Home » Government Schemes » Central Government Schemes » Pradhan Mantri Yojana » प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती: नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्ट्ये | Mudra Loan Information In Marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती: नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्ट्ये | Mudra Loan Information In Marathi

Mudra Loan Information In Marathi: तुमच्या नवीन उद्योगाला कर्ज मिळवा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्या. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | Mudra Loan Information In Marathi

तुम्ही स्वतः चा नवीन उद्योग सुरू करणार असाल. तर त्या साठी आर्थिक सहकार्याची गरज पडतेच. उद्योग उभारण्यासाठी पैशांची गरज असते. तसेच, तुमच्या नवीन उद्योगाला कर्ज मिळणेही अवघड जाते. तर, आता स्वतः च्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज मिळणे सोपे झाले आहे. केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे तुम्हाला कर्ज मिळेल.

योजनेचे नावप्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Scheme )
योजनेचा प्रकारकेंद्र पुरस्कृत योजना
उद्देशलघु उद्योग व व्यवसायांना विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे. तसेच त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे.
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mudra.org.in/

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) मधील मुद्रा चा फुल फॉर्म म्हणजेच MUDRA = Micro Units Development Refinance Agency Limited ( मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्सिंग एजन्सी लिमिटेड ) होय.

मुद्रा योजना म्हणजे काय ?

मुद्रा (MUDRA) या संस्थेची स्थापना भारत सरकारने लघु व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलेली एक वित्तीय संस्था आहे.

मुद्रा कॉर्पोरेट नसलेल्या लघु उद्योगांना बँका, एनबीएफसी आणि एमएफआय या सारख्या विविध वित्तीय संस्थांच्याकडून निधी पुरवण्याचे काम करते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेला ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. २०,००० करोड भांडवल असलेली मुद्रा बँक स्थापन केली गेली.

भारत सरकारने या योजनेतून उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच, देशातील नागरिकांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

आत्तापर्यंत खूप उद्योजक व व्यावसायिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. बँक मध्ये अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन १० लाखापर्यंतचे कर्ज मिळवू शकता. या योजने अंतर्गत तुम्ही कमर्शियल वाहन म्हणजे व्यापार उपयोग करीता वाहन खरेदी करण्यासाठी लोन मिळवू शकता. त्यामध्ये ट्रॅक्टर, ऑटो रिक्शा, टॅक्सी, ट्रॉली, मालवाहतूक वाहन, तीन चाकी वाहन, ई-रिक्शा इत्यादी खरेदी करण्यासाठी लोन मिळते.

Pradhan Mantri Mudra Loan Yojana च्या माध्यमातून कृषि व पशुपालन व्यवसाय, व्यापारी, दुकानदार तसेच सेवा क्षेत्रातील व्यवसायांना कर्जाची रक्कम दिली जाते. कर्ज रक्कम लाभार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना मुद्रा कार्ड दिले जातात.

प्रधानमंत्री मुद्रा लोनचे प्रकार

कर्ज रकमेवर आधारित मुद्रा कर्ज तीन प्रकारे विभागले आहे.

  1. शिशु कर्ज : लाभार्थ्याला मुद्रा योजने अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर होऊ शकते.
  2. किशोर कर्ज : लाभार्थ्याला मुद्रा योजनें अंतर्गत कर्ज ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
  3. तरुण कर्ज : लाभार्थ्याला मुद्रा योजने अंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.

एमएफआय द्वारे १ लाख पर्यंतच्या कर्जासाठी असणारी योजना म्हणजे सूक्ष्म कर्ज योजना, व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नॉन बँकिंग वित्तीय संस्था आणि लघु वित्त बँका यासाठी पुनर्वित योजना.

मुद्रा कर्जाचे उद्देश

  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा मुख्य उद्देश लघु उद्योग व व्यवसायांना विकास करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून आर्थिक सहाय्य करणे.
  • मुद्रा कर्ज रक्कम व्यवसायांकरिता दिले जाते. त्यामुळे व्यवसायातून उत्पन्न वाढते.
  • युवकांना रोजगाराची संधी निर्माण होते 
  • उद्योजकांना आपला व्यवसाय कोणत्याही अडचणी शिवाय चालवण्यासाठी मुद्रा कार्डद्वारे कार्यरत भांडवली कर्ज दिले जाते.
  • कमी उत्पन्न गटांना तसेच कमी भांडवली उद्योग करू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची उभारणी आणि विस्तार करण्यासाठी पत स्वरूपात मदत मिळते.
  • मुद्रा या वित्तीय संस्थेद्वारे विक्रेते, व्यापारी, दुकानदार आणि इतर सेवा क्षेत्रासाठी व्यवसाय कर्ज दिले जाते.
  • व्यवसायामध्ये वाहनांची सुध्दा गरज पडते. त्याकरिता मुद्रा योजना परिवहन वाहन कर्ज सुद्धा पुरविते.
  • ट्रॅक्टर, ट्रेलर आणि दुचाकी वाहन घेण्यासाठी कर्ज जे व्यावसायिक हेतूने घेतले जाते.
  • लघु व सूक्ष्म उद्योजकांना उद्योगाकरिता लागणाऱ्या मशिनरी किंवा उपकरणे लागतात. त्या खरेदी करण्यासाठी कर्ज मिळते.
  • कृषी क्षेत्रातील उत्पन्न किंवा कृषी संबधीत बिगरशेती उत्पन्न निर्मिती व्यवसायांसाठी मुद्रा कर्ज देते. उदाहरणार्थ – कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन आणि मत्स्य पालन.
  • सर्व लघु उद्योग वित्त संस्था आणि संबंधित घटकांची नोंदणी करणे आणि नंतर त्यांचे नियमन करणे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे  लाभ

  • मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
  • मुद्रा कर्जासाठी कमीतकमी कर्जाची रक्कम नाही.
  • मुद्रा कर्जाचा मुख्य लाभ म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नाही.
  • मुद्रा कर्ज योजनेत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणूनच, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात. 
  • मुद्रा कर्ज विना गॅरंटी व तारण दिले जाते. परतफेड कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी पात्रता

ज्या उद्योजकांना आपल्या लघु उद्योगासाठी १० लाखापर्यंत कर्ज हवे आहे. अशा उद्योजकांना मुद्रा कर्ज मिळू शकते. छोटा व्यवसाय सुरु करणारे लोक आणि तसेच लहान व्यवसायात वाढ होण्या आधीच मुद्रा कर्ज योजने साठी अर्ज करू शकतात.

१ ) कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे.

२ ) अर्जदार कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना महत्वाची कागदपत्रे / दस्तावेज :

  • लाभार्थ्याचे ओळख पुरावा ( Identity Proof ) – आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र
  • व्यवसाय ओळख व पत्ता पुरावा
  • व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा
  • व्यवसायाच्या श्रेणीचा पुरावा
  • मागील दोन वर्षांचा ताळेबंदसह आयकर परतावा
  • मागील सहा महिन्याचे बॅंक विवरण ( Bank Statement )

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.

  1. आपणास जवळच्या संबंधित बँकेत जावून मुद्रा योजनेचा अर्ज प्राप्त करावा.
  2. अर्जामध्ये नाव, पत्ता, आधार नंबर व इतर माहिती भरून त्यासोबत संबंधित सर्व कागदपत्रे जोडावीत.
  3. बँक अधिकारी आपल्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करुन अर्ज स्वीकारतील.
  4. आपल्या बँक खात्यावर १ महिन्यात कर्ज रक्कम प्राप्त होईल.
  5. अशाप्रकारे आपण प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुद्रा लोन साठी पोर्टलवर लॉगिन कसे करावे ?

Mudra Loan login in marathi
  1. पहिल्यांदा आपण मुद्रा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ उघडावे.
  2. आपणासमोर मुख्यपृष्ठ उघडेल.
  3. मुख्य पृष्ठावरती आपणास लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. त्या बटणावरती क्लिक करावे.
  4. आता आपणासमोर एक लॉगिन करण्यासाठी पृष्ठ उघडेल. त्यामध्ये आपण आपले वापरकर्तानाव (Username), संकेतशब्द (Password) आणि दिलेला कॅप्चा कोड (Captcha Code) समाविष्ट करावे.
  5. त्यांनतर लॉगिन बटणावर क्लिक करावे.
  6. आता आपण मुद्रा पोर्टलवरती यशस्वी लॉगिन केले असेल.

अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेशी संपर्क साधावा किंवा https://www.mudra.org.in/ या संकेतस्थळास भेट द्या.

मुद्रा लोन देणाऱ्या बँका ( Mudra Loan Bank List ) :

  1. Public Commercial Banks :
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • कॅनरा बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • इंडियन बँक
  • इंडियन ओवरसिस बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • पंजाब & सिंध बँक
  • UCO बँक
  1.  Private Commercial Banks
  2. State Cooperative Banks
  3. Regional Rural Banks
  4. Micro Finance Institutions

Frequently Asked Questions (FAQ) On Mudra Loan In Marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेतंर्गत किती रक्कम मिळणार आहे?

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना १० लाखापर्यंत कर्ज रक्कम मिळणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी वयाची अट किती आहे?

या मुद्रा योजनेसाठी लाभार्थी वय १८ ते ६५ दरम्यान असावे.

या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असावी?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी लाभार्थी भारतीय नागरिकत्व असलेला असावा. तसेच तो कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखात दिली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचा परतफेड कालावधी किती आहे?

जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले, तर कर्ज घेतल्यापासून तीन ते पाच वर्ष हा त्या कर्जाचा परतफेड कालावधी असेल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी व्याजदर किती आहे?

प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी व्याजदर प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेसाठी वेगवेगळे असते. त्या संबंधित माहिती बँकेतून मिळवावी.

आशा आहे की आम्ही दिलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Mudra Loan Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *