आजच्या ह्या माहिती अणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्व जग डिजीटल होत चालले आहे. वस्तुंची खरेदी विक्रीपासुन तर शिक्षण, नोकरीपर्यत आज सर्व काही आँनलाईन झालेले आहे. आधी आपल्याला नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागायचे आता आपण मोबाईल तसेच इंटरनेटचा वापर करून घरबसल्या काम करून पैसे कमवू शकतो.एवढी क्रांती आज कलियुगात घडुन आलेली आपणास दिसुन येते आहे.
पण कधी कधी आपण आपले काम आँनलाईन पदधतीने मोबाईलद्वारे करत असताना अचानक आपला मोबाईल काम करणे बंद करतो म्हणजेच तो हँग होत असतो.
अणि त्यातच अशावेळी आपल्याला अर्जट एखादे काम करायचे असेल किंवा कोणाला फोन करायचा असेल किंवा कोणाचा फोन येणार असेल तर अशावेळी आपली खुप फजिती होत असते.
अणि ह्याच फजितीमुळे आपली चिडचिड देखील होत असते. अणि ह्याचमुळे आपण कधी कधी निराश होऊन बसत असतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होत असतो.
म्हणुन आजच्या लेखातुन आपण आपला मोबाईल हँग का होत असतो? तसेच आपला मोबाईल हँग झाल्यावर आपण काय करायला हवे? हे जाणुन घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मोबाईल हँग झाल्यावर ज्या शारीरीक, मानसिक, आर्थिक इत्यादी प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते त्यांना सामोरे जावे लागणार नाही.
मोबाईल हँग होण्याची कारणे :
- कधी कधी मोबाईलमध्ये व्हायरस असल्यामुळे देखील मोबाईल हँग होत असतो.मग हा व्हायरस एखादी untrusted app install केल्यामुळे अणि त्या अँपला आपल्या मोबाईलमधील डेटा permission allow केल्यामुळे देखील आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस प्रवेश करत असतो.अणि आपला मोबाईल हँग होत असतो.
- किंवा एखाद्या untrusted link वर क्लीक केल्यामुळे देखील आपल्या सिस्टममध्ये व्हायरस येत असतो.त्यामुळे देखील मोबाईल हँग होत असतो.
- एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन मोबाईलमध्ये रण केल्यामुळे देखील
मोबाईल हँग होत असतो.आपण जेव्हा एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन मोबाईलमध्ये ओपन करत असतो तेव्हा multitasking मुळे operation overloading चा problem देखील येत असतो.त्यामुळे मोबाईल काही मिनिटांसाठी हँग होऊन जात असतो.
- मोबाईलचे प्रोसेसर अणि रँम मोबाईलशी compatible नसल्यामुळे त्याची स्टोरेजची क्षमता,प्रोसेसर स्पीड अणि दर्जा उत्तम नसल्यामुळे देखील आपला मोबाईल हँग होऊ शकतो.
अशा पदधतीने वरील काही कारणांमुळे आपला मोबाईल हँग होत असतो.
मोबाईल हँग होऊ नये म्हणुन करावयाचे उपाय:
- मोबाईलमध्ये कोणताही व्हायरसचा प्रवेश होऊ नये म्हणुन मोबाईलमध्ये कोणतीही untrusted app install करायची नाही तसेच तिला आपला डेटा access करण्याची permission द्यायची नाही.
- कोणत्याही untrusted link वर directly click करून त्यात जाऊ नये.कारण अशा लिंकमध्ये देखील व्हायरस असण्याची दाट शक्यता असते.
- एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन मोबाईलमध्ये रण केल्यामुळे देखील मोबाईल हँग होत असतो. आपण जेव्हा एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन मोबाईलमध्ये ओपन करत असतो तेव्हा multitasking मुळे operation overloading चा problem येत असतो. त्यामुळे देखील मोबाईल काही मिनिटांसाठी हँग होऊन जात असतो. यामुळे एकाच वेळी मोबाईलमध्ये Multiple application ओपन करू नये कारण याने देखील Operation overloading मुळे आपला मोबाईल हँग होत असतो.
- कोणताही मोबाईल खरेदी करताना फक्त त्याचे वरील सजावट न बघता म्हणजे तो किती आकर्षक आहे हेच न बघता त्याचे प्रोसेसर अणि रँम उत्तम दर्जाचे आहे की नाही हे बघावे.प्रोसेसरचा स्पीड किती आहे? रँमची स्टोरेज क्षमता किती आहे हे देखील बघावे.
अंतिम निष्कर्ष : अशा पदधतीने आज आपण मोबाईल हँग होण्याची कारणे अणि मोबाईल हँग होऊ नये म्हणुन आपण काय उपाय करायला हवे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी सदर लेख आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रीणींपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या मोबाईल हँग होण्याच्या समस्येपासुन मुक्त होता येईल अणि आपले काम सातत्याने करता येईल.