जाहिरात लेखन (Jahirat Lekhan) (advertisement writing in marathi) ही एक खुप महत्वाची कला आहे. जाहीरात लेखनाला आपण पासष्ठावी कला असे देखील म्हणत असतो.आणि आज जर आपल्याला जनतेशी संपर्क साधायचा असेल आणि आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार,प्रसार करावयाचा असेल तर आपल्याकडे जाहीरातीशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. म्हणुन आजच्या लेखातुन आपण ह्याच जाहीरात लेखना विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जाहीरात लेखन (Jahirat Lekhan) म्हणजे काय?
जाहीरात लेखन ही एक अशी निर्मितीशील कला आहे.जिचा वापर करून आपण आपल्या उद्योग-धंदा व्यापार,व्यवसायाचा जगभर प्रचार तसेच प्रसार करू शकतो.आणि आपला उद्योग व्यवसाय जगभर पसरवू शकतो.
जाहीरात लेखणाचे प्रमुख उददिष्ट कोणते?
जाहीरात लेखन आपण ह्यासाठी करत असतो की आपल्या उद्योग,व्यवसायाचा जगभर प्रचार तसेच प्रसार व्हावा.आपल्या उद्योग व्यवसायाविषयी लोकांना माहीती मिळावी.आणि आपल्या विक्रीमध्ये तसेच ग्राहकांमध्ये वाढ व्हावी.आणि आपल्याला चांगला नफा प्राप्त व्हावा.
जाहीरातीचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?
आज आपल्या उद्योग,व्यवसायाला जर आपल्याला जगभर प्रसिदध तसेच प्रचलित करायचे असेल.जगभर त्याचा प्रचार,प्रसार करावयाचा असेल तर आपण त्याची जाहीरात टिव्हीवर तसेच सोशल मिडियाद्वारे करत असतो.पण आपण ज्या ह्या जाहीराती करत असतो यांचे देखील वेगवेगळे प्रकार पडत असतात ते पुढीलप्रमाणे आहेत :
1. स्थानिक जाहीरात
स्थानिक जाहीरात ही एक अशी जाहीरात असते. जिच्यादवारे आपण स्थानिक क्षेत्रातील लोकांपर्यत आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करत असतो. अशा प्रकारच्या जाहीराती देण्यासाठी रेडिओ, टिव्ही, पोस्टर तसेच बँनर, वर्तमानपत्र इत्यादींचा वापर केला जात असतो.
2. राष्टीय जाहीरात
राष्टीय जाहीरात म्हणजे अशी जाहीरात ज्याद्वारे राष्टीय पातळीवर एखादी कंपनी आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार तसेच प्रसार करत असते.
3. वर्गीकृत जाहीरात
वर्गीकृत जाहीरातींमध्ये अशा जाहीरातींचा समावेश होत असतो, ज्या स्थानिक गरजा आणि माहीतीवर आधारलेल्या असतात.
4. औद्योगिक जाहीरात
औद्योगिक जाहीरात ही आपण आपल्या ग्राहकांना आपल्या उद्योग, व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी करत असतो. तसेच औद्योगिक जाहीरातीद्वारे आपण ग्राहकांपर्यत आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करत असतो.
5. माहीतीपुर्ण जाहीरात
माहीतीपुर्ण जाहीरात ही एक अशी जाहीरात असते, ज्यात एखाद्या शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थेत नाव नोंदणी कशी करावी? नाव नोंदणी करण्यासाठी कोणती प्रक्रिया पुर्ण करावी याची माहीती दिली जात असते.
6. सार्वजनिक कल्याण जाहीरात
अशा प्रकारच्या जाहीराती ह्या नेहमी सरकार तसेच सामाजिक कल्याणाचे काम करत असलेल्या संस्थांकडुन समाजाच्या कल्याणासाठी दिल्या जात असतात.
जाहिरात लेखन (Jahirat Lekhan ) कसे करावे (How To Write Advertisement In Marathi)
जेव्हाही आपण एखादी जाहीरात लिहित असतो.तेव्हा आपल्याला त्या जाहीरातीचा एक आराखडा तयार करावा लागत असतो.ज्यात आपण जाहीरातीत कुठे काय समाविष्ट करायचे?कोणता शब्द तसेच चित्र वापरायचे हे दिलेले असते. चला तर मग जाणुन घेऊया जाहीरात लेखन कसे करतात.
जाहीरात लेखणाचे स्वरूप (Advertisement Writing Format In Marathi)
- जाहीरात लेखन करत असताना आवश्यक असलेली महत्वाची माहीती सर्वप्रथम एकत्र करायची असते.
- एक चौकोनी आकार बनवायचा आणि त्याच्या वरच्या भागात मध्यभागी ठळक आणि मोठया अक्षरात आपण ज्या वस्तुची जाहीरात करतो आहे.त्या वस्तुचे नाव लिहायचे.
- जाहीरात लेखन करताना सेल! खुशखबर असे ग्राहकांना आकर्षित करणारे शब्द उजव्या तसेच डाव्या बाजुला लिहावेत.
- डाव्या बाजुच्या मध्यभागी आपण ज्या वस्तुची जाहीरात करतो आहे त्या वस्तुचा गुणधर्म लिहायचा असतो.
- आपण ज्या वस्तुची जाहीरात करतो आहे.त्या वस्तुचे चित्र उजव्या बाजुला किंवा मध्यभागी द्यावे.
- जाहीरात ठळक दिसावी यासाठी त्यात आकर्षक पदधतीच्या रंगांचा वापर करावा.
जाहीरातीची भाषा कशी असावी?
आपण जेव्हाही जाहीरात लेखन करत असतो.तेव्हा आपल्याला आपल्या वस्तु तसेच उत्पादनाच्या जाहीरातीची भाषा अशी ठेवावे लागते की जेणेकरून ग्राहक आपल्या उत्पादनाकडे आकर्षिला जाईल.
- जाहीरातीची भाषा ही आपल्या उत्पादनाची गुणवत्ता,प्रभावीपणा,आणि गुण सांगणारी असावी.
- जाहीरातीची भाषा कमी शब्दांत जास्त अर्थ सांगणारी आशयपुर्ण अशी असावी.
- भाषेमध्ये केलेला वाक्यरचनेचा वापर परिणामकारक तसेच आपल्या उत्पादनाचे प्रतिबिंब चित्रित करणारा असावा.
- आपण आपले उत्पादन जनतेला कुठे उपलब्ध करून देतो आहे त्या जागेचा देखील उल्लेख जाहीरातीत करावा.सोबत संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर देखील खाली द्यायला हवा.
- जाहीरात लेखन करताना अलंकारिक आणि काव्यमय शब्दांचा प्रयोग वाक्यरचनेत करावा.
- आपण ज्या उत्पादनाची जाहीरात देतो आहे त्याची किंमत आणि ती वस्तु खरेदी करताना मिळणारी सवलत काय आहे?हे देखील सांगावे.
- ग्राहकाने आपले उत्पादनच का खरेदी करावे? आपल्या उत्पादनाचे असे काय वैशिष्टय आहे?तसेच काय वेगळेपणा आहे?जो इतरांच्या उत्पादनात नाही.याचे देखील दोन ओळीत स्पष्टीकरण द्यावे.
जाहीरातीची माध्यमे किती आणि कोणकोणती असतात?
सर्वात पहिले आपण कोणतीही जाहीरात करण्यासाठी चौकाचौकात पोस्टर तसेच बँनर लावायचो.रेडिओवर टिव्हीवर अनाऊन्स करायचो किंवा वर्तमानपत्रात त्याची जाहीरात बातमी द्यायचो पण आता आधुनिक काळात जाहीरातीची पदधत ही बदलत चालली आहे. जाहीरातीची माध्यमे पुढीलप्रमाणे आहेत :
जुनी जाहीरातीची माध्यमे :
- पोस्टर लावणे
- बँनर उभारणे
- टिव्हीवर जाहीरात करणे
- रेडिओवर तसेच स्पीकरवर अनाऊन्समेंट करणे
- वर्तमानपत्रात बातमी देणे.
- चित्रपट तसेच नाटक
आधुनिक जाहीरातीची माध्यमे :
- इंटरनेट
- सोशल मिडिया प्लँटफाँर्म वर अँड दाखवणे
- ब्लाँग तसेच वेबसाईट वर अँड दाखवणे
- डिजीटल मार्केटिंग करणे
इत्यादी.
जाहीरात लेखणासाठी आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवेत?
कोणत्याही विषयावर तसेच वस्तु,उत्पादनाविषयी जाहीरात लेखन जेव्हा आपण करत असतो तेव्हा जाहीरातलेखन करण्यासाठी काही महत्वाचे गुण आपल्यात असणे फार गरजेचे असते. जाहीरात लेखनासाठी आपल्यात असावे लागणारे काही महत्वाचे गुण पुढीलप्रमाणे आहेत:
1. कल्पणाशक्ती :
एक चांगली आणि उत्तम जाहीरात लिहिण्यासाठी आपली कल्पणाशक्ती ही अतिशय उत्तम असावी लागते.
2. भाषेवर चांगले प्रभुत्व :
कोणत्याही भाषेत जाहीरात लेखन करण्यासाठी आधी आपल्याला त्या भाषेवर प्रभुत्व मिळविणे गरजेचे असते.आणि त्यासाठी आपल्याला त्या भाषेचा,तिच्या व्याकरणाचा उत्तम अभ्यास करावा लागत असतो.कारण ह्यामुळे आपल्या शब्द साठयात वाढ होते.
3. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा चांगला अभ्यास :
आपण ग्राहकांच्या मानसिकतेचा देखील अभ्यास करायला हवा.की ग्राहकांना कोणती वस्तु हवी आहे?कशी वस्तु आहे?ग्राहकांची आवड काय आहे?तसेच त्यांची मागणी काय आहे?ह्या सर्व गोष्टींची माहीती आपल्याला असायला हवी.
4. विषयाची मांडणी कशी करावयाची त्याचे ज्ञान :
जाहीरात लेखन करताना विषयाची मांडणी कशी करतात याचे ज्ञान असायला हवे.
5. जाहीरातीच्या विषयाचे चांगले ज्ञान :
एक उत्तम जाहीरात लेखक बनण्यासाठी आपल्याला आपण ज्या वस्तु तसेच उत्पादनाची जाहीरात करतो आहे तिची चांगली माहीती असणे गरजेचे आहे.जेणेकरून आपण ग्राहकांना आपल्या वस्तु तसेच उत्पादनात त्यांना मिळत असलेल्या सुविधा,फायदे सांगता येतील.
6. तीक्ष्ण निरीक्षणशक्ती :
जाहीरात लेखन करण्यासाठी आपली निरीक्षण शक्ती देखील तिक्ष्ण असायला हवी.
जाहीरात देण्याचे फायदे कोणकोणते असतात ?
आपण ज्या वस्तु तसेच प्रोडक्टचा व्यवसाय करत असतो.त्या वस्तु,प्रोड्क्ट विषयी लोकांनी माहीती व्हावी जनतेमध्ये,ग्राहकांमध्ये प्रचार तसेच प्रसार व्हावा म्हणुन त्या वस्तु तसेच प्रोड्क्ट विषयी आपण जाहीरात देत असतो. जाहीरात देण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
- जाहीरात केल्याने आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत आपल्या वस्तु उत्पादनाचा प्रचार तसेच प्रसार करता येतो.
- जाहीरात दिल्याने आपल्या वस्तु तसेच उत्पादनाच्या विक्रीत तसेच ग्राहकांत अधिक वाढ होत असते.
- ग्राहकांना स्वताकडे आकर्षुन घेता येते.आणि आपल्या वस्तु तसेच उत्पादनाची खरेदी करण्यास त्यांना प्रवृत्त देखील करता येते.
Advertisement Writing Examples List In Marathi | Advertisement In Marathi Topics
Sr. No. | Advertisement In Marathi Topics |
---|---|
1 | संगणक वर्गाची जाहिरात |
2 | Yoga Classes Advertisement in Marathi |
3 | जाहिरात लेखन प्लास्टिक बंदी |
4 | जाहिरात लेखन अभिनय कार्यशाळा |
5 | जाहिरात लेखन सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा |
6 | मोबाईल जाहिरात लेखन मराठी |
7 | जाहिरात लेखन बेकरी |
8 | मॅजिक च्यवनप्राश जाहिरात लेखन |
9 | Ice Cream Parlour Advertisement In Marathi |
10 | jahirat lekhan in marathi on hair oil |
11 | advertisement writing on soap in marathi |
12 | जाहिरात लेखन सुट्टी मधील योग शिबिर |
आशा आहे की आम्ही दिलेल्या जाहिरात लेखन मराठी (Jahirat Lekhan In Marathi) माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या जाहिरात लेखन मराठी (Jahirat Lekhan In Marathi) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :
मुख्य पृष्ठ (Home Page) | येथे क्लिक करा |