Home » Business & Finance » Finance » Banking » Home Loan Information In Marathi | होम लोन माहिती: पात्रता, कागदपत्रे व गृहकर्ज कसे मिळवावे

Home Loan Information In Marathi | होम लोन माहिती: पात्रता, कागदपत्रे व गृहकर्ज कसे मिळवावे

होम लोन विषयी माहिती, घर बांधण्यासाठी कर्ज, गृह कर्ज कागदपत्रे, होम लोन साठी लागणारी कागदपत्रे, होम लोन मराठी माहिती (Home Loan Information In Marathi, Home Loan Meaning In Marathi, Home Loan Documents List In Marathi, Home Loan In Marathi, Home Loan Process In Marathi, Home Loan Details In Marathi)

Home Loan Information In Marathi: तुम्ही तुमचे स्वतःचे घर बांधण्याचा विचार नक्कीच केला असेल. आता तुमच्या स्वप्नातील घर सत्यात साकारण्यात कोणताही अडथळा येणार नाही. लोक घर उभारणीसाठी आपली संपूर्ण कमाई साठवून ठेवत नाहीत, नंतर पैशांची गरज भासते. त्यासाठी होम लोन हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही होम लोनचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

Contents hide
1. Home Loan Information In Marathi | होम लोन माहिती

Home Loan Information In Marathi | होम लोन माहिती

Home Loan Information Marathi
Home Loan Information In Marathi
कर्जाचे नावगृह कर्ज (Home Loan)
उद्देशग्राहकांना स्वतःचे घर बांधणीसाठी किंवा विकत घेण्यासाठी कर्जाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे

होम लोन म्हणजे काय (Home Loan Meaning In Marathi)

स्वत:च्या मालकीचं घर असणं, हे अनेकांच्या आयुष्यातील प्रमुख स्वप्न असतं. कोरोनामुळे गेल्या काही काळात गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. सर्व बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जावरील व्याजदर सतत कमी करत आहेत. त्यामुळे सध्या घरखरेदीसाठी चांगली संधी असल्याचे बोलले जाते. 

घर खरेदी करताना एकरकमी पैसे देणे तसेच घर बांधणीसाठी पैशांची उभारणी करणे अवघड असते. त्यामुळे बहुतांश ग्राहक घरखरेदीसाठी गृहकर्ज घेतात. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज ग्राहकाचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता पाहून कर्ज देते. कर्जाशी संबंधित सर्व माहिती तुम्ही त्या बँकेत जाऊन किंवा बँकांच्या वेबसाइटवर उपलब्ध असते.

होम लोनलाच ‘ गृह कर्ज ‘ असेही म्हणतात.

होम लोन म्हणजे असे कर्ज जे बँक किंवा वित्तीय संस्था ही ग्राहकास गृह खरेदी, बांधकाम व घर दुरुस्ती करण्यासाठी देते.

साधारणत: बँकांकडून घराच्या एकूण किंमतीच्या 80 टक्के गृहकर्ज दिले जाते. 20 टक्के रक्कम ही सुरुवातीला तुम्हाला भरावी लागते. गृहकर्जाचा हप्ता हा ग्राहकाच्या एकूण उत्पन्नाच्या 60 टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे. ग्राहक अगदी दोन ते पाच लाखांचेही गृहकर्ज घेऊ शकतात.

होम लोनचे प्रकार (Types Of Home Loan In Marathi)

घराच्या आवश्यकतेनुसार आधारित गृह कर्ज प्रकारे विभागले आहे.

1Loans for Purchase of Landजमीन खरेदीसाठी कर्ज
2Loans for Home Purchaseगृहखरेदीसाठी कर्ज
3Loans for Construction of a Houseघराच्या बांधकामासाठी कर्ज
4House Expansion or Extension Loans गृह विस्तार कर्ज
5Home Conversion Loansगृह रूपांतरण कर्ज
6Loans for Home Improvementगृह सुधारणेसाठी कर्ज
7Balance Transfer Home Loansबॅलन्स ट्रान्सफर होम लोन
8NRI Home LoansNRI गृहकर्ज
9Bridged Loansब्रिज्ड कर्ज
10Stamp Duty Loansस्टॅम्प ड्युटी कर्ज
11Composite Home Loanकंपोसिट होम लोन

1. जमीन खरेदीसाठी कर्ज (Loans for Purchase of Land)

अनेक बँका जमीन खरेदीसाठी कर्ज देतात. जमीन खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे, खरेदीदार जेव्हा जेव्हा त्याची आर्थिक परवानगी देईल किंवा गुंतवणूक म्हणून जमीन असेल तेव्हा तो निधी वाचवू शकतो आणि घर बांधू शकतो. जमिनीच्या किमतीच्या 85% पर्यंत बँके कडून कर्ज दिले जाते.

2. गृह खरेदी करीता कर्ज (Loans for Home Purchase)

आपल्याला जर तयार असलेले घर खरेदी करण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी किंवा सेकंड हॅण्ड घर किंवा सेकंड हॅण्ड फ्लॅट खरेदी करण्यासाठी होम लोनची गरज असेल. तर, आपणास बॅंकेकडून होम लोन मिळु शकते.

बँकेचे कर्मचारी आपण ठरवलेल्या घरी किंवा फ्लॅट मधे पाठवते. ते अधिकारी आपल्या घराचे अथवा फ्लॅटचे मुल्यांकन करून आपल्याला किती लोन द्यायचे हे ठरवते.

जर घर किंवा फ्लॅट हा सेकेंड हॅण्ड असेल. तर बॅंक ही मुळ किंमतीच्या ९० टक्क्यापर्यंत लोन आपल्याला देऊ शकते.

3. घराच्या बांधकामासाठी कर्ज (Loans for Construction of a House)

हा कर्जाचा सर्वात चांगला प्रकार आहे. गृह कर्ज देणाऱ्या संस्था मधे सहकारी बँक आणि खासगी बॅंक तसेच वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. या संस्था आपल्या गरजेनुसार, आपल्याला होम लोनचा पुरवठा करता. तो मासिक हप्ता च्या स्वरुपात आपल्याला परतफेड करावी लागते.

जर तुमच्याकडे जमीन आहे व त्या जमिनीवरती तुम्हाला घर बांधायचे आहे तर होम लोन हा एक उत्तम पर्याय आहे.

4. गृह विस्तार कर्ज (House Expansion or Extension Loans)

जर तुमच्याकडे आधीपासूनच घर आहे व ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार एक मजला किंवा एक खोली आणखी मोठे करायचे आहे. तर तुम्हाला होम Extension लोनअंतर्गत लोन मिळु शकते.

5. गृह रूपांतरण कर्ज (Home Conversion Loans)

ज्या लोकांनी आधीच गृहकर्ज घेतलेले आहे आणि त्यासोबत घर खरेदी केले आहे परंतु त्यांना दुसऱ्या नवीन घरात जायचे असेल तर ते गृह रूपांतरण कर्जाची निवड करू शकतात. हे कर्ज नवीन घरामध्ये हस्तांतरित करून, कर्जदार नवीन घराच्या खरेदीसाठी निधी देऊ शकतात आणि त्यांना मागील गृहकर्जाची परतफेड करण्याची आवश्यकता नाही. जरी हे सुविधा देते असेल पण गृहकर्जाचा हा प्रकार खूप महाग आहे.

6. गृह सुधारणेसाठी कर्ज (Loans for Home Improvement)

जर आपल्या घरामध्ये काही मोठ्या त्रुटी किंवा चुका असतील. तर, घर रिपेअरिंग किंवा डागडुजीसाठी जसे की घराचे रंगकाम, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक वायरिंग मधे बदल तसेच घराच्या सिलिंगचे वाॅटर प्रुफिंग करणे या कामासाठी काही बॅंका Home Improvement Loan देतात.

7. बॅलन्स ट्रान्सफर होम लोन (Balance Transfer Home Loans)

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कमी व्याजदर किंवा इतर बँकेने देऊ केलेल्या चांगल्या सेवा यासारख्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचे गृहकर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करायचे असेल तेव्हा या पर्यायाचा लाभ घेता येतो. हे उर्वरित कर्जाची परतफेड करण्यासाठी सुधारित, इतर Bank ने देऊ केलेल्या कमी व्याजदरावर केले जाते.

8. NRI गृहकर्ज (NRI Home Loans)

अनिवासी भारतीयांना भारतात निवासी मालमत्ता खरेदी करण्यात मदत करण्यासाठी खास डिझाइन केलेले loan चा प्रकार आहे. या प्रकारच्या कर्जाची औपचारिकता आणि अर्ज प्रक्रिया इतरांपेक्षा वेगळीअसते. सामान्यतः, बहुतेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या गृहनिर्माण कर्ज पोर्टफोलिओचे उत्पादन म्हणून NRI कर्ज देतात.

9. ब्रिज्ड कर्ज (Bridged Loans)

ब्रिज्ड लोन ही अल्प मुदतीची कर्जे आहेत जी सध्याच्या घरमालकांसाठी डिझाइन केलेली आहे, जे नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखत आहेत. विद्यमान मालमत्तेसाठी खरेदीदाराची ओळख होईपर्यंत नवीन घराच्या खरेदीसाठी कर्जदारांना निधी देण्यास ते मदत करते. या प्रकारच्या कर्जासाठी सहसा बँकेकडे नवीन घर गहाण ठेवण्याची आवश्यकता असते आणि ती दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी वाढवली जाते. विजया बँक आणि एचडीएफसी बँक सारख्या अनेक बँका ब्रिज्ड कर्ज देतात.

10. स्टॅम्प ड्युटी कर्ज (Stamp Duty Loans)

मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी स्टॅम्प ड्युटी कर्ज दिले जाते.

11. कंपोसिट होम लोन (Composite Home Loan)

या गृह कर्जाचा प्रकारामधे आपण घर बांधण्यासाठी लागणारी जमीन व त्या जमिनीवर इमारत बांधण्यासाठी एकत्र लोन बॅंकेकडून घेता येऊ शकते.

होम लोनचे लाभ (Home Loan Benefits In Marathi)

1टॅक्स मधील सवलत
2कमी व्याजदर
3कर्ज परतफेडीसाठी मिळणारा जास्तीचा कालावधी
4आगाऊ भरलेल्या रक्कमेवरती दंड बसत नाही (Pre-Payment)
5होम लोन Balance Transfer
6होम लोन वरील व्याजदर सवलत

टॅक्स मधील सवलत

होम लोनमुळे आपल्याला आयकर (Income Tax) मध्ये काही प्रमाणात सवलत मिळु शकते.

कमी व्याजदर

होम लोन वरील व्याजदर हे इतर कोणत्याही घेतलेल्या लोन पेक्षा खुप कमी असते. सर्वसाधारणपणे बहुतांश बॅंकांचे होम लोन वरील व्याजदर हे ६.५० ते १२ % असते. अडचणीच्या काळात आपल्याला आपल्या चालु होम लोन वरती अतिरिक्त रक्कम ही कमी व्याजदरात मिळु शकते. हे पर्सनल लोन पेक्षाही फायदेशीर ठरते.

व्याजदर हे कर्जदाता ते कर्जदाता, आर.बी.आय(RBI) विहित(Prescribed) रेपो दर, महागाई, आर्थिक घडामोडी अशा बहुतांश कारणांवरती अवलंबून असते.

तसेच, होम लोनचे व्याजदर हे एकतर स्थिर किंवा अस्थिर असतात. स्थिर होम लोन हे बॅंकेने ठरवुन दिलेल्या कालावधी पर्यंत स्थिर असू शकते. 

स्थिर प्रकारचे होम लोन हे मार्केट च्या अस्थिरते पासून सुरक्षीत असतात. हा प्रकार कर्ज घेणाऱ्याच्या फायदयाचा असुही शकतो किंवा नसूही शकतो.

कर्ज परतफेडीसाठी मिळणारा जास्तीचा कालावधी

दुसऱ्या कोणत्याही लोनच्या तुलनेत होम लोन मध्ये होम लोन परतफेडीचा कालावधी अधिक मिळतो. तो जवळपास ‌‌‍‍२५ ते ३० वर्षाचा कालावधी मिळु शकतो.

जास्त कालावधी मिळत असल्यामुळे लोन घेणाऱ्यावरती मासिक हप्त्याचा बोजा होत नाही.

टीप : परतफेड कालावधी हा प्रत्येक बॅंकेनुसार वेगवेगळा असू शकतो.

आगाऊ भरलेल्या रक्कमेवरती दंड बसत नाही (Pre-Payment)

जेव्हा तुम्ही फ्लोटिंग रेट होम लोन घेता तेव्हा तुम्ही आगाऊ रक्कम बँकेत जमा करु शकता ते ही कोणताही दंड न भरता. यामुळे तुम्हाला तुमचे लोन हे शेड्युल चा लवकर फेडता येऊ शकते.

होम लोन Balance Transfer

होम लोन मध्ये चालूचे व्याज हे खुप जास्त असतील किंवा तुम्ही तुमच्या कर्जदात्याकडुन मिळणाऱ्या सेवेपासून नाखुश असाल. तेव्हा, तुम्ही तुमची होम लोनचा राहिलेली रक्कम (Outstanding Balance) दुसऱ्या कर्जदात्याकडे जेथे कमी व्याजदर व चांगली सेवा भेटेल तेथे स्थलांतरित करु शकता.

होम लोन वरील व्याजदर सवलत

काही बॅंका मागास महिला, बॅंक कर्मचारी आणि जेष्ठ नागरिक यांना होम लोन व्याज दरामधे ०.०५% ची सवलत देतात.

होम लोन मिळवण्यासाठी पात्रता (Iigibility For Home Loan In Marathi)

होम लोन साठी प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था आपापले वेगवेगळे निकष लावते. परंतु, अर्जदाराची सामान्य पात्रता असावी.

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • गृहकर्जासाठी आवश्यक किमान क्रेडिट स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
  • होम लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ७० असावे.
  • अर्जदाराचे किमान वेतन किंवा उत्पन्न दरमहा २५,००० रुपये असावे. (कर्ज देणाऱ्या बँका किंवा संस्थेनुसार मर्यादा बदलते.) 
  • कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.
  • स्वयंरोजगार असेल तर, किमान दोन वर्ष जुना व्यवसाय असावा.

तसेच, पात्रता ही मालमत्तेच्या प्रकार व स्थळ यावरती सुद्धा अवलंबून असते.

होम लोनसाठी महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज (Documents Required For Home Loan In Marathi)

होम लोन घेण्यासाठी आपणास खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

१. पुर्णपणे भरलेला गृह कर्जाचा अर्ज

२. अर्ज आणि पासपोर्ट आकाराचे फोटो

३. ओळख आणि रहिवासी असल्याचा पुरावा ( आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / बॅंक पासबुक / पासपोर्ट /  जन्म प्रमाणपत्र / दहावीचे गुणपत्रक )

(यापैकी कोणतेही एक)

४. मागील सहा महिन्याचे बॅंक विवरण ( Bank Statement )

५. प्रक्रिया शुल्क धनादेश (Check)

६. टायटल कागदपत्रांची प्रती

७. शेतजमीन चित्रण

८. जमिन धारणा नविन वेतन पावती

९. शैक्षणिक पात्रता (प्रमाणपत्र प्रत)

१०. व्यवसायाचे प्रमाणपत्र आणि पुरावा

११. Copies of Title Documents of Agricultural Land depicting crops

१२. व्यापारासाठी १६ नंबर फॉर्म

१३. मागील ३ वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र

१४. आयकर परतावा (ITR)

१५. मागील दोन वर्षांपासूनचे कर्ज घेतल्याचे विवरण; कर्ज असेल तर सॅंक्शन आणि क्लोजर लेटर

१६. मागील तीन‌ वर्षाचा नफा आणि तोटा व आढावा पत्रक (Balance Sheet)

१७. मागील ३ महिन्याची वेतन पावती

१८. कार, फिक्स डिपाॅझिट, म्युच्युअल फंड, एल आय सी पॉलिसी पेपर

टीप – वरील कागदपत्रांची यादी व्यतिरिक्त कर्ज देणारी बँक व वित्तीय संस्था इतर कागदपत्रांची मागणी करू शकते.

होम लोन साठी अर्ज कसा करावा

सध्याच्या काळात होम लोन घेणे हे खुपच सोपे आणि सोयिस्कर झाले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे आणि बरेचशा माध्यमांमुळे हे शक्य झाले आहे. आपण गृह कर्जासाठी सरळ बॅंकेत जाऊन आणि चौकशी करून तसेच आपण आँनलाईन पद्धतीने सुद्धा होम लोनसाठी अर्ज करु शकतो.

१. अर्ज करताना बॅक आपल्याकडुन आवश्यक ते कागदपत्रे जमा करुन घेते. त्यानुसार तुमची होम लोन ची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये तुमचा CIBIL स्कोअर, मालमत्तेचे मुल्य, अशा बर्याचशा गोष्टींचे मुल्यमापन केले जाते.

२. सर्व कागदपत्रांचे मुल्यमापन आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला होम लोन द्यायचे किंवा नाही हे ठरवले जाते.

अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेशी संपर्क साधावा.

FAQ On Home Loan Information In Marathi

होम लोन अंतर्गत मालमत्तेच्या किती टक्के रक्कम मिळते?

होम लोन अंतर्गत मालमत्तेच्या ८०-९०% कर्ज रक्कम मिळते.

होम लोन साठी वयाची अट किती आहे?

होम लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ७० असावे.

होम लोन साठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

होम लोन साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

गृह कर्जासाठी कोणकोणत्या फी आकारल्या जातात?

गृह कर्जासाठी फी चार्जेस प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेसाठी वेगवेगळे असते. साधारणतः प्रक्रिया शुल्क हे आकारले जाते.

आशा आहे की आम्ही दिलेल्या होम लोन (Home Loan) विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Home Loan Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *