Home » Jobs & Education » Essay Writing » मोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi

मोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi

Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi म्हणजे भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन किंवा मोबाईल शाप की वरदान या विषयावर मराठी निबध मी इथे उपलब्ध करून देत आहे.

Contents hide
1. मोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi

मोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi

आज ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने अत्यंत प्रगती केलेली आपणास दिसुन येते.एक वेळ अशी होती की आपल्याला संदेश पाठवायचा असेल तर तार पाठवावा लागायची किंवा राजा महाराजांच्या काळात संदेश दुताद्वारे संदेश पाठविला जायचा.पण आता वेळ तशी राहिलेली नाहीये आज आपण घरात ज्याच्याशी बोलायचे त्याला काँल लावुन त्याच्यासोबत बोलू शकतो,त्याला संदेश पाठवू शकतो.हे सर्व आज शक्य झाले आहे मोबाईलमुळे.मोबाईल आज हा आपली अन्न,वस्त्र,निवारा ह्यानंतरची महत्वाची,जीवणोपयोगी चौथी गरज बनलेला आहे.

पण ह्या मोबाईलमुळे जसे आपल्याला अनेक फायदे झाले आहेत.तसेच मोबाईलच्या वापरामुळे आपले भरपुर नुकसान देखील होते आहे असे काही जणांचे मत आहे.

म्हणुन हेच मत मांडुन मोबाईल शाप आहे की वरदान? मोबाईल कोणासाठी शाप आहे?आणि तो का?तसेच कोणासाठी वरदान आहे आणि ते का?हे आपण आजच्या लेखातुन समजुन घेणार आहोत.

मोबाईल (Mobile) मुळे आपल्याला काय फायदे झालेले आहेत?

मोबाईलच्या शोधामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तसेच आपले धावपळीचे जीवन देखील सुकर झालेले आहे.

आपल्या अनेक समस्या दुर झाल्या आहेत.

भ्रमणध्वनी (Mobile) मुळे आपल्याला झालेले फायदे :

1) आँनलाईन शाँपिंग 

आज मोबाईलमुळे आपल्याला कपडयांची तसेच कोणत्याही घरगुती वस्तुंची शाँपिंग करण्यासाठी कुठे दुर जाण्याची अजिबात गरज पडत नाही.जागेवर बसुन आपण आपल्याला हव्या त्या कपडयांची,घरगुती वस्तुंची आँनलाईन खरेदी करू शकतो.एवढेच नाहीतर आपण दुकानात ज्या किंमतीत त्या वस्तु खरेदी करतो त्यापेक्षा कमी किंमतीत तसेच घरपोच आपण त्या वस्तु  आँनलाईन मागवु शकतो.

2) आँनलाईन बुकिंग :

मोबाईलचा वापर करून आपण घरबसल्या रेल्वेचे आँनलाईन तिकिट बुक करू शकतो.घरबसल्या एखादी कार,कँब बुक करू शकतो.जी आपल्याला घरपोच घ्यायला येते आणि घरपोच सोडुन देखील देते.तसेच एखाद्या डाँक्टर तसेच वकिलला भेटण्यासाठी काँल करून त्याच्याकडे अपाईंटमेंट घेऊ शकतो.आणि आपला तपासणीसाठी घरबसल्या नंबर लावू शकतो.

3) आँनलाईन मनी ट्रान्सफर :

मोबाईलचा वापर करून आपण कोणालाही कुठुनही गुगल पे फोन पे ह्या सारख्या ट्रान्झँक्शन अँपचा वापर करून पैसे पाठवू शकतो.

4) काँलिंग तसेच चँटिंग :

मोबाईलद्वारे आपण दुर परदेशात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला काँल करू शकतो,त्याच्याशी बोलु शकतो,त्याला बघु देखील शकतो.फेसबुक,व्हाँटस अँप,मेसेज ह्या माध्यमांचा वापर करून कोणालाही संदेश पाठवू शकतो.त्याच्याशी चँट करू शकतो.

5)आँनलाईन सेलिंग :

मोबाईलचा वापर करून आपण घरबसल्या आपले कोणतेही प्रोडक्ट तसेच सर्विस इतरांना सेल करू शकतो.

6) आँनलाईन टिचिंग,लर्निग :

घरात एका जागी बसुन दुरवर बसलेल्या आपल्या विदयार्थ्याना आँनलाईन झुम,गुगल मीट सारख्या अँपचा वापर करून शिकवू शकतो.तसेच दूर परदेशात असलेल्या संस्थेत अँडमिशन घेऊन तिथुन आँनलाईन शिक्षण देखील आपण मोबाईलचा वापर करून घेऊ शकतो.

7) माहीतीचे संकलन :

आपल्याला जी माहीती हवी असेल ती माहीती आपण मोबाईलवरून इंटरनेटद्वारे गुगलवर सर्च करून तसेच युटयूबवरील व्हिडिओ बघुन मिळवू शकतो.

8) आँनलाईन अर्निग :

आज आपण मोबाईलवरून काम करून ब्लाँगिंग,युटयुब,फ्रिलान्सिंग इत्यादी माध्यमांद्वारे पैसे देखील कमवू शकतो.

9) लोकेशन शोधणे तसेच फोटो काढणे :

मोबाईलचा वापर करून आपण गुगल मँपद्वारे आपण आत्ता कुठे आहे हे बघु शकतो तसेच आपल्याला जिथे जायचे आहे ते ठिकाण कुठे आहे कोणत्या दिशेला आहे हे शोधु शकतो.इतकेच नाहीतर आपल्याजवळ कँमेरा नसला तरी मोबाईलवर आपण आपला तसेच इतर कोणाचाही फोटो काढु शकतो.

अशा पदधतीने आपण मोबाईल इंटरनेटचा वापर करून आज प्रत्येक पाहिजे ती गोष्ट करू शकतो.जी मोबाईलच्या,तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आपण करू शकत नव्हतो.खरेदी विक्री,पैशांचा व्यवहार,जाँब,बिझनेस इत्यादी सर्व काही आज आपण मोबाईलचा वापर करून करू शकतो.यावरून आपल्याला कळुन येते की आज मोबाईलने आपल्या आयुष्यात किती महत्वाची भुमिका बजावलेली आहे?

आपल्या वेळेची तसेच उर्जेची किती बचत केली आहे.

मोबाईलमुळे आपले काय आणि कोणते नुकसान झाले आहे?

1) घरच्यांपासुन मासे दुर जाता आहे :

खुप जणांची आज अशी तक्रार आपणास ऐकावयास मिळते की आज मोबाईलमुळे माणुस तंत्रज्ञानाच्या जवळ तर गेला आहे पण आपल्याच माणसांपासुन तो दुर होत चालला आहे.याला कारण अनेक जण घरात कामावरून आल्यावर कुटुंबियांसोबत बसलेले असताना देखील मोबाईलवर चिकटलेले असतात.ह्यामुळे माणसे एकमेकांपासुन मानसिकदृष्टया दुर चालली आहेत.

2) लहान मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आहे:

लहान मुले मोबाईलवर दिवसभर गेम खेळत बसतात तसेच मित्र मैत्रीणींशी फेसबुक तसेच व्हाँटस अँपसारख्या माध्यमांद्वारे दिवसभर चँटिंग करत बसतात.ज्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम त्यांच्या निकालावर पडत असतो.

3) लहान मुले मोबाईलचा गैरवापर करता आहे :

आज आपणास असे देखील दिसुन येते की लहान मुले मुलीआईवडिलांनी अभ्यासासाठी घेऊन दिलेल्या मोबाईलचा वापर इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ बघण्यासाठी करताना दिसुन येत आहे.

4) चँटिंगमध्ये वेळ वाया जातो:

आज मोबाईलचा वापर करत असताना आपण दिवसभरात आपला जास्तीत जास्त वेळ आँनलाईन मित्र मैत्रीणींसोबत वायफळ चँटिंग करण्यात घालवत असतो.ज्यामुळे आपला खुप मौल्यवान वेळ देखील वाया जात असतो.

5) रस्त्यावर अपघात घडतात:

आज खुप जण रस्त्यावर चालत असताना देखील मोबाईलवर चँटिंग करत असता ज्याचे परिणाम स्वरूप त्यांना अनेक दुर्घटनांना देखील सामोरे जावे लागत असते.एवढेच नाही तर काही जण मोबाईलवर बोलतानाच ड्राईव्हिंग करत असता ज्यामुळे त्यांच्यासोबत एखादी दुर्घटना म्हणजेच अपघात देखील घडु शकतो.आणि त्यात त्यांना आपले प्राण देखील गमवावे लागु शकता.

6) मोबाईलमुळे स्फोट होणे :

खुप जणांना वाईट सवय असते की मोबाईलवर चँटिंग करत असतानाच किंबा गेम खेळत असतानाच मोबाईल चार्जिग देखील करायचा.असे केल्याने मोबाईल गरम पडुन त्याचा स्फोट सुदधा होऊ शकतो.आणि ह्या भयंकर स्फोटामुळे आपल्याला आपले प्राण तसेच दृष्टी देखील गमवावी लागु शकते. 

7) आपली बँक डिटेल कोणीही चोरू शकते: 

आज आपण प्रत्येक जण आँनलाईन पैसे पाठविण्यासाठी गुगल पे फोन पे सारख्या माध्यमांचा वापर करत असतो.आणि ह्या अँपसाठी आपण आपल्या मोबाईलचाच पासवर्ड अधिकतर ठेवत असतो.

जो आपल्या जवळच्या मित्र मैत्रीणींना माहीत असतो.अशाने कोणीही मित्र मैत्रीण परिचित व्यक्ती आपल्याला नकळत आपल्या खात्यातील पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो.एवढेच नाहीतर आपण आपल्या मोबाईलमध्ये आपली जी बँक डिटेल जपुन ठेवलेली असते ती देखील कोणीही आपल्या नकळत आपला मोबाईल पासवर्ड लक्षात घेवून चोरू शकते.

8) हेडफोनवर मोठया आवाजात गाणे ऐकल्याने कानाचा आजार जडणे :

खुप जणांना मोबाईलवर हेडफोन लावुन मोठया आवाजात गाणे ऐकण्याची सवय असते.याच्याने आपल्याला कानाला त्रास होऊ शकतो

जसे की आपला कान दुखु शकतो,आपण बहिरे होऊ शकतो,कानाच्या पडदयाला दुखापत होऊ शकते.

9) शारीरीक आजार जडणे :

आपण रात्री झोपताना आपला मोबाईल हा चँट करता करता झोप लागल्याने छातीवरच रात्रवर ठेवून कधीकधी झोपत असतो.ज्यामुळे आपल्याला छातीचा हदयाचा आजार देखील जडु शकतो.तसेच मोबाईलच्या किरणांमुळे आपली दृष्टी खराब होऊ शकते.

आपल्या सगळयांसाठी वरदान ठरलेला मोबाईल आपल्यासाठी शाप ठरू नये यासाठी आपण काय करायला हवे?

 • मोबाईलचा मर्यादित तसेच गरजेपुरताच तसेच महत्वाच्या कामासाठीच वापर करावा आणि कुटुंबियांसमवेत घरात असताना शक्य होईल तेवढा कमी मोबाईलचा वापर आपण करायला हवा.याने आपल्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ व्यतित करता येईल.
 • लहान मुलांना मोबाईल देऊच नये आणि जरी दिला तर तो मर्यादित वेळेपुरताच म्हणजे आँनलाईन लेक्चर अटेंड करण्यासाठी,आँनलाईन इंटरनेटद्वारे गुगलवरील नोटस वाचण्यासाठी, यूटयुबवरील शिक्षणविषयक व्हिडिओ बघण्यासाठी द्यायला हवा.
 • लहान मुलांनी मोबाईलचा गैरवापर करू नये तसेच प्रौढ चित्र व्हिडिओ मोबाईलवर बघु नये यासाठी मोबाईलला पँरेण्टेड लाँक तसेच फेस लाँक पासवर्ड ठेवायला हवा.कारण फेस लाँक मध्ये जोपर्यत आपण मोबाईलच्या समोर चेहरा नेणार नाही तोपर्यत तो लाँक खूलणारच नाही.
 • मोबाईलचा वापर फक्त महत्वाच्या कामासाठीच करावा इतर फालतु निरर्थक चँटिंग वगैरेसाठी अजिबात मोबाईलचा वापर करू नये.तसेच असे करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया देखील घालु नये.
 • रस्त्यावरुन चालत असताना किंवा ड्राईव्हिंग करत असताना कधीही चँटिंग करू नये किंवा मोबाईलवर बोलु नये.तसेच हेड फोन लावुन गाणे ऐकु नये.
 • मोबाईल चार्जिगला लावलेला असताना कधीच मोबाईलचा वापर करू नये
 • आपला मोबाईलचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये.आणि शक्यतो आपल्या मोबाईलवर फेस लाँक लावावा.याने मोबाईलच्या समोर जोपर्यत आपला चेहरा नेणार नाही तोपर्यत त्याचा लाँक खोललाच जाणार नाही.
 • आपली सर्व बँक डिटेल मोबाईलमध्ये लिहुन ठेऊ नये.अशाने कोणीही आपला मोबाईलचा पासवर्ड माहीत असलेली व्यक्ती आपल्या बँक डिटेलचा गैरवापर करण्याची शक्यता असते.
 • मोठया आवाजात हेडफोनवर गाणे ऐकु नये.
 • रात्री झोपताना आपला मोबाईल शरीरापासुन लांब अंतरावर ठेवावा.
 • डोळयांना त्रास होऊ नये म्हणुन मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवावा. 

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *