Home » Jobs & Education » Essay Writing » मराठी निबंध माझा आवडता छंद । Majha Avadta Chhand Nibandh In Marathi

मराठी निबंध माझा आवडता छंद । Majha Avadta Chhand Nibandh In Marathi

आजच्या या लेखात आपण माझा आवडता छंद (majha avadta chhand) या विषयावर एक निबंध बघू. 

माझा आवडता छंद या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

Majha Avadta Chhand हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

मराठी निबंध माझा आवडता छंद । Majha Avadta Chhand Nibandh In Marathi

आज आपल्या प्रत्येकाच्या अंगी काहीतरी विशिष्ट गुण असतात, कला कौशल्ये असते जो आपला छंद देखील असतो.यात आपल्यापैकी कोणाला वाचणाचा छंद असतो तर कोणाला गायनाचा,लेखणाचा,नृत्य करण्याचा असे वेगवेगळया प्रकारचे अनेक छंद आपल्याला प्रत्येकाला असतात.ह्या जगात एकही असा व्यक्ती आपल्याला बघायला मिळणार नाही ज्याला कोणताही छंद नाही.

कारण आपल्याला जर आयुष्य,सुखाने,समाधानाने आणि आनंदाने व्यतित करायचे असेल तर त्यासाठी मनोरंजन हा घटक आपल्या आयुष्यात असावाच लागतो.

आणि छंद ही एक अशी गोष्ट आहे ज्यात आपण स्वताच्या आनंदासाठी,मनोरंजनासाठी एखादे काम आवडीने करत असतो मग ते वाचण्याचे,लिहिण्याचे,गाण्याचे,नाचणे,चित्र काढणे इत्यादी कोणत्याही प्रकारचे काम असो.

जसा आपल्या प्रत्येकाला कोणता ना कोणता एक छंद जडलेला असतो.असाच एक छंद मला देखील जडलेला आहे तो म्हणजे लिहिण्याचा. 

लिहिणे ही एक निर्मितीशील कला आहे.जी देवाने प्रत्येकाला दिलेली नसते.फार मोजकेच व्यक्ती असतात जे लेखक असतात.कोणत्याही घटना,प्रसंगावर तसेच विषयांवर सखोल विचार करणे आणि मग आपले मत जगासमोर विचारविनिमय करून मांडणे हे एका लेखकाचे काम,कर्तव्य आणि महत्वाची जबाबदारी देखील असते.

बालपणापासुनच मला लिहिण्याची फारच आवड होती.त्यामुळे निबंध लेखन हा माझा शाळेत असताना एकदम आवडीचा विषय होता.कारण त्यात मला माझ्या आवडत्या विषयावर मनसोक्त तसेच मनमोकळेपनाने लेखन करण्याची संधी मिळत असे.

जसजसा शालेय जीवणातुन महाविद्यालयीन जीवणात प्रवेश केला तेव्हा आजुबाजुला अनेक दिग्दज तसेच प्रसिदध लेखक आणि लेखिकांच्या सान्निध्यात राहु लागलो.कारण माझी शाखाच आर्टस होती आणि माझा स्पेशल विषय देखील मराठी होता.

त्यामुळे माझे सर्व आजुबाजुचे वातावरण हे प्राध्यापक,लेखक,लेखिका,कवी,पत्रकार असेच साहित्य आणि लेखन क्षेत्राशी संबंधित होते.कारण माझ्या सर्व प्राध्यापकांमध्ये कोणी साहित्यिक होते तर कोणी पत्रकार त्यामुळे महाविद्यालयीन काळात देखील माझ्यावर साहित्याचेच संस्कार झाले.

आधी पासुनच शालेय जीवणापासुन मला कोणत्याही विषयावर निबंध लिहिण्याची फार आवड होती.त्यातच माझ्या आजुबाजुचे महाविद्यालयीन वातावरण देखील लेखन आणि वाचणास अनुकुल असेच होते.त्यामुळे माझ्यातील लिहिण्याच्या आवडीत दिवसेंदिवस अजुन प्रखरतेने वाढ होत गेली.

कारण माझ्या आजुबाजुचे सर्व साहित्यिक,प्राध्यापक हे मला वेळोवेळी लेखणाबाबत मार्गदर्शन करत होते.त्यामुळे मी देखील त्यांचे लेखन बघुन छोटे छोटे लेख आमच्या काँलेजच्या व्हाँटस अँपवरील गृपवर लिहु लागलो होतो.प्राध्यापकांकडुन देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त मिळत होते.

पण अचानक काही घरगुती तसेच आर्थिक अडी अडचणींमुळे मला माझे एम ए चे शिक्षण अर्धवट सोडावे लागेल.तेव्हा मी एम ए च्या दितीय वर्षात शिकत होतो.

मग घरात हातभार लावण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मी काम शोधू लागलो आणि नातलगांना देखील माझ्यासाठी काम बघा असे सांगितले पण कोणीच काम देत नव्हते.त्यातच मला खुप गर्दी माझ्या अवतीभोवती कोणी करणे अजिबात आवडायचे नाही.

अशा परिस्थितीत मला देखील माझ्याबाबद हीच चिंता सतत लागुन असायची की माझे भविष्यात कस होणार?

कारण मला बाहेरची गर्दी गोंधळ,गोंगाट अजिबात सहन होत नाही त्यात लोकाचे काम म्हटले तर चार लोकांना तोंडीतोंड द्यावेच लागते.अशावेळी मी माझ्या स्वतासाठी असे कोणते असे काम बघावे की मला ते एकांतात कोणताही गर्दी गोंधळ सहन न करता ते काम करता येईल.अशा बिकट परिस्थितीत माझा लिहिण्याचा छंदच माझ्या कामी आला.

रोज घरी एकांतात इंटरनेटवर आँनलाईन पैसे कसे कमवायचे? असे सर्च करता करता एका व्हिडिओ द्वारे मला वर्क फ्रोम होम वर्क फ्रिलान्सिंग विषयी कानावर पडले.मग मी इंटरनेटवर फ्रिलान्सिंग विषयी माहीती काढु लागलो की फ्रिलान्सिंग म्हणजे नेमके काय असते?

खुप सर्च करून झाल्यावर माझ्या हे लक्षात आले की फ्रिलान्सिंग हे एक वर्क फ्राँम होम काम असते जे स्त्री, पुरुष, विदयार्थी,घरगृहिणी यापैकी कोणीही कुठेही बसुन आपल्या क्लाईंटसाठी आँनलाईन पदधतीने देखील करू शकतो.पण त्यासाठी आपल्या अंगी काहीतरी कला असावी लागते आणि आपण त्या कलेत एक्सपर्ट देखील असणे गरजेचे असते.

मग मी फ्रिलान्सिंगच्या कामांविषयी पुर्ण यादी काढली ज्यात मला माझ्या लायक एकच काम असे दिसले जे माझ्या आवडीनुसार होते ते म्हणजे कंटेट रायटिंगचे.ज्यात आपल्याला लेख लिहायचे पैसे मिळत असतात.आणि हे काम असे असते जे आपल्याला इतरांच्या ब्लाँगसाठी देखील करता येते.किंवा स्वताचा वैयक्तिक ब्लाँग तयार करून स्वतासाठी सुदधा करता येते.

पण मला वर्तमान काळात पैशांची नितांत आवश्यकता असल्यामुळे आणि ब्लाँगवर कमाई होण्यास एक दोन वर्षाचा किमान कालावधी लागत असल्यामुळे मी आँनलाईन युटयुबवरील व्हिडिओ तसेच गुगलवरील इतर ब्लांँग वाचुन आणि त्यातील प्रत्येक लेखकाची लेखणाची पदधत बघुन,समजुन,शिकुन दोन ते तीन महिन्यात कंटेट रायटिंग शिकलो व इतरांच्या ब्लाँगसाठी मी कंटेट म्हणजेच लेख लिहिणे सुरू केले.

ज्याचे सुरूवातीला मला कामाचा कोणताही अनुभव नसल्याकारणाने एका ब्लाँगरने 25 रूपये हजार वर्ड आर्टिकलचे अशी कामाची आँफर दिली. जी मी लगेच स्वीकारली कारण ही माझी कामाची पहिलीच सुरूवात होती. ज्यात मला माझ्या आवडीचे काम लेखन करायला मिळणार होते आणि त्याचेच मला पैसे देखील मिळणार होते. कारण या आधी मी फक्त छंद म्हणुन लिहित होतो पण आता माझ्या छंदातुनच मला पैसे कमविण्याची संधी मिळणार होती. म्हणुन किती पैसे मिळता आहे न बघता मी आवड तसेच छंद म्हणुन कंटेट रायटिंगच्या कामाला सुरूवात केली.

मग रोज लेखन करता करता नवनवीन प्रकारच्या गोष्टी रायटिंगमध्ये शिकु लागलो.याआधी मी फक्त साधे लेख लिहायचे काम करत होतो.जे मी माझ्या काँलेजच्या व्हाँटस अप गृपवर टाकायचो.पण जसजसे कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात अनुभव प्राप्त होत गेले नवनवीन क्लाईंटसाठी काम करत गेलो.तसतशी माझी लिहिण्याची पदधत सर्वसाधारण लेखावरून एससीओ आँप्टीमाईज कंटेट रायटिंगची झाली.

ज्यात आपल्याला एखाद्या नीशवर रिसर्च करून किवर्डचा वापर करून एक परिपुर्ण कंटेट तयार करावा लागत असतो.

आज कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात काम करून मला कमीत कमी दोन ते तीन वर्ष झाली आहेत.खुप छान वाटते एखाद्या विषयावर रिसर्च करायचे मग इतर ब्लाँगरपेक्षा जास्त परिपुर्ण माहीती असलेला आणि युनिक कंटेट आपल्या क्लाईंटसाठी तयार करायचा.आणि माझे लिहिलेले लेख लोक इंटरनेटवर माहीती सर्च करतात तेव्हा त्यांना वाचायला मिळतात.मग लोक त्याची मनापासुन प्रशंसा करतात.

समाधान एकाच गोष्टीचे वाटते की ज्या लेखनाच्या छंदाचे मला भविष्यात कधी कोणी पैसे देईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते त्याच छंदाचा वापर करून पार्ट टाईम हव्या त्या वेळात काम करून आज माझा उदरनिर्वाह होतो आहे तसेच महिन्याचा सर्व खर्च देखील भागतो आहे.आणि आज मी माझ्या छंदाला जोपासुन कंटेट रायटिंग ह्या क्षेत्रात माझे फुलटाईम करिअर करू शकतो.इतके विस्तृत आणि विशाल आज हे क्षेत्र झाले आहे.आणि भविष्यात सुदधा ह्या क्षेत्रात रायटिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी ह्या वाढतच जाणार आहे.

कारण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कंटेटला मार्केटचा किंग म्हटले जाते.कारण आज इंटरनेटवर सर्च केल्यावर आपण जे लेख वाचतो,युटयुवर जे व्हिडिओ बघतो,इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातुन जी माहीती इन्सटाग्रामवर फेसबुक टेलिग्रामवर वाचतो हे सर्व कंटेटचेच प्रकार आहेत.जे तयार करण्याचे काम एक आँनलाईन कंटेट क्रिएटर तसेच कंटेट रायटर करत असतो.

असा आहे माझा आवडता छंद लेखन आणि त्यात मी केलेला माझा आतापर्यतचा एक छोटासा प्रवास.

अंतिम निष्कर्ष:

अशा पदधतीने आज आपण माझा आवडता छंद (majha avadta chhand) या विषयावर निबंध बघितला. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माझा आवडता छंद (majha avadta chhand) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *