Home » Government Schemes » Farmer Scheme » किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती, पात्रता, लाभ व नोंदणी कशी करावी | Kisan Credit Card Loan Information In Marathi

किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती, पात्रता, लाभ व नोंदणी कशी करावी | Kisan Credit Card Loan Information In Marathi

किसान क्रेडिट कार्ड योजना, किसान क्रेडिट कार्ड ची माहिती, किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे, किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे (Kisan Credit Card Information in Marathi, Kisan Credit Card Loan Information In Marathi, Kisan Credit Card Loan Marathi, Kisan Credit Card Yojana Information In Marathi)

भारत देशातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून सुटका मिळावी म्हणजेच कमी व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठीच भारत सरकारने किसान क्रेडिट योजना तयार केेली आहे.

आपण किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता, महत्वाची कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

Contents hide

किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Loan Information In Marathi

योजनेचे नावकिसान क्रेडिट योजना (Kisan Credit Card Scheme )
योजनेचा प्रकारकेंद्र पुरस्कृत योजना
मंत्रालयवित्त मंत्रालय
उद्देशशेतकऱ्यांला कमी वेळात व कमी व्याजदरात शेतीसंबंधीच्या कामासाठी कर्जाची रक्कम पुरविणे.
पुरस्कृत बँकाव्यापारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, लघु वित्त व सहकारी बँका
व्याजदर३ ते ७ टक्के
परतफेड कालावधी३ ते ५ वर्ष
अधिकृत संकेतस्थळhttps://pmkisan.gov.in

किसान क्रेडिट योजना म्हणजे काय । Kisan Credit Card Yojana Information In Marathi

 • किसान क्रेडिट कार्ड योजनेचा ऑगस्ट १९९८ मध्ये शुभारंभ झाला.
 • या योजनेची सुरुवात नाबार्ड बॅंकेद्वारे करण्यात आली.
 • आर. व्ही. गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार केसीसी योजना सुरू झाली.
 • २००४ मध्ये शेती व बिगर शेतीकामाच्या गुंतवणुकीच्या कर्ज आवश्यकतेनुसार ही योजना विस्तारित करण्यात आली.
 • २०१२ साली टी. एम. भसीन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने बदल सांगितले.
 • २०१४ मध्ये ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँकांव्दारे इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्डची सुविधा प्रदान करण्यात आली.
 • २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आले.
 • १८ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे सुधारित किसान क्रेडिट कार्ड योजना आणण्यात आली.

शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदी, शेतमशागत पासून ते शेतमालाच्या बाजार विक्री पर्यंत अनेक गरजा आहेत. यात त्याला आर्थिक मदतीची गरज असते.

यापूर्वी शेतकरी आपली शेतीतील आर्थिक गरज भागवण्यासाठी सावकार किंवा जमीनदार यांच्याकडून कर्ज घेत. त्यांच्या जास्त व्याजामुळे तो कर्जबाजारी होत असे.

या अडचणी दूर करण्यासाठीच सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकरी आता कर्जबाजारी होणार नाहीत.

शेतकऱ्यांस जे अल्प मुदतीचे किंवा पीककर्ज मंजूर झालेले असते, त्या रक्कमेची नोंद किसान क्रेडिट कार्डवर केली जाते. याच्या साहाय्याने कर्जदार तितक्या रक्कमेची खते, बी-बियाणे व अन्य गरजेच्या गोष्टींची खरेदी करू शकतो. म्हणजेच ज्या वेळी गरज भासते त्यावेळी बँकेत जाऊन रोख रक्कम काढता येते. जितकी रक्कम काढली जाते, त्यावरच व्याजाची आकारणी होते.

शेती सोबतच शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन तसेच मत्स्यपालन असे जोडधंदे करतात. त्यांच्यासाठी यातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. या योजनेतून शेतकऱ्यांचा खाद्य, पशु आहार, चिकित्सा वरील खर्चाकरिता सुध्दा कर्ज पुरवठा केला जातो.

कोरोना संकटाच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड चे वाटप केले जात होते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेची उद्दिष्टे

‘शेतकऱ्यांच्या शेतीविषयक व अन्य गरजांसाठी, एकाच खिडकीमधून सुलभ व लवचिक कार्य पद्धतीने पुरेसे व वेळच्या वेळी कर्जरक्कम उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे मुख्य उद्दिष्ट आहे.’

पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लघु मुदत कर्जाच्या गरजांची पूर्तता करणे.

 • कापणी, कापणीनंतर व हंगामासाठी येणारा खर्च.
 • पीक उत्पादनाच्या विक्रीसाठी होणारा खर्च.
 • शेतकऱ्यांचा घरखर्च.
 • कृषी निगडित वस्तू खरेदीसाठी.
 • शेती मालमत्ता व शेतीसाठी लागणारे खेळते भांडवल.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता | Kisan Credit Card Eligibility In Marathi

KCC योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

१ ) लाभार्थी व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी तसेच ७० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.

टीप: जर ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्याला कर्ज घ्यावयाचे असेल, तर सोबत ६० पेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.

२ ) स्वत:च्या मालकीची जमीन असणारे (एकटे / संयुक्तपणे), मौखिक भाडे पट्टेगार, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.

३) शेतकऱ्याचे शेतात किमान ५००० किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे उत्पादन असणे गरजेचे आहे.

टीप : शेतकरी PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा. असेच शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज

 • लाभार्थ्याचे ओळख पुरावा ( Identity Proof ) – आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक
 • रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला
 • आपले सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत
 • सात बारा दाखला आणि आठ अ
 • बँक पासबुक प्रत
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • अन्य बँकेतून कर्ज न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र
 • मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाशी जोडलेला/लिंक असावा.

टीप : जर आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसेल. तर तुमच्या जवळच्या आधार केंद्र मधून लिंक करावा.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे | Kisan Credit Card Benefits in Marathi

 • शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके, इ. शेतीच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाते.
 • शेती सोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन जोडधंदे करणारे शेतकरी ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • कोणत्याही वेळी ठराविक कालवधीसाठी कर्ज मिळते.
 • १ लाख ६० हजार  रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जमिनीचा आधार घेण्याची गरज नाही. आता विना तारण कर्ज मिळून जाते.
 • किसान क्रेडिट कार्ड हे ATM मध्ये वापरता येते. आठवड्याचे सातही दिवस, २४ तास कधीही एटीएममधून पैसे काढता येतात. त्यामुळे बँकेत जाण्याचा वेळ वाचतो.
 • तसेच बँकेतून रोख रक्कमही काढता येते. २५००० पेक्षा जास्त पत मर्यादा असणाऱ्यासाठी चेकबुकची सुविधा उपलब्ध आहे.
 • आवश्यकतेवेळीच सवडी आणि निवडीप्रमाणे KCC वापर करून पैसे काढल्याने आवश्यक तेवढाच कर्जाचा वापर होतो. म्हणून तितकेच कमी व्याज भरावे लागते.
 • प्रत्‍येक पिकावेळी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज भासत नाही.
 • ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
 • वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा – हंगामी मूल्‍यांकनाची गरज नाही
 • लाभार्थी केवळ शेती कामासाठी नव्हे तर वैयक्तिक आर्थिक अडचणीतही या कार्ड वापरू शकतात.
 • शेतीच्‍या म्हणजेच पिकांच्या उत्‍पन्नावर तसेच लागवडीखालील क्षेत्रावर आधारित कर्जाची मर्यादा (सीमा) ठरवली जाते.
 • कर्जाची परतफेड हंगामानंतर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करू शकता.
 • किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाते, तसेच इतर धोक्यांसाठी २५ हजार रुपयांचं विमा संरक्षण दिले जाते.

बँकेंसाठी किसान क्रेडिट कार्डचे फायदे

 • बँकेत रोखीचे व्यवहार कमी होतात.
 • कर्जदारास बँकेत जावे लागत नसल्यामुळे बँकेत गर्दी व ताण कमी.
 • बँकेच्या सेवा खर्चात बचत.
 • ग्राहकास समाधानकारक सेवा देणे सुलभ होते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे तोटे

 • किसान क्रेडिट कार्डची वैधता कालावधी ५ वर्ष आहे.
 • KCC चे वार्षिक शुल्क १५० रुपये आहे.
 • जर एका वर्षात कर्जाची परतफेड केली नाही. तर, व्याजदर ७ टक्के भरावा लागतो.

किसान क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा | How to Use Kisan Credit Card In Marathi

 • एटीएम वापरायोग्य RuPay कार्ड, चेकने व्यवहार तसेच शाखेमार्फत व्यवहार करता येतात.
 • शेतीमध्ये कार्यरत कंपन्यांमध्ये असलेल्या पीओएस (Point of Sale) मार्फत, शेती माल व्यापारी व मंडईमध्ये मोबाईल आधारित हस्तांतर व्यवहार आणि खते, कीडनाशके व बी-बियाणे वितरकांकडे असलेल्या पीओएस मशिनद्वारे ही व्यवहार करता येतात.
 • KCC साठी प्रक्रिया फी, जमीन गहाण ठेवण्याची फी प्रत्येक बँक नुसार वेगवेगळी असू शकते.
 • १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जाते, तर ३ लाख रुपयांपेक्षा जास्तच्या कर्जासाठी तारण ठेवणं गरजेचे आहे.
 • KCC अंतर्गत ७ टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु, लाभार्थी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल. तर व्याजदरात ३ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच एकूण ४ टक्के व्याजदाराने शेतकऱ्यांना कर्ज मिळते.
 • उदा. समजा पिकानुसार सर्व खर्चाचा विचार करून बँकेने रु. ३.०० लाख पीककर्ज मंजूर केले. त्या वेळी त्या शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्डचे मूल्य ३ लाख रुपये असते. म्हणजेच आपल्याला मंजूर झालेल्या पीककर्जाचीच नोंद त्यावर केलेली असते. या पीककर्जाच्या मर्यादेमध्ये आपण निविष्ठांची खरेदी करू शकतो. रोख रक्कम काढू शकतो. या ३ लाखासाठी ४ टक्के व्याज दर आकारला जाणार.

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे | Kisan Credit Card Apply Online in Marathi

आपण किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच या कामगारांना ‘आपले सरकार सेवा केंद्राची’ मदत देखील मिळू शकते.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

 1. पहिल्यांदा तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावे.
 2. सोबत वरती सांगितलेली कागदपत्रे घेऊन जावे.
 3. तिथे तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाईल.
 4. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक मेल आणि मेसेज केला जाईल.
 5. फॉर्म भरल्यावर मिळालेली पावती कागदपत्रांच्या सोबत जोडून बँकेमध्ये जमा करावे.
 6. १५ दिवसाच्या आत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

ऑफलाईन अर्ज कसा करावा

 1. पहिल्यांदा आपण किसान क्रेडिट योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ उघडावे.
 2. Download KCC Form बटण क्लिक करावे. KCC फॉर्म डाऊनलोड होईल.

किंवा 

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करावा.

 1. तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट काढून त्यातील माहिती भरायची आहे.
 2. त्या सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून नजीकच्या बँक शाखेत जमा करावे.
 3. तुम्हाला थोड्याच दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

अशाप्रकारे तुम्हाला तुमचे किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अर्ज करता येईल.

भारतीय बॅंका व त्यांची किसान क्रेडिट कार्ड नावे

 • अलाहाबाद बँक  : किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
 • आंध्र बँक  : ए बी किसान ग्रीन कार्ड
 • बँक ऑफ बडोदा  : बीकेसीसी (बीकेसीसी)
 • बँक ऑफ इंडिया  : किसान समाधान कार्ड
 • ओरिएन्‍टल बँक ऑफ कॉमर्स  : ओरिएन्‍टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
 • पंजाब नॅशनल बँक  : पीएनबी कृषि कार्ड
 • स्‍टेट बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी, एक्सिस बॅंक, आय बी आय बॅंक, कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँक : केसीसी
 • सिंधिकेट बँक  : एसकेसीसी
 • विजया बँक  : विजया किसान कार्ड

किसान क्रेडिट कार्ड विषयी संपर्क :

अधिक माहितीसाठी किंवा काही समस्या असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 115 526 वरती संपर्क साधू शकता. पी एम किसान पोर्टलवर किंवा उमंग ॲपवरून समस्या निवारण करून घेऊ शकता.

किंवा

तुमच्या जवळच्या CSC केंद्र येथे संपर्क साधावा.

नजिकचे CSC केंद्र शोधण्यासाठी लिंक वर क्लिक करा : https://findmycsc.nic.in/csc/

FAQ On Kisan Credit Card Loan Information In Marathi

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी वयाची अट किती आहे?

या किसान क्रेडिट योजनेसाठी लाभार्थी वय १८ ते ७० दरम्यान असावे.

किसान क्रेडिट कार्डची वैधता कालावधी आहे का? किती?

किसान क्रेडिट कार्डची वैधता कालावधी आहे आणि ते ५ वर्षे वैध राहील. तो बँकेद्वारे शेतकऱ्याचे पिकांच्या नमुण्यांनुसार व गुणवत्तेनुसार वाढवला जाऊ शकतो.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळते?

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत कर्ज मिळते.

पत्रांची आवश्यकता आहे?

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

किसान क्रेडिट कार्ड मध्ये नोंदणीसाठी शेतकऱ्यांना काही शुल्क भरावे लागते का?

किसान क्रेडिट कार्ड वर नोंदणी विनामूल्य आहे. परंतु वार्षिक शुल्क १५० रुपये भरावे लागते.

किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली?

किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरूवात ऑगस्ट १९९८ मध्ये त्यावेळचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचेव्दारे केली गेली. 

आशा आहे की आम्ही दिलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजना माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Kisan Credit Card Loan Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *