निषाद कुमार हा २१ वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीट आहे आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये त्याने पुरुषांच्या उंच उडी T ४६/ T ४७ क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. निषादने अमेरिकेच्या डॅलस वाइजशी बरोबरीने दुसरा क्रमांक पटकावला. निषादने २.०६ मीटरचा आशियाई विक्रम केला आहे. आणि, पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताचे हे दुसरे मेगा इव्हेंट पदक आहे.
निषाद कुमारचा जन्म ३ ऑक्टोबर १९९९ रोजी बदाऊ, हिमाचल प्रदेश येथे झाला. वयाच्या ९ व्या वर्षी निषादचा चारा कापण्याच्या मशीनशी अपघात झाला आणि त्याने आपला उजवा हात गमावला. निषादने वर्ष २०१९ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली.

निषाद कुमार जीवनचरित्र । Nishad Kumar Information in Marathi
नाव | निषाद कुमार |
जन्म दिनांक | ३ ऑक्टोबर १९९९ |
जन्म स्थळ | आंब, जिल्हा ऊना, हिमाचल प्रदेश (भारत) |
वय | २१ वर्षे |
आईचे नाव | पुष्पा कुमारी |
वडिलांचे नाव | राशपाल सिंग |
धर्म | हिंदू |
राशी | तूळ |
शिक्षण | पदवीधर |
प्रशिक्षक | सत्यनारायण |
जागतिक क्रमवारी | ३ |
क्रीडा प्रकार | T ४७ उंच उडी |
दिव्यांगत्व वर्ग | T ४७ |
निषाद कुमारांचा जन्म व परिवार :

भारतीय पॅरा ॲथलीट निषाद कुमारचा जन्म ३ ऑक्टोबर १९९९ रोजी हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आंब शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राशपाल सिंग आहे. त्यांचे वडील गवंडीकाम करतात. त्यांच्या आईचे नाव पुष्पा कुमारी असून त्या गृहिणी आहेत. त्याच्या बहिणीचे नाव रमा कुमारी आहे.
निषाद कुमारचे शिक्षण :
निषाद कुमार लव्हली व्यावसायिक विश्वविद्यालय, पंजाब (LPU) येथून शारीरिक शिक्षण विषयात पदवीधर आहे.
निषाद कुमारचे वय व व्यक्तिगत माहिती :
भारतीय पॅरा ॲथलीट निषाद कुमार सध्या २१ वर्षाचा आहे. (वर्ष २०२१ प्रमाणे)
तो अविवाहित आहे.
निषादला पुस्तके वाचण्याचा छंद आहे. त्याचा आवडता अभिनेता अक्षय कुमार आहे आणि आवडती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.
निषाद कुमारचे प्रशिक्षक :
प्रशिक्षक सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली निषाद कुमारने स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया, बेंगलोर येथे प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षक सत्यनारायण हे रिओ पॅरालिम्पिक २०१६ मधील T42 पुरुष उंच उडी सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगावेलूचे प्रशिक्षक होते आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये ही होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली निषाद कुमार आणि मरियप्पन थंगावेलू या दोघांनीही पॅरालिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकले.
निषाद कुमारचे करियर :
- वयाच्या 8 व्या वर्षी निषादचा आईला मदत करताना चारा कापण्याच्या मशीनसोबत अपघात झाला. या अपघातात त्याने उजवा हात गमावला. त्यानंतर, शांत न बसता भविष्याचा विचार करत त्याने क्रिडा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याला त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला.
- अपघाताच्या २ वर्षांनंतर, त्याने २००९ साली पॅरा ॲथलेटिक्स मधील आपला प्रवास सुरू केला. त्याने सुरुवातीचे उंच उडीचे प्रशिक्षण कतोहर खुर्दमध्ये प्रशिक्षक रमेश यांच्या मार्गर्शनाखाली घेतले.
- त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात, त्याने शाळेत त्याच्यापेक्षा शारीरिकरित्या सक्षम ॲथलीटंसह सराव केला.
- २०१३ साली, त्याने पटियाला येथील राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये सब ज्युनियर या गटात रौप्य पदक जिंकले.
- सन २०१७ मध्ये त्याने ताऊ देवीलाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पंचकुला येथून प्रशिक्षण घेतले.
- त्यानंतर, तो प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, पंचकुला क्रीडा स्पर्धेत खेळला आणि रौप्य पदकासह १.८३ मीटर उंच उडी मारली.
- सन २०१९ मध्ये, त्याने दुबईच्या जागतिक पॅरा ग्रॅंड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले.
- त्याच वर्षी, त्याने दुबईच्या फाझा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्येही सुवर्णपदक मिळवले.
- आता, टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्येही त्याने रौप्य पदक जिंकत आपले स्वप्न पूर्ण केले.
निषाद कुमारची शारीरिक माहिती :
निषाद कुमारची उंची ६ फूट ३ इंच (१९० सेमी) आहे.
निषादचे वजन ६२ किलो आहे.
त्याचा वर्ण गोरा आहे. त्याच्या केसांचा रंग काळा आणि डोळ्याचा रंगही काळा आहे.
निषादला उजव्या हाताचे दिव्यांगत्व आहे. त्याचा क्रिडा प्रकारात दिव्यांगत्व वर्ग T ४७ आहे.
[ दिव्यांगत्व वर्ग T ४७ म्हणजे काय? = कोपर किंवा मनगटाचे विच्छेदन किंवा कमजोर असलेले ॲथलीट. ]
निषाद कुमारची कामगिरी आणि विक्रम :
वर्ष | कामगिरी | T ४६/T ४७ उंच उडी (मीटर मध्ये) |
२०१३ | पटियाला येथील राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये रौप्य पदक | माहीत नाही |
२०१७ | राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, पंचकुला मध्ये रौप्य पदक | १.८३ |
२०१९ | जागतिक पॅरा ग्रॅंड प्रिक्स चॅम्पियनशिप, दुबई मध्ये कांस्य पदक | १.९९ |
२०२१ | दुबईतील फाझा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्णपदक | २.०६ |
२०२१ | टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक | २.०६ |
निषाद कुमारचे विक्रम :
निषादने टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये T ४७ पुरुषांच्या उंच उडी क्रीडा प्रकारात २.०६ मीटरचा आशियाई आणि राष्ट्रीय विक्रम केला आहे.
निषाद कुमारला प्राप्त पुरस्कार :
निषादला आतापर्यंत पुरस्कार मिळाले नाहीत.
निषाद कुमारचे सोशल मीडिया अकाउंट्स :
Instagram : Click here
Twitter : Click here
निषाद कुमारची टोकियो पॅरालिम्पिक २०२० मधील कामगिरी:
- निषाद कुमार कोविड १९ मधून बरा झाला आणि बेंगलोरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) येथे पॅरालिम्पिकसाठी तयारी केली.
- निषाद कुमार टोकियो पॅरालिम्पिक २०२० साठी पात्र ठरला. दिल्ली मध्ये निवड चाचणीतच त्याने सर्वोत्कृष्ट २.०७ मीटर उडी मारली.
- टोकियो पॅरालिम्पिकसाठी त्याने पहिल्या प्रयत्नात २.०२ मीटर आणि नंतर त्याने २.०६ मीटर उडी मारली.
- त्याने रौप्य पदक पटकविले आणि द्वितीय स्थान मिळवले.
- तसेच, अमेरिकेच्या डॅलस वाइजनेही २.०६ मीटर उडी घेतली परंतु निषाद कुमारच्या मागील उडीमुळे त्याला रौप्य पदक मिळाले.
- निषादने आपले रौप्य पदक डॅलस वाइज सोबत विभागून घेतले.
- अमेरिकन ॲथलीट रॉडरिक टाऊनसेंडने २.१५ मीटर गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे आणि हा त्याने केलेला पॅरालिम्पिक विक्रम आहे.
- निषाद कुमारने हे पदक टेबल टेनिसमधील भाविना पटेल नंतर टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारतासाठी दुसरे पदक आणले.
- त्याच्या यशाचा आनंद परिवाराने व गावातील लोकांनी जल्लोषात साजरा केला.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निषाद कुमार याच्या टोकियो पॅरालिम्पिक २०२० मधील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यासाठी ट्विट केले.
- हरियाणा सरकारने पॅरालिम्पिकमधील २०२० विजयासाठी निषादला १ करोड रुपये जाहीर केले.
- टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्य पदकांसह एकूण १९ पदके मिळवून पदकतालिकेत २४ वे स्थान प्राप्त केले.
Frequently Asked Questions On Nishad Kumar In Marathi (FAQ) :
निषाद कुमार हा T ४७ उंच उडी क्रीडा प्रकारातील भारतीय पॅरा ॲथलीट आहे ज्याने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले.
निषाद कुमार २१ वर्षाचा आहे.
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये निषाद कुमारने रौप्य पदक जिंकले.
T ४६/T ४७ पुरुष उंच उडी क्रीडा प्रकार.
अमेरिकन ॲथलीट रॉडरिक टाउनसेंडचे T ४६/T ४७ पुरुष उंच उडी क्रीडा प्रकारात २.१५ मीटर पॅरालिम्पिक रेकॉर्ड आहे.
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :