Home » People & Society » Information » Krishna Poonia Information In Marathi | कृष्णा पूनिया ची माहिती मराठी मध्ये

Krishna Poonia Information In Marathi | कृष्णा पूनिया ची माहिती मराठी मध्ये

कृष्णा पुनिया एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी भारतीय डिस्कस थ्रोअर (Discus Thrower) आहे. त्याच बरोबर ट्रॅक आणि फील्ड (Track and field) धावपटू सुद्धा आहे, हिने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त केले आहे.

सद्या कॉंग्रेस पक्षाची एक राजकारणी आहे आणि राजस्थानमधील सादुलपूर मतदारसंघातील सध्याची आमदार आहे.

कृष्णा पुनिया ने 2004, 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता आणि २०१० मधील दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आहे.

त्याच बरोबर तिच्याकडे 64.76 मीटर च सर्वात लांब डिस्कस् थ्रोसाठी सध्याचा राष्ट्रीय विक्रम आहे.

Krishna Poonia Information In Marathi | कृष्णा पूनिया ची माहिती मराठी मध्ये

Source: Facebook
जन्म (Birth)5 मे 1977 (वय 43) अग्रोहा, हरियाणा, भारत
उंची (Height)1.8 मी॰ (5 फीट 11 इंच)
वजन (Weight)79 कि॰ग्राम (174 पौंड; 12.4 स्टोन) (2013-Present)
पती (Husband)वीरेंदरसिंग पूनिया
खेळ (Sport)एथलेटिक्स (Athletics)
स्पर्धा (Event)डिस्कस थ्रो (Discus Throw)
सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन (Best Performance)64.76 m (वैलुकु 2012)
2006 डोहा आशियाई खेळ (2006 Doha Asian Games)कांस्य पदक (Bronze Medal)
2010 गुआंगझोउ आशियाई खेळ (2010 Guangzhou Asian Games)कांस्य पदक (Bronze Medal)
2010 दिल्ली राष्ट्रकुल खेळ (2010 Delhi Commonwealth Games)सुवर्ण पदक (Gold medal)

कृष्णा पूनिया यांचे वैयक्तिक जीवन (Personal life)

कृष्णा पूनिया च जन्म 5 मे 1977 रोजी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील अग्रोहा गावात एका जाट कुटुंबात झाला होता. जेव्हा ती 9 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचे निधन झाले त्यामुळे तिचे पालनपोषण तिच्या वडिलांनी आणि आजीने केले.वयाच्या 15 व्या वर्षापासून तिच्या कौटुंबिक भूमीवर काम केल्यामुळे तिला शारीरिक तंदुरुस्तीचा फायदा झाला. 

२००० मध्ये तिने वीरेंदरसिंग पूनिया सोबत लग्न केले जो कि एक माजी खेळाडू होता ज्याने त्यांच्या लग्नानंतर तिला प्रशिक्षित दिले. 2001 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. ते दोघे भारतीय रेल्वेसाठी काम करत होते पण २०१३ मध्ये कृष्णा पूनिया यांनी भारतीय रेल्वे मध्ये राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

ते जयपूरमध्ये राहतात आणि कृष्णा पूनिया यांनी जयपूरमधील कनोरिया पीजी महिला महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी सुध्दा घेतली आहे.

कृष्णा पूनिया यांचे करिअर व खेळ जीवन (Career And Sports Life)

Image Source: Wikipedia

कृष्णा पूनियाने 2006 डोहा आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. दुसर्‍या प्रयत्नात तिने 61.53 मीटर अंतरावर आपले वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन दिले परंतु चीन च्या एमिन सिंग (63.52) आणि चीन च्याच मा जुएनजुन (62.43) च्या मागे राहिली। 

तिने 60.10 मीटर अंतरावर करिअर सर्वोत्तम प्रवेश करत सर्वांचे आवडते सीमा अँटिल आणि हरवंत कौर यांना मागे टाकून 46 व्या ओपन नॅशनल एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

तिने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता, 58.23 च्या थ्रोसह क्वालिफायर मध्ये 10 वा क्रमांक मिळविला परंतु अंतिम फेरीत पोहोचण्याचा अयशस्वी राहिली.

8 मे 2012 रोजी, तिने हवाई, यूएस मध्ये 64.76 मीटर थ्रो चे नवे राष्ट्रीय विक्रम दर्ज केले. तिने ग्वांगझो एशियन गेम्स, २०१० मध्ये सुध्दा कांस्य पदक जिंकले होते.

2010 राष्ट्रकुल खेळ (2010 Commonwealth Games)

कृष्णा पूनिया ही नवी दिल्ली 2010 राष्ट्रकुल खेळामधील सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. कृष्णा पूनियाने 61.5 मीटर क्लिअर करून डिस्कस स्पर्धेत ऐतिहासिक क्लिन स्वीप चे नेतृत्व केले. राष्ट्रकुल खेळाच्या ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला असून ती मिल्खा सिंग नंतर अशा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय सुध्दा आहे. 

2012 लंडन ऑलिम्पिक (2012 London Olympics)

२०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने महिलांच्या डिस्कस थ्रोमध्ये विश्वासार्ह प्रदर्शन केले होते. पहिल्या प्रयत्नात तिने 62.42 मीटर दर्ज केले होते आणि तिसऱ्या मध्ये 61.61 आणि 61.31 सहाव्या आणि अंतिम थ्रो मध्ये दर्ज केले होते. दुसर्‍या आणि चौथ्या प्रयत्नात तिने दोन ना थ्रो केले. यापूर्वी ती ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीच्या ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत स्थान मिळवणारी केवळ सहावी भारतीय खेळाडू ठरली होती.

राजकीय जीवन (Political career)

2013 मध्ये, ती चूरू येथे एका निवडणुकीच्या सभेत INC पार्टीत सामील झाली. चूरू हे तिच्या पतीचा गृह जिल्हा आहे. राहुल गांधी आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी संपर्क साधला.

2013 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत ती लढली आणि सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून तिची पहिली निवडणूक हरली. जिथे तीने भाजप आणि बसपाच्या मागे तिसरे स्थान पटकावले होते. 2018 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत ती पुन्हा लढली आणि 70020 मते मिळवल्यानंतर 18084 मतांच्या फरकाने कॉंग्रेसच्या तिकिटावर तीच जागा जिंकली. 

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत, जयपूर ग्रामीण मतदारसंघातून कृष्णा पूनिया यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. तिने भाजपच्या ऑलिम्पियन राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. परंतु राठोड यांच्याकडून 393171 मतांच्या फरकाने ती पराभूत झाली.

कृष्णा पूनिया राजस्थान राज्य आरोग्य मंत्रालयाला स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या प्रयत्नात मदत करत आहेत. विशेषत: हरियाणामध्ये जेथे पूनिया मोठी झाली तेथे महिलांच्या गर्भाच्या निवडक गर्भपात ही एक चिंताजनक बाब आहे. आणि जयपूर आणि देशभरातील मुलांच्या खेळाची पायाभूत सुविधा सुधारण्यातही ती गुंतलेली आहे.

कृष्णा पूनिया ला मिळालेले सन्मान (Honors)

  1. २०११ मधील “पद्मश्री” नागरी सन्मान: भारत सरकारकडून सन्मानित.
  2. २०१० मध्ये “अर्जुन पुरस्कार”: भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्राल द्वारे प्रदान करण्यात आले.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *