आपल्या भारत देशाच्या विकासाचे मुख्य श्रेय हे आपल्या देशातील तरूण पिढीला जाते. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून आपल्या देशाच्या लहानापासुन मोठया उद्योग मंत्रालयांनी ह्या गोष्टीला नजरेत ठेवून लहान सहान उद्योजकांना, व्यापारींना त्यांच्या व्यापारात, उद्योगधंद्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणुन एम एस एम ई ची आँनलाईन पदधतीने नोंद करणे सुरू केले आहे. आणि आजच्या ह्या लेखात आपण ह्याच एम एस एम ई (MSME) विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

एम एस एम ई (MSME) चे पूर्ण नाव किंवा Full Form हे Micro Small and Medium Enterprises असे आहे. आणि एमएसएमई (MSME) चा मराठीत अर्थ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग असा होतो.
MSME Information In Marathi
संस्थेचे नाव (Name Of Organization) | सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (Micro Small and Medium Enterprises) |
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | https://msme.gov.in/ |
MSME Meaning in marathi । एम एस एम ई म्हणजे काय?
छोटया तसेच मध्यम स्वरुपी उद्योगांमध्ये चालना निर्माण होण्यासाठी सरकारकडुन काही छोटया मोठया नियमावलींची यात घोषणा केली जात असते. आणि संबंधित उद्योगातील नियमावलीत जर आपल्याला काही नवीन बदल हवा असेल तर त्यासंबंधी काही नवीन कायद्यांची निर्मिती MSME द्वारा केली जात असते.
एम एस एम ई चे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात:
- सुक्ष्म उद्योग (Micro Enterprises)
- लघु उद्योग (Small Enterprises)
- मध्यम उद्योग (Medium Enterprises)
वर्गीकरण (Classification) | गुंतवणूक | उलाढाल |
---|---|---|
सूक्ष्म (Miro) | 1 कोटी | 5 कोटी |
लघु (Small) | 10 कोटी | 50 कोटी |
मध्यम (Medium) | 50 कोटी | 250 कोटी |
सूक्ष्म उद्योग म्हणजे काय ?
सूक्ष्म उद्योग (Micro Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही. आणि त्याची उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.
लघु उद्योग म्हणजे काय ?
लघु उद्योग (Small Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणे यांची गुंतवणूक दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त नसते. आणि त्याची उलाढाल पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.
मध्यम उद्योग म्हणजे काय ?
मध्यम उद्योग (Medium Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणे यांची गुंतवणूक पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याची उलाढाल अडीचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.
भारतामध्ये एमएसएमई चे काय महत्व आहे?
- आपल्या भारत देशातील समुळ 45 टक्के अर्थव्यवस्थेत एम एस एम ई चा वाटा आहे. आणि ज्या लोकांना केंद्र तसेच राज्य सरकारकडुन मिळत असलेल्या सोयी सुविधांचा लाभ हवा असेल त्यांना सर्वात आधी एम एस एम ई मध्ये आपली नाव नोंदणी करावी करावी लागत असते.
- असे उद्योजक ज्यांचा समावेश हा सुक्ष्म तसेच मध्यमवर्गीय उद्योजकांत होतो अशा उद्योजकांना ह्यातुन कमी व्याजदर,उत्पादनाच्या दरात सवलत आणि योजना कर सबसिडी अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येत असतो.
- उद्योग विश्वात जेव्हा आपल्याला कधीही कोणत्याही वस्तुच्या दरात सवलत प्राप्त करायची असेल तर अशा वेळी सर्वप्रथम आपल्याला उद्योग आधार मध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे फार आवश्यक असते.
- आपल्याला जर आपला स्वताचा एखादा सुक्ष्म उद्योग, लघूउद्योग,तसेच एखादा मध्यम प्रतीचा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आधी एम एस एम ई चे प्रमाणपत्र प्राप्त करावे लागत असते.त्याशिवाय आपण आपला उद्योग सुरू करू शकत नसतो.
एम एस एम ई मध्ये आपले नाव नोंदणी केल्यानंतर व्यापारी तसेच उद्योजकांना याचे अनेक फायदे होत असतात. ते सर्व फायदे पुढीलप्रमाणे:
1. बँकिंग क्षेत्रात प्राप्त होणारे लाभ : एम एस एमई मध्ये ज्या व्यापारी तसेच उद्योजकांच्या नावाची नोंदणी केलेली असते.त्यांना सहजरीत्या कोणत्याही बँकेतुन कर्ज प्राप्त होत असते.एवढेच नव्हे तर त्यांना व्याजदरात देखील सुट दिली जात असते.
2. राज्य सरकारकडून मिळत असलेली सवलत: एम एस एम ई मध्ये ज्या उद्योजक तसेच व्यापारींचा समावेश असतो त्यांना वीज देयकात तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये देखील सबसिडीचा लाभ मिळत असतो.आणि ह्या सबसिडीमुळेच व्यापारी तसेच उद्योजकांना वीजेमध्ये चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त होत असते.याचसोबत राज्य सरकार देखील अशा व्यापारी तसेच उद्योजकांना विक्री दरात चांगली सवलत देत असते.
3. टँक्स मध्ये मिळणारे फायदे: एम एस एम ई मध्ये नाव नोंदणी केल्यामुळे सर्व व्यापारी तसेच उद्योजकांना उद्योग व्यवसायामध्ये जो कर भरावा लागत असतो त्यात देखील सुट दिली जात असते.याचसोबत सरकारच्या मदतीचा हात घेऊन जे व्यापारी तसेच उद्योजक आपल्या व्यापाराची तसेच उद्योगाची स्थापणा करत असतात त्यांना देखील सबसिडी दिली जात असते.
4. केंद्र तसेच राज्य सरकारकडुन मिळत असलेले मान्यतेचे लाभ: जर एखाद्या व्यापारी तसेच उद्योजकाला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संमतीपत्राची गरज असेल तर त्याला ते संमतीपत्र एम एस एम ई मध्ये नाव नोंदणी केलेली असल्यामुळे झटक्यात प्राप्त होत असते.
- आपल्याला जर आपल्या उद्योग व्यवसायासाठी एम एस एम ई कडुन कर्ज प्राप्त करायचे असेल तर आपला उद्योग व्यवसाय दोन ते तीन वर्ष जुना असणे गरजेचे आहे.
- ज्या उद्योग व्यवसायासाठी आपल्याला एम एस एम ई कडुन कर्ज हवे असते त्या उद्योग व्यवसायातील आपला Turnover हा कमीत कमी 10 लाख असावा लागतो किंवा त्यापेक्षा जास्त असावा लागतो.
- ज्या उद्योग व्यवसायासाठी आपल्याला एम एस एम ई कडुन कर्ज प्राप्त करायचे असते त्या उद्योग व्यवसायातील आपण भरलेला आरटीआर कमीत कमी दीड लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- जर आपल्याला एम एस एम ई मध्ये आपले नाव नोंदवायचे असेल तर आपले घर किंवा आपला व्यवसाय या दोघांपैकी एक तरी आपल्या स्वताच्या नावावर असणे फार गरजेचे आहे.
- आपल्या उद्योग व्यवसायातील निघणारा टर्न ओव्हर हा 5 करोड पेक्षा जास्त नसावा.तरच आपण एम एस एम ई मध्ये आपले नाव नोंदवु शकतो.
- पँन कार्ड
- आधार कार्ड
- दोन पासपोर्ट साईज मधील फोटो
- संपत्तीसंबधित सर्व महत्वाची कागदपत्रे
- शपथ प्रमाणपत्र
- एन ओसी प्रमाणपत्र
- पुरावा म्हणुन दोन व्यक्ती
एम एस एम ई मध्ये आपण Offline तसेच Online ह्या दोन पदधतीने आपल्याला नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतो.
- जर आपल्याला सुक्ष्म लघु तसेच मध्यम प्रतीचा व्यापार उद्योगा सुरू करायचा असेल तर आपण आपल्या व्यवसायासंबंधित स्थापित केल्या गेलेल्या एस एस एम ई च्या कार्यालयात जाऊन त्यासाठी एक अर्ज करावा लागेल.
- मग अर्ज भरून झाल्यावर आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तिथे कार्यालयात तो अर्ज जमा करावा लागतो.
- अर्ज जमा करण्याअगोदर एखाद्या तज्ञाकडुन त्याची फेरतपासणी नक्की करून घ्यावी.आणि त्याविषयी माहीती देखील प्राप्त करून घ्यावी.
- मग त्यानंतर आपल्या जिल्हयातील उद्योग केंद्रात जाऊन आपला अर्ज जमा करावा लागेल.
- मग यानंतर आपला अर्ज हा संबंधीत विभागात पाठवला जातो आणि तिथे आपल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते.आणि सर्व अटी पुर्ण झाल्यानंतर आपल्याला मंजुरी दिली जात असते.त्यानंतर मग आपल्याला एम एस एम ई कडुन एक प्रमाणपत्र देखील दिले जाते.
आणि याची सुचना देखील आपल्याला ईमेल करून दिली जाते किंवा आपल्या पत्यावर पोस्टाने सुचित केले जाते.
- एम एस एम ई मध्ये आँनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एम एस एम ई च्या आँफिशिअल साईट वर जावे लागेल.

- https://udyamregistration.gov.in/UdyamRegistration.aspx या लिंकला भेट देऊन आधार क्रमांक, मालकाचे नाव इत्यादी भरल्यानंतर ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर किंवा ईमेलवर एक ओटीपी म्हणजेच युनिक नंबर येईल, जो तुम्हाला फॉर्म मध्ये टाकावा लागेल आणि फॉर्म मध्ये खाली दिलेला कॅप्चा टाकून सबमिट करावा लागेल.
- जेव्हा तुम्ही एमएसएमई उद्योग सुरू करता तेव्हा तुम्हाला अंतिम नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला अंतिम एमएसएमई प्रमाणपत्र दिले जाते.
- एकदा उत्पादन सुरू झाल्यावर तुम्ही कायमस्वरूपी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.
एम एस एम ई मध्ये मदतीसाठी मागणी करण्यासाठी किंवा काही तक्रार करण्यासाठी काय करावे?
जर आपल्याला एम एस एम ईच्या योजनेबाबत काही समस्या असेल काही अडचण असेल तसेच काही तक्रार करायची असेल तर आपण एम एस एमईच्याकडे आपली समस्या सांगुन त्याचे निवारण करू शकतात. त्यासाठी एम एस एम एम ई ने आपले काही मदतीसाठी तसेच तक्रारीसाठी काही हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे :
Prime minister employment generation program tollfree number | 01123063641 |
For basic information tollfree number | 01123063288, 01123063643 |
For registration tollfree number | 23061500, 23061546 |
एम एस एम ई (MSME) विषयी FAQ
एम.एस.एम.ई. या पुर्ननिर्धारित योजनांची आखणी 2020 वर्षी झाली.
भारतात एम.एस.एम.ई. द्वारे प्राप्त होणारे एकूण उत्पादन हे देशाच्या जी.डी.पी. च्या 45 टक्के आहे.
आशा आहे की आम्ही दिलेल्या MSME Information In Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या MSME Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :