Facebook Twitter Instagram
    Facebook Twitter Instagram
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    • Jobs & Education
      • Marathi Alphabet
      • Advertisement Writing
      • Essay Writing
      • Letter Writing
      • Stories
        • Moral Stories
    • Business & Finance
      • Business
      • Finance
    • People & Society
      • Health
      • Information
      • Biography
      • Festival Information
      • Devotional
        • Hanuman Chalisa
      • Quotes
      • Meaning
      • Names
      • Wishes
    • Schemes
      • Central Government Schemes
        • Pradhan Mantri Yojana
      • Maharashtra Government Schemes
    • Sports & Entertainment
      • Sports
      • Entertainment
      • Web Stories
    • Download
    • News
    • About
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Terms Of Use
      • DMCA Copyright
    Read In Marathi – वाचा मराठी मध्ये
    Home » Business & Finance » Business » [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    Business

    [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi

    Sammiksha PawarBy Sammiksha PawarJanuary 3, 2023Updated:January 3, 20231 Comment11 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Home Business Ideas For Ladies In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घरगुती व्यवसाय महिलांसाठी, स्त्रियांसाठी घरगुती व्यवसाय, घरबसल्या व्यवसाय, इंटरनेटवर पैसे कसे कमवायचे, बिनभांडवली व्यवसाय, ग्रामीण भागातील व्यवसाय, घरगुती व्यवसाय यादी, व्यवसाय मार्गदर्शन, नवीन व्यवसाय, घरगुती काम पाहिजे, घरगुती काम, पैसे कसे कमवायचे, गृहिणी, माता यांच्यासाठी व्यवसाय कल्पना, व्यवसाय कसा करायचा, लघुउद्योग, रोजगार, घरी काम, घरी करता येणारे व्यवसाय, महिलांसाठी उद्योग, महिलांसाठी व्यवसाय, घरबसल्या उद्योग [Home Business Ideas For Ladies In Marathi] (Housewives, Housewife, Ladies, Home Small Business Ideas For Women In Marathi)

    अशी खुप कामे तसेच व्यवसाय आपल्याला पाहावयास मिळतात जी एक स्त्री आपल्या घरगुती जबाबदारींचे पालन करून देखील करताना आपणास दिसुन येते. आणि आपल्या घरात तसेच संसारात आपला स्वताचा हातभार ती लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही कामे तसेच उद्योग व्यवसाय असे आहेत जे करण्यासाठी कोणत्याही स्त्रीला जास्त वेळ देण्याची तसेच त्यात जास्त मेहनत घेण्याची देखील कोणतीही गरज नसते.

    Contents hide
    1. घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Business Ideas For Women In Marathi
    1.1. महिला वर्गासाठी तसेच घरगृहिणींसाठी साईड बिझनेस | Business Ideas For Housewives In Marathi
    1.2. अशिक्षित तसेच कमी शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी व्यवसाय | Small Business Ideas In Marathi For Ladies
    1.3. महिलांसाठी विकेंड व्यवसाय :
    1.4. ग्रामीण भागातील महिला तसेच गृहिणींसाठी व्यवसाय :
    1.5. स्त्रियांसाठी किंवा गृहिणींसाठी कमी खर्चात घरी करता येणारे व्यवसाय । Low Investment Business Ideas In Marathi
    1.6. नोकरदार तसेच व्यवसायिक महिलांसाठी व्यवसाय

    घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Business Ideas For Women In Marathi

    आज पाहावयास गेले तर कित्येक स्त्रीया आज पुरूषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन नोकरी करता आहेत तसेच स्वताचा उद्योग व्यवसाय देखील चालवता आहेत.आणि आजच्या लेखात आपण खास महिला करू शकत असलेल्या उद्योग तसेच व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत. जेणेकरून जास्तीत जास्त महिला तसेच गृहिणींना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन प्राप्त होईल.

    महिला वर्गासाठी तसेच घरगृहिणींसाठी साईड बिझनेस | Business Ideas For Housewives In Marathi

    1. टयुशन घेणे :ज्या महिला तसेच गृहिणींचे भरपुर तसेच उच्च शिक्षण झालेले असेल त्या महिला आपल्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजातील उद्याचे उज्वल भविष्य असणारे आपल्या लहान शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला मुलींना घडविण्यासाठी,त्यांना शिकविण्यासाठी महिला करू शकतात.

    ह्यात महिला तसेच घरगृहिणी सुरुवातीला आपल्या घरातच लहान मुला मुलींचे टयुशन क्लासेस घेण्याचे काम करू शकतात.आणि मग मुला मुलींची संख्या जशी वाढेल त्याप्रमाणे आपले स्वताचे एक कोचिंग सेंटर सुदधा त्या सुरू करू शकतात.

    2. संगीत शिकविणे : अशा महिला ज्यांना संगीताची खुप आवड आहे तसेच त्यांना त्याचे पुरेपुर ज्ञान देखील आहे.अशा महिला आपल्या घरातच संगीताचे क्लासेस देखील घेऊ शकतात.आणि जसजशी आपल्या क्लासमधील संगीत शिकत असलेल्या मुला मुलींच्या संख्येमध्ये वाढ होत जाईल.आपण आपल्या त्या छोटयाशा क्लासला एक मोठे म्युझिक टिचिंग सेंटर देखील बनवु शकतो.

    3. अकाऊंटिंग : अशा गृहिणी ज्यांचे काँमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेत शिक्षण झालेले आहे आणि त्यांचे अकाऊंटचे ज्ञान खुप उत्तम आहे.अशा महिला घरबसल्या वेगवेगळया कंपन्यांसाठी त्यांचे अकाऊंट सांभाळण्याचे त्यांचे बँलन्स शीट तयार करण्याचे काम करू शकतात.यासाठी फक्त आपल्याला अशा कंपनीशी 

    आँनलाईन जाँबशी संबंधित वेबसाईटशी आँनलाईन संपर्क साधुन तिथे आपला बायोडाटा पाठवायचा असतो.ज्या कंपनीला अकाऊंट किपर हवा असेल त्या आपल्याशी नक्की संपर्क साधत असतात.मग आपण आपल्याला हव्या त्या कंपनीचे अकाऊंट बघण्याचे काम करू शकतो.

    4. आँनलाईन टिकिट बुक करणे : अशा महिला ज्यांना इंटरनेटचे चांगले ज्ञान आहे आणि त्यांना आँनलाईनची सर्व कामे जमतात अशा महिला इतरांना घरबसल्या आँनलाईन टिकिट बुक करून देणे तसेच लाईट बिल भरूण देणे अशी आँनलाईन कामे करून एक चांगले साईड इन्कम प्राप्त करू शकतात.फक्त लोकांना ही सेवा देण्यासाठी आपल्याकडे आपला स्वताचा एक कंप्युटर तसेच लँपटाँप असणे गरजेचे असते आणि त्यात चांगले इंटरनेट कनेक्शन असणे देखील आवश्यक असते.सोबतच कागदपत्रांची प्रिंट काढण्यासाठी आपल्याकडे एक प्रिंटरही असावे लागते.

    5. आँनलाईन सर्वे करणे : आज मार्केटमध्ये अशा खुप कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांना आपल्या कंपनीत सर्वे करण्यासाठी आँनलाईन कामे करत असलेल्या मुला मुलींची घरगृहिणींची आवश्यकता असते.अशा कंपनींसाठी आँनलाईन सर्वे करण्याचे काम देखील महिला तसेच घरगृहिणी करू शकतात.

    6. आँनलाईन कपडे विकण्याचा व्यवसाय करणे : आज पाहावयास गेले तर आपणास गेले तर आपणास दिसुन येते की बहुतेक महिला ह्या आँनलाईन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करता आहेत.फक्त ह्यासाठी आपल्याला आपला सोशल मिडियावर भरपुर लोकांशी संपर्क निर्माण करावा लागतो.वेगवेगळे गृप तसेच पेजेस बनवुन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागते.

    आँनलाईन आपल्या मालाचे फोटो पोस्ट करावे लागतात ज्यालाही कपडे आवडले तो आपल्याशी संपर्क साधून कपडे मागवित असतो.मग आपल्याला त्या दिलेल्या पत्यावर मालाची डिलीव्हरी करायची असते.

    अशिक्षित तसेच कमी शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी व्यवसाय | Small Business Ideas In Marathi For Ladies

    1. जेवणाचा डब्बा तयार करणे, पोहचविणे : अशा स्त्रिया ज्यांना स्वयंपाक बनविण्याची खुप आवड आहे.आणि त्यांना पाककलेचे चांगले ज्ञान अवगत आहे अशा स्त्रिया आपल्या कलेचा वापर करून इतरांसाठी भोजन बनविण्याचा व्यवसाय करून अशा लोकांना तसेच मुला मुलींना ही सेवा देऊ शकतात जे पुरुष,मुले मुली नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी राहत आहेत आणि त्यांची जेवणाची गैरसाय होते आहे.

    2. लहान मुले सांभाळण्याचा व्यवसाय : बहुतेक महिला ह्या एक तर नोकरदार असतात किंवा त्यांचा स्वताचा उद्योग व्यवसाय असतो त्यामुळे अशा महिला आपल्या लहान मुला मुलींची काळजी घेण्यासाठी एखादी स्त्री शोधत असतात जी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या लहान बाळाची व्यवस्थित काळजी घेईन.अशा आपल्या आजुबाजु वास्तव्यास असलेल्या नोकरदार तसेच उद्योजक महिलांसाठी आपण त्यांची मुले सांभाळण्याचे काम करू शकतात.ह्या व्यवसायासाठी आपल्याला फक्त लहान मुलांसाठी घरात खेळणी वगैरे ठेवणे गरजेचे असते.

    3. मेहंदी लावण्याचा व्यवसाय : ज्या महिलांना चांगली मेहंदी काढता येते अशा महिला आपल्या घरातच एक मेहंदी लावण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात.आपल्या आजुबाजुच्या महिलांना सण उत्सव तसेच विशेष कार्यप्रसंगी हातात मेहंदी काढुन देण्याचे काम देखील आपण करू शकतात.त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या घराबाहेर एक छोटीशी पाटी लावावी लागेल की आमच्याकडे सर्व प्रकारच्या डिझाईनच्या मेहंदी काढुन मिळतील मग आजुबाजुच्या स्त्रियांना जसजशी माहीती होईन तसतशा त्या आपल्याकडे मेहंदी काढुन घेण्यासाठी येत जातील. 

    4. दागिणे बनविण्याचा व्यवसाय : दागिणे बनविणे हा एक असा व्यसाय आहे जो बहुतेक महिला आपल्या घरी बसुन देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला आर्टिफिशल दागिणे असणे खुप गरजेचे आहे.आणि आपल्याला जर आर्टिफिशल दागिणे कसे बनवतात हे माहीत नसेल तसेच त्याचे ज्ञान नसेल तर आपण युटयुबवर व्हिडिओ बघुन देखील काही दिवसांतच आँनलाईन ही कला शिकु शकतो.किंवा एखादी ट्रेनिंगसुदधा घेऊ शकतो.

    महिलांसाठी विकेंड व्यवसाय :

    1. कुकिंकचे क्लासेस घेणे : बहुतेक महिला अशा असतात ज्यांना कुकिंगची फार आवड असते.आणि त्यांना नवनवीन स्वादिष्ट पदार्थ बनवायला आणि इतरांना खाऊ घालायला खुप आवडत असते.अशा महिला आपल्या अंगी असलेल्या ह्या कौशल्याचा वापर इतरांना कुकिंग शिकविण्यासाठी करू शकतात.ज्यात ते नवनवीन पदार्थ बनवायला इतरांना देखील शिकवू शकतात.आणि हे कुकिंगचे क्लास आपण हप्त्यातुन एकदा तसेच दोनदा घेऊ शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे फक्त स्वयंपाकघर आणि काही भांडयांची आवश्यकता असते.

    2. कंप्युटर दुरुस्त करणे : अशा महिला ज्यांना कंप्युटरचे उत्तम ज्ञान प्राप्त आहे.त्यांना साँपटवेअर तसेच हार्डवेअरचे चांगले उत्तम ज्ञान आहे.अशा महिला घरातुनच आपला कंप्युटर दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

    3. युटयुब चँनल सुरू करणे : बहुतेक महिला आपले ज्ञान आपला,अनुभव आपल्या अंगी असलेले एखादे कौशल्य इतरांसोबत आपले स्वताचे एक युटयुब चँनल सुरू करून शेअर करू शकतात.त्यांना ती कला शिकवू शकतात.आपले प्राप्त केलेले ज्ञान इतरांसोबत वाटुन घेऊ शकता.आपले अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता.अशा पदधतीने आपण आपले स्वताचे चँनल सुरू करून आपल्याला जे उत्तम येते ते आपण इतरांसोबत शेअर करून युटयुबद्वारे

    पैसे कमवू शकतो.फक्त यासाठी आपल्याला आपले चँनल आधी माँनीटाईज करावे लागते.मग त्यावर ज्या अँड येतात त्याचे पैसे आपल्याला मिळत असतात.

    4. ट्रान्सलेटींग : अशा महिला ज्यांना चांगले भाषांतर येत असते ज्या एका भाषेतील मजकुर दुसरी भाषेत भाषांतरीत तसेच अनुवादीत करू शकतात.अशा महिला ट्रान्सलेटर म्हणुन देखील काम करु शकतात.आणि हा व्यवसाय महिला घरबसल्या आँनलाईन देखील करू शकतात.अशा खुप वेबसाईट तसेच लेखक असतात ज्यांना आपले आर्टिकल एका भाषेतुन दुसरी भाषेत ट्रान्सलेट करायचे असते ज्यासाठी त्यांना ट्रान्सलेटरची आवश्यकता असते.

    5. फ्रिलान्स रायटिंग करणे : आज असे खुप ब्लाँग आहेत ज्यात ब्लाँगर्सला स्वता आपल्या ब्लाँगसाठी आर्टिकल लिहायला वेळ भेटत नसतो.त्यामुळे त्यांना आपल्या ब्लाँग वेबसाईटसाठी आर्टिकल लिहायला एक कंटेट रायटर हवा असतो जो त्यांना हव्या त्या विषयावर रोज आर्टिकल लिहुन देण्याचे काम करत असतो.शा ब्लाँगरसाठी रिकाम्या वेळात आर्टिकल लिहुन आपण चांगले इन्कम प्राप्त करु शकतात.

    ग्रामीण भागातील महिला तसेच गृहिणींसाठी व्यवसाय :

    1. घरगुणी लोणचे बनवण्याचा व्यवसाय : आज खूप महिला तसेच पुरूष जण आहेत जे नेहमी जेवणात भाजी पोळी सोबत तोंडी लावण्याकरता लोणचे देखील घेत असतात.पण त्यांच्या घरात दोघे नवरा बायको कामाला जात असल्याकारणाने नेहमी लोणचे तयार केले जात नसते त्यामुळे ते बाहेरून बाजारातुन लोणचे आणत असतात.अशा लोकांसाठी घरगुती लोणचे तयार करून ते घरपोच दिले जाण्याची सेवा देऊन आपण आपला स्वताचा घरगुती लोणचे आणि पापड सेवा वगैरेचा चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. 

    2. मिठाई विकण्याचा व्यवसाय करणे : आज वेगवेगळया कार्यक्रमांसाठी प्रत्येक ठिकाणी मग ते लग्न समारंभ असो किंवा इतर कोणताही समारंभ असो मिठाई ही लागतच असते.कारण मिठाई ही आपल्याला प्रत्येकाला स्वीट मध्ये आवडत असते.म्हणुन नेहमी कोणताही कार्य प्रसंग असल्यावर आपण जेवणाच्या ताटात मिठाईचा समावेश पहिले करत असतो.अशा वेगवेगळया कार्य प्रसंगी स्वादिष्ट मिठाई बनवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.

    3. स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करणे : घरगृहिणी तसेच महिला आपल्या घरातच स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करू शकतात.ज्यात त्या आपल्याला दैनंदिन जीवणात लागत असलेल्या वस्तु,किराणा,भाजीपाला आपल्या घरात ठेवू शकतात आणि तोच आजुबाजुच्या लोकांना विकु शकतात.याच्याने इतर लोकांचा बाजारात वस्तु विकत घेण्यासाठी जाण्याचा त्रासही कमी होईल आणि आपलाही एक साईड इन्कम बिझनेस चालु होऊन जाईल.

    4. मेणबत्ती बनवण्याचा तसेच विकण्याचा व्यवसाय : मेणबत्ती ही एक अशी वस्तु आहे जीची गरज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवणात नेहमी पडत असते.घरात लाईट गेल्यावर घरात जेव्हा सर्वत्र अंधार झालेला असतो तेव्हा प्रकाशासाठी आपण घरात मेणबत्ती लावत असतो.तसेच वेगवेगळया साज सजावटीच्या कामासाठी तसेच धार्मिक ठिकाणी देखील मेणबत्तीची आवश्यकता भासत असते.म्हणून हा सुदधा एक चांगला उत्तम व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला मेणबत्ती कशी तयार केली जाते हे शिकावे लागेल.

    स्त्रियांसाठी किंवा गृहिणींसाठी कमी खर्चात घरी करता येणारे व्यवसाय । Low Investment Business Ideas In Marathi

    1. केक बनविणे : आज कुठेही मोठया कार्यक्रमात मग तो कोणाचा वाढदिवस असो किंवा इतर कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो तिथे केक आपल्याला आवर्जुन पाहायला मिळत असतो.अशा मोठमोठया वाढदिवसाच्या कार्यक्रमांसाठी घरगुती केक बनवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.ह्यात आपण सुरूवातीला आपल्या घराच्या आजुबाजुच्या लोकांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असला तर त्यासाठी केक बनवुन देण्याचे काम करू शकतो.मग जसजशी व्यवसायात वृदधी होईल तसतसे आपण मोठमोठया दुकानांसाठी केक बनवुन देण्याचे काम करु शकतो.

    2. वधुवरसुचक मंडळ : वधुवर सुचक मंडळ हा सुदधा महिलांसाठी एक चांगला व्यवसाय आहे जो महिला घरबसल्या देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याकडे अशा काही लग्न इच्छुक वर आणि वधु यांची यादी असणे गरजेचे असते जे आपल्यासाठी एक जीवनसाथी शोधत असतात.मग आपण त्या दोघांची भेट घडवून देऊन त्यांचे लग्न जुळवुन देऊन चांगले कमिशन प्राप्त करू शकता.

    3. कार्यक्रमाचे नियोजन करणे : आज बहतेक महिला तसेच मुली ह्यांना वेगवेगळया कार्यक्रमाचे नियोजन करायला खुप आवडत असते.आणि अशी आवड असलेल्या महिला इतरांच्या घरी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे जसे की लग्न,नव वर्षाचा कार्यक्रम यांचे नियोजन करून एक चांगली कमाई करु शकतात.

    4. ब्युटी पार्लर : ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी आपल्या घरातच सुरू करू शकतात.फक्त हा व्यवसाय करण्यासाठी आपणास ब्युटी पार्लर मध्ये जी कार्ये केली जातात जसे की चेहरा साफ करणे,केस कापणे,फेशल करणे इत्यादी कामांचे आपल्याला आधी प्रक्षिक्षण घ्यावे लागेल मग आपण आपले स्वताचे एक ब्युटी पार्लर सुरू करू शकतात.

    5. शिवणकाम करणे : जर आपणास शिवणकाम येत असेल तर आपण आपल्या घरातच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपण आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील पुरूष,महिला लहान मुले मुली यांचे फाटलेले कपडे शिवण्याचे काम करू शकतात.यासाठी आपल्याला एक शिवणयंत्र लागत असते त्याचा खर्च आपल्याला करावा लागत असतो.

    नोकरदार तसेच व्यवसायिक महिलांसाठी व्यवसाय

    1. ब्लाँगिंग : आजच्या ह्या डिजीटल युगात ब्लाँगिंग सुदधा एक चांगला आँनलाईन करता येणारा व्यवसाय आहे.ज्यात महिला आपल्याला मिळेल त्या वेळेत कंटेट लिहुन पब्लिश करू शकत असतात.किंवा कंटेट लिहिण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नसेल तर एखादा कंटेट रायटर देखील ब्लाँगवर रोज कंटेट लिहिण्यासाठी लावू शकतात.आणि ह्यात आपल्याला फक्त आर्टिकल लिहुन त्याचा एसीओ करून पब्लिश करायचे असते ज्यासाठी दिवसातुन कधीही रोज एक दोन तास दिले तरी पुरेसे आहे.फक्त ह्यात आपल्याला वाचकांची आवड बघुन कंटेट लिहावे लागतात.ह्यात गुंतवणुक फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करण्याची असते जो खर्च आपल्याला दर वर्षी साधारणत तीन ते पाच हजार इतका करावा लागत असतो.

    2. इंटेरिअर डिझाइनिंगचे काम करणे : अशा महिला ज्यांना इंटेरिअर डिझाइनिंगची आवड आहे.ज्यांनी इंटेरिअर डिझाइनिंगचा एखादा कोर्स देखील केला आहे त्या आपला स्वताचा इंटेरिअर डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपल्याला लोकांच्या घरातील आतील साज सजावट तसेच डेकोरेशनचे काम बघायचे असते.

    3. एससीओ कंसल्टन्सी सुरू करणे : आपल्या वेबसाईटवर ट्रँफिक आणण्यासाठी आणि आपली अरनिंग वाढवण्यासाठी तिचा एससीओ करणे हा एक खुप महत्वाचा भाग असतो.आणि भरपुर ब्लाँग तसेच वेबसाईट अशा असतात ज्यांना आपली वेबसाईट गुगलच्या सर्च इंजिनमध्ये फस्ट रँकला आणायची असते.पण एसीओचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना आपली वेबसाईट फस्ट रँकला आणता येत नसते.मग अशा वेळेला काही कंपन्या तसेच ब्लाँगर आपली वेबसाईट फस्टला रँक करण्यासाठी एससीओ स्पेशलिस्टला हायर करत असतात.ज्यात तो स्पेशालिस्ट त्यांच्या वेबसाईटचा अशा पदधतीने एससीओ करतो की ती गुगलवर सर्च करताच पहिल्या क्रमांकाला तसेच टाँप पाच मध्ये तरी दिसत असते.आणि ही सेवा इतरांना देण्यासाठी आपल्याला सोशल मिडियावर अकाऊंट  तसेच एक पेज तयार करावे लागत असते जिथे आपण देत असलेल्या सेवेविषयी लोकांना सांगु शकतो आणि त्या पेज मधुन आपला नंबर प्राप्त करून लोक आपल्यापर्यत पोहोचु शकतील.आणि आपण देत असलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

    4. वेब डिझाइनिंग करणे : ज्या महिलांना वेबसाईट डिझाईन करता येते तसेच त्यांनी ह्या कामाचा एखादा डिप्लोमा तसेच कोर्स केलेला असेल त्या महिला वेबसाईट डिझाइनिंगचा व्यवसाय करू शकतात.ह्यासाठी त्यांना अशा काही कंपनी तसेच एजन्सी सोबत संपर्क साधावा लागेल ज्या वेबसाईट बनवायचे आणि तिचे डिझाइन करण्याचे काम करते.

    त्यांच्याशी संपर्क साधुन आपण त्यांच्यासाठी वेब डिझाइनिंगचे काम करू शकतो.

    5. रिझ्युम तयार करणे : अशा महिला ज्यांना चांगला रिझ्युम तयार करता येतो त्या महिला आपला स्वताचा रिझ्युम रायटिंगचा व्यवसाय देखील करू शकतात.आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे आपला लँपटाँप,कँप्युटर तसेच प्रिंटर असणे गरजेचे असते.

    आशा आहे की आम्ही दिलेल्या 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

    आपल्याला या Home Business Ideas For Ladies In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

    अधिक वाचा:

    • शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी व माहीती
    • कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    business ideas for women in marathi ladies business ideas in marathi navin business ideas in marathi women's business ideas in marathi घरगुती व्यवसाय महिलांसाठी स्त्रियांसाठी घरगुती व्यवसाय
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sammiksha Pawar
    • Website
    • Facebook
    • LinkedIn

    नमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.

    Related Posts

    Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

    January 24, 2023
    Read More

    Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas

    January 3, 2023
    Read More

    मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi

    January 3, 2023
    Read More

    1 Comment

    1. Puja raut on August 14, 2022 12:50 pm

      Accounting, online ticket booking, pleasue vaccancy asel tar kalwa..

      Reply

    Leave A Reply Cancel Reply

    Recent Posts
    • Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये
    • Top 54 Best Small Business Ideas in Marathi [2023] | कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas
    • [30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi
    • मकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi
    • 26 January Republic Day Speech In Marathi 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
    Categories
    • Advertisement Writing
    • App
    • Banking
    • Bigg Boss Marathi
    • Biography
    • Business
    • Central Government Schemes
    • Cricket News & Updates Marathi
    • Cryptocurrency
    • Devotional
    • Digest
    • Download
    • Entertainment
    • Essay Writing
    • Farmer Scheme
    • Festival Information
    • Finance
    • Full Form
    • Ganpati Names
    • Hanuman Chalisa
    • Health
    • House Names
    • How To
    • Information
    • Jobs
    • Jobs & Education
    • Lagna Patrika
    • Letter Writing
    • Love Letter
    • Maharashtra Government Schemes
    • Mangalashtak Marathi
    • Marathi Alphabet
    • Marathi Grammar
    • Marathi Numbers
    • Marriage Biodata Format
    • Meaning
    • Moral Stories
    • Mutual Fund
    • Names
    • News
    • Pradhan Mantri Yojana
    • Quotes
    • Recipes
    • Share Market
    • Speech
    • Stories
    • Technology
    • Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
    • Twins Baby Boy Names
    • UPI
    • Whats App Group
    • Wishes
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms Of Use
    • DMCA Copyright
    © 2023 Read In Marathi. Designed by Read In Marathi.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.