आज मि तुम्हाला HDD आणि SSD म्हणजे काय (HDD And SSD Meaning In Marathi) या विषयी संपूर्ण माहिती या लेखा द्वारे देत आहे.
हार्ड डिस्क काय आहे? | Hard Disk Meaning In Marathi
आपल्याला जर HDD आणि SSD हे विषय जाणून घ्यायचे असतील तर मग सर्वात आधी हार्ड डिस्क ही संकल्पना जाणून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत समजून सांगायचे झाले तर आपण संगणक किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस (Electronic Device) मध्ये आपला डेटा सेव्ह (Save) करण्यासाठी ज्या हार्डवेअरचा वापर केला जातो त्याला हार्ड डिस्क (Hard Disk) असे म्हणतात.
आता यामध्ये आपण स्टोरेज कसे होते आणि त्यातून आपल्याला आपला डेटा किती वेळात परत मिळतोय यावरून HDD आणि SSD हे प्रकार मिळतात. हार्ड डिस्क ही प्राथमिक मेमरी असते. म्हणजेच याचा समावेश हा ROM डिव्हाईस मध्ये होतो.
हार्ड डिस्कला नॉन व्होलाटाईल स्टोरेज डिव्हाईस (Non Volatile Storage Device) म्हणून ओळखले जाते कारण यामध्ये आपण जो काही Data Save करत असतो तो रॅम प्रमाणे आपली सिस्टम बंद केल्यानंतर डिलीट न होता तसाच राहतो.
हार्ड डिस्कचे प्रकार (Types Of Hard Disk In Marathi)
- HDD (हार्ड डिस्क ड्राईव्ह)
- SSD (सॉलिड स्टेट ड्राईव्ह)
- SSHD (सॉलिड स्टेट हायब्रीड ड्राईव्ह)
यापैकी आपण HDD आणि SSD हे दोन मुख्य प्रकार जास्त वापरात आहेत.
HDD (हार्ड डिस्क ड्राईव्ह) काय आहे? | HDD (Hard Disk Drive) Meaning In Marathi

HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह (Hard Disk Drive) हा फक्त एक Full Form झाला. परंतु नक्की HDD म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
1956 साली IBM सारख्या सर्वात जुन्या संगणक क्षेत्रातील कंपनीने HDD ही संकल्पना आणली होती. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की आपला डेटा स्टोअर करण्यासाठी सर्वात मोठे पाऊल हे जवळपास 60 वर्षाहून आधीच उचलले गेले होते.
HDD मध्ये डेटा स्टोअर आणि वापर करण्यासाठी Magnetism चा वापर केला जातो. HDD च्या ज्या पार्ट वर आपण माहिती Read किंवा Write करत असतो त्याला Spinning Platter असे म्हणतात.
यावर आपली माहिती किंवा डेटा read किंवा write करण्यासाठी head असतो. हा head आणि HDD Platter जितक्या जास्त वेगाने फिरतो त्यानुसार HDD Performance ठरत असतो. या Platter च्या आकारानुसार आपल्याला किती डेटा स्टोअर करता येईल हे समजते. जितकी मोठी Platter तितका जास्त स्टोरेज असते.
HDD हा आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी अगदी सोपा पर्याय आहे. कारण याची किंमत देखील कमी आहे आणि आपल्याला आता याची किंमत अधिकाधिक कमी आणि स्टोरेज जास्तीत जास्त वाढत आहे.
सध्या 512 जीबी पासून ते 1 टीबी , 2 टीबी असे अनेक मोठे HDD स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. सध्या SSD जरी आलेली असली तरी देखील HDD हा पर्याय अनेक लोक वापरात आणत आहेत. किंमत आणि जास्त स्टोरेज हे HDD वापराचे सर्वात मोठे कारण आहे.
HDD मध्ये SATA या केबलचा वापर केला जातो. आपल्याला लॅपटॉप आणि डेस्कटॉप दोन्ही मध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ह वेगवेगळे बघायला मिळतात. लॅपटॉप मध्ये 2.5 इंच फॉर्म फॅक्टर असलेल्या HDD वापरतात तर डेस्कटॉप मध्ये 3.5 इंच फॉर्म फॅक्टर HDD वापरल्या जातात.
SSD (सॉलिड स्टेट ड्राईव्ह) काय आहे? | SSD (Solid State Drive) Meaning In Marathi

SSD चा फुल फॉर्म म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह होय. आपल्याला मोठी आणि वजनदार हार्ड डिस्क ड्राईव्ह नको असेल आणि पेन ड्राईव्ह सारखे आणि छोटेसे डेटा स्टोरेज डिव्हाईस हवे असेल तर त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता SSD मध्ये आहे.
पेनड्राईव्ह ची स्टोरेज साईझ कमी असते मात्र SSD मध्ये आपल्याला HDD सारख्या जास्त मोठ्या प्रमाणात स्टोरेज स्पेस मिळत असते.
आपण HDD जसे बघितले की त्यात एक Read Write पॉइंटर असतो आणि तो Platter वर फिरत असतो त्याप्रमाणे SSD मध्ये कोणत्याही प्रकारे मेकॅनिकल पार्टस नसतात. SSD ला मेमरी स्टिक म्हणून ओळखले जाते.
मायक्रो चिप्स च्या सहाय्याने आपला डेटा इथे सेव्ह केला जातो. कोणत्याही प्रकारे मेकॅनिकल मुव्हिंग पार्टस नसल्याने SSD चा आकार हा HDD पेक्षा लहान असतो.
HDD मध्ये आपल्याला एखाद्या लोकेशनला पोहोचायचे असेल तर प्लॅटर वर आपला हेड पॉइंटर ट्रॅक मधून फिरवत न्यावा लागतो. मात्र SSD मध्ये असे कोणत्याही प्रकारे मेकॅनिकल हालचाल करावी लागत नसल्याने आणि आपल्याला ते लोकेशन लगेच मिळाल्याने SSD चा वेग हा वाढतो. त्यामुळे SSD ही HDD पेक्षा वेगवान आहे असे म्हणता येईल.
तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर HDD मध्ये NAND वर आधारित फ्लॅश मेमरीचा वापर केला जातो. SSD ही हार्ड डिस्क आहे त्यामुळे फ्लॅश टेक्नॉलॉजी जरी वापरलेली असली तरी देखील ही मेमरी नॉन व्होलाटाईलच आहे.
SSD सुरुवातीला जेव्हा बाजारात आली तेव्हा हे तंत्रज्ञान इतके चांगले नाही असे वाटत होते मात्र जस जसे लोकांनी याचा वापर करायला सुरुवात केली तेव्हा पासून मग यासाठी इतकी जास्त किंमत आपण देतोय ही योग्य आहे असे समजले.
आपण HDD चा स्पीड त्याच्या हेड पॉइंटरच्या रोटेशन नुसार काढतो मात्र SSD चा स्पीड हा कंट्रोलर च्या सहाय्याने जाणून घेता येतो. या कंट्रोलर मध्ये मग स्टोअर, रिट्राईव्ह, कॅश आणि क्लीन अप हे सर्व कार्य आणि त्यांचा एकत्रित स्पीड असतो.
SSD ला mini SATA म्हणजेच mSATA आणि काही SSD मध्ये SATA स्लॉट असतात. लॅपटॉप मध्ये असलेल्या mini-PCI Express Slot मध्ये आपण mSATA स्लॉट मदतीने SSD कनेक्ट करू शकतो.
HDD आणि SSD मध्ये फरक काय आहे? | HDD Vs SSD In Marathi
HDD | SSD |
---|---|
HDD (हार्ड डिस्क ड्राईव्ह) | SSD (सॉलिड स्टेट ड्राईव्ह) |
HDD ची किंमत SSD च्या तुलनेत कमी असते. | SSD ची किंमत ही HDD च्या तुलनेत 3 ते 4 पट जास्त असते. |
आपल्याला HDD मध्ये जास्त स्टोरेज मिळते कारण कमी खर्चात आपल्याला HDD उपलब्ध आहेत. | जास्त स्टोरेजच्या SSD बनविणे थोडे अवघड आहे कारण त्याची किंमत खूप जास्त वाढते आणि त्यामुळे ग्राहक ते विकत घेत नाहीत. |
HDD वापरलेल्या संगणकाला सुरू होण्यासाठी 30 ते 40 सेकंद कालावधी लागतो. | SSD मध्ये संगणक सुरू होण्यासाठी म्हणजेच बूट होण्यासाठी फक्त 10 सेकंद कालावधी लागतो. |
HDD मध्ये मुव्हिंग पार्टस असल्याने त्यामधून आवाज येतो. त्यामुळे संगणकाचे कंपन देखील जास्त होते. | SSD मध्ये कोणत्याही प्रकारे मुव्हिंग पार्टस नसल्याने याचा आवाज येत नाही. कंपन कमी असते. |
HDD ला जास्त वीज लागते. HDD मध्ये जवळपास 6 ते 6 वॅट ऊर्जा लागते. HDD असलेला लॅपटॉप हा त्यामुळे लवकर डिस्चार्ज देखील होतो. | SSD मध्ये विजेची गरज कमी असते. 2 ते 3 वॅट इतकीच ऊर्जा SSD वापराला लागते. त्यामुळे लॅपटॉप मध्ये SSD असेल तर नॉर्मल लॅपटॉप पेक्षा 30 मिनिटाहुन अधिक काळ बॅटरी बॅकअप वाढतो. |
HDD मध्ये SSD च्या तुलनेत जास्त Heat निर्माण होते. | SSD मध्ये मुव्हिंग पार्टस नसल्याने कमी HEAT तयार होते. |
HDD मध्ये कॉपी करण्याचा वेग हा 50 MB/s ते 120 MB/s पर्यंत असतो. | SSD मध्ये कॉपी करण्याचा वेग हा 200 MB/s पासून 550 MB/s पर्यंत असू शकतो. |
HDD मध्ये मॅग्नेटिक पार्टस असल्याने मॅग्नेटिसम इफेक्ट चा यावर परिणाम होतो. | SSD मध्ये मॅग्नेटिक मेकॅनिसम काही नसल्याने मॅग्नेटिक इफेक्टचा यावर परिणाम होत नाही. |
HDD आकाराने थोड्या मोठ्या असतात. | SSD या आकाराने लहान असतात. |
HDD कोणासाठी योग्य आहे?
तुम्हाला जर जास्तीत जास्त स्टोरेजची गरज असेल आणि तुम्ही स्पीड बाबतीत थोडं चालून घेऊ शकत असाल तर HDD चांगला पर्याय आहे. कंक खर्चात तुम्हाला HDD मिळून जाते. मात्र HDD वापरत असाल तर आपल्याला बुटिंग स्पीड कमी भेटेल हे विसरता कामा नये.
SSD कोणासाठी योग्य आहे?
तुम्हाला स्टोरेज स्पेस कमी असेल तरी चालत असेल मात्र स्पीड फास्ट हवा आहे तर SSD हा पर्याय योग्य आहे. बूट आणि कॉपी स्पीड जर तुम्हाला जास्त हवा असेल तर SSD हा एक सर्वात चांगला ऑप्शन आहे.
आशा आहे की आम्ही दिलेल्या HDD आणि SSD विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या HDD And SSD Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा:
मुख्य पृष्ठ (Home Page) | येथे क्लिक करा |