Home » How To » कोणतेही काम करायला आपल्याला कंटाळा येण्याची कारणे आणि कंटाळा येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे | How To Concentration On Work In Marathi

कोणतेही काम करायला आपल्याला कंटाळा येण्याची कारणे आणि कंटाळा येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे | How To Concentration On Work In Marathi

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एका गोष्टीला फार महत्व असते. ती म्हणजे आपले काम जे आपण रोज आवडीने निष्ठेने अणि प्रेमाने करत असतो.

पण आपल्याच पैकी काही लोक असे देखील असतात. ज्यांना आपले रोजचे काम करायला कंटाळा येत असतो. मग ते काम आपले कितीही आवडीचे काम असो.

हे असे का होते हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडत असतो. याचविषयी आपण आजच्या लेखातुन सविस्तर जाणुन घेणार आहोत की आपल्याला एखादे काम करायला कंटाळा का येत असतो?

कोणतेही काम करायला आपल्याला कंटाळा येण्याची कारणे 

1) कामाची आवड नसणे:

कोणतेही काम करायला आपल्याला कंटाळा कधी येतो जेव्हा ते काम करायला आपल्याला अजिबात आवडत नसते आपली त्या कामात अजिबात कोणतीही रूची नसते पण आपल्याला ते काम बळजबरीने करावे लागत असते.

का तर ते काम आपण केले नाही तर आपल्याला आपले पोट भरता येणार नाही, आपला उदरनिर्वाह करता येणार नसतो.

पण अशा पदधतीने एक ओझे म्हणुन जेव्हा आपण एखादे काम करत असतो तेव्हा आपण ते काम तेवढ्या निष्ठेने, श्रदधेने अणि मनाने करत नसतो. जेवढी निष्ठा आपल्यामध्ये त्या कामाविषयी असणे गरजेचे असते.

याचेच परिणाम स्वरुप ते काम आपल्याकडुन उत्तम पदधतीने होत नसते. कारण आपण ते काम फक्त पैसे मिळण्यासाठी करत असतो आपली त्या कामावर श्रदधा तसेच निष्ठा, प्रेम आहे म्हणुन करत नसतो. अणि असे असल्यामुळेच आपण त्या कामात आपले सर्वोतम कामाचे प्रदर्शन करत नसतो.

2) कामाची एकच पदधत:

जेव्हा आपण एखादे काम एकाच पदधतीने रोज करत असतो तेव्हा देखील आपल्याला ते काम करायला कंटाळा येत असतो. मग ते काम आपल्या कितीही आवडीचे तसेच जिव्हाळयाचे काम असो.

कारण सतत एकाच पदधतीने जेव्हा आपण एखादे काम करत असतो तेव्हा आपल्याला ते काम करण्याची मज्जा तसेच आनंद लुटता येत नसतो. कारण रोज एकाच पदधतीने जेव्हा आपण एखादे काम करतो तेव्हा आपल्याला त्या कामातुन काहीतरी नवनिर्मिती ही करता येत नसते.

म्हणुन देखील आपल्याला आपले एखादे आवडते काम देखील रोज रोज करायला कंटाळा येत असतो.

3) कृतीपेक्षा परिणामांवर जास्त लक्ष असणे:

एखादे काम करायला आपल्याला तेव्हा देखील कंटाळा येत असतो. जेव्हा आपण ते काम करताना त्यात आपल्याला करायच्या असलेल्या कृतीचा तसेच चांगल्या प्रदर्शनाचा विचार न करता ती कृती केल्यानंतर किंवा ते काम केल्यानंतर मला काय वेतन मिळणार आहे? किंवा किती वेतन मिळणार आहे? मला किती लाभ मिळणार आहे? याकडे आपले जास्त लक्ष असते.

म्हणजेच कृतीपेक्षा आपले मन परिणामांमध्ये जास्त गुंतलेले असते. आपले मन त्या कामापेक्षा त्या कामाची मिळणारी किंमत कामातुन मिळणारा फायदा यावर जास्त लागलेले असते. म्हणुन देखील आपले एखाद्या कामात मन लागत नसते.

4) केलेल्या कामाचा योग्य तो म्हणजेच आपल्याला अपेक्षित, हवा तो मोबदला न मिळणे 

आपण एखादे काम एकदम मन लावून निष्ठेने अणि श्रदधेने अणि निर्मितीशीलपणे तेव्हा देखील करत नसतो जेव्हा आपल्याला त्या कामाची आपल्याला हवी ती किंमत, हवा तो मोबदला मिळत नसतो.

म्हणुन आपण ते काम करायला कंटाळा करत असतो. अणि जरी नाइलाजाने आपण ते काम केले तरी ते आपण मन लावून पुर्ण निष्ठेने अणि श्रदधेने ते काम करत नसतो.

याला कारण आपण केलेल्या कामाचा तसेच करत असलेल्या कामाचा आपल्याला योग्य तो म्हणजेच आपल्याला अपेक्षित असा हवा तो मोबदला मिळतो आहे याचे आपल्याला समाधान नसणे. संतुष्टी नसणे हे देखील एक महत्वाचे कारण असते कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा येण्याचे.

कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे?

  • कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा येऊ नये याचे दोन मुख्य उपाय आहेत एक म्हणजे आपल्याला आवडते तेच काम आपण नेहमी करायला हवे याने आपल्याला ते काम करताना कंटाळा येत नसतो.
  • अणि दुसरा उपाय म्हणजे आपण जे काम करतो त्याविषयी आपल्या मनात आवड निर्माण करणे. अणि ती आवड निर्माण करण्यासाठी आपल्या कामात एक मजेशीरपणा गंमत निर्माण करणे ज्याने आपल्याला ते काम करताना कंटाळा येत नसतो. एखादा खेळ खेळताना जशी उत्सुकता, कुतुहल अणि हुरुप जोश आपल्या अंगात अणि मनात असतो. तसा हुरुप आपण आपले कोणतेही काम करताना आपल्या स्वतामध्ये आपण निर्माण करणे गरजेचे आहे.
  • रोज आपले काम आपण एका वेगळया नव्या पदधतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा जेणेकरून सतत एकाच पदधतीने रोज काम केल्यामुळे आपल्याला जो ते काम करण्याचा कंटाळा येत असतो. तो येत नसतो. रोज ते काम करताना आपल्याला एक वेगळीच मज्जा येत असते. आनंद होत असतो.
  • कोणतेही काम करताना त्या कामाचे मला पैसे मिळणार आहे किंवा ते काम केल्याने मला वर्तमानात तसेच भविष्यात काही फायदा होणार आहे. असा कोणताही विचार न करता ते काम करणे आपले कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. अणि ते काम आपण पैशासाठी किंवा कोणत्याही इतर फायद्यासाठी नाही तर आपल्याला ते काम करताना आनंद होतो मज्जा वाटते म्हणुन आपण ते काम करायला हवे.जसे की एखादे लहान मुल दिवसभर खेळत असते. कोणताही मोबदला मिळण्याची अपेक्षा मनात न ठेवता. कारण जेव्हा आपण अशा पदधतीने एखादे काम जेव्हा करत असतो तेव्हा काम आपल्यासाठी काम राहत नसते तर तो आपल्यासाठी एक खेळ होऊन जात असतो.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आजच्या लेखातुन आपण कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा का येत असतो?अणि आपण तो कंटाळा घालविण्यासाठी काय उपाय करायला हवेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 तरी सदर लेख आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रीणींपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या कामातील कंटाळवाणेपणा घालवता येईल अणि त्यांनाही आपल्या कामाचा आनंद घेता येईल त्याची मज्जा लुटता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *