Home » Jobs & Education » Essay Writing » ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी | Online Education Essay In Marathi

ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी | Online Education Essay In Marathi

आजच्या या लेखात आपण ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान, Online Education Essay In Marathi, ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे, online shikshanache fayde in marathi, ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य, online shikshan marathi nibandh, online school essay in marathi या विषयावर एक निबंध बघू. ऑनलाइन (Online) शिक्षणाचे फायदे व तोटे या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.

ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

ऑनलाइन शिक्षण शाप की वरदान | ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य | ऑनलाइन (Online) शिक्षणाचे फायदे व तोटे निबंध मराठी

आजकाल कोरोना महामारीच्या काळात सर्वच काही ऑनलाइन होत चालले आहे. एवढेच काय तर लहान मुलांपासुन मोठया मुलांपर्यत सगळयांचेच शिक्षण सुदधा आँनलाईन होऊ राहिले. आपली तरुण पिढी ही नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षण करते आहे.

झुम मिटिंग वगैरे सारखी अँप्लीकेशनचा वापर ऑनलाइन लेक्चर्ससाठी केला जातो आहे.सर्व मुले मुली घरबसल्या मोबाईल इंटरनेटच्या द्वारे शिक्षण करता आहे.

पण याच ऑनलाइन शिक्षणाचे काही तोटे पण आहेत. जसे की विदयार्थ्यांच्या मनात सर्व काही पुन्हा व्यवस्थित झाल्यावर शाळा तसेच महाविदयालयात जाण्याची ईच्छाच निर्माण नही झाली तर?हा सुदधा एक चिंतेचा विषय आहे.कारण मुलांना आपण जशी सवय आपण लावत असतो.तशी सवय त्यांना लागत असते.

म्हणजेच ऑनलाइन शिक्षणाची जशी जमेची बाजु दाखवणारे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे तोटे देखील आपणास दिसुन येतात.

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे :

 • ऑनलाइन शिक्षणासाठी शाळा तसेच महाविद्यालयात जाण्याची कोणतीही आवश्यकता नसते. दररोज घराबाहेर निघणे अणि शाळा महाविदयालयापर्यत पायी तसेच सायकलने जाण्याची तसदी घेण्याची आवश्यकता नसते. कारण आँनलाईन शिक्षण झाल्यामुळे आपली उर्जा अणि वेळ दोघांची बचत होते.
 • ऑनलाइन तासिका चालु असताना एखादा मुददा जर एखाद्या विदयार्थ्याला समजलाच नाही तर तो मुददा पुन्हा नीट व्यवस्थित समजून घेण्यासाठी विदयार्थी त्या लेक्चरची रिकाँर्डिंग सुदधा पुन्हा ऐकु शकतात.
 • आँनलाईन शिक्षणाचा सगळयात महत्वाचा फायदा हा सुदधा आहे की आपण देशातीलच नव्हे तर परदेशातील शिक्षण कोणत्याही संस्थेद्वारे आँनलाईन पदधतीने प्राप्त करू शकत असतो.
 • आपल्या अभ्यासक्रमातील जे मुददे किंवा घटक आपल्याला समजलेले नसतील त्यांची माहीती आपण गुगल तसेच युटयुबवरून देखील वेगवेगळया लेक्चर व्हिडिओच्या माध्यमातुन मिळवू शकतो.
 • आँनलाईन शिक्षणामुळे शाळा महाविदयालयात आपण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे जो कोरोना संक्रमणाचा धोका संभवत होता.कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची जी भीती जाणवत होती ती भीती काही प्रमाणात का होईना दुर झाली कोरोनामुळे जो धोका उदभवणार होता तो काही प्रमाणात टळला. कारण आँनलाईन शिक्षणामुळे आपण सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करू शकलो.ज्याचा लाभ म्हणुन कोरोनाच्या संसर्गात वाढ होणे कमी देखील झाले.
 • आँनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी अधिक गोडी निर्माण झाली.कारण असेही लहान मुलांपासुन तर तरुण पिढी मोबाईलवर दिवसभर गेम खेळण्यात तसेच सोशल मिडिया हाताळण्यात लागलेली असते.अणि त्यातच शिक्षणही आँनलाईन झाल्यामुळे अशा विदयाथ्यांसाठी अधिक सोन्याहुन पिवळे झाले.कारण गेम्स खेळणे सोशल मिडियावर चँटिंग करणे ह्या सवलतींसोबत घरबसल्या त्यांना शिक्षणही आता मोबाईलवरच प्राप्त करून दिले जाते 

आहे.

 • आँनलाईन शिक्षणामुळे मुले मोबाईल, कंप्युटर, लँपटाँप हाताळायला शिकु राहिली.ज्याचा खुप चांगला फायदा त्यांना भविष्यात होणार आहे.
 • आँनलाईन शिक्षणामुळे सकाळी सकाळी मुलांसाठी टिफिन तयार करणे, त्यांची तयार करणे,त्यांना शाळेत सोडायला जाणे यात जो वेळ पालकांना लागायचा तो आता कमी झाला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचे तोटे तसेच त्यात येणारी अडचण :

 • ऑनलाइन शिक्षणाचा तोटा हा आहे की आपल्या देशातील खुप विदयाथ्यांची आर्थिक परिस्थिती बळकट नाहीये. म्हणून ते आँनलाईन शिक्षणासाठी एवढा महाग अँड्राईड मोबाईल, लँपटाँप कंप्युटर घेऊ शकत नसतात. कारण त्यांची तेवढी आर्थिक कुवतच नसते. अणि म्हणुन असे गरजू पण मागास विदयार्थी हे ऑनलाइन शिक्षणापासुन नेहमी वंचितच राहत असतात.
 • आँनलाईन शिक्षणाला बहुतेक विदयार्थी गाँभीर्याने घेत नसतात. चालु लेक्चरला एकमेकांशी गप्पा मारतात, वेळेवर आँनलाईन लेक्चरला हजर राहत नाही.
 • आँननलाईन शिक्षणामधील सगळयात मोठी अडचण म्हणजे नेटवर्कचा प्राँब्लेम येणे.कारण आँनलाईन लेक्चर चालू असताना एखाद्याचे नेटवर्क गेले तर लेक्चरमध्ये शिकविलेला अर्धा भाग त्याचा अपुर्ण राहुन जातो.म्हणुन आँनलाईन शिक्षणासाठी उत्तम नेटवर्क असणे पण फार गरजेचे असते.
 • मोबाईलसमोर तसेच कंप्युटरसमोर जास्त वेळ बसल्याने बहुतेक विदयाथ्यांना डोळयांचा तसेच कानांचा देखील त्रास होण्याची दाट संभावना असते.
 • मोबाईलवर रोजचा अभ्यास असल्यामुळे मुलांचे मन अभ्यासाव्यतीरीक्त इतरही गोष्टींकडे विचलित होण्याची दाट शक्यता मोबाईलवरील लँपटाँपवरील आँनलाईन शिक्षणात असते.
 • आँनलाईन शिक्षणात कोणता विदयार्थी काय करतो आहे?हे शिक्षकांना विदयाथ्यांनी त्यांचा व्हिडिओ बंद ठेवल्यावर अजिबात दिसत नसते. ज्यामुळे बहुतेक विदयार्थी आँनलाईन लेक्चरला झोपा देखील काढत असतात.
 • घरी बसुन शिक्षण केल्यामुळे कोणत्याही विदयाथ्याला आपल्या मित्र मैत्रीणींशी भेटता येत नाही.कारण सर्व अभ्यास तसेच लेक्चर देखील आँनलाईनच होत असतात.ज्यामुळे विदयाथ्याला घराबाहेर पडता येत नसते. ज्याचे परिणामस्वरूप तो एकलकोंडा बनत असतो.
 • मुलांकडे नीट पालकांनी व्यवस्थित लक्ष न ठेवल्यास त्यांना मोबाईलचा योग्य तो वापर करायची शिकवण न दिल्यास मुलगा त्याच मोबाईलचा गैरवापर देखील करू शकतो.

अशा पदधतीने आज आपण ऑनलाइन शिक्षण शाप आहे तर ते का शाप आहे? अणि वरदान आहे तर का वरदान आहे? हे दोन्ही अंगांनी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

1 thought on “ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी | Online Education Essay In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *