ओव्हरड्राफ्ट, ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, ओव्हरड्राफ्ट मराठी अर्थ (Bank OD Meaning in Marathi, OD Account Meaning in Marathi, Avail Overdraft Meaning in Marathi, Bank Overdraft Meaning in Marathi, Overdraft Facility in Marathi, Overdraft Facility Meaning in Marathi, Overdraft in Marathi, Overdraft Loan Meaning in Marathi, Overdraft Marathi Meaning, Overdraft Meaning in Marathi Language, Overdraft Meaning Marathi, Overdraft Meaning In Marathi, Overdraft Account Meaning In Marathi, Overdraft Account Bank Of Maharashtra Meaning In Marathi)
आपल्या सर्वांचे बँकेत खाते असेलच पण त्यासंबंधित बँकेने पुरवलेल्या सर्व सुविधांचा, माहितीच्या अभावामुळे आपण लाभ घेत नाही. त्यापैकीच एक Overdraft सुविधा होय. Overdraft म्हणजे काय? Overdraft चा अर्थ काय आहे? Overdraft चे फायदे व तोटे काय?
तर आता आपण या लेखात Overdraft बद्दलची संपूर्ण माहिती पाहुयात –
Overdraft Meaning In Marathi | ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय
“खात्यातून काढलेली अतिरिक्त रक्कम = Overdraft”
- Noun (नाम) : Overdraft
व्याकरणदृष्ट्या Overdraft हे Noun (नाम) म्हणून वापरले जाते.
- Overdraft चा मराठीत शब्दश: अर्थ :
‘ खात्यातून काढलेली अत्तिरिक्त रक्कम ‘ असा Overdraft चा होतो.
- Synonyms (समानार्थी शब्द ) :
ठराविक काळासाठी कर्ज, अतिकाढ, अधिकर्ष, ठेवीपेक्षा जास्त पैसे काढणे,
साहित्य लेखा मध्ये अतिशयोक्ती, बँक खात्यातील रक्कमेपेक्षा जास्त पैसे काढणे, अतिरिक्त कर्जरक्कम घेणे, बँक खात्यापेक्षा जास्त पैसे काढा
- Overdraft चा संज्ञा (Definition) / स्पष्टीकरण (Explanation) :
ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेद्वारे दिली जाणारी सुविधा आहे, ज्याच्या अंतर्गत खातेदार आपल्या बँक खात्यामधून शिल्लक रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम काढू शकता.
- Overdraft meaning in Hindi :
जब बैंक खाता में कम रकम हो, तो खातेदार अपने खाता से ज्यादा रकम ब्याज पे निकाल सकते है इस सुविधा को ‘ओव्हरड्राफ्ट’ कहते है |
- Overdraft ची उदाहरणे :
- Some banks offer Special deal on Overdraft for Account Holders. – काही बँका खातेदारांना ओव्हरड्राफ्ट साठी विशिष्ठ सुविधा देतात.
- Choose low Overdraft Charges Banks – कमी ओव्हरड्राफ्ट चार्जेस आकारणारी बँक निवडा.
Overdraft Information In Marathi (ओव्हरड्राफ्ट बद्दल माहिती):
- जेव्हा आपल्या बँकेच्या खात्यामध्ये रक्कम अपुरी असते, तेव्हा बँक आपल्याला गरजेकरिता थोडी रक्कम उधार देते. यालाच सोप्या भाषेत ‘पैसे उधार देणे’ म्हणतात.
- ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारे बँकेने दिलेले कर्ज होय. म्हणूनच यावर व्याज आकारले जाते. बँका ओव्हरड्राफ्टसाठी प्रोसेसींग फी आकारतात.
- काही बँका खाते काढल्यापासून, तर काही बँका अर्ज केल्यावर सुविधा देतात.
- ही सुविधा खाजगी आणि सरकारी बँकासुद्धा पुरवतात.
बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा ही खातेदाराच्या FD, वेतन किंवा विमा यावरती अवलंबित असतात.
ग्राहक ज्या खात्यात आपले वेतन स्वीकारतात त्या बँक खात्यात बँक ही सुविधा जलद पुरविते. काही बँकांद्वारे नेहमी व्यवहार असल्याने कमी व्याजदर सुध्दा घेतले जाते. ग्राहकाचे किमान वेतन १५ ते २० हजार असावे.
विमा पॉलिसीवर आधारित:
खातेदार विमा पॉलिसी तारण म्हणून ठेऊन ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकतात. ओव्हरड्राफ्टची रक्कम विम्याच्या किंमतीवरती अवलंबून असते.
एफडीवर (FD) आधारित:
खातेदाराला त्याच्या Fixed Deposit च्या ७५% ओव्हरड्राफ्ट मिळू शकते. यावरती बँकेकडून व्याजदर कमी आकारतात.
याबरोबरच ओव्हरड्राफ्ट हे चालू खाते, बचत खाते आणि शेअर्स किंवा ब्रॅण्डवर सुध्दा उपलब्ध असते
बॅंक ओव्हरड्राफ्ट अर्थ (Bank Overdraft meaning in Marathi) | Bank OD Meaning in Marathi
बँक खातेधारकाला जर आपल्या बँक खात्यातील रक्कम अपुरी पडत असल्यास या सुविधेचा लाभ घेऊ शकता. बँक ओव्हरड्राफ्ट अंतर्गत खातेदार अतिरीक्त रक्कम बँकेकडून घेऊ शकतात. त्यावरती बँकेद्वारे व्याज आकारले जाते.
ओव्हरड्राफ्ट लिमिट म्हणजे काय? (Overdraft limit meaning in Marathi) :
आपण ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर मर्यादित स्वरूपातच करु शकतो. बँक प्रत्येक खातेदारास ठराविक रक्कम काढण्याची परवानगी देते. यालाच ‘ओव्हरड्राफ्ट लिमिट’ असे म्हणतात.
Benefits Of Overdraft (ओव्हरड्राफ्टचे फायदे) :
- कमी कागदपत्रे
- लोकांकडून उधार न घेता, ओव्हरड्राफ्ट तात्काळ भासणारी पैशांची आवश्यकता पूर्ण करते.
- बँकेमार्फत वापरलेल्या रकमेवरतीच फक्त व्याज घेतले जाते.
Disadvantages Of Overdraft (ओव्हरड्राफ्टचे तोटे) :
- वार्षिक चार्जेस आकारतात.
- जास्त व्याजदर आकारला जातो.
- ओव्हरड्राफ्ट मर्यादा ही खातेदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.
- बँका लवकर परतफेड न केल्यास पेनल्टी चार्जेस आकारतात.
FAQ On Overdraft Meaning In Marathi
Overdraft म्हणजे वापराकरिता दिली जाणारी जास्तीची रक्कम (उधार) होय.
Overdraft ची मर्यादा ही मुख्यतः खातेदाराच्या क्रेडिट स्कोअर आणि बँकेतील व्यवहारावरती अवलंबून आहे.
Overdraft साठी क्रेडिट स्कोर चांगला असावा. तसेच नियमित बँक व्यवहार असावेत.