Facebook Twitter Instagram
    Facebook Twitter Instagram
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    • Jobs & Education
      • Marathi Alphabet
      • Advertisement Writing
      • Essay Writing
      • Letter Writing
      • Stories
        • Moral Stories
    • Business & Finance
      • Business
      • Finance
    • People & Society
      • Health
      • Information
      • Biography
      • Festival Information
      • Devotional
        • Hanuman Chalisa
      • Quotes
      • Meaning
      • Names
      • Wishes
    • Schemes
      • Central Government Schemes
        • Pradhan Mantri Yojana
      • Maharashtra Government Schemes
    • Sports & Entertainment
      • Sports
      • Entertainment
      • Web Stories
    • Download
    • News
    • About
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Terms Of Use
      • DMCA Copyright
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    Home » Business & Finance » Finance » App » Groww App Information In Marathi | ग्रो (Groww) ॲप्लिकेशन कशा करता आहे आणि ग्रो अँप कसे वापरावे
    App

    Groww App Information In Marathi | ग्रो (Groww) ॲप्लिकेशन कशा करता आहे आणि ग्रो अँप कसे वापरावे

    Sammiksha PawarBy Sammiksha PawarJanuary 2, 2022Updated:January 3, 20222 Comments7 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Groww App Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तुम्हाला जर शेअर मार्केट (Share Market) किंवा म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करण्याची असेल. तर, तुम्ही ‘Groww App’ बद्दल तुम्ही ऐकून असालच! आपणास याबद्दल माहिती नसेल तर या लेखात आपण ग्रो (Groww) ॲप्लिकेशन कशा करता आणि कसे वापरतात, ग्रो चे फायदे आणि बरेच काही जाणून घेणार आहोत.

    Contents hide
    1. ग्रो अँप काय आहे? (What is Groww App In Marathi)
    1.1. ग्रो ॲप चा इतिहास (History) :
    1.2. ग्रो अँप ची वैशिष्ट्ये / सुविधा (Features):
    2. ग्रो (Groww) हा ॲप कसा वापरायचा? (How To Use Groww App In Marathi) :
    2.1. ग्रो ॲप अकाऊंट कसे उघडावे? | How to open Groww Account in Marathi (Step by Step)
    2.2. ग्रो अँप चे फायदे ( Use / Benefits of Groww app ) :
    2.3. ग्रो अँप द्वारे पैसे कसे कमवायचे? ( How to Earn Money in Groww ) :
    2.3.1. Refer and Earn (रेफर आणि कमवा) :
    2.4. ग्रो एप कस्टमर केयर नंबर
    2.5. ग्रो ॲप मार्फत किती फी/चार्जेस आकारले जातात
    3. Frequently Asked Questions On Groww App In Marathi (FAQ) :

    ग्रो अँप काय आहे? (What is Groww App In Marathi)

    ग्रो ॲप हे ऑनलाइन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे ॲप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने आपणास स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, ETF किंवा डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येते.

    ज्यांना म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांनी ग्रो ॲप्लिकेशन बद्दल बरेचदा ऐकलं किंवा वाचलं असेल‌. पण हे नक्की कसे वापरायचे हे समजत नसेल. तर आपण आता ग्रो ॲप बाबत माहिती घेऊया.

    ग्रो ॲप म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकप्रिय आहे. ॲपमध्ये म्युच्युअल फंडाच्या बाबतीत सविस्तर माहिती दिलेली असते. गुंतवणूकदार करणाऱ्यांसाठी फंड चे विश्लेषण करून त्यामध्ये गुंतवणूक करणे सोयीस्कर जाते. 

    ग्रो हे एक ब्रोकर असून आपले पैसे शेअर बाजारात गुंतवण्यासही मदत करते. या मध्ये आपण Intraday trading सुद्धा करू शकतो. तसेच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येते. या बरोबरच SIP द्वारे ही पैसे गुंतवण्याची सुविधा हे ॲप देते.

    अशा विविध प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी Groww App विश्वसनीय व सुरक्षित माध्यम आहे. आजकाल बाजारात ऑनलाइन पैसे कमावण्याचे खूप ॲप्लिकेशन आहेत. त्यातून लोकांची फसवणूक करून लुबाडले जाते. ग्रो ॲप हे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्ड हे गुंतवणूक करून पैसे कमावण्याचे विश्वसनीय माध्यम बनले आहे. ज्याचा वापर करुन आपण घरबसल्या पैसे कमावू शकतो.

    ग्रो ॲप चा इतिहास (History) :

    • २०१६ या वर्षी ललित केश्रे, हर्ष जैन, निरज सिंग व ईशान बन्सल या चार व्यक्तिंनी गुंतवणूक सोपे करणारे स्टार्टअप सुरू केले. त्यांनी याला ‘Groww’ असे नाव दिले.
    • या संस्थापकांना भारतातील लोकांची गुंतवणूक करण्याची प्रक्रिया किचकट व गुंतागुंतीची वाटली. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी यांनी ग्रो निर्माण केले. त्यांच्या टीमने मार्केट रिसर्च आणि प्रयोग केले.
    • २०१७ साली अखेर ‘ग्रो’ हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे एक लोकप्रिय माध्यम बनले.
    • २०२० साला मध्ये ग्रो ने शेअर मार्केट गुंतवणूक करण्याचा पर्याय खुला केला. त्याच वर्षी इंट्रा डे ट्रेडिंग, डिजिटल गोल्ड, ETF आणि IPO या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या.
    • भविष्यात ग्रो हे US Stocks, Futures and Options (F&O), Sovereign Gold Bond या सुविधा देणार आहे.
    • CEO : ललित केश्रे
    • Owner : Nextbillion Technology
    • HeadQuarter : बेंगळूर, कर्नाटक

    ग्रो अँप ची वैशिष्ट्ये / सुविधा (Features):

    • ग्रो ॲप ॲप्लिकेशन स्वरूपात Android व iOS वरती उपलब्ध आहे. ते Google Play Store किंवा Apple Store वरुन डाऊनलोड करू शकता.
    • हे ॲप युजर फ्रेंडली आहे म्हणजेच वापरण्यास सोपे आणि सुलभ आहे.
    • कागदपत्रांच्या शिवाय नवीन खाते तयार करू शकतो. (Paperless)
    • स्टॉक मार्केट मधील सध्याच्या किंमती अद्ययावत राहतात.(Price Updates)
    • एका क्लिक वरती आपली ऑर्डर प्लेस केली जाते.
    • शेअर बाजारामध्ये असलेल्या सर्व भारतीय कंपन्यांची माहिती पाहू शकता.
    • नुकत्याच आलेल्या आर्थिक विश्वातील बातम्या, व्हिडिओज, चार्ट्स आणि माहिती ग्राहकांना पुरवली जाते.
    • तुम्ही या आधी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील (History) पाहू शकता.
    • Candlestick Chart च्या माध्यमातून ग्राहकांना कंपन्या किंवा मुच्युअल फंड ची विश्लेषण करता येते. तसेच त्यांची मागील कामगिरी पाहता येते.
    • ग्रो ॲप ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘कस्टमर सपोर्ट’ ची सुविधा पुरवते. तुम्ही चॅटिंगच्या स्वरूपात ही संवाद साधू शकता.

    ग्रो (Groww) हा ॲप कसा वापरायचा? (How To Use Groww App In Marathi) :

    ग्रो ॲप बद्दल आपण माहिती घेतली. आता आपण याचा वापर कसा करावा हे पाहुया. हे ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. ग्रो ॲपचे ॲप्लिकेशन Android आणि iOS वरती उपलब्ध आहे. तर Groww Dmat Account उघडण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात.

    ग्रो ॲप अकाऊंट कसे उघडावे? | How to open Groww Account in Marathi (Step by Step)

    आता आपण ग्रो ॲप चे नवीन अकाऊंट/खाते कसे उघडायचे हे पाहूया.

    • Step 1 : Mobile मधे गुगल प्ले स्टोअर उघडून ग्रो ॲप सर्च करावे आणि ग्रो ॲप ॲप्लिकेशन Install करावे किंवा येथे क्लिक करून Install करावे.
    • Step 2 : Groww ॲप उघडावे. तुमच्या मोबाईलमधे लॉग-इन केलेल्या ई-मेल आयडी निवडा. त्यात तुम मोबाईल नंबर भरावा आणि ‘Next’ बटण क्लिक करावे. तुमच्या मोबाइल वरती OTP येईल तो आपोआप भरला जाईल आणि मोबाइल नंबर व्हेरिफिकेशन होईल.
    • Step 3 : या नंतर समोर Verify Pan असा पर्याय दिसेल. दिलेल्या जागेत आपला पॅन कार्ड क्रमांक समाविष्ट करा व Create Account बटण क्लिक करा. तिथे तुमचे पॅन कार्ड वरील नाव तपासावे लागते व Confirm करावे. 
    groww app verify PAN
    • Step 4 : तुमच्या समोर जन्मतारीख (Date of Birth), लिंग (Gender), वैवाहिक स्थिती (Marietal Status), व्यवसाय (Occupation), उत्पन्न, ट्रेडिंग करण्याचा अनुभव अशी प्रकारे विचारलेली माहिती भरावी. KYC पूर्ण करण्यासाठी आई व वडिलांचे नाव भरावे व Next वर क्लिक करावे. यापुढे तुम्हाला म्युच्युअल फंड साठी वारस (Nominee) नेमण्याचा पर्याय दिसतो तो तुम्ही भरू शकता. (Optional)
    Groww app add kyc details step 1
    Groww app add kyc details step 2
    • Step 5 : आता तुम्हाला बँक खाते निवडावे लागेल. Groww वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते जोडावे लागते. तुमचे बँक खाते असलेली बँक दिलेल्या यादीतून निवडा.
    groww app choose your bank
    • Step 6 : त्यानंतर तुमच्या बँक शाखेचा IFSC कोड भरावा. समोर बँक शाखेची महिती दिसेल. खालील बॉक्स मधे तुमचा बँक खाते क्रमांक समाविष्ट करा व Verify Bank वरती क्लिक करा. Groww ॲप तर्फे व्हेरिफिकशन करण्यासाठी तुमच्या खात्यात ₹1 पाठवला जाईल. 
    groww app verify bank account
    • Step 7 : या नंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो काढून सबमिट करावा लागेल. पुढे तुम्हाला सही व्हेरिफिकशन करण्यासाठी तुमची सही मोबाइल वरतीच सबमिट करावी लागेल.
    groww app signature verification
    • Step 8 : Aadhar E-Sign करण्याकरिता ‘Proceed to E-Sign’ वर क्लिक करावे. नंतर समोर Account Opening Form दिसेल. तो आपणास वाचायचा आहे कारण त्यामध्ये ग्रो मार्फत आकारले जाणारे चार्जेस आणि इतर महत्वाची माहिती दिलेली असते. वाचल्यानंतर ‘Sign now’ वरती क्लिक करा.
    groww app esign
    • Step 9 : आपणासमोरNSDLAadhar E-Sign पोर्टल उघडेल. इथे आपणास आधार क्रमांकाच्या आधारे ई-साईन करावयाचे आहे. व्हेरिफिकेशन करण्याकरिता आधार क्रमांक भरून Send OTP वर क्लिक करावे. तुमच्या आधारकार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबर वरती OTP येईल तो भरावा.
    groww app nsdl esign
    • Step 10 : या नंतर तुमचे ग्रो खाते तयार होईल. पुढे तुम्हाला खाते सुरक्षेसाठी पिन किंवा बायोमेट्रिकने खाते सुरक्षित करावे.

    आता तुम्ही Groww च्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.

    ग्रो अँप चे फायदे ( Use / Benefits of Groww app ) :

    1. ग्रो ॲप हे एकाच ठिकाणी शेअर बाजारात, म्युच्यअल फंड आणि डिजिटल सोने गुंतवणूक करण्याकरिता उत्तम ॲप्लिकेशन आहे.
    2. ग्रो ॲपमध्ये खाते उघडणे व गुंतवणुकीचे व्यवहार करणे सोपे आहे.
    3. गुंतवणूक करण्याकरिता सुरक्षित आहे.
    4. कागदविरहीत खाते उघडले जाते.
    5. या ॲपमधे पैसे भरणे आणि पैसे काढणे ही सोईस्कर आहे.

    ग्रो अँप द्वारे पैसे कसे कमवायचे? ( How to Earn Money in Groww ) :

    ग्रो ॲपच्या मार्फत शेअर बाजार गुंतवणुक, म्युचुअल फंड, डिजिटल सोने, SIP, ETF, IPO, FD आणि Futures & Options या मध्ये गुंतवणुक करून पैसे कमवण्या सोबतच रेफरल करून पैसे कमावू शकता.

    Refer and Earn (रेफर आणि कमवा) :

    तुम्ही Groww वापरण्याबरोबरच ते तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुमच्या रेफरल लिंक च्या साहाय्याने शेअर करून पैसे कमावू शकता.

    तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर ॲप्लिकेशन शेअर करतेवेळी तुम्ही ग्रो ॲप ची रेफरल लिंक पाठवा, त्यांनी लिंक द्वारे हे ॲप जर डाउनलोड करून नवीन खाते तयार केले. तर तुम्हाला प्रत्येक रेफरल साठी १०० रुपये व त्या व्यक्तीस १०० रुपये मिळतील.

    ग्रो एप कस्टमर केयर नंबर

    Groww Customer Care शी संपर्क करण्यासाठी ग्रो ॲपच्या ‘Help & Support’ विभागातून किंवा कस्टमर केअर शी चॅट माध्यमातून संपर्क साधावा. ग्रो ही सेवा 24×7 देते. तसेच ९१०८८००६०४ क्रमांकद्वारे  व support@groww.in या ई-मेल आयडी द्वारे संपर्क साधू शकता.

    ग्रो ॲप मार्फत किती फी/चार्जेस आकारले जातात

    ग्रो ॲप गुंतवणूकदारांना त्याच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विविध चार्जेस आकारते. ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

    Frequently Asked Questions On Groww App In Marathi (FAQ) :

    ग्रो ॲप काय आहे?

    ग्रो ॲप हे ऑनलाइन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे ॲप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने आपणास स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, ETF किंवा डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येते.

    ग्रो ॲप मोफत आहे का?

    भारतामध्ये ग्रो ॲप द्वारे Dmat किंवा Trading खाते उघडणे मोफत असून व्यवहार करण्यासाठी पैसे आकारले जातात.

    ग्रो ॲप केव्हा लॉंच केले गेले?

    २०१६ या वर्षी Groww ॲप लॉंच केले गेले. हे कमी काळातच लोकप्रिय झाले.

    ग्रो (Groww) हे ॲप्लिकेशन वापरणे सुरक्षित आहे का?

    होय, ग्रो हे SEBI या शासकीय संस्थेशी नोंदणीकृत असून वापरकर्त्याच्या म्युच्युअल फंडचे व्यवहार AMC शी व शेअर बाजारातील व्यवहार BSE & NSE शी थेट करते.

    ग्रो ॲप मधून पैसे काढण्याची मर्यादा किती आहे?

    तुम्ही ग्रो ॲपमधून रु.५०,००० किंवा गुंतवणुकीच्या ९०% (यापैकी जी कमी असेल ती) रक्कम काढता येते.

    ग्रो ॲप NRI वापरकर्त्यांना वापरण्यासाठी उपलब्ध आहे का?

    सध्या ग्रो ॲप NRI वापरकर्त्यांना सुविधा पुरवित नाही.

    आशा आहे की आम्ही दिलेल्या ग्रो एप विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

    आपल्याला या Groww App Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

    अधिक वाचा :

    • गुगल पे कसे वापरावे
    • बिटकॉइन म्हणजे काय मराठी माहिती
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sammiksha Pawar
    • Website
    • Facebook
    • LinkedIn

    नमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.

    Related Posts

    Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

    January 24, 2023
    Read More

    Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas

    January 3, 2023
    Read More

    [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi

    January 3, 2023
    Read More

    2 Comments

    1. Amol V. Belhekar on September 23, 2022 10:08 pm

      ग्रो अँप व इतर डिमॅट अकाउंट मध्ये काय फरक आहे ?

      Reply
      • Smiksha Pawar on September 26, 2022 10:53 am

        ग्रो अँप वरून तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता.

        Reply

    Leave A Reply Cancel Reply

    Recent Posts
    • Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये
    • Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    • [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    • मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi
    • 26 January Republic Day Speech In Marathi 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
    Categories
    • Advertisement Writing
    • App
    • Banking
    • Bigg Boss Marathi
    • Biography
    • Business
    • Central Government Schemes
    • Cricket News & Updates Marathi
    • Cryptocurrency
    • Devotional
    • Digest
    • Download
    • Entertainment
    • Essay Writing
    • Farmer Scheme
    • Festival Information
    • Finance
    • Full Form
    • Ganpati Names
    • Hanuman Chalisa
    • Health
    • House Names
    • How To
    • Information
    • Jobs
    • Jobs & Education
    • Lagna Patrika
    • Letter Writing
    • Love Letter
    • Maharashtra Government Schemes
    • Mangalashtak Marathi
    • Marathi Alphabet
    • Marathi Grammar
    • Marathi Numbers
    • Marriage Biodata Format
    • Meaning
    • Moral Stories
    • Mutual Fund
    • Names
    • News
    • Pradhan Mantri Yojana
    • Quotes
    • Recipes
    • Share Market
    • Speech
    • Stories
    • Technology
    • Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
    • Twins Baby Boy Names
    • UPI
    • Whats App Group
    • Wishes
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms Of Use
    • DMCA Copyright
    © 2023 Read In Marathi. Designed by Read In Marathi.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.