Home » Business & Finance » Finance » [अगदी सोप्या भाषेत] Mutual Fund Information In Marathi | म्यूचुअल फंड मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti)

[अगदी सोप्या भाषेत] Mutual Fund Information In Marathi | म्यूचुअल फंड मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti)

म्यूचुअल फंड विषयी माहीती (Mutual Fund Information In Marathi) : आज आपल्याला कोणी कितीही पुरावा दिला की म्युच्अल फंड आपल्यासाठी सुरक्षित आहे तरी आपल्या मनात कुठेतरी भीती ही असतेच की म्यूचुअल फंड मध्ये पैसे गुंतविल्यावर माझे नुकसान तर होणार नही ना? माझे पैसे बुडणार तर नाही ना?

कारण आपण म्यूचुअल फंडविषयी स्वता वैयक्तिक कोणताही अनुभव घेतलेला नसतो. म्हणुन आपल्या मनात म्यूचुअल फंड विषयी हा संभ्रम निर्माण होत असतो.

आजच्या लेखात म्हणुन आपण म्यूचुअल फंड (Mutual Fund) विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. जेणेकरून आपल्या मनातील हा संशय दुर होण्यास मदत होईल.

चला तर मग जाणुन घेऊयात म्यूचुअल फंडविषयी.

Contents hide
1. म्यूचुअल फंड मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti)। Mutual Fund Information In Marathi

म्यूचुअल फंड मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti)। Mutual Fund Information In Marathi

गुंतवणूकीचा प्रकार (Investment Type)म्यूचुअल फंड (Mutual Fund)
म्युच्युअल फंड साठी मराठी शब्द (Mutual Fund Marathi Word)सामाईक निधी
म्युच्युअल फंड नियामक संस्था (Mutual Fund Regulatory Body)भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) [Securities and Exchange Board of India (SEBI)]

म्युच्युअल फंड म्हणजे काय (What is Mutual Fund in Marathi)? | Mutual Funds Meaning in Marathi

म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा निधी असतो जो विविध कंपन्या, तसेच सर्वसामान्य व्यक्तींकडुन गोळा केला जात असतो.

आणि हा लोकांनी गुंतवणुक केलेला सर्व पैसा हा विविध ठिकाणी गुंतवला जात असतो.

जेणेकरून गुंतवणुकदारांनी जितका पैसा Mutual Fund मध्ये गुंतवलेला आहे. त्यापेक्षा अधिक पटीने त्यांना प्राप्त होत असतो.

आणि हा निधी गोळा करण्यासाठी एक फंड मँनेजर (Fund Manager) ची नेमणुक केली जात असते. जो ह्या गोळा केलेल्या पैशांचे योग्य ठिकाणी त्यांची गुंतवणुक करून व्यवस्थापण करत असतो.

म्युच्युअल फंडाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत जिथे आपण आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो ? | Mutual Funds Types in Marathi

तसे पाहायला गेले तर म्युचअल फंडचे खुप प्रकार असलेले आपणास दिसुन येतात.पण सगळयात आधी आपण म्युच्अल फंडचे मुख्य प्रकार किती आणि कोणकोणते आहेत हे जाणुन घेऊयात.मग त्याचे उपप्रकार देखील समजुन घेऊ.

म्युच्युअल फंडाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

 1. इक्विटी म्यूचुअल फंड (Equity Mutual Fund)
 2. डेब्ट म्यूच्यूअल फंड (Debt mutual fund)
 3. हाइब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund)

1. इक्विटी म्यूचुअल फंड (Equity Mutual Fund)

ज्या पैशांची आपण इक्विटी फंडमध्ये गुंतवणुक करत असतो.त्या पैशांचा वापर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी केला जात असतो.इथे आपल्याला जेवढा लाभ प्राप्त होत असतो तेवढीच जोखिम देखील घ्यावी लागत असते.

इक्विटी फंड (Equity Fund) चे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

 1. मिड कैप इक्विटी फंड (Mid Cap Equity Fund)
 2. स्मॉल कैप इक्विटी फंड (Small Cap Equity Fund)
 3. लार्ज कैप इक्विटी फंड (Large Cap Equity Fund)

2.डेब्ट म्यूच्यूअल फंड (Debt Mutual Fund) | Debt Fund Meaning in Marathi

डेब्ट फंड (Debt Fund) मध्ये जे पैसे आपण गुंतवत असतो ते अशा ठिकाणी गुंतवले जातात जिथुन आपल्याला ठरलेली निश्चित रक्कम प्राप्त होत असते.म्हणुन ह्या फंडमधून आपल्याला जास्त रिटर्न प्राप्त होत नाही.पण यात आपल्या पैशांना कोणताही धोका देखील नसतो.

डेब्ट फंड (Debt Fund) चे काही महत्वाचे प्रकार :

 1. डायनेमिक बॉन्ड (Dynamic bond)
 2. इनकम फंड (Income Fund)
 3. लिक्विड फंड (Liquid Fund)
 4. गिल्ट फंड (Gilt Fund)
 5. फिक्स्ड मॅच्युरिटी फंड Fixed Maturity Fund)
 6. क्रेडिट आँपर्च्युनिटी फंड (Credit Opportunity Fund)

3. हाइब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund)

हाइब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund) मध्ये आपण एकापेक्षा अधिक ठिकाणी आपले पैसे गुंतवू शकतो.

हाइब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund) चे प्रकार :

 1. एग्रेसिव हाइब्रिड फंडAggressive Hybrid Fund
 2. बँलेन्स हाइब्रिड फंड (Balance Hybrid Fund)
 3. डायनँमिक एलोकेशन (Dynamic allocation)
 4. मल्टी एसेट एलोकेशन फंड (Multi Asset Allocation Fund)
 5. आर्बिटरीज फंड (Arbitrage Fund)
 6. इक्विटी सेविंग फंड (Equity Savings Fund)

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी

 • Mutual Fund मध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करण्यासाठी आपण एखाद्या ऑनलाईन ट्रेडिंग साइट वर देखील आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो. किंवा आपण ग्रो अँप (Groww App) द्वारे देखील म्यूच्यूअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो.
 • तसेच कुठे पैशांची गुंतवणुक करावी आणि किती पैशांची गुंतवणुक करावी याबाबद आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण एखाद्या म्युच्अल फंड सल्लागारा (Mutual Fund Adviser) कडुन पैसे गुंतवण्याअगोदर सल्ला देखील घेऊ शकतो.
 • इथे आपण दोन पदधतींचा वापर करून आपले पैसे गुंतवू शकतो. जर आपल्याला Mutual Fund चे आधीपासुन चांगले ज्ञान प्राप्त असेल तर आपण म्युच्अल फंडच्या डायरेक्ट प्लँन (Direct Plan) चा वापर करू शकतो. ज्या द्वारे आपण आपल्याला हवे तिथे हव्या त्या स्कीममध्ये डायरेक्ट आपले पैसे गुंतवू शकतो.
 • पण जर आपण नवीन असाल आणि आपणास Mutual Fund चे पुरेसे ज्ञान नसेल की इथे कुठे पैशांची गुंतवणुक करावी? कशी करावी तर आपण एखाद्या म्युच्अल फंड तज्ञाचा सल्ला घेऊन देखील आपले पैसे योग्य त्या ठिकाणी गुंतवु शकता.

म्युच्अल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळत असतात? | Mutual Fund Benefits in Marathi

1. Mutual Fund मध्ये आपण एकाच वेळी वेगवेगळया ठिकाणी आपले पैसे गुंतवू शकतो. ज्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता फार कमी राहत असते.

2. म्युच्अल फंडमध्ये आपण जे पैसे गुंतवत असतो त्या पैशांची देखरेख तसेच व्यवस्थापण हे तज्ञांद्वारे केले जात असते.म्हणुन इथे आपले पैसे अशाच ठिकाणी गुंतवले जात असतात जिथुन आपण हाय रिटर्न प्राप्त करू शकतो.

3. Mutual Fund मध्ये पैशांची गुंतवणूक केल्याने आपल्याला गुंतवणुकीसाठी इतर ठिकाणी जो जास्त प्रमाणात जो खर्च करावा लागत असतो तो इथे आपल्याला करावा लागत नाही.

4. सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे म्युच्अल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा जास्त टँक्स भरावा लागत नाही.खुप कमी टँक्सची आकारणी इथे केली जात असते.

5. काही म्युच्अल फंडच्या स्कीम मधुन आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आपण पैसे काढु शकतो. म्हणजेच लिक्विडीटी (Liquidity) इथे आपणास पाहायला मिळते. पण काही म्युच्अल फंडमध्ये लाँक इन पीरीयड दिलेला असतो. जिथुन आपण ठरलेल्या कालावधीच्या अगोदर आपले पैसे काढु शकत नाही.म्हणुन पैशांची गुंतवणुक करताना आपल्याला कधी पैसे लागु शकता आणि ते किती कालांतराने लागतील हे लक्षात घेऊनच योग्य तिथे आपल्या पैशांची आपल्या गरजेनुसार गुंतवणुक आपण करायला हवी.

Mutual Fund मध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करण्यात आपल्याला कोणत्या जोखिमेला सामोरे जावे लागु शकते?

जर आपण आपल्या पैशांची गुंतवणुक डेब्ट म्युच्अल फंडमध्ये केली तर आपल्याला तिथुन एक निश्चित ठरलेली रक्कम प्राप्त होत असते.आणि इथे आपले पैसे गुंतवण्यात जास्त धोका नसतो.पण इथे डेब्ट म्युच्अल फंडमध्ये आपल्याला जास्त रिटर्न प्राप्त होत नसतो.

म्युच्अल फंडमधुन काही स्कीम मधून जसे की इक्विटी म्युच्अल फंडमध्ये आपल्याला एक निश्चित फिक्स रिटर्न प्राप्त होत नाही.कारण इथे जे पैसे आपण गुंतवत असतो ते पैसे शेअर बाजारमध्ये गूंतवले जात असतात आणि शेअर बाजार हे असे ठिकाण आहे जिथुन आपल्याला फिक्स रिटर्न हा कधीच प्राप्त होत नाही कारण इथे कधीही शेअरची किंमत वाढत तसेच कमी देखील होत असते.

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड कसा निवडावा

 1. सगळयात आधी गुंतवणुकीचे उददिष्ट ठरवणे
 2. फंड रेटिंगचे विश्लेषण करणे
 3. शेवटी योग्य तिथे गुंतवणुक

1. सगळयात आधी गुंतवणुकीचे उददिष्ट ठरवणे :

Mutual Fund ही एक गुंतवणुक असते जी काही  वर्षांच्या कालावधीसाठी तसेच दिर्घकाळासाठी वृदधाल्पकाळात चांगली रक्कम मिळावी म्हणुन आपण करत असतो. म्हणुन म्युच्अल फंडमध्ये पैसे गुंतवण्याअगोदर आपल्याला ती रक्कम कधी आणि केव्हा लागणार आहे? किती रक्कम लागणार आहे? कशासाठी लागणार आहे? हे आपण ठरवून घ्यायला हवे जेणेकरून आपल्याला त्यानुसार किती पैशांची आपण गुंतवणुक करायची जेणेकरून भविष्यात चांगले हवे ते रिटर्न मिळतील हे ठरवता येईल.

2. फंड रेटिंगचे विश्लेषण करणे :

कोणत्या फंडला किती रेटिंग प्राप्त आहे याचे विश्लेषण करावे. यासाठी रिसर्च करावे कोणत्या फंडमध्ये किती गुंतवणुक केली तर आपल्याला किती फायदा होणार आहे? कुठे गुंतवणुक करणे जोखिमकारक आहे आणि कुठे आपले पैसे सुरक्षित राहतील तसेच जोखिम आहेच तर किती जोखिम आहे याची माहीती काढावी.

3. मग शेवटी योग्य तिथे गुंतवणुक करावी :

मग गुंतवणुकीचे उददिष्ट ठरवून झाल्यावर तसेच कुठे गुंतवणुक केल्याने किती फायदा होईल? आपण अशी कुठे गुंतवणुक करावी जेणेकरून आपण गरजेला आपले पैसे काढु शकतो किंवा लाँग टर्मसाठी त्या पैशांची गुंतवणुक देखील करू शकतो? ही सर्व माहीती काढुन झाल्यावर शेवटी मग आपण आपल्या गरजेनुसार तसेच आर्थिक परिस्थितीनुसार योग्य तो प्लँन निवडुन तिथे आपले पैसे गूंतवू शकतो.

म्युच्युअल फंड बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ On Mutual Funds In Marathi)

म्युच्युअल फंड ला मराठीत काय म्हणतात?

म्युच्युअल फंड (Mutual Fund) ला मराठीत सामाईक निधी असे म्हणतात.

म्युच्युअल फंड ही कोणती सेवा आहे?

म्युच्युअल फंड ही एक प्रकारची गुंतवणूक पर्याय आहे.

म्युच्युअल फंडाचे नियमन कोणती बँक करते?

म्युच्युअल फंडाचे नियमन कोणती बँक नसते करत. Securities and Exchange Board of India (SEBI) म्युच्युअल फंडाचे नियमन करते.

म्युच्युअल फंड संस्था आपले पैसे कुठे गुंतवावे?

म्युच्युअल फंड संस्था आपले पैसे सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स (shares of listed companies), सरकारी बॉण्ड्स (government bonds), कॉर्पोरेट बॉण्ड्स (corporate bonds), अल्पकालीन मनी-मार्केट साधने (short-term money-market instruments), इतर सिक्युरिटीज किंवा मालमत्ता (other securities or assets) किंवा या गुंतवणुकीचे मिश्रण (combination of these investment) येथे गुंतवावे.

म्युच्युअल फंडातील विशिष्ट काळासाठी असलेल्या योजनेचा कालावधी किती असतो?

प्रत्येक म्युच्युअल फंडातील विशिष्ट काळासाठी असलेल्या योजनेचा कालावधी भिन्न असतो.

म्युच्युअल फंडाचे नियम कोण करते?

म्युच्युअल फंडाचे नियम Securities and Exchange Board of India (SEBI) करते.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण म्यूचुअल फंड (Mutual Fund) विषयी संपूर्ण माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली म्यूचुअल फंड (Mutual Fund) विषयी माहिती मराठी भाषेत आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या म्यूचुअल फंड विषयी माहीती (Mutual Fund Information In Marathi) संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

2 thoughts on “[अगदी सोप्या भाषेत] Mutual Fund Information In Marathi | म्यूचुअल फंड मराठी माहिती (Mutual Fund Marathi Mahiti)”

 1. अनंत शांताराम गुरव

  चांगले रिटर्न्स देणारा mutual fund कोणता ते सांगावे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *