Home » People & Society » Festival Information » नवरात्री मराठी माहिती | नवरात्र उत्सव मराठी माहिती | नवरात्री माहिती मराठी मध्ये | Navratri Information in Marathi 2021

नवरात्री मराठी माहिती | नवरात्र उत्सव मराठी माहिती | नवरात्री माहिती मराठी मध्ये | Navratri Information in Marathi 2021

नमस्कार मित्रांनो या लेखात मी आपल्याला नवरात्र (Navratra) किंवा नवरात्री (Navratri) उत्सव बददल संपूर्ण माहीती उपलब्ध करून देत आहे.

नवरात्री मराठी माहिती । Navratri Information in Marathi 2021 | Ghatasthapana Information in Marathi

उत्सवाचे नाव (Festival Name) नवरात्र (Navratra) किंवा नवरात्री (Navratri) उत्सव
नवरात्री 2021 प्रारंभ तारीख (Navratri 2021 Start Date)गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021
नवरात्री 2021 शेवटची तारीख (Navratri 2021 End Date) शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021
नवरात्री घटस्थापना मुहूर्त६ वाजुन सतरा मिनिटांपासुन सात वाजुन सात मिनिटांपर्यत

आज भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण आपण प्रत्येक धर्मातील व्यक्ती साजरा करत असतो.आपण साजरा करत असलेल्या प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टय असलेले आपणास दिसुन येते.अशाच एक वैशिष्टयपुर्ण सण म्हणजे नवरात्र.

नवरात्र हा हिंदु धर्मातील पवित्र सणांपैकी एक सण आहे.जो आपण साजरा करत असतो.नवरात्रीचा शब्दश अर्थ जाणुन घेतला तर ह्याचा अर्थ होतो नव+रात्र =नवरात्र म्हणजेच ९ रात्री साजरा केला जात असलेला सण तसेच उत्सव होय.

आज आपण ह्याच नवरात्री सण तसेच उत्सवाविषयी संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

नवरात्र म्हणजे काय?

तसे पाहायला गेले तर नवरात्र हा आपण संस्कृत भाषेतुन घेतलेला शब्द आहे.जो भाषिक व्यवहारासाठी आपण मराठी भाषेत समाविष्ट केला आहे.नवरात्रीला शारदीय नवरात्र देखील म्हणतात.

नवरात्रीत सलग नऊ रात्रींपर्यत आपण देवीच्या नऊ रुपांची पुजा,आराधना करीत असतो.ह्या नवरात्रीच्या काळात स्त्रिया प्रत्येक तारखेनुसार ठरलेल्या नऊ विविध रंगांच्या साडया नेसत असतात.

नऊ प्रकारचे नैवैद्य देवीपुढे श्रदधेने आणि भक्तीने अपर्ण करीत असतात.नवरात्रीत रात्रभर सर्व स्त्रिया मुली गरबा तसेच दांडिया खेळतात.

नवरात्रीची सुरूवात कधी होणार आहे आणि नवरात्र कधी संपणार आहे?

नवरात्र हा दरवर्षी येणारा सण तसेच उत्सव आहे.ह्या वर्षी नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्रीची सुरूवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला ७ आँक्टोंबरला होणार आहे.आणि नवरात्रीच्या ह्या प्रारंभीच्या दिवशी घटस्थापणा देखील केली जाणार आहे.१५ आँक्टोंबर पर्यत नवरात्र चालणार आहे.

नवरात्रीत घटस्थापणा करण्यासाठी शुभ मुहुर्त कोणता आहे?

ह्या २०२१ मध्ये नवरात्रीत घटस्थापणा करण्यासाठी शुभ मुहुर्त हा ७ आँक्टोंबर रोजीचा आहे.ह्या दिवशी आपण सकाळी ६ वाजुन सतरा मिनिटांपासुन सात वाजुन सात मिनिटांपर्यत कधीही घटस्थापणा करू शकतो.

घटस्थापणेसाठी लागणारी महत्वाची सामग्री कोणकोणती?

घटस्थापणेसाठी लागणारी महत्वाची सामग्री पुढीलप्रमाणे: 

  • सात प्रकारचे धान्य 
  • मातीचे भांडे 
  • माती(एखाद्या पवित्र स्थानावरील)
  • कलश 
  • गंगाजल 
  • आंब्याची पाने 
  • सुपारीचे तुकडे 
  • नारळ 
  • तांदुळ 
  • लाल कपडा 
  • फुले

घटस्थापना कशी करावी (Navratri Ghatasthapana Puja Vidhi In Marathi)

नवरात्रीमधील घटस्थापणेचा विधी पुढीलप्रमाणे आहे:

  • कलश स्थापण करताना कधीही तो घराच्या उत्तर पुर्व दिशेलाच करायला हवा.
  • घट बसवण्या अगोदर ज्या जागी घट बसवायचे आहे त्या जागेची सर्वप्रथम स्वच्छता करावी.
  • मग त्यानंतर जमिनीवर तसेच केळाच्या पानावर स्वच्छ माती पसरवुन घ्यावी.
  • त्यानंतर त्या पसरवलेल्या मातीत बियाणे पेरावे.मग असे करून झाल्यानंतर अजुन एक वेळेस स्वच्छ माती त्यावर पसरवून घ्यायची.आणि त्या मातीवर थोडे पाणी देखील शिंपडुन घ्यावे.
  • मातीवर पुरेसे पाणी शिंपडुन झाल्यानंतर आपण कलश स्थापित करायला हवा.
  • कलश भरताना तो नेहमी शुदध पाण्यानेच भरून ठेवावा.
  • जर आपल्याला कलशाच्या वर झाकण ठेवण्याची ईच्छा असेल तर आपण झाकण देखील ठेवू शकता त्यासाठी सर्वप्रथम तांदुळ भरावे आणि समजा आपल्याला जर झाकण उघडे ठेवाया असेल तर त्यात आपण आंब्याची पाने देखील टाकु शकतात.
  • मग यानंतर कलशाच्या मधोमध एक नारळ देखील आपण ठेवायला हवे.आणि दीवा लावून पुजा करावी.

नवरात्रीत आपण काय करू नये:

  • नवरात्रीत व्रत करत असताना त्या कालावधीत कधीही आपण दाढी करू नये,केस कापु नये.
  • जिथे आपण कलश स्थापित केला आहे त्या जागी अखंड ज्योत जाळावी.आणि ते ठिकाण आपण रिकामे देखील सोडायचे नसते.
  • नवरात्रीच्या काळात कोणत्याही प्रकारचे तिखट तसेच मांसाहारी भोजन आपण करायचे नसते.
  • व्रत करत असताना आपण कोणत्याही धान्याचे सेवन करू नये.फक्त फळ खायला हवीत.
  • व्रत करत असताना कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नये.

नवरात्रीची कथा :

असे म्हटले जाते की देवी दुर्गेने सलग नऊ राक्षसांशी युदध केले आणि त्यात त्यांचा संहार देखील केला.सर्व राक्षसांचा संहार करण्यासोबतच देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या क्रुर राक्षसाचा देखील संहार केला होता म्हणुन तेव्हापासुन दुर्गा देवीला महिषासुराचा वध केल्यामुळे महिषा सुर वर्धिनी म्हटले जाऊ लागले.

नवरात्र हा सण देशातील विविध भागात कशा पदधतीने साजरा केला जातो?

नवरात्र हा एक असा सण तसेच उत्सव आहे जो संपुर्ण भारतभर साजरा केला जात असतो. फक्त हा सण साजरा करण्याची प्रत्येकाची पदधत तसेच परंपरा थोडी वेगळी देखील असते.

चला तर मग जाणुन घेऊयात देशातील विविध भागांत तसेच क्षेत्रात नवरात्र कशी साजरी केली जाते असते.

1. पुर्व भारत :

पुर्व भारतामध्ये नवरात्र ह्या सण तसेच उत्सवाला दुर्गा पुजन असे म्हटले जात असते.पुर्व भारतातील पश्चिम बंगाल,बिहार, उडिसा इत्यादी राज्यांमध्ये नवरात्रीत लोकांची खुप गर्दी आपणास पाहायला मिळते.पुर्व भारतामधील लोक ह्या सणाला देवी दुर्गेची पुजा करत असतात.आणि महिषासुर सारख्या राक्षसाचा देवीने वध केला म्हणुन हा दिवस आनंदाने साजरा देखील करत असतात.

2. उत्तर भारत :

असे म्हणतात की नवरात्र हा सण उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये देखील साजरा केला जातो.उत्तर भारतामध्ये नवरात्रीत लोक नऊ दिवस उपवास ठेवत असतात.

3. पश्चिम भारत :

पश्चिम भारतामध्ये गुजरात ह्या ठिकाणी नवरात्र हा सण दांडिया नृत्य तसेच गरबा खेळुन साजरा केला जात असतो.

4. दक्षिण भारत :

दक्षिण भारतात नवरात्र ह्या सणामध्ये सर्व वाद्यांची पुजा केली जात असते.ह्या दिवशी दक्षिण भारतातील लोक सर्व प्रकारची वाहने तसेच पुस्तके वाद्यांसमोर ठेवतात आणि त्यांची हळद, कुंकु लावून पुजा करीत असतात.

नवरात्रीमधील देवीचे नऊ प्रमुख अवतार आणि नऊ रंग :

नवरात्रीमधील देवीची नऊ प्रमुख अवतार तसेच नवरात्रीचे नऊ प्रमुख रंग पुढीलप्रमाणे आहेत:

देवीचे नऊ प्रमुख अवतार नऊ रंग
देवी शैलपुत्री पिवळा रंग 
ब्रम्हचारीणी हिरवा रंग
देवी चंद्रघंटा राखाडी 
कुष्मांडा नारंगी 
स्कंदमाता पांढरा 
कात्यायनी लाल
कालरात्री निळा
महागौरी गुलाबी 
सिदधीदात्री जांभळा

नवरात्रीत देवीला दाखवायचा नैवेद्य :

पहिला दिवस – देवी शैलपुत्री – तुपाचा नैवैद्य 

दुसरा दिवस – देवी ब्रम्हचारीणी -साखर,मिठाई,

तिसरा दिवस – देवी चंद्रघंटा -दुध,खीर तसेच इतर दुधाचे पदार्थ.

चौथा दिवस – देवी कुष्मांडा -मालपुहा 

पाचवा दिवस – स्कंदमाता – केळी 

सहावा दिवस – कात्यायनी – मध 

सातवा दिवस – कालरात्री – गुळ 

आठवा दिवस – महागौरी – नारळ 

नववा दिवस – सिदधीदात्री – डाळिंब 

अंतिम निष्कर्ष :

अशा प्रकारे आज आपण नवरात्र ह्या सणा विषयी संपूर्ण माहिती जाणुन घेतले आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या नवरात्र (Navratra) किंवा नवरात्री (Navratri) उत्सव विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला नवरात्री 2021 या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

1 thought on “नवरात्री मराठी माहिती | नवरात्र उत्सव मराठी माहिती | नवरात्री माहिती मराठी मध्ये | Navratri Information in Marathi 2021”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *