मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची सुरूवात ही राज्य सरकारने सन २०१९ मध्ये केली होती. प्रत्येक शेतकरीला सिंचन सुविधा प्राप्त करून द्यावी हा मुख्य हेतु डोळयासमोर ठेवून ही योजना सरकारने चालु केली होती.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) हा अशा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे ज्याच्याद्मध्ये राज्य सरकार आपल्या संपुर्ण महाराष्टातील सर्व शेती करत असलेल्या शेतकरी मित्रांना शेतीचे सिंचन करता यावे यासाठी सोलर पंप वितरीत करत असते याचाच अर्थ ह्या योजनेत सरकार आपणास सौर उर्जेवर चालत असणारे सौर पंपचे वितरण करणार आहे.
आणि जुने डिझेल तसेच विजेचे पंपाचे सोलर पंपामध्ये परिवर्तन करणार आहे.याचाच अर्थ ह्या योजनेमध्ये सर्व जुने डिझेल तसेच वीजेचे पंप काढुन त्यांच्याठिकाणी नवे सौरपंप बसविणार आहे.सोबतच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या मार्फत सर्व शेतकरी मित्रांना महाराष्ट सरकार आपल्या वतीने सबसिडीची सुविधा देखील देणार आहे.
चला तर मग ह्या योजनेविषयी अजुन सविस्तरपणे जाणुन घेण्यासाठी ह्या योजनेची संपुर्ण माहीती जाणुन घेऊयात.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022 । अटल सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022 | Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra 2022
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, अटल सौर कृषी पंप योजना, Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana |
योजनेचा प्रकार | 90% सब्सिडी |
यांच्याद्वारे सुरु केले आहे | महाराष्ट्र राज्य सरकार |
उद्देश | प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा सहाय्य करणे. |
लाभार्थी | सर्व महाराष्ट्रातील शेतकरी |
लाभाचे स्वरूप | लाभार्थी शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालत असणारे सौर पंप देण्यात येईल. |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahadiscom.in/solar/ |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप ह्या योजनेचा अर्थ काय आहे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही एक प्रामुख्याने शेतकरींसाठी राबविली गेलेली योजना आहे.आणि ही सदर योजना राज्य सरकारकडुन राबविण्यात आलेली आहे.ह्या योजनेमध्ये राज्य सरकार महाराष्टामधील सर्व शेतकरी मित्रांना सोलर पंपची सुविधा देणार आहे ज्यामुळे शेतकरींना व्यवस्थितपणे शेतीचे सिंचन करता येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यामागचा सरकारचा मुख्य हेतु काय आहे
आपण सर्वच जण चांगलेच जाणतो की आपण ज्या देशात राहतो तो भारत देश हा एक शेतीप्रधान देश आहे.त्यामुळे येथे लोक जी काही मिळकत प्राप्त करता करता त्या मिळकतीचे प्रमुख स्रोत सुदधा शेती हेच आहे.
पण आपल्या देशात शेतीसाठी हवे तेवढे पाणी उपलब्ध नसल्या मुळे आपल्या देशातील शेतकरी हे पिकांना पाणी मिळावे यासाठी पावसाची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहतात.म्हणुन शेतकरी मित्रांची हीच अडचण कायमची दुर व्हावी यासाठीच आपल्या महाराष्ट सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सर्व शेतकरींसाठी आणली आहे.ह्या योजनेमध्ये महाराष्ट सरकार अशा शेतकरींना वीजेची पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देत आहे ज्यांना अदयाप विजेची सुविधा प्राप्त झालेली नाहीये.आणि अशाच ठिकाणी सोलर पंपच्या माध्यमाने शेतीचे सिंचन करण्याची सोय सुविधा उपलब्ध करून दिली गेली पाहिजे हा मुख्य हेतु ही योजना सुरू करण्यामागचा महाराष्ट सरकारचा आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ह्या योजनेतुन सौर पंप प्राप्त होऊन महाराष्टातील सर्व शेतकरी मित्रांच्या कमाईमध्ये वाढ होईल आणि त्यांना बाजारात जाऊन महाग किंमतीचे सौरपंप खरेदी करण्याची गरज भासणार नाही हा देखील महाराष्ट सरकारचा सदर योजना राबवण्या मागचा मुख्य हेतु असलेला आपणास दिसुन येतो.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतुन आपल्याला सर्व (शेतकरी मित्रांना) होणारे फायदे कोणकोणते आहेत?
- ह्या योजनेचा फायदा घेऊन सर्व शेतकरी मित्र सौर कृषी पंपाचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून लाभ घेऊ शकतात.
- आणि ज्या शेतकरींची 5 एकर पेक्षा जास्त प्रमाणात शेती असेल अशा शेतकरींना ही योजना 5 hp तसेच 5 एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकरींना 3 hp चे पंप देखील देणार आहे.
- आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी ह्या योजनेच्या प्रथम दितीय आणि त्रितीय टप्प्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांना महाराष्ट सरकार तब्बल 25 हजार सौर पंप वितरीत करणार आहे.आणि ही महाराष्टातील सर्व कष्टकरी शेतकरी मित्रांसाठी एक लाभदायक बाब आहे.
- आणि पर्यावरणाचे होणारे प्रदुषण थांबावे तसेच ते कमी व्हावे यासाठी जुन्या डिझेल पंपांच्या ऐवजी ह्या योजनेअंतर्गत नवीन सौर बसवुन त्या पंपांचा वापर देखील विनियोग करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सहभागी होण्यासाठी आपली पात्रता काय असावी ?
1. ह्या योजनेचा लाभ फक्त तेच शेतकरी लोक घेऊ शकतात जे महाराष्टातील रहिवासी आहेत. म्हणजेच ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरी हा महाराष्टातील मुळ रहिवासी असावा लागतो.
2. ह्या योजनेचा लाभ असे शेतकरी देखील घेण्यास पात्र आहेत.ज्यांच्या शेतीमध्ये सिंचनाचे साधन आधीपासुन उपलब्ध आहे.
3. ज्यांच्या राहत्या विभागात,क्षेत्रामध्ये अजुनही पाहिजे तेवढी पुरेशी वीजेची सोय उपलब्ध नाहीये असे शेतकरी सुदधा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात?
- आधार कार्डची प्रत
- ओळखीचे प्रमाण (identity proof)
- रहिवासी प्रमाणपत्र
- शेतीची सर्व महत्वपुर्ण डाँक्युमेंटस
- बँक अकाऊंट पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो (दोन)
वरील सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री सौर कृषी पंप ह्या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आपल्याला जोडावीच लागणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आँनलाईन अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता अर्ज करण्याच्या पहिले आपण आपल्याकडे आपल्या जमिनीचा ७/१२, आपले आधार कार्ड ठेवावे. आणि समजा आपण जर मागासवर्गीय प्रवर्गातील आहे तर जातीचा दाखला ही सर्व प्रमुख कागदपत्रे स्कँन करून त्यांची फाईल आपण आपल्या जवळ ठेवावी. कारण जेव्हा आपण आँनलाईन अर्ज भरत असतो तेव्हा आपल्याला तिथे ह्या सर्व कागदपत्रांच्या फाईल्स अपलोड करायच्या असतात.म्हणुन आपण ही सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीच. त्याचबरोबर आपण जिथे सौर कृषी पंप बसविणार आहे त्या जागेचा महावितरण ग्राहक क्रमांक देखील आपण माहीती करून घ्यावा.
- सर्वात पहिले आपण आपल्या Laptop तसेच कंप्युटरवर गुगल ओपन करायचे मग सर्च बारमध्ये टाईप करायचे mahadiscom.in/solar
- मग महावितरणची वेबसाईट ओपन होईल आपल्याला तिथे दोन पर्याय दिसतील स्कीन इन्फो आणि बेनिफिशरी सर्विसेस मग त्या दोन पर्यायापैकी बेनिफिशरी सर्विसेस या पर्यायावर ओके करायचे याने आपल्याला बरेच पर्याय दिसुन येत असतात त्यापैकी आपण apply online ह्या आँप्शनला क्लीक करावे.मग क्लीक केल्यावर आपल्याला अजुन पाच पर्याय दिसुन येतात.ते पुढीलप्रमाणे:
1)New customer, consumer
2)paid pending customer, consumer
3)click here for applying off-grid
4)solar agriculture pump 7.5
5)hp load
वरील दिलेल्या पाचही पर्यायांपैकी इतर कोणत्याही पर्यायावर क्लीक न करता आपण चौथ्या क्रमांकाच्या पर्यायावर क्लीक करायचे .मग क्लीक केल्यावर आपल्यासमोर एक application form येतो जो आपण इंग्रजी तसेच मराठी ह्या दोन्ही भाषेत भरण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध असते.आणि मग आपल्याला तिथे विचारलेली सर्व माहीती आपण त्या अर्जात अचुकपणे न चुकता भरायची असते.
सौर कृषी पंप बसविण्याचे कोणकोणते फायदे आपल्याला होतील?
- आपल्या शेतीसाठी अखंड वीज पुरवठा सौर कृषी पंप बसविल्याने आपल्याला मिळेल.
- विजेच्या बिलापासुन आपली कायमची सुटका होईल.
- सौर कृषी पंप बसविल्याने पर्यावरणाला पुरक असे परिचलन निर्माण होण्यासाठी मदत होत असते.
- डिझेल पंपाच्या तुलनेमध्ये शुन्य परिचलन खर्च आपल्याला सौर कृषी पंप बसविल्यावर भरावा लागतो.
- ह्या योजनेत शेतकरीं मित्रांना दिवसा सुदधा सौर उर्जा उपलब्ध केली जाईल.
- विद्युत पंपाच्या दुरुस्ती साठी जो खर्च आपल्याला करावा लागायचा तो आता आपल्याला करावा लागणार नाही.
सौरपंपाची कोणकोणती वैशिष्टये आपल्याला बघायला मिळतात?
- ह्या योजनेमध्ये केवळ dc pump समाविष्ट केला आहे आणि ह्या डिसी पंपाची कार्य करण्याची क्षमता ही एसी पंपाहुन खुपच जास्त प्रमाणात असते.
- सौरपंपासोबतच दोन एल ईडी बल्ब कोणतेही शुल्क न आकारता आपल्याला मोफत मध्ये दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज स्थिती कसे चेक करायचे?
- सगळयात आधी आपणास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल मग त्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्यासमोर एक होम पेज येते.
- ह्या होम पेजवरच आपल्याला benefieciery services असे एक आँप्शन दिसुन येईल आपल्याला ह्याच आँप्शनवर क्लीक करायचे असते.
- त्यानंतर track application status नावाचे आँप्शन येते तिथे सुदधा आपल्याला क्लिक करायचे असते

- त्यांतर आपल्या मोबाईल,लँपटाँप,कंप्युटर च्या स्क्रीनवर एक पेज ओपन होते तिथे आपल्याला आपले application status बघण्यासाठी beneficiery id टाकुन सर्च वर ओके करायचे असते.
- यानंतर आपल्यासमोर आपल्या अर्जाचे application status येऊन लागते.
अंतिम निष्कर्ष:
अशा पद्धतीने आज आपण Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra 2022 बद्दल संपूर्ण माहितीबघितली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022 माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा: