Home » People & Society » Festival Information » कोजागिरी पौर्णिमा 2023 मराठी माहिती। Kojagiri Purnima Information In Marathi

कोजागिरी पौर्णिमा 2023 मराठी माहिती। Kojagiri Purnima Information In Marathi

कोजागिरी पौर्णिमा 2023 मराठी माहिती, कोजागिरी पौर्णिमा कधी आहे 2023, कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी, कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे, कोजागिरी पौर्णिमेचे महत्व, कोजागिरी पौर्णिमा विषयी माहिती ( Kojagiri Purnima In Marathi, Kojagiri Purnima Information In marathi, Kojagiri Purnima 2023 Marathi )

कोजागिरी पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा असे देखील म्हणत असतो. कोजागिरी पौर्णिमेविषयी असे सांगितले जाते की पुर्ण वर्षभरात हाच एक दिवस असतो. जेव्हा चंद्र सोळा कलांनी परिपुर्ण झालेला दिसुन येत असतो.

आणि ह्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला आपणास दिसुन येत असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच कोजागिरी पौर्णिमेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Contents hide
1. कोजागिरी पौर्णिमा विषयी माहिती । Kojagiri Purnima Information In Marathi

कोजागिरी पौर्णिमा विषयी माहिती । Kojagiri Purnima Information In Marathi

उत्सवाचे नाव (Festival Name)कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा) 2023 तारीख 28 ऑक्टोबर, शनिवार

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?

कोजागिरी पौर्णिमा हा एक भारतीय हिंदु तसेच बौदध धर्म संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे.जो आश्विन पौर्णिमेच्या दिवशी येत असतो.

आणि इंग्रजी कँलेंडरनुसार सांगावयाचे म्हटले तर कोजागिरी पौर्णिमा हा सण तसेच उत्सव सप्टेंबर किंवा आँक्टोंबर महिन्यामध्ये साजरा केला जात असतो.

कृषी संस्कृतीमध्ये देखील ह्या दिवसाला खुप विशेष महत्व आहे.ह्याच दिवशी घरात आलेल्या नवीन धान्याची पुजा केली जाते ज्या कारणाने आपण यास नवान्न पौर्णिमा असे देखील म्हणत असतो.

कोजागिरी पौर्णिमा कधी आणि केव्हा साजरी केली जाते?

कोजागिरी पौर्णिमा ही आश्विन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी येते, सप्टेंबर किंवा आँक्टोंबर महिन्यामध्ये आपण साधारणत साजरी करत असतो.

2023 मध्ये कोजागिरी पौर्णिमा कधी आणि केव्हा आहे?

2023 मध्ये कोजागिरी पौर्णिमा आश्विन महिन्यात 28 ऑक्टोबर रोजी शनिवारच्या दिवशी असणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते?

कोजागिरी पौर्णिमा हा सण आपण मुख्यकरून ह्या कारणामुळे साजरा करत असतो की कारण ह्याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणुन त्यांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी आपण दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस साजरा करत असतो.

असे देखील म्हटले जाते की जेव्हा सागर मंथनातुन माता लक्ष्मी प्रकट झाली तो दिवस हा कोजागिरी पौर्णिमेचा म्हणजेच शरद पौर्णिमेचाच दिवस होता.

कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात?

कोजागिरी पोर्णिमा हे एक असे व्रत आहे ज्याचे पालन खुप जण करत असतात. ह्या दिवशी आपण दिवसा उपवास ठेवत असतो आणि रात्री लक्ष्मीचे पुजन करत असतो. मग रात्री दुध आटवून त्याचा नैवैद्य देवीला दाखवत असतो.आटवलेल्या दुधामध्ये आपण अनेक सामग्री टाकत असतो जसे की जायफळ,काजु,बदाम,चारोळया,वेलदोडा इत्यादी सामग्री आपण त्यात टाकत असतो.आणि मग मध्यरात्रीनंतर ते आटवलेले दुध पिले जाते.आणि रात्रभर जागरण केले जाते.

अशा पदधतीने कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय आहे?

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसात तसे पाहायला गेले तर अनेक विशिष्टता आहे ज्यामुळे आपण याला अधिक महत्व देत असतो. आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

 1. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हवामानामध्ये अनेक प्रकारचे बदल घडताना आपल्याला दिसुन येत असते.दिवसा गरम होते तर रात्री कडाक्याची थंडी वाजत असते.अशा परिस्थितीत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दुध आटवुन पिल्याने आपले पित्त कमी होत असतात.
 2. तसेच कोजागिरीच्या चंद्राची छाया आपल्या अंगावर पडल्याने आपल्याला मन शांती लाभत असते आणि आपले आरोग्य देखील उत्तम राहत असते.तसेच आपल्याला जडलेल्या अनेक रोगांचा नाश देखील होत असतात.
 3. ह्याच दिवशी माता लक्ष्मीची पुजा देखील केली जात असते.कारण ह्याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि शास्त्रात असे देखील म्हटले आहे की ह्याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातुन प्रकट देखील झाली होती.
 4. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खीर तयार करुन ती चंद्राच्या उजेडात ठेवली तर तिच्यात अमृताचा सहभाग होत असतो असे मानले जाते.
 5. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा नवविवाहीतांसाठी खुप महत्वाचा दिवस मानला जात असतो.कारण ह्या दिवसात त्यांच्या घरात खुप आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण राहत असते.
 6. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अविवाहीत मुली चांगला नवरा प्राप्त व्हावा यासाठी भगवान कार्तिकेय यांची आराधना करीत असतात.
 7. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच भगवान श्री कृष्ण यांनी एक गोपींसोबत महारासाची रचना केली होती.
 8. याच दिवशी आपण भगवान कुबेर तसेच इंद्र यांची विधीनुसार पुजा करत असतो.
 9. ह्या दिवशी तप केले तर ते यशस्वी होत असते असे शास्त्रात देखील सांगितले आहे.
 10. पर्यटनाच्या दृष्टीने पाहावयास गेले तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आग्रा येथे पर्यटकांसाठी पर्यटनाची विशेष संधी उपलब्ध करून दिली जाते ज्यासाठी ते विशेष दराची आकारणी देखील करत असतात.
 11. आदीवासी जमातीतील लोक ह्या दिवशी मायलोमा आणि खोलोमा ह्या त्यांच्या विशिष्ट देवतांची रात्री विशेष पूजा करत असतात.मायलोमा ही भाताचे रक्षण करणारी देवी आहे.

कोजागिरी पौर्णिमेला रात्री दुध आटवून रात्रभर जागरण का केले जाते?

कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी खीर ह्या पदार्थाला खुप महत्व दिले जाते कारण हा पदार्थ आपण दुधापासुन बनवलेला असतो.आणि दुधाला आपण चंद्राचे प्रतिक मानत असतो.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्रभर दुध आटवुन पित असतो तसेच जागरण करत असतो म्हणुन याला जागृती पौर्णिमा असे देखील संबोधिले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण केल्याने आपल्याला माता लक्ष्मीकडुन आशिर्वाद प्राप्त होत असतो.आणि आपल्या धन तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ होत असते.म्हणुनच कोजागर यालाच कोण जागे आहे हे पाहण्याचा दिवस देखील म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेला महिला तसेच मुली व्रत का ठेवत असतात?

कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा ह्या दिवशी अनेक जण व्रत देखील ठेवत असतात.

याची देखील काही कारणे आहेत. 

1) ह्या दिवशी व्रत ठेवल्याने अविवाहीत मुलींना चांगला वर प्राप्त होत असतो.

2)ह्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला अधिक धनलाभ होत असतो.

3) ह्या दिवशी व्रत केल्याने मृत्यृनंतर आपणास मोक्ष प्राप्त होत असतो.

कोजागिरी पौर्णिमेला व्रत कसे केले जाते?

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवत असतो. आणि हे व्रत आपण पुढीलप्रमाणे करत असतो :

 • सकाळी लवकर उठुन सर्वप्रथम अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
 • या दिवशी उपवास करायचा असतो. आणि सोने चांदी तसेच पितळ इत्यादींनी बनवलेल्या लक्ष्मीच्या मुर्तीची पुजा करायची असते.
 • रात्री मग चंद्रा उगवण्या अगोदर दिवे लावायचे असतात.
 • आणि दुधाने बनवलेला पदार्थ जसे की खीर चंद्राच्या प्रकाशात रात्री ठेवायची असते.
 • त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर ही देवीला नैवैद्य म्हणुन दाखवायची असते.
 • आणि मग दुसरे दिवशी लक्ष्मीचे पुजन करून व्रताची सांगता करायची असते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुजेचा शुभ मुहुर्त काय आहे?

कोजागिरी पौर्णिमेला आपण सकाळी लक्ष्मीचे पुजन करून दिवसभर व्रत ठेवत असतो.पण हे व्रत ठेवण्याचा देखील शास्त्रानुसार तसेच पंचांगानुसार शुभ मुहुर्त ठरलेला असतो जो आपण लक्षात घेणे फार गरजेचे आहे.कारण त्या शुभ मुहुर्तावर पुजा केल्याने आपली पुजा लागु तसेच सफल होत असते असे मानले जाते.

पौर्णिमा तिथीची सुरुवात – 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 04:17.

तसेच पौर्णिमा तिथी संपेल – 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01:53.

कोजागिरी पूजा निशिता वेळ – 11:39 PM ते 12:31 AM, 29 ऑक्टोबर

कोजागिरी पौर्णिमेतील बनवले जाणारे प्रमुख खाद्यपदार्थ कोणकोणते असतात?

कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्व दुधाचे पदार्थ विशेषकरून तयार करत असतो.कारण दुधाला आपण चंद्राचे प्रतिक मानलेले असते.ज्यापासुन बनवलेले अनेक पदार्थ उदा खीर ह्या पक्वानाचा विशेष समावेश आपण ह्या दिवशी देवीला नैवेद्य तसेच भोग दाखवण्यासाठी करत असतो.

FAQ On Kojagiri Purnima Information In Marathi

कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे?

शनिवार, 28 ऑक्टोबर.

कोजागिरी पौर्णिमा कधी आहे

कोजागिरी पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबर ला आहे.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Kojagiri Purnima Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *