पत्र लेखन मराठी (Letter Writing in Marathi) : आज आपल्याला आपल्या मनातील भावना कोणाजवळ व्यक्त करायची असो किंवा नोकरीसाठी तसेच विनंतीसाठी अर्ज करावयाचा असो आपण पत्रलेखन करत असतो.
पत्र लेखन मराठी | Letter Writing in Marathi
आजच्या लेखातुन आपण ह्याच पत्रलेखनाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहे.ज्यात आपण पत्रलेखन म्हणजे काय?पत्रांचे प्रकार किती व कोणकोणते?कोणतेही पत्र कसे लिहावे?पत्रलेखणाचा आराखडा काय असतो?इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.
पत्र म्हणजे काय?
पत्रलेखन ही एक अशी कला तसेच कौशल्य आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या मनातील भावना तसेच विचारांना शब्दांच्या आधारे तसेच माध्यमातुन इतरांसमोर व्यक्त करत असतो.
पत्र हे संदेश पोहचविण्याचे एक साधन तसेच माध्यम आहे.ज्याद्वारे आपण आपल्या मनातील भावना तसेच विचार इतरांपर्यत पोहचवू शकतो.पुर्वीच्या काळात संदेश पाठविण्याचे साधन अजिबात उपलब्ध नसल्यामुळे पुर्वीच्या काळी लोक एका ठिकाणाहुन दुसरे ठिकाणी संदेश पाठविण्यासाठी पत्राचा वापर करायचे.पण आता आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आपण संदेश पाठविण्यासाठी मोबाईल तसेच ईमेलचा वापर जास्त प्रमाणात करत असतो.
मराठीतील पत्रांचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?
मराठीमध्ये पत्रांचे दोन प्रमुख प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
- औपचारीक पत्र
- अनौपचारीक पत्र
1. औपचारीक पत्र (Formal Letter in Marathi)
आपण कार्यालयीन कामकाजासाठी तसेच व्यावसायिक कामासाठी जे पत्र लिहित असतो त्याला औपचारीक पत्र असे म्हणतात.एखाद्या औपचारीक कार्यासाठी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी,संस्थेशी तसेच कार्यालयाशी लेखी स्वरूपामध्ये संवाद साधत असतो तेव्हा त्यास औपचारीक पत्र असे म्हटले जाते.
औपचारीक पत्रांचे काही प्रकार :
- कार्यालयीन कामकाजासाठीचे पत्र
- व्यवसायिक कामासाठीचे पत्र
- नोकरीसाठी अर्ज
- तक्रार अर्ज
- प्रार्थना अर्ज
- आमंत्रण पत्र
- चौकशी पत्र
1. कार्यालयीन कामकाजासाठीचे पत्र :
- शासकीय पत्र
- अर्धशासकीय पत्र
- ज्ञापन
- पृष्ठांकन
- परिपत्रक
- कार्यालयीन आदेश
- अधिसुचना
- तार
- शिघ्रपत्र
- प्रसिदधीपत्रक
- शासननिर्णय
मराठीतुन औपचारीक पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी (How To Write Formal Letter in Marathi) | Marathi Formal Letter Writing Rules
- सर्वप्रथम पत्राच्या सुरूवातीला आपले नाव,पत्ता तसेच ज्या दिवशी पत्र पाठवतो त्या दिवसाची तारीख लिहावी.
- पत्रातील सर्व मजकुर हा विषयाला अनुसरून लिहिलेला असायला हवा.
- पत्र लिहित असताना पत्राची भाषा ही साधी, सोप्पी ठेवावी.आणि पत्रातुन औपचारीकता झळकायला हवी.
- पत्रात अनावश्यक गप्पा गोष्टी करू नये.फक्त व्यवहारीक लेखन केलेले असावे.
- पत्राची भाषा ही भारदस्त आणि वजनदार असायला हवी.जेणेकरून पत्र वाचत असलेल्या व्यक्तीला पत्राचे महत्व तसेच गांभीर्य कळले पाहिजे.
- पत्रात नाव,पत्ता आणि तारीख लिहुन झाल्यावर सर्वप्रथम खाली उजव्या बाजुला प्रती असे लिहावे.
- मग त्याखाली ज्यांना आपण पत्र पाठवतो आहे त्यांचे पद,अधिकार लिहुन खाली त्यांचा सविस्तर पत्ता लिहावा.
- यानंतर मग पत्राचा विषय काय आहे ते लिहायचे.त्यानंतर मग पत्रातील मुळ मजकुर लिहिण्यास सुरूवात करावी.
- आणि मग शेवटी उजव्या बाजुला आपला विश्वासु/आपला कृपाभिलाषी असे लिहुन खाली आपली स्वाक्षरी करावी.
मराठीतील औपचारीक पत्रांचे स्वरुप (Formal Letter Format in Marathi)
- पत्र लिहित असताना नेहमी उजव्या बाजुला आपले नाव, आपला पत्ता,आपला पिनकोड,आणि ज्या दिवशी पत्र लिहितो आहे त्या दिवसाची तारीख लिहावी.
- नंतर खाली मग डाव्या बाजुस प्रती असे लिहावे.आणि खाली त्याचे नाव,त्याचा पत्ता,आणि त्याचा पिनकोड देखील लिहावा.
- मग खाली एका ओळीचे अंतर सोडुन द्यावे आणि आपण लिहित असलेल्या पत्राचा विषय लिहावा.
- ज्याला पत्र लिहितो आहे त्याला संबोधताना माननीय तसेच आदरणीय असे लिहावे.
- मग खाली थोडे अंतर घेऊन मुळ मजकुर लेखणास सुरूवात करायला हवी.
- आणि मग पत्र लिहुन झाल्यावर आपला कृपाभिलाषी/आपला विश्वासु असे लिहुन खाली आपले नाव लिहावे आणि हस्ताक्षर देखील करावे.
औपचारीक पत्राचा आराखडा (Marathi Formal Letter Writing Format)
[ येथे पत्र लेखकाचे
पूर्ण नाव, पत्ता
आणि फोन नंबर.]
दिनांक: __________
प्रति,
[ पत्र स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी येथे लिहावा.]
विषय : [ येथे पत्राचा विषय कमीत कमी शब्दात लिहावा]
संदर्भ : [ येथे पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]
माननीय/आदरणीय महोदय/महोदया,
[ येथे पात्राच्या मजकुर लेखणास सुरूवात करायला हवी . प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]
[_______________________________________________________________________________________________________________________________]
आपला कृपाभिलाषी/आपला विश्वासु,
सही
सोबत:
[ काही वेडा पत्रासोबत अन्य कागदपत्रे जोडाव्या लागतात. ]
[ अशी कागतपत्रांची यादी या ठिकाणी लिहावी.]
प्रत माहितीसाठी :
[ काही पत्रे वेग्वेगड्या टप्यांवरील कार्यवाहीसाठी वेग्वेगड्या ठिकाणी पाठवल्या जातात. ]
[ जी पत्रे वेग्वेगड्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पात्रांमध्ये त्या व्यक्ती ची यादी या जागी लिहावी. ]
नोकरी मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचे स्वरूप कसे असते (ob application letter format in marathi
- सगळयात आधी उजव्या बाजुला कोन्यात आपले संपुर्ण नाव,आपला पत्ता,आपण राहत असलेल्या ठिकाणचा पिनकोड नंबर द्यावा.सोबतच ज्या दिवशी नोकरीसाठी अर्ज करतो आहे त्या दिवसाची तारीख देखील लिहावी.
- नंतर मग खाली प्रति असे लिहावे.
- मग ज्याला आपण पत्र लिहितो आहे किंवा जिथे आपण नोकरीसाठी अर्ज करतो आहे त्याठिकाणाचे,संस्थेचे नाव,त्यांचे पद,त्यांचा पत्ता,त्यांचा पिनकोड नंबर लिहावा.
- मग खाली थोडे अंतर सोडुन पत्राचा विषय लिहावा.
- सोबत अर्जदाराचे म्हणजेच आपले नाव देखील लिहावे.आणि नोकरीच्या जाहीरातीची माहीती कुठुन मिळाली त्याचा संदर्भ देखील द्यावा.
- मग पत्रातील महत्वाचा मजकुर लिहावा.पत्रातील मजकुर लिहुन झाल्यावर खाली आपला कृपाभिलाषी तसेच आपला विश्वासु लिहुन आपले नाव लिहावे आणि स्वाक्षरी देखील करावी.
- आणि सोबत आपला बायोडाटा,शैक्षणिक कागदपत्रे,आपली वैयक्तिक माहीती जसे की आधार कार्ड वगैरे देखील अर्जासोबत जोडावे.
2. अनौपचारीक पत्र (Informal Letter in Marathi)
अनौपचारीक पत्रांमध्ये अशा पत्रांचा समावेश होत असतो.जे पत्र आपण आपल्या आईवडील,भावंड,कौटुंबिक सदस्य तसेच नातेवाईकांना लिहित असतो.ह्या पत्रात आपण कोणतेही व्यवहारीक, व्यवसायिक कामकाजासाठी लेखन करत नसतो.ह्या पत्रात आपण आपल्या मनातील प्रेम,उत्साह,सुख दुख ह्या भावना आपल्या जवळच्या संबंधितांजवळ व्यक्त करत असतो.
अनौपचारीक पत्रांचे काही प्रकार:
- वैयक्तिक तसेच कौटुंबिक पत्र
- सामाजिक पत्र
मराठीत अनौपचारीक पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी (How To Write Informal Letter in Marathi) | Marathi Informal Letter Writing Rules
- सगळयात आधी पत्राच्या सुरूवातीलाच उजव्या बाजुला आपले स्वताचे नाव,आपला पत्ता लिहावा.
- मग त्याखाली ज्या दिवशी पत्र लिहितो आहे त्या दिवसाची तारीख लिहावी.
- अनौपचारीक स्वरुपाचे पत्र लिहित असताना आपण पत्रात आपले नाव लिहिले नाही तरी देखील काही हरकत नसते.
- पत्रलेखन करताना याची दक्षता बाळगावी की आपण जो मजकुर लिहितो आहे तो पत्राच्या विषयाला अनुसरूनच असायला हवा.
- आणि आपण ज्या भाषेत पत्र लिहितो आहे ती भाषा एकदम साधी सोप्पी आणि जिव्हाळयाची असायला हवी.आपल्या पत्रामध्ये सुखदुख,प्रेम,आपुलकी असावी त्यात कोणतीही औपचारीकता नसावी.
- आपल्यापेक्षा मोठया तसेच वडिल लोकांना पत्र लिहित असताना त्यात आपल्या मनात त्यांच्याविषयी असलेली नम्रता तसेच आदराची भावना पत्रातुन व्यक्त व्हायला हवी.
मराठीतील अनौपचारीक पत्रांचे स्वरुप (Informal Letter Format in Marathi)
- पत्राच्या सुरुवातीलाच आपले नाव,आपला पत्ता पिन कोड आणि पत्र लिहिण्याच्या दिवसाची तारीख देखील लिहावी.
- मग पत्र लिहित असलेल्या व्यक्तीशी आपला असलेल्या संबंधानुसार आदरणीय,माननीय, प्रिय हे शब्द वापरावे.
- आपण ज्याला पत्र लिहितो आहे ती व्यक्ती वयस्कर म्हणजे वयाने मोठी असेल तर आदरणीय किंवा माननीय पासुन सुरूवात करावी आणि आपण पत्र लिहित असलेल्या व्यक्तीचे वय आणि आपले वय सारखेच असेल तर आपण त्याला प्रिय असे देखील संबोधु शकतो.
- मग पत्राचा मुळ आतील मजकुर लिहावा.
- आणि मग पत्राच्या शेवटी ज्याला पत्र लिहितो आहे त्याच्या वयोमर्यादेनुसार तुझाच/तुझीच किंवा आपला आज्ञाधारक/आपली आज्ञार्थी असे लिहावे.
अनौपचारीक पत्राचा आराखडा (Marathi Informal Letter Writing Format)
[ येथे पत्र लेखकाचे
पूर्ण नाव, पत्ता
आणि फोन नंबर.]
दिनांक: __________
आदरणीय/माननीय/प्रिय,
(—————————————————————————————————————————————————————————————-
मायना —————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————-)
तुझाच/तुझीच किंवा आपला आज्ञाधारक/आपली आज्ञार्थी
(नाव)
अशा प्रकारे आज आपण पत्रलेखणाचे विविध प्रकार आणि त्यांचे स्वरुप आणि पत्रलेखण करताना घ्यायच्या महत्वाच्या काळजी विषयी जाणुन घेतले आहे.
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :