आपला भारत देश हा सण आणि उत्सवांचा देश आहे. जिथे प्रत्येक सण हा एकत्रितपणे आनंदाने, उत्साहाने मोठया जल्लोषात साजरा केला जातो. मग तो सण कुठल्याही धर्माचा असो.
कृष्ण जन्माष्टमी सुदधा आपल्या भारतात मुख्यतकरुन हिंदु धर्मात साजरा केल्या जात असलेल्या इतर सण उत्सवांपैकीच एक महत्वाचा सण म्हणुन जगभर प्रसिदध आहे. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदु धर्मात साजरा केला जाणारा असा एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो भगवान श्रीहरि विष्णु यांना समर्पित केला गेलेला आहे.
आणि कृष्ण जन्माष्टमीला गोकुळ अष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती असे देखील म्हटले जात असते. जन्माष्टमी हा एक असा सण तसेच उत्सव आहे जो भगवान श्री कृष्ण ह्यांच्या जन्मदिनी सर्वत्र साजरा केला जातो. आणि हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला प्रामुख्याने आपण सर्व साजरा करत असतो.
श्रीकृष्ण हा भगवान श्रीहरिविष्णुंचेच एक रुप होते. जे रूप श्री हरिविष्णुंनी कंसच्या वाईट कृत्यांची त्याला शिक्षा देण्यासाठी तसेच त्याच्या कुकर्माचा कायमचा अंत करण्यासाठी धारण केले होते. म्हणुन ह्या दिवशी आपण मध्यरात्रीपर्यत उपवास करत असतो.कारण श्रीहरि विष्णुंचा श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर जन्म देखील मध्यरात्रीतच झाला होता.
हा एक असा सण आहे ज्यादिवशी सर्वत्र दही हंडीचा कार्यक्रम आयोजित करून दहीहंडी फोडली जात असते.आणि जो ही दही हंडी फोडत असतो त्याला पारितोषिक देखील दिले जात असते.
ह्यादिवशी आपण श्रीहरिविष्णुंचे मंदिर सजवत असतो. तसेच श्रीहरिविष्णुंच्या लिलांचे प्रदर्शन देखील ठिकठिकाणी ह्यादिवशी आयोजित केले जात असते.
कृष्ण जन्माष्टमी हा एक असा सण उत्सव आहे जो आपणा सर्वाना ही शिकवण देतो की आपल्या आयुष्यात कितीही संकटे तसेच अडी अडचणी आल्या तरी देखील आपण नेहमी सत्य आणि धर्माच्या मार्गाने चालायला हवे.
श्रीकृष्ण यांच्या आईचे नाव हे देवकी होते. आणि त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव असे होते. श्रीकृष्ण यांचा जन्म हा जन्माष्टमीच्याच दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास झाला होता. म्हणुन ठिकठिकाणी मग ते मंदिर असो कोणाचे घर असो ह्या दिवशी सर्व ठिकाणी रात्री बारा वाजता सर्व मिळुन श्रीकृष्णाची पुजा, आरती केली जाते.
मथुरा आणि वृंदावन ही अशी दोन ठिकाणे आहेत जिथे श्रीकृष्णाने आपले बालपण व्यतित केले होते. चला तर मग जाणुन घेऊयात कृष्ण जन्माष्टमी विषयी अधिक सविस्तरपणे.
Janmashtami Information in Marathi
उत्सवाचे नाव | श्री कृष्ण जन्माष्टमी |
इतर नावे | गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती |
तिथी | श्रावण महिन्याच्या पौर्णिमेनंतर आठवा दिवस |
तारीख 2021 | 30 ऑगस्ट |
देव | श्री कृष्ण |
विशिष्ट | कृष्ण वाढदिवस |
उत्सवाचे प्रकार | धार्मिक |
जन्माष्टमी हा सण सर्वत्र का साजरा केला जातो?
मथुरेचा राजा हा कंस होता. आणि तो आपल्या प्रजेवर खुप अत्याचार करायचा. आणि अचानक अशी आकाशवाणी होते ज्यात कंसला कळते की त्याची बहिण देवकीचा आठवा मुलगा हाच त्याच्या मृत्युचे कारण ठरणार आहे.हे ऐकताच कंस आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना बंदीस्त करतो.
आणि देवकीच्या गर्भातुन जेवढीही सात मुले जन्माला येतात त्या सर्वाना तो मारून टाकतो. पण जेव्हा देवकी तिच्या आठव्या मुलाला जन्म देते तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात आणि ते वासुदेवला आज्ञा देतात की ह्या मुलाला गोकुळमध्ये यशोदा आणि नंद यांच्याकडे सुखरूपपणे नेऊन सोड.जेणेकरून कंस याची हत्या करू शकणार नाही.मग पुढे जाऊन श्रीकृष्णाचे पालनपोषण यशोदा आणि नंद हे दोघे करतात.तेव्हापासुन श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणुन हा दिवस मोठया उत्साहाने तसेच जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो.
जन्माष्टमी ह्या सणाचे महत्व काय आहे?
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाने माता देवकीच्या पोटातुन जन्म घेतला होता. आणि श्रीकृष्णाचे हा जन्म घेण्याचे कारण अत्याचारी कंसला त्याच्या अपराधांची शिक्षा करणे हे होते. जसेही आपण नवीन वैवाहिक जीवणात प्रवेश करत असतो. तसे आपल्याला वाटु लागते की आपले देखील एक मुल असावे.कोणाला लग्नानंतर लगेच आणि कोणाला काही कालांतराने संतानप्राप्तीचे सुख हे प्राप्त होत असते. आणि जन्माष्टमी हा एक असा दिवस आहे ज्यादिवशी सर्व नवविवाहीत स्त्रिया आपल्याला मुल व्हावे ह्यासाठी व्रत तसेच उपवास करत असतात. कारण असे म्हटले जाते की जे दांपत्य ह्या दिवशी मनोभावे व्रत तसेच उपवास करत असतात त्यांना संतानप्राप्ती होत असते.
जन्माष्टमी हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जातो? । 2021 मध्ये कृष्ण जन्माष्टमी कधी आहे?
कृष्णाष्टमी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला प्रामुख्याने आपण सर्व जण साजरा करत असतो.
2021 मध्ये कृष्ण जन्माष्टमी कधी आहे?
आता 2021 मध्ये जन्माष्टमी हा सण 30 आँगस्टला राहणार आहे.
जन्माष्टमी हा सण कशापदधतीने साजरा केला जातो?
जन्माष्टमी हा सण संपुर्ण भारतात साजरा केला जाणारा सण उत्सव आहे. ह्यादिवशी कुठे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करून दहीहंडी फोडली जात असते.त्याचबरोबर कृष्ण मंदिराची सजावट केली जाते.तिथे श्रीकृष्णाच्या लिलांचे प्रदर्शन देखील केले जात असते. श्रीकृष्णाची पुजा अर्चा,आराधना केली जात असते.
आपण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत तसेच उपवास का करायला हवा?
- जो व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरूष श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत तसेच उपवास करत असते ती व्यक्ती त्याने केलेल्या शंभर जन्माच्या पापांपासुन हे व्रत केल्याने मुक्त होत असते.
- जी व्यक्ती जन्माष्टमीच्या दिवशी व्रत तसेच उपवास करत असते तिच्या घरामध्ये नेहमी सुख आणि समृदधी नांदत असते.
- जी गर्भवती स्त्री जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करत असते तिचे बाळ पोटात सुदृढ राहत असते आणि ते जन्म देखील ठिक वेळेवरच घेत असते.
- जी व्यक्ती जन्माष्टमीच्या दिवशी व्रत तसेच उपवास आणि जागरण करत असते त्या व्यक्तीला अकाल मृत्युचे भय राहत नाही.
- जी व्यक्ती जन्माष्टमीचे व्रत करते तिच्या घरामध्ये कधीच गर्भपात होत नाही.कारण त्या व्यक्तीवर भगवान श्रीकृष्णाची कृपा असते.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्हाला उपवास करता येत नसेल तर उपवास करणे आवश्यक नाही. जरी तुम्ही मनापासून श्रद्धेने पूजा केलीत, तर देव तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमची भक्ती स्वीकारनार आणि तुम्हाला त्यांचे परम आशीर्वाद मिळणार.
जन्माष्टमीच्या व्रताचे कोणकोणते नियम आहेत?
- जन्माष्टीच्या एक दिवस आधी रात्री साधे अन्न ग्रहण करावे.
- जन्माष्टमीच्या पहाटे लवकर उठुन अंघोळ करून भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करावे.आणि देवाचे नामस्मरण करून झाल्यावर व्रताचा संकल्प घेऊन मग पुजेची तयारी करावी.
- ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या आवडते व्यंजन माखन नी बनवलेले मिठाईचे पदार्थ भोग म्हणुन त्यांच्यापुढे ठेवले जात असतात.
- मग रात्री श्रीकृष्णाचा अभिषेक करावा आणि त्यांना नवीन वस्त्र घालावेत.
- आणि त्यांच्या नैवेदयात आपण तुळशीची पाने देखील ठेवावी.
- आणि जन्माष्टमीच्या दिवशी ज्यांनी व्रत ठेवले आहे त्यांनी कांदा लसुन, सुपारी, तंबाखु,मांस मद्य यांचे सेवन करू नये त्याबरोबरच घरातील इतरही व्यक्ती यांनी व्रत ठेवलेले नाहीये त्यांनीही यांचे सेवन जन्माष्टमीच्या दिवशी करू नये.
कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी मुहूर्त
निशिता पूजेची वेळ | 24: 03+ ते 24: 49+ |
कालावधी | 46 मिनिटे |
मध्यरात्री पूजेची वेळ | 24:26+ |
जन्माष्टमीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते?
- दोन दिवे
- वात
- शुदध तुप
- अगरबत्ती
- धुप
- काडीपेटी
- पुजेचे ताट
- घंटी
- तुळस
- नारळ
- सजवलेला तांब्या(कलश)
- सुपारी
- पाने
- आंब्याचे पान
- सुका मेवा
- प्रसाद
- पंचामृत
- श्रीकृष्णाची बालरुपातील मुर्ती किंवा एखादे चित्र
- सजवलेला पाळणा
- आणि अभिषेक करण्यासाठी एक ताट
इत्यादी वस्तु जन्माष्टमीच्या पुजेसाठी लागत असतात.
जन्माष्टमीचे व्रत तसेच पुजा कशी केली जाते?
- जन्माष्टमीच्या दिवशी जे कोणी व्रत ठेवत असते ते रात्री बारा वाजेपर्यत हे व्रत ठेवत असते.
- आणि उपवास करण्याच्या आधी रात्री थोडेफार हलकेफुलके जेवण देखील केले जात असते.
- ज्यादिवशी उपवास असेल त्यादिवशी आपल्याला सकाळी लवकर उठुन अंघोळ करावी लागते.
- यानंतर सुर्य, सोम, यम, काळ,सं धी, भुत, पवन, भुमी आकाश इत्यादींना नमस्कार करून पुर्व उत्तर मुखी बसावे.
- यानंतर पाणी, फळ, कुश गंध घेऊन एक संकल्प केला जातो.
- मग दुपारून काळया तिळाच्या पाण्याने अंघोळ करावी.
- त्यांतर भगवान श्रीकृष्णांच्या मुर्तीची तसेच चित्राची स्थापणा करावी.
- यानंतर विधिवतपणे पुजा करावी पुजा करत असताना देवकी, वासुदेव, नंद, बलराम, यशोदा यांचे देखील नामस्मरण करावे.
- आणि शेवटी प्रसाद वाटुन कृष्ण लीलेचे भजन तसेच किर्तन करावे.
कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी
- श्री कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. म्हणूनच कृष्णाचा जन्म संपूर्ण भारतात रात्री 12 वाजता साजरा केला जातो.
- दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रात्री 12 वाजता लोक प्रत्येक मंदिरात आणि घरात प्रतीक म्हणून श्री कृष्णाचा जन्म साजरा करतात.
- जन्मानंतर त्यांना दूध, दही आणि शुद्ध पाण्याने अभिषेक केला जातो आणि त्यांना लोणी, मिश्री, पंजारी आणि काकडी अर्पण केली जाते.
- यानंतर, कृष्णा जीची आरती केली जाते, काही लोक भजन, कीर्तन करतात आणि आनंदात रात्रभर नाचतात.
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.