Home » People & Society » Meaning » Memes Meaning In Marathi | मीम्स म्हणजे काय आहे?

Memes Meaning In Marathi | मीम्स म्हणजे काय आहे?

आपण अनेकदा Memes हा शब्द पहिला असेल किंवा ऐकला असेल. परंतु, नक्की Memes म्हणजे काय? Memes meaning in Marathi, Memes काय आहे? त्याचे प्रकार , Memes चे फायदे काय असतात? तसेच Memes मधील प्रसिद्ध चेहरे कोण आहेत? आणि Memes कसे बनवावेत हे तुम्हाला माहीत नसेल. तर आता आपण या लेखात Memes बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मीम्स चा मराठीत अर्थ (Memes Meaning In Marathi Language)

Meme चा फुल फॉर्म ‘Mostly Entertain Material Ever’ आहे असा मानला जातो.

 तसे पाहिले तर Memes या शब्दाला शब्दशः अर्थ नाही. हा शब्द प्रत्येक भाषेत मीम्स म्हणूनच वापरला जातो.

मीम्स म्हणजे काय? (Memes Information In Marathi)

आपण खूपवेळा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया वरती वेळ घालवतो. या सोशल मीडियावरती दररोज लाखो फोटो व व्हिडिओ शेअर होतात. त्यातच Memes हे खूप पाहिले जातात.

आजकाल इंटरनेट वर मीम्स चा वापर करून लोकांना ट्रोल व काही गोष्टींवर टीका टिप्पणी केली जाते. कोणाबद्दलही चांगले किंवा वाईट मत सोशल मीडियावरती मांडायचे असेल तर Memes चा वापर केला जातो. शाब्दिक लिखाणापेक्षा चित्र व विनोद यांची सांगड घालून बनवलेल्या मीम्स च्या माध्यमातून विचार स्पष्ट होतात. म्हणून Memes ला लोक पसंती दर्शवतात व हेच मीम्स व्हायरल सुध्दा होतात.

Memes ची सुरुवात इंटरनेट च्या आधी पासून केला जातो आहे. सन १९०६ मध्ये ब्रिटिश लेखक व जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी ‘द सेल्फिश जीन’ (The Selfish Gene) पुस्तक लिहले. या पुस्तकातच पहिल्यांदा memes हा शब्द आढळला. Richard Dawkins यांनी आपल्या या पुस्तकात memes चा अर्थ सांगितला आहे.

Memes चा मराठीत अर्थ :- ” एक विचार किंवा संकल्पना जी कालांतराने एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरते. (“An idea that spread from one person to another”)

इंटरनेट युगाने या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. अक्षरशः Memes चा वापर कोणालाही बदनाम, ट्रोल करण्यासाठी केला जातो आहे.

मीम्सचे विविध प्रकार (Types of Memes Marathi)

सोशल मीडियासाठी मीम्स हे मनोरंजन कामी बनवले जातात. Memes चे वेगवेगळे प्रकार आहेत.

1. क्लासिक मीम्स (Classic) :

क्लासिक मीम्स एक साधी आणि सोपी पद्धत आहे. या प्रकारात मधे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कोणत्याही फोटोवर text लिहून मीम्स बनवले जाते. टेक्स्ट हे कोणतेही असू शकते ज्यातून भावना किंवा मत मांडलेले असते.

2. सीरिज मीम्स (Series) :

सीरिज नावाप्रमाणेच मीम्स या सीरिज मध्ये असतात. असे मीम्स series मध्ये असून ते माहितीपर गोष्टी दाखवण्याकरिता मुख्यतः वापरतात. इंस्टाग्राम वरती असे मीम्स खूप आढळतात.

3. शैक्षणिक मीम्स (Educational) :

शैक्षणिक मीम्स हे माहितीपर कंटेंट दर्शवण्यासाठी वापरतात. मनोरंजनाचा साहाय्याने शैक्षणिक माहिती पसरवण्याचा प्रयत्न यातून केला जातो.

4. अस्पष्ट मीम्स (Obscurity) :

हे मीम्स मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले जातात. अशा मीम्स ची रचना अस्पष्ट असते. ह्या प्रकारातील मीम्स हास्य व विनोद दृष्टिकोन ठेवून तयार केले जातात म्हणून ते व्हायरल होतात.

5. डांक मीम्स (Dank) :

Dank memes meaning in Marathi म्हणजे हे मीम्स व्हायरल कंटेंट (Viral Content) वरती बनवले जातात. असे मीम्स पटकन आणि कमी काळातच व्हायरल होतात आणि लोक खूप काळासाठीयाचा वापर करतात.

6. ट्रेडिंग मीम्स (Trending) :

या प्रकारातील मीम्स हे ट्रेंड वरती निर्भर असतात. असे मीम्स थोड्या काळासाठी असतात नंतर ट्रेंड नुसार जाऊन त्याजागी नवीन येतात. ट्रेंड मध्ये असताना हे खूप व्हायरल होतात.

Trending Memes चे उदाहरण – Binod, Bachpan ka Pyar

मीम्स कसे बनवावेत (How to Make Memes in Marathi ) :

मीम्स हे इमेज आणि व्हिडिओ दोन्ही प्रकारचे असतात. इमेज मीम्स हे तुम्ही संगणकावर कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता Paint मध्ये बनवू शकता. खालील काही सॉफ्टवेअर व ॲप्लिकेशन च्या साहाय्याने आपण memes तयार करू शकतो.

 • Photoshop : फोटोशॉप हे संगणकावरून फोटो एडिटिंग करण्यासाठी वापरले जाते. यावरती तुम्ही Memes बनवू शकता. फोटोशॉप हे वापरण्यास अवघड जाते. तसेच, मोबाइल वरती हे वापरता येत नाही.
 • Canva : Canva हे फोटोशॉप पेक्षा वापरण्यासाठी सोपे आणि सुलभ आहे. यात आपण memes आकर्षक पद्धतीने बनवू शकतो. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता ब्राऊझर मधून https://www.canva.com वरुन ही वापरू शकता. Canva चे मोबाइल ॲप्लिकेशन सुद्धा उपलब्ध आहे.
 • PicsArt : PicsArt हे फोटो एडिटिंग करण्याचे ॲप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्ही memes बनवू शकता. एडिटिंग करण्यासाठी खूप पर्याय यामध्ये आहेत.
 • Imgflp : या वेबसाईट वरून सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने meme बनवता येतात. ज्यांना फोटो एडिटिंग करणे अवघड वाटते त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये आपणास हवी ती इमेज अपलोड करून मजकूर भरून meme तयार करता येते.  https://imgflip.com/memegenerator
 • संगणकावर VSDC मधून तसेच OpenShot या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर मधून तुम्ही व्हिडिओ memes बनवू शकता. तसेच मोबाइल करीता Kinemaster आणि Power Director सारखे व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन वापरू शकता.

मीम्स मध्ये वापरले जाणारे प्रसिद्ध चेहरे (Famous Faces in Memes in Marathi) :

 • Khaby Lame : इंटरनेट वरती या आफ्रिकन मुलाची खूपच चर्चा आहे. याचे इंस्टाग्राम वरती ४ कोटी पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच एका वर्षात सगळ्यात जास्त फॉलोवर्स चा रेकॉर्ड बनवले. लॉकडाऊन मध्ये नोकरी गमावल्याने त्याने व्हिडिओ तयार केले. ते व्हायरल झाले. त्यामुळे khaby lame ला प्रसिद्धी मिळाली.
 • Ositha Ihema : Osita Ihema हे एक नायजेरियातील हास्य कलाकार आहेत. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1982 मध्ये झाला होता. एका विशिष्ट आजारामुळे ओसिता यांचे वय वाढत आहे, परंतु त्यांची उंची वाढत नाही. त्या ते जणू एखाद्या लहान मुलाप्रमाणे भासतात. त्यात त्यांचे हावभाव व हास्यास्पद फोटो memes मध्ये वापरले जातात.
 • Yao Ming : Yao Ming हे एक चायनीज बास्केटबॉल खेळाडू आहे, जे शांघाई शार्क नावाच्या चायनीज बास्केटबॉल टीम साठी खेळतात. Yao Ming ह्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1980 मध्ये झाला. एकदा हसलेला त्यांचा फोटो व्हायरल झाला. त्यामुळेच Yao Ming यांचा हसता चेहरा खूप प्रसिद्ध झाला आहे.
 • Drake Hotline : Drake Hotline हे एक लोकप्रिय कॅनाडियन रैपर आहेत. त्यांच्या फोटोचा वापर memes मध्ये दिसून येतो.  जेव्हा कोणत्याही दोन वस्तू आणि गोष्टींमध्ये तुलना दाखवायची असेल तर यांचे एक आवडती व दुसरी नावडती दर्शविणारे फोटो वापरतात.
 • विजय फाटक (Hindustani Bhau) : हिंदुस्तानी भाऊ यांच्या व्हिडिओज क्लिप चा वापर व्हिडिओ meme मध्ये केला जातो. हे आपल्या भाषणशैली साठी ओळखले जातात.

मीम्स मधून पैसे कसे कमवावे (How to Earn by Making Memes) :

 • इंस्टाग्रामवरती मीम्स संबंधित पेज बनवा.
 • ट्रेडिंग विषयाशी निगडीत मीम्स बनवा. तसेच व्हिडिओ मीम्स सुध्दा बनवा.
 • या पोस्ट करून तुम्ही फॉलोवर्स वाढवू शकता.
 • तुमचे मीम्स व्हायरल झाल्यास तुमचे फॉलोवर्स नक्की वाढतील. 
 • तुमच्या पेजवर ती फॉलोवर्स वाढल्याने तुम्हाला Advertisement आणि Paid Promotion मिळेल.
 • या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता.

Frequently Asked Questions (FAQ) On Memes In Marathi

Memes शब्द पहिल्यांदा कोणी वापरला?

सन १९७६ मधे Richard Dawkins यांनी पहिल्यांदा ‘द सेल्फिश जीन’ या पुस्तकात Memes हा शब्द वापरला.

Memes कसे बनवावे?

तुम्ही Imgflp वेबसाईट वरून सहजरीत्या memes तयार करू शकता. ही वेबसाईट मोबाइल किंवा संगणक वापरून मीम्स तयार करता येतात.

Meme Day कधी साजरा केला जातो?

१९ नोव्हेंबर या दिवशी ‘National Meme Day’ साजरा केला जातो.

Memes चा फुल फॉर्म काय आहे?

Meme चा फुल फॉर्म ‘Mostly Entertain Material Ever’ आहे असा मानला जातो.

आशा आहे की आम्ही दिलेल्या Memes Meaning In Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Memes meaning in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *