Home » Jobs & Education » Letter Writing » मराठी निबंध माझी आई | Essay On Majhi Aai In Marathi | Majhi Aai Nibandh In Marathi

मराठी निबंध माझी आई | Essay On Majhi Aai In Marathi | Majhi Aai Nibandh In Marathi

आजच्या या लेखात आपण माझी आई निबंध मराठी, Aai nibandh marathi, Marathi essay mazi aai, माझी आई निबंध लेखन मराठी, Essay on majhi aai in marathi या विषयावर एक निबंध बघू.

माझी आई (Majhi Aai) या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी इयत्ता १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, आणि ११, १२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

मराठी निबंध माझी आई | Essay On Majhi Aai In Marathi | Majhi Aai Nibandh In Marathi

आज आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की गुरूशिवाय ज्ञान नाही.आणि ज्ञानाशिवाय जीवणाला कोणताही अर्थ नाही.कारण गुरू हा आपला पहिला मार्गदर्शक असतो. जो आपल्याला वाट दाखवत असतो आणि आपल्याला सगळयांनाच चांगले माहीत आहे की ह्या जगात आपली आई हीच आपली प्रथम गुरू असते.कारण जन्मल्यानंतर आपण लगेच शाळेच जायला निघत नसतो.सर्वात आधी आपण बोलायला,चालायला शिकतो.मग त्यानंतर आपण शाळेत जात असतो.

म्हणुनच असे म्हटले जाते की आई ही आपली प्रथम गुरू असते.कारण आपण तिच्या गर्भात असतानाच आपल्यावर संस्कार करणे सुरू करत असते तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत ती आपले गुरू बनुन सतत मार्गदर्शन करत असते.आजच्या निबंधातुन मी तुम्हाला माझ्या आईविषयी सांगणार आहे.

माझी आई निबंध लेखन मराठी

माझ्या आईचे नाव आहे प्रतिभा.तिचे शिक्षण पाहायला गेले तर जेमतेम १० वी पर्यतच झालेले आहे.पण आयुष्याच्या शाळेत खुप अनुभवांचे शिक्षण झालेले असे तिचे व्यक्तीमत्व आहे. लहानपणीच वडिलांचे क्षत्र हरपल्यामुळे लहानाची मोठी ती मामांच्याच घरी झाली. तिथे देखील दिवसभर घरातील कामे आवरणे, आवर निवर करणे ही कामे ती रोज करायची.

रोज सकाळी उठुन जो कामाला लागते तर दिवसभर घरातील काम आवरतच कधी दिवस संपुण जातो हे देखील तिच्या लक्षात राहत नाही.सकाळी लवकर उठुन आम्हा सर्वासाठी अंघोळीसाठी पाणी तापविणे,चहा करणे,नाष्टा तयार करणे ह्या सर्व कामात ती इतकी गुंग असते की सकाळचा नाष्टा करायला देखील तिला अजिबात सवड नसते.घरातील आम्हा सगळयांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर आमच्या सर्वाच्या विश्रांतीच्या वेळेस ती जेवण करत असते.इतकी माझी आई कामात गुंग असते.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करताना तिला कधीच आमच्यासाठी चहा-नाश्ता स्वयंपाक घरातील झाडझुड,करायचा कंटाळा येत नाही.घरातील सर्व कामे ती अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने करत असते.

इतकेच नाही तर रोज संध्याकाळी मोठया भावासोबत बाहेर कुठे कामानिमित्त गाडीवर गेल्यावर आठवणीने आमच्या सगळयांसाठी खाऊ देखील आणत असते. स्वताला भलेही आवडो किंवा ना आवडो बाहेरचे खायला आमच्यासाठी बाहेरून लस्सी,बदाम शेक असे काहीतरी थंड नक्कीच आणत असते.

लहानपणापासुन तर आज महाविद्यालयात जाईपर्यत आम्हा सर्व सर्व भावांचा अभ्यास घेणे,लहानपणी आम्हाला सायकलवर बसवून पँण्डल मारत शाळेत सोडायला येणे ही सर्व कामे तीने केली.

जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला असे वाटायचे घरातील कर्ता व्यक्ती हा पुरुष हाच असतो.पुरूष मंडळी नोकरी शोधतात दिवसभर काबाडकष्ट करतात पैसे कमवतात आणि घरातील सर्व जबाबदारी पार पाडतात.स्त्रिया फक्त घरातील थोडीफार असलेली कामे आवरत असतात आणि ते आवरून झाल्यावर टिव्हीवर दिवसभर मालिका बघत बसतात.त्यांचे आयुष्य खुप सुखी असते.

पण जसजसा मी मोठा झालो आणि नीट निरीक्षण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की घरातील पुरूष मंडळींपेक्षा अधिक कामे तर स्त्रिया करत असतात.सकाळी लवकर उठुन सहा वाजेपासुनच सगळयांसाठी अंघोळीला पाणी ठेवणे,चहा नाश्ता मग दुपारचे जेवण,मग संध्याकाळी पुन्हा चहा,जेवण करणे

सकाळ संध्याकाळ घराची साफसफाई करणे,भांडी घासणे मग एवढे सर्व काम आटोपुन झाल्यावर बाजारात काही खरेदी करण्यासाठी गेली तर आमच्यासाठी खाऊ घेऊन येणे,दर वाढदिवसाला आम्हा भावंडांसाठी कपडे घेणे केक आणने मोठया जल्लोषात आमचा वाढदिवस साजरा करते.

स्वतासाठी कधीच आमच्याकडे तिने कधीच काही मागितले नाही.बाहेरून काही खायला आणले तर फ्रिजमध्ये आणुन ठेवून देते आणि आम्हाला लागेल तेव्हा आम्हाला खायला,प्यायला देत असते.आम्हा भावंडांपैकी एकही जण जेवणाला उशिरा घरी आला.तर तो घरी येईपर्यत त्याची वाट बघते त्याला आल्यावर जेवू घालते मग स्वता जेवायला बसते.अशी आहे माझी आई जी आधी आमचा विचार करते मग स्वताचा.

माझ्या आईकडे जेव्हा बघतो तेव्हा मला कळते की स्त्रीचे जीवण किती हलाखीचे आणि कष्टाचे असते.आयुष्यभर ती सगळयांसाठी सतत करत राहते मुलांसाठी,पतीसाठी,सासु,सासरे सर्व कुटुंबासाठी पण स्वतासाठी कधीच काही मागत नसते.

आई म्हणजे फक्त आपल्याला जन्म देणारी एक स्त्री नसते तर आई म्हणजे त्याग,समर्पण,बलिदानाचे प्रतीक असते.आईच असते जी आपल्या घराला जोडुन ठेवण्याचे काम करते.आईमुळेच आपल्या घराला घरपण येत असते.आईच असते जी स्वता उपाशी राहुन आपल्या मुलांना जेवू घालते आणि आपल्या मुलांना जेवताना बघुन जिचे पोट आपोआप भरून जाते.

अशा पदधतीने आयुष्यभर आई तिची सर्व कर्तव्ये आणि जबाबदारीचे पालन करत असते.

म्हणुन असे म्हणतात की आईविना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी.

अशा पदधतीने आज आपण माझी आई विषयी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या मराठी निबंध माझी आई माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या मराठी निबंध माझी आई माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

1 thought on “मराठी निबंध माझी आई | Essay On Majhi Aai In Marathi | Majhi Aai Nibandh In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *