        • Pradhan Mantri Yojana
      • Maharashtra Government Schemes
    • Sports & Entertainment
      • Sports
      • Entertainment
      • Web Stories
    • Download
    • News
    • About
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Terms Of Use
      • DMCA Copyright
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    Home » Business & Finance » Finance » UPI » Google Pay Information In Marathi | गुगल पे कसे वापरावे
    UPI

    Google Pay Information In Marathi | गुगल पे कसे वापरावे

    Sammiksha PawarBy Sammiksha PawarNovember 17, 2021Updated:December 12, 2021No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Google Pay Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘Google Pay’ बद्दल तुम्ही ऐकून असालच! नसेल तर या लेखात आपण गुगल पे कसे वापरावे, गुगल पे चे फायदे आणि बरेच काही जाणून घेणार आहोत.

    Contents hide
    1. Google Pay Information In Marathi | Google Pay Marathi Mahiti
    1.1. गुगल पे म्हणजे काय | What Is Google Pay In Marathi
    1.2. गुगल पे चा इतिहास :
    1.3. गुगल पे ची वैशिष्ट्ये / सुविधा :
    2. गुगल पे कसे वापरावे | How To Use Google Pay In Marathi
    2.1. गुगल पे अकाऊंट कसे उघडावे? | How to open Google Pay Account in Marathi (Step by Step)
    2.2. गुगल पे चे फायदे ( Use/ Benefits ) :
    2.3. गुगल पे द्वारे पैसे कसे कमवायचे? ( How to Earn Money in Google Pay ) :
    2.3.1. 1. Refer and Earn (रेफर आणि कमवा) :
    2.3.2. 2. Scratch Card ( स्क्रॅच कार्ड ):
    2.3.3. 3. Google Pay ऑफर्स :
    3. Frequently Asked Questions (FAQ) On Google Pay In Marathi

    Google Pay Information In Marathi | Google Pay Marathi Mahiti

    App चे नाव ( Application Name )गूगल पे ( Google Pay )
    प्रकार (Type)डिजिटल वॉलेट (Digital Wallet)
    अधिकृत संकेतस्थळ (Official Website)pay.google.com

    गुगल पे म्हणजे काय | What Is Google Pay In Marathi

    गुगल पे हा गुगलचा ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म आणि डिजिटल वॉलेट सिस्टीम आहे ज्याच्या साहाय्याने पैशाची देवाण घेवाण करता येते.

    २०१६ साली भारत सरकारने नोटाबंदी केली. तेव्हा नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे अवघड जावू लागले. त्यानंतर लोकांनी कागदी नोटा किंवा चलनाद्वारे व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल पेमेंट म्हणजेच व्यवहार करण्यावर भर दिला. आपणास पैसे पाठवणे किंवा स्विकारण्यासाठी याआधी कागदी चलानाद्वारे व्यवहार करावे लागत. आता एक व्यक्ती पटकन दुसऱ्या व्यक्तीस ऑनलाइन पैसे पाठवू शकतो. तसेच दुकानांमध्ये ग्राहक दुकानातील QR कोड स्कॅन करून आपली रक्कम त्वरित दुकानदाराच्या खात्यात पाठवतात. आज बाजारात डिजिटल पेमेंट करण्याचे ॲप उपलब्ध आहेत. जसे की PhonePe, Paytm, BHIM and Mobikwik असे अनेक ॲप्स सुद्धा ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी भारतात वापरले जातात. परंतू Google च्या विश्वासामुळेच Google Pay वापरण्यास लोक पसंती दर्शवतात.

    Google Pay हे UPI आधारित डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशन आहे. UPI म्हणजेच Unified Payment Interface होय. UPI हा National Payments Corporation of India (NPCI) संस्थेने भारत सरकार मार्फत डिजिटल पेमेंट सोयीस्कर करण्यासाठी एक गेट वे निर्माण केला आहे. UPI ID चा वापर करून आपण बॅंक खात्यांमध्ये पैशांची देवाण-घेवाण करू शकतो.

    गुगल पे मधे मल्टिपल लेयर सेक्युरिटी वापरण्यात आली आहे. जे तुम्हाला सुरक्षितपणे पैशांचे व्यवहार करण्यास मदत करते. तसेच गुगल कंपनीचा 

    गुगल पे चा इतिहास :

    • १८ सप्टेंबर २०१७ रोजी गुगलने Google Tez हे पेमेंट ॲप्लिकशन लाँच केले. 
    • गुगलने ८ जानेवारी २०१८ साली Google Tez हा ॲप लाँच केला.
    • २८ ऑगस्ट २०१८ रोजी Google Tez ॲपचे नाव बदलून Google Pay करण्यात आले.
    • Tez मध्ये नवीन वैशिष्टे (Features) समाविष्ट केले गेले. Google Pay हे Tez ॲपचेच सुधारित व्हर्जन आहे.
    • जगभरात गुगल पे सध्या ४२ पेक्षा जास्त देशांत आहे.
    • भारतामध्ये १ जानेवारी २०२२ पासून गुगल पे ग्राहकांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती सर्व्हरला साठवून ठेवणार नाही.

    गुगल पे ची वैशिष्ट्ये / सुविधा :

    • गुगल पे ॲप्लिकेशन स्वरूपात Android व iOS वरती उपलब्ध आहे. ते Google Play Store किंवा Apple Store वरुन डाऊनलोड करू शकता.
    • पैसे पाठवू आणि स्वीकारू शकता.
    • ऑनलाइन शॉपिंग करतेवेळी Google Pay वापरून खरेदी करू शकता.
    • समोरील व्यक्तीच्या बँक खाते नंबर व बँक शाखा अशा महितीविना फक्त मोबाईल नंबरच्या साहाय्याने पैसे पाठवू शकता.
    • तुम्ही या आधी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील (History) पाहू शकता.
    • वीज, पाणी, गॅस, डीटीएच आणि फोन बिल्स घरबसल्या मोबाईल वरूनच भरू शकता.
    • गुगल पे मधून मोबाईलला Prepaid किंवा Postpaid Recharge करू शकता.
    • गुगल प्ले वरून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अप्लाय करू शकता.
    • या ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही सरकारी फंड किंवा संस्थांना आर्थिक मदत (Donation) करू शकता.
    • Google AdWords चे बील भरू शकता‌.
    • IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुगल पे वापरू शकता.
    • सोने खरेदी आणि विक्री करू शकता.
    • ट्रेन तिकिटे आरक्षित करू शकता.
    • गुगल पे मधील ‌Jobs Spots चा वापर करून नोकरी शोधू शकता.

    गुगल पे कसे वापरावे | How To Use Google Pay In Marathi

    गुगल पे बद्दल आपण माहिती घेतली. आता आपण याचा वापर कसा करावा हे पाहुया. हे ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. गुगल पेचे ॲप्लिकेशन Android आणि iOS वरती उपलब्ध आहे.

    गुगल पे अकाऊंट कसे उघडावे? | How to open Google Pay Account in Marathi (Step by Step)

    आता आपण गुगल पे चे नवीन अकाऊंट/खाते कसे उघडायचे हे पाहूया.

    • Step 1 : Mobile मधे गुगल प्ले स्टोअर उघडून गुगल पे सर्च करावे आणि गुगल पे ॲप्लिकेशन Install करावे किंवा येथे क्लिक करून Install करावे.
    • Step 2 : Google Pay ॲप उघडावे. त्यात तुमचा तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर भरावा आणि ‘Next’ बटण क्लिक करावे. तुमच्या मोबाइल वरती OTP येईल तो आपोआप भरला जाईल.
    • Step 3 : समोरील Gmail Account निवडून ‘Accept and Continue’ बटण क्लिक करा.  ( त्यामधील Termes & Conditions आणि Privacy Policy वाचू शकता. )
    • Step 4 : तुमच्या समोर खालीलप्रमाणे विंडो उघडेल. तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेकरिता तुम्ही स्क्रीन लॉक किंवा गुगल पिन ठेवू शकता. नंतर ‘Continue’ करा.
    • Step 5 : आता तुमचे गुगल पे अकाऊंट तयार होईल. Google Pay वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते जोडावे लागते. समोरील किंवा उजव्या कोपऱ्यातील फोटोवर क्लिक करून  ‘Add Bank Account’ वरती क्लिक करा. 
    • Step 6 : तुमचे बँक खाते असलेली बँक दिलेल्या यादीतून निवडून ‘Continue’ करा.
    • Step 7 : नंतर तुमचे सिम कार्ड निवडा. तुमचे बँक खाते गुगल पे शी जोडले जाईल.

    जर प्रथमच तुम्ही ऑनलाइन पेमेंट ॲप वापरत असाल तर UPI ID तयार करण्यास येईल. त्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरून OTP व्हेरिफिकेशन करून UPI Pin सेट करा. आता तुम्ही Google Pay च्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

    गुगल पे चे फायदे ( Use/ Benefits ) :

    1. गुगल पे हे मोफत ॲप्लिकेशन आहे.
    2. खाते उघडणे व पैसे पाठवणे सोपे आहे.
    3. Google च्या सुरक्षेसह उपलब्ध
    4. कागदविरहीत जलद आर्थिक व्यवहारासाठी उत्तम माध्यम आहे.
    5. फसवणूक आणि जोखीम व्यवस्थापन केले जाते.
    6. रिचार्ज, बिल भरणा अशा सुविधांचा वापर करू शकता.

    गुगल पे द्वारे पैसे कसे कमवायचे? ( How to Earn Money in Google Pay ) :

    Google Pay वरून आपण ऑनलाइन पेमेंट करू शकतो आणि त्याच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतोच. तसेच आपणास गुगल पे चा वापर करून पैसे कमवण्याची संधी देखील मिळते. गुगल पे वरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत.

    1. Refer and Earn (रेफर आणि कमवा) :

    तुम्ही Google Pay वापरण्याबरोबरच ते तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करून पैसे कमावू शकता.

    तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर ॲप्लिकेशन शेअर करतेवेळी तुम्ही गुगल पे ची रेफरल लिंक पाठवा, त्यांनी लिंक द्वारे हे ॲप जर डाउनलोड करून वापरले तर तुम्हाला  मिळतील. तुम्ही फक्त ३ व्यक्तिंना रेफरल करू शकता.

    2. Scratch Card ( स्क्रॅच कार्ड ):

    रेफेर करण्याबरोबरच तुम्ही स्क्रॅच कार्ड वापरून पैसे कमवू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल पे ॲप मधून पैशांचे व्यवहार करावे लागतील. पैसे पाठवू किंवा प्राप्त करावे लागतील. यानंतर, तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल, ते तुम्हाला स्क्रॅच करायचे असते. त्यामध्ये तुम्ही एक हजार रुपयांपर्यंत रक्कम जिंकू शकता. मिळालेल्या बक्षिसासाठी Reward History तपासा.

    3. Google Pay ऑफर्स :

    गुगल पे ॲप दिवाळी किंवा काही वेळा ऑफर जाहीर करते. त्यात दिलेल्या टास्क पूर्ण करून तुम्ही Google Pay पैसे कमवू शकता.

    Frequently Asked Questions (FAQ) On Google Pay In Marathi

    गुगल पे काय आहे?

    गुगल पे ही गुगल ची पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाइन मोफत सेवा आहे.

    गुगल पे मोफत आहे का?

    होय, भारतात गुगल पे हे पूर्ण विनामूल्य असून Google वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क आकारत नाही.

    गुगल पे केव्हा लॉंच केले गेले?

    १८ सप्टेंबर २०१७ रोजी Google Tez हे लॉंच केले गेले. नंतर त्याचे गुगल पे असे नामकरण करण्यात आले.

    गुगल पे वरती वापरकर्ते एकमेकांच्या सोबत संवाद साधू शकतात का? 

    होय, वापरकर्त्यांना या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून आधीपासूनच गुगल पे वापरणाऱ्या तुमच्या मित्रांशी ऑनलाइन संभाषण करता येते.

    गुगल पे चे पैसे पाठवण्याची मर्यादा आहे का? किती?

    तुम्ही याद्वारे एका दिवसात रु. 1,00,000 पेक्षा जास्त पैसे पाठवू शकत नाही.

    गुगल पे चा हेल्पलाईन नंबर काय आहे? 

    Google Pay चा Customer care number 1-800-419-0157 हा आहे. ते सेवा 24×7 देते.

    अंतिम निष्कर्ष :

    अशा पदधतीने आज आपण गुगल पे (Google Pay) विषयी संपूर्ण माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली गुगल पे (Google Pay) विषयी माहिती मराठी भाषेत आवडली असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

    आपल्याला या गुगल पे विषयी माहीती (Google Pay Information In Marathi) संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

    अधिक वाचा :

    • Mutual Fund Information In Marathi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sammiksha Pawar
    • Website
    • Facebook
    • LinkedIn

    नमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.

    Leave A Reply Cancel Reply

    Recent Posts
    • Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये
    • Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    • [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    • मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi
    • 26 January Republic Day Speech In Marathi 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
    Categories
    • Advertisement Writing
    • App
    • Banking
    • Bigg Boss Marathi
    • Biography
    • Business
    • Central Government Schemes
    • Cricket News & Updates Marathi
    • Cryptocurrency
    • Devotional
    • Digest
    • Download
    • Entertainment
    • Essay Writing
    • Farmer Scheme
    • Festival Information
    • Finance
    • Full Form
    • Ganpati Names
    • Hanuman Chalisa
    • Health
    • House Names
    • How To
    • Information
    • Jobs
    • Jobs & Education
    • Lagna Patrika
    • Letter Writing
    • Love Letter
    • Maharashtra Government Schemes
    • Mangalashtak Marathi
    • Marathi Alphabet
    • Marathi Grammar
    • Marathi Numbers
    • Marriage Biodata Format
    • Meaning
    • Moral Stories
    • Mutual Fund
    • Names
    • News
    • Pradhan Mantri Yojana
    • Quotes
    • Recipes
    • Share Market
    • Speech
    • Stories
    • Technology
    • Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
    • Twins Baby Boy Names
    • UPI
    • Whats App Group
    • Wishes
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms Of Use
    • DMCA Copyright
    © 2023 Read In Marathi. Designed by Read In Marathi.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.